Thursday 22 July 2021

Blue Origin कंपनीच्या New Shepard अंतराळयानाने केला अंतराळ पर्यटनाचा शुभारंभ

  

 Blue Origin कंपनीच New Shepard कमर्शियल अंतराळयान अंतराळवीरांसह अंतराळात झेपावताना

Blue Origin - 21जुलै 

अमेरिकेच्या स्वयंनिर्मित Space X Crew Dragonने अमेरिकेची बंद पडलेली अंतराळ उड्डाण मोहीम पुन्हा यशस्वी केल्यानंतर आता अमेरिकन व्यावसायिकांनी अंतराळातविश्वात अंतराळ पर्यटन मोहीमेची मुहूर्तमेढ रोवली आहे ह्या महिन्यात दोन खाजगी कंपन्यांनी स्वयंनिर्मित अंतराळयानातून नागरिकांना अंतराळ पर्यटन घडवले आहे गेल्या आठवड्यात Sir Richard Branson ह्यांनी त्यांच्या Virgin Galactic कंपनिच्या  Unity अंतराळयानातून अंतराळप्रवासाचा यशस्वी  शुभारंभ केल्यानंतर आता अमेझॉनचे संस्थापक आणि C.E.O Jeff Bezos ह्यांनी देखील New Shepard कमर्शियल अंतराळ यानातून अंतराळ पर्यटनाचा ऐतिहासिक शुभारंभ केला आहे 

 Jeff Bezos and Blue Origin New Shepard crew

             New Shepard यानातील प्रवाशी Oliver ,Jeff Bezos ,Mark Bezos आणि Wally Funk 

वीस जुलैला संध्याकाळी साडेसहा वाजता  West Texas येथील लाँच साईटवरून New Shepard अंतराळ यानाने रॉकेटच्या साहाय्याने अंतराळात झेप घेतली  ह्या अंतराळ यानातून Jeff  Bezos,Mark Bezos ,Wally Funkआणि Oliver Daemen ह्या चौघांनी अंतराळप्रवास केला रॉकेट प्रज्वलनानंतर रॉकेट अंतराळात झेपावले आणि काही मिनिटातच यान रॉकेटपासून वेगळे झाले यानाने आवाजाच्या तिप्पट वेगाने अंतराळात प्रवेश केला पृथ्वीच्या वरच्या वातावरणाची कक्षा भेदून शंभर मीटर उंचीवर (62 मैल )यान पोहोचताच सर्वांनी आनंदाने जल्लोष केला ह्या दहा मिनिटांच्या अंतराळ प्रवासादरम्यान चार मिनिटे सर्वांनी गुरुत्वाकर्षण विरहित अवस्था अनुभवली त्या वेळेस त्यांनी  सीटबेल्ट काढून यानात तरंगण्याची मजा लुटली शिवाय New Shepard यानाला असलेल्या अनेक खिडक्यांमधून पृथ्वीच सौन्दर्य न्याहाळताना त्यांनी WOW! अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त केली ह्या चौघांनी पृथ्वी आणि अंतराळातील सीमारेषा असलेली Karman line भेदून अंतराळप्रवास केल्यामुळे त्यांना आता अंतराळवीरांचा दर्जा देण्यात आला आहे उड्डाणानंतर दहा मिनिटांनी अंतराळयान पॅराशूटच्या साहाय्याने सुरक्षितपणे पृथ्वीवर उतरले तेव्हा सर्वांनी एकच जल्लोष केला

 072021-floating3.jpg

New Shepard अंतराळयानातील गुरुत्वाकर्षण विरहित अवस्थेत तारांगण्याचा आनंद लुटताना अंतराळ प्रवाशी 

