
Blue Origin नस-37चे अंतराळ प्रवासी अंतराळ पर्यटनास निघण्याआधी -Joey Hyde,JasonStansell,Hans Koenigemann,Michaela Benthaus,Neal Mitch आणि Adonis Pouroulis-फोटो -Blue Origin
Blue Origin -24 डिसेंबर
अमेरिकेने अंतराळ विश्वातील व्यावसायिक अंतराळ ऊड्डाणासाठी खाजगी कंपन्याना मान्यता दिल्यानंतर Blue Originने अंतराळ पर्यटनाचा शुभारंभ केल्यानंतर त्याला मिळालेला सामान्य नागरिकांचा ऊत्स्फुर्त प्रतिसाद वाढतच आहे त्यामुळे आता हि अंतराळ पर्यटन मोहीम नियमित सुरु झाली आहे 20 डिसेंबरला Blue Origin -NS -37 मोहिमेअंतर्गत सहा अंतराळ प्रवासी अंतराळ पर्यटन करून परतले ह्या पर्यटकांमध्ये Michaela (Michi) Benthaus, JoeyHyde ,Hans Koenigsmann, Neal Mitch, Adonis Pouroulis , Jason Stansell ह्यांचा समावेश होता ह्या वेळेसच्या मोहिमेचे वैशिष्ठ म्हणजे ह्या पर्यटकांमध्ये प्रथमच अपघाती अपंगत्व आलेल्या तरुणीचा समावेश होता
ह्या पर्यटकांविषयी- Florida येथील Joey Hyde Physicist आहेत त्यांनी त्यांच्या आजोबा सोबत 1988 मध्ये Space Shuttle Atlantis चे उड्डाण पाहिले त्यांना तेव्हापासूनच त्यांना अंतराळ उड्डाणाची आवड निर्माण झाली German American Aerospace Engineer Hans ह्यांनी Space X energy Sector मध्ये काम केले आहे त्यांनी Reusable Spacecraft आणि Launch Vehicles मध्ये करिअर केले ते परवानाधारक पायलट आहेत त्यांनी स्वत:साठी विमान बनवले Neal नामांकित व्यावसायी आहेत त्यांची वडिलोपार्जित Laundry Lux कंपनी आहे त्यांनी Biomedical Research Institute विश्वस्त मंडळाचे ते अध्यक्ष आहेत त्यांनी विशेषतः Genetic Research ला प्राधान्य दिले आहे Adonis Entrepreneur Investor नामांकित उद्योजक आणि Mining Engineer आहेत West Texas चे रहिवासी Jason Stansell Software Engineer आहेत त्यांनी स्वत:च्या अंगणातून अनेक व्यावसायिक अंतराळ उड्डाणे पाहिली ते साहसी उत्साही आणि विज्ञानप्रेमी आहेत त्यांना स्कुबा डायविंग,कार मोटार सायकल ड्रायविंग व विमान उड्डाणाची आवड आहे हे अंतराळ पर्यटन 2016 मध्ये कर्करोगाने निधन पावलेला त्यांचा भाऊ Kevin ला समर्पित करणार आहेत
Michaela -Aerospace & Mechatronics Engineer आहे -Michi European Space Agency मध्ये कार्यरत आहे लहाणपणापासूनच तिला अंतराळविश्वाची आवड होती तिला खेळाची आणि पर्वतारोहणाची देखील आवड आहे 2018मध्ये Mountain Biking करताना तिचा अपघात झाला तिच्या पाठीच्या कण्याला इजा झाली त्यामुळे तिचे पाय निकामी झाले चालण्याची क्षमता गेली तरीही न डगमगता तिने तिची आवड जोपासत अंतराळवीर होण्यासाठी प्रयत्न केले न्यायालयात वकिली केली आणि 2022मध्ये Analog Astronaut Mission अंतर्गत रिसर्च उड्डाणात सहभागी झाली आता प्रथमच अपंग व्यक्तीही अंतराळ पर्यटन करू शकतो हे तिने प्सिद्ध केले आहे
