रशियन अभिनेत्री Yulia Peresild अंतराळवीर Anton Shkaplerov आणि सिनेनिर्माते Klim Shipenko स्थानकात जाण्याच्या ट्रेनिंग दरम्यान -फोटो -Roscosmos
नासा संस्था -2 ऑक्टोबरनासाचे रशियन अंतराळवीर Anton Shkaplerov पाच तारखेला चवथ्यांदा अंतराळस्थानकात राहण्यासाठी जाणार आहेत त्यांच्या सोबत रशियातील सिनेनिर्माते Klim Shipenko आणिअभिनेत्री Yulia Peresild हे दोघेही स्थानकात जाणार आहेत तेथे ते रशियन सिनेमाचे शूटिंग करणार आहेत
हे तिघेही पाच तारखेला मंगळवारी कझाकस्थानातील बैकोनूर येथील उड्डाणस्थळावरून सोयूझ MS-19 ह्या अंतराळयानातून स्थानकात जाण्यासाठी अंतराळात उड्डाण करणार आहेत त्यांचे सोयूझ यान स्थानिक वेळेनुसार सकाळी 4.55मिनिटाला ह्या तिघांना घेऊन अंतराळात झेपावेल आणि 8 वाजून बारा मिनिटाला स्थानकाजवळ पोहोचेल सोयूझ अंतराळयान स्थानकाजवळ पोहोचल्यानंतर अंतराळात दोन फेऱ्या मारेल दोन तासांनी सोयूझ यान आणि स्थानक ह्याच्यात संपर्क होईल त्यानंतर यान आणि स्थानक ह्यांच्यातील Docking आणि Hatching प्रक्रिया पार पडेल यान आणि स्थानकातील ह्या दोन्ही प्रक्रिया पार पडल्यानंतर ह्या तिघांचा स्थानकात प्रवेश होईल सध्या स्थानकात राहात असलेले अंतराळ मोहीम 65 चे अंतराळवीर ह्या तिघांचे स्थानकात स्वागत करतील
अभिनेत्री Yulia Peresild आणि निर्माते Klim Shipenko हे पहिल्यांदाच अंतराळ प्रवास करणार आहेत हे दोघेही स्थानकात बारा दिवस मुक्काम करणार आहेत ह्या बारा दिवसाच्या वास्तव्यात सिनेनिर्माते Klim "Challenge" ह्या फिचर फिल्मचे शूटिंग करणार असून त्यात अभिनेत्री Yulia चाही सहभाग आहे अंतराळस्थानकातील झिरो ग्रॅव्हीटीत अंतराळवीर कसे राहतात त्यांना त्या विपरीत वातावरणात राहताना कोणकोणत्या समस्यांना सोमोरे जावे लागते याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन स्थानकातील अंतराळवीरांच्या निवासादरम्यानच्या जीवनमानाचे चित्रीकरण ते करणार आहेत शिवाय भविष्यकाळात अंतराळविश्वात व्यावसायिक दृष्ठ्या सिनेसृष्ठीसाठी काय आव्हानात्मक संधी उपलब्ध होतील ह्याचा आढावाही ते घेणार आहेत ह्या स्थानकातील सिनेशुटिंगसाठी आणि अंतराळस्थानकातील वास्तव्यासाठी ह्या दोघांनी रशियन अंतराळसंस्था Roscosmos आणि Moscow based Media Entities ह्यांच्याशी व्यावसायिक करारनामा साइन करून रीतसर परवानगी घेतली आहे
सिनेनिर्माते Klim आणि अभिनेत्री Yulia हे दोघे अंतराळवीर Oleg Novitskiy ह्यांच्यासोबत 16 ऑक्टोबरला सोयूझ MS-18 ह्या अंतराळयानातून पृथ्वीवर परतणार आहेत तर अंतराळवीर Anton Shkaplerov हे मात्र मार्चपर्यंत स्थानकात राहून तेथे सुरु असलेल्या संशोधनात सहभागी होणार आहेत आणि नंतर अंतराळवीर Vande Hei आणि अंतराळवीर Dubrov ह्यांच्यासोबत पृथ्वीवर परततील
ह्या तिघांच्या अंतराळउड्डाण,स्थानकातील Hatching, Docking आणि स्थानकातील प्रवेशाचे लाईव्ह प्रसारण नासा T.V. वरून करण्यात येणार आहे
No comments:
Post a Comment