पृथ्वीवर परतलया नंतर आणि प्रवासाआधी Wally Funk ह्यांचा आनंद आणि उत्साह वाखाणण्याजोगा होता त्यांची कित्येक वर्षांची अंतराळप्रवासाची इच्छा पूर्ण झाली होती ह्या अंतराळयानातून अंतराळात यशस्वी झेप घेणाऱ्या चार अंतराळवीरांमध्ये Wally Funk ह्या 82 वर्षीय माजी अंतराळवीर महिला आहेत त्या माजी पायलट असून त्यांच्या कार्यकाळात त्यांनी विमान उड्डाणादरम्यान आकाशात 19,600 तास व्यतीत केले आहेत साठच्या दशकातच त्यांना अंतराळात जाण्याची इच्छा होती त्या मुळे त्यांनी अंतराळवीरांसाठी आवश्यक असलेल ट्रेनिंग पूर्ण केल होत पण केवळ महिला असल्याने त्यांना अंतराळप्रवास नाकारण्यात आला होता विशेष म्हणजे त्यांनी उत्कृष्ट पायलट म्हणून अनेक बक्षिसेही मिळवली होती पण तरीही त्यांच्यावर अन्याय झाला ह्या अंतराळ मोहिमेमुळे त्यांची त्या वेळेसची हुकलेली संधी त्यांना पुन्हा मिळाली त्या वेळेस त्या एकवीस वर्षांच्या होत्या आता मला पुन्हा पंचविशीत असल्यासारख वाटल असं त्यांनी पृथ्वीवर परतल्यानंतर सांगितल मला ह्या वयात अंतराळप्रवास करायला मिळेल अस स्वप्नातही वाटल नव्हत पण खूप इच्छा होती म्हणून हि संधी दिल्याबद्दल मी Jeff Bezos ह्यांचे विशेष आभार मानते अस मत त्यांनी परतल्यावर व्यक्त केल आता त्यांनी सर्वात जास्त वयाच्या अंतराळप्रवास करणाऱ्या महिला अंतराळवीर होण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे 

 

         New Shepard कमर्शियल यान पॅराशूटच्या साहाय्याने पृथ्वीवर सुरक्षितपणे उतरताना

Oliver Daeman हा सर्वात लहान अंतराळवीर ठरला ह्या अंतराळप्रवासासाठी त्याच्या वडिलांनी कमर्शियल फ्लाईटच तिकीट काढल होत आणि ते दुसऱ्या ट्रिप मध्ये जाणार होते पण ह्या यानातून जाणाऱ्या प्रवाशाला जाण्यास अडचण आल्याने त्यांच  जाण ऐनवेळी रद्द झाल आणि ते तिकीट Oliver च्या वडिलांना मिळाल पण त्यांनी त्यांच्या ऐवजी Oliver ला ह्या अंतराळप्रवासाची संधी दिली 

Jeff Bezos आणि Mark Bezos हे दोघे भाऊ आहेत आणि Blue Origin कंपनीचे मालकही New Shepard हे अंतराळयान त्यांनी स्वखर्चांनी निर्मित केल आहे प्रायव्हेट कंपनीने तयार केलेल्या ह्या अंतराळयानाला अधिकृत व्यावसायिक अंतराळ प्रवासाचा परवाना मिळाला आहे आता ह्या विमानातून अंतराळवीराप्रमाणेच हौशी नागरिकांनाही अंतराळात जाता येता येणार आहे शिवाय ह्या अंतराळयानाचा पुनर्वापर अनेकदा करता येणार आहे 

ह्या यशस्वी अंतराळपर्यटन मोहिमेच्या यशस्वीतेनंतर Blue Origin चे CEO Bob Smith म्हणतात ,ह्या मोहिमेच्या यशाने आम्ही आनंदित झालो आहोत आजचा दिवस अंतराळविश्वातील ऐतिहासिक दिवस ठरला आहे विशेषतः मानवी अंतराळ पर्यटनासाठी ह्या मोहिमेतील इंजिनिर्स तंत्रज्ञांच्या टीमने उत्कृष्ठ कामगिरी पार पाडून त्यांचे असामान्य कर्तृत्व सिद्ध केले आहे ह्या मोहिमेचे काम त्यांनी व्यवस्थित पार पाडल्यानेच हि मोहीम यशस्वी झाली अंतराळविश्वातील अंतराळपर्यटनाच्या शुभारंभाचा हा पहिला टप्पा निर्विघ्नपणे पार पडला आहे आता ह्या वाटेवरून भविष्यकालीन मोहीमाही यशस्वी होतील ह्या वर्षी अजून दोनवेळा आम्ही नागरिकांना अंतराळपर्यटन घडवणार आहोत आणि पुढच्या वर्षी अनेक मोहिमाद्वारे नागरिकांना अंतराळपर्यटनाची संधी उपलब्ध करून देणार आहोत त्या मुळे ज्यांना अंतराळ पर्यटन करायचे आहे त्यांनी Blue Origin co. शी संपर्क साधावा अर्थात सध्या तरी त्यासाठी तिकिटाचा खर्च मात्र करोडोत करावा लागेल 

No comments:

Post a Comment