हे सहाही अंतराळ पर्यटक Blue Origin च्या West Texas येथील उड्डाण स्थळावरून सकाळी सव्वा आठ वाजता (CT ) New Shepard अंतराळ यानातून रॉकेटच्या सहाय्याने अंतराळात झेपावले काही वेळातच अंतराळयानातील स्वयंचलित यंत्रणा कार्यरत झाली अंतराळयान रॉकेट पासून वेगळे झाले आणि अंतराळाच्या दिशेने मार्गस्थ झाले
यानाने अत्यंत वेगाने अंतराळ प्रवास करीत काही मिनिटातच पृथ्वी आणि अंतराळ ह्यांच्यातील 62 मैल (100k.m) अंतरावरील करमन रेषा भेदून अंतराळातील झिरो ग्रॅविटीत प्रवेश केला तेव्हा सर्वजण सीटच्या बाहेर पडले आणि झिरो ग्रॅव्हीटीत तरंगण्याचा अद्भुत आनंद घेतला त्या वेळी सर्वाच्या तोंडुन ऊत्स्फुर्त प्रतिक्रिया बाहेर पडल्या "Wow !We are in Space !This is amazing Indescribable feeling ! The Earth & Atmosphere is Awesome!"

Blue Origin चे New Shepard अंतराळयान अंतराळात पोहोचल्यावर Michi आणि Hans अंतराळ पर्यटनाचा आनंद घेताना -फोटो -Blue Origin
अवघ्या दहा बारा मिनिटांचा पृथ्वी ते अंतराळ असा अद्भुत प्रवास करून हे सहाही पर्यटक पृथ्वीवर सुखरूप परतले तेव्हा त्यांनी हा अंतराळ पर्यटनाचा लाभ सामान्य नागरिकांना दिल्याबद्दल Blue Origin कंपनीचे आभार मानले
Michi अंतराळयानातून हसतमुखाने बाहेर पडली तेव्हा तेथे जमलेल्या सर्वांनी तिचे टाळ्या वाजवून स्वागत केले त्या वेळी Michi भावनिक झाली होती ती म्हणाली," खूप सुंदर अनुभव होता मी अंतराळात वर खाली तरंगत होते माझे पायही ठीक होते मी अंतराळातील ते दृश्य पाहून हसू शकले त्या प्रत्येक क्षणाचा आनंद उपभोगू शकले Awesome ! माझ्या अपघातानंतर मी माझे अंतराळात जाण्याचे स्वप्न पूर्ण होण्याची आशा सोडली होती पण मी लकी ठरले माझे अंतराळात पर्यटन करण्याचे स्वप्न Blue Origin मुळे पूर्ण झाले त्या बद्दल त्यांचे आभार अंतराळ सर्वांसाठी खुले आहे त्या मुळे कितीही संकटे आली तरी तुम्ही तुमचे ध्येय सोडू नका जगात अशक्य काहीही नाही तुमचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करत राहा अशी प्रितिक्रिया तिने व्यक्त केली

NS -37 मोहिमेतील अंतराळवीर Michaela Benthaus अंतराळ पर्यटनावरून परतल्यानंतर -फोटो -Blue Origin
Hans -मी लहानपणापासून Mission Control मधून अनेक अंतराळयानाचे ऊड्डाण पाहिले होते आणि आज मी प्रत्यक्षात अंतराळ यानात बसलो होतो खूपच अभूतपूर्व सुंदर क्षण होता तो आणि यान झिरो ग्रॅव्हीटीत शिरल्यावर अचानक बसल्या जागेवरून कुणीतरी खूप जोरात प्रचंड दाबाने बाहेर ढकलल्याचा अनुभव आला आणि क्षणात साऱ्यांचीच स्थिती सारखी झाल्याच लक्षात आल वजनरहित अवस्थेत सर्वचजण तरंगू लागलो आम्ही खाली पृथ्वीकडे पाहील ते दृश्य खूप अप्रतिम होत पण आजूबाजूचा काळोख माझ्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त होता खूप अद्भुत अनुभव होता !"
Neal -खूप सुंदर अनुभव होता पृथ्वीवर ट्रेनिंग घेतलं तरीही झिरो ग्रॅव्हीटीतला वजन रहित अवस्थेत तरंगण्याचा अनुभव अनपेक्षित होता आपण आपल्याला सावरू शकत नाही आणि तिथून पृथ्वीदर्शनचा क्षण अमूल्य आहे पण तिथून दिसलेली अंतराळ आणि पृथ्वीमधली निळी पातळ रेषा आपल्या दृष्टीकोनात बदल घडवते आपल्याला पृथ्वी संवर्धनाचे पर्यावरण रक्षणाचे महत्व कळते हे ह्या पर्यटनाचे ठळक वैशिष्ठ आहे Blue Origin चे हे व्यावसायिक अंतराळ पर्यटन Extraordinary आहे !'
Joeys -ह्यांचा आज वाढदिवस होता आणि पर्यटकांनी उड्डाणा आधी अंतराळयानात Happy Birth Day song गाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या ,"माझ्या आयुष्यातील अंतराळयानात साजरा झालेला हा पहिला वाढदिवस उर्वरित आयुष्यात कायम लक्षात राहील अंतराळातील Zero G मधला Intense Kinetic Force खूप सुंदर थ्रिलिंगअनुभव असामान्य होता झिरो ग्रॅव्हीटीत प्रवेश केल्यावर माझ्या मेंदूतील संवेदना बधिर झाल्या अचानक सगळ जग गोलाकार फिरू लागल्याची जाणीव झाली आम्ही सर्व दिशेने तरंगू लागलो सगळ्यांनी एकमेकाला Hi केल आणि मी सायंटिफिक प्रयोग केला मी चेंडू भिरकावला आणि तो किती अंतरावर जातो ते पाहील तोही तरंगू लागला ह्या अमूल्य अद्भुत अनुभवासाठी Blue Origin चे आभार !"
ह्या सहाही अंतराळ पर्यटकांना त्यांची कर्तृत्व वैशिष्ठे कोरलेला NS-37-Mission Patch व अंतराळवीर झाल्याचे सर्टिफिकेट देऊन गौरवण्यात आले

DNA-Neal ह्यांच्या साठी विज्ञानाचे महत्व आणि प्रभाव ,पाणघोडा Michi साठी आवडत्या प्राण्याचे प्रतीक Adonis ह्यांच्यासाठी Baobab tree ,Joey ह्यांच्यासाठी Spiral galaxy Symbolizes ,Dog bone shape,stars,K Jason ह्यांच्या भावासाठी
हे अंतराळ पर्यटक पृथ्वीवर परतल्यानंतर Blue Origin चे Senior Vice President - Phil Joyce ह्यांनी त्यांचे अभिनंदन केले ते म्हणाले," NS मोहिमेअंतर्गत आजवर 92 नागरिकांनी अंतराळ पर्यटन केले NS -37 हे ह्या वर्षातील 9वे अंतराळ पर्यटन होते येत्या वर्षात त्यात आणखी वाढ होईल ह्या मोहिमेद्वारे आजवर जगभरातील सायंटिस्ट,इंजिनीअर्स ,व्यावसायिक,डॉक्टर्स,अंतराळविश्व आणि सोशल माध्यमातील व्यक्तीसह अनेकांनी अंतराळ पर्यटनाचा अनुभव घेतला प्रत्येक उड्डाणानंतर त्यांच्या दृष्ठीकोनातील बदल आम्हाला प्रेरित करत ह्या मोहिमेतील Michi चे पर्यटन अंतराळ सर्वांसाठी खुले आहे हे सिद्ध करते तीच स्वप्न पूर्ण होण्यासाठी आमची मदत झाली ह्याचा आम्हाला अभिमान वाटतो New Shepard अंतराळ यानाची रचना अद्ययावत असल्यामुळे आणि Launch Tower Lift असल्यामुळे अपंग ,अंध मूक बधिर व्यक्तीही त्याचा लाभ घेऊ शकतात