Tuesday, 18 November 2025

नासा आणि Blue Origin संस्थेच्या ESCAPADE अंतराळयानांचे मंगळ आणि सौरवाऱ्याच्या संशोधनासाठी उड्डाण यशस्वी

नासाच्या Cape Canaveral Space Force Center येथील 36 Complex उड्डाण स्थळावरून ESCAPADE अंतराळयान अंतराळात झेपावले -फोटो -नासा संस्था / Blue Origin 

नासा संस्था / Blue Origin -13 नोव्हेंबर 

नासा आणि Blue Origin संस्थेच्या वतीने ESCAPADE ह्या जुळ्या अंतराळयानांचे मंगळ आणि सौरवाऱ्याच्या  संशोधनासाठी उड्डाण करण्यात आले नासाच्या Florida येथील Cape Canaveral Space Force Center येथून 36 complex ह्या उड्डाण स्थळावरून  गुरुवारी दुपारी 3.55 (EST) वाजता हि दोन्ही अंतराळयाने Blue Origin च्या New Glenn रॉकेटच्या साहाय्याने अंतराळात झेपावली ESCAPADE (Escape &Plasma Acceleration &Dynamic Explorer) हि दोन अंतराळयाने मंगळावरील Magnetic वातावरणावर सौरवाऱ्याचा कसा प्रभाव पडतो आणि भविष्यकालीन मानवासहित मंगळ मोहिमेसाठी उपयुक्त संशोधित माहिती मिळवणार आहेत 

सूर्याच्या अंतर्गत भागातील स्फोटक घटकांमुळे नुकत्याच झालेल्या उद्रेकामुळे अत्यंत शक्तशाली तीव्र उष्ण ज्वाळा आणि आगीचे लोट बाहेर पडले पृथ्वीवरील काही भागात त्याचा परिणाम झाला पृथ्वीवरील आकाशात Auroras पडल्यामुळे उड्डाणासाठी हवामान अनुकूल नव्हते त्या मुळे ह्या अंतराळयानांच्या उड्डाणास उशिर झाला आता ह्या सौर उद्रेकाचा व वादळाचा मंगळावर काय परिणाम झाला ह्या विषयी संशोधित माहिती मिळेल 

  Two spacecraft approach Mars

ESCAPADE च्या यशस्वी उड्डाणानंतर नासाचे Administrator Sean Duffy ह्यांनी Blue Origin Rocket Lab चे U.C Berkeley, नासाच्या ESCAPADE मोहिमेची टीम आणि सर्व पार्टनर्सचे अभिनंदन केले ," ह्या Heliophysics mission द्वारे मंगळावरील पुरातनकाळचे अस्तित्वात असलेले पोषक वातावरण शुष्क वाळवंटात कसे रूपांतरित झाले ह्याचा शोध घेण्यात येईल आणि संशोधित माहिती गोळा करण्यात येईल शिवाय सौरवाऱ्यामुळे तेथील वातावरणावर काय परिणाम होतो ह्या विषयी संशोधित माहिती मिळवण्यात येणार आहे New Glennच्या प्रक्षेपणाद्वारे गोळा केलेली हि संशोधित माहिती भविष्यकालीन आर्टीमस मोहिमेत MK-1च्या प्रक्षेपणासाठी उपयुक्त ठरेल शिवाय भविष्यकालीन अंतराळ मोहिमेतील अंतराळवीरांच्या सुरक्षिततेसाठीही आवश्यक आहे !"  

Rocket Lab द्वारा निर्मित हि दोन अंतराळयाने सूर्याच्या करोडो मैल प्रती तास वेगाने येणाऱ्या अखंडित प्रकाशझोत आणि त्यातील सौरकणांचे सखोल निरीक्षण करून संशोधित माहिती गोळा करणार आहे ह्या सौर प्रवाहित प्रकाश किरणे ,सौरवारे व सौरवादळामुळे मंगळावरील वातावरण प्रभावित होऊन ते कसे बदलत गेले प्राचीन काळी अस्तित्वात असलेले पाणी कसे नष्ठ झाले तेथील पोषक वातावरण थंड कसे झाले हि माहिती संशोधित करतील  

नासाच्या Washington येथील संस्थेच्या Associate Administrator Nicky Fox म्हणतात ," ESCAPADE मोहीमेद्वारे मंगळावरील प्राचीन कालीन वातावरण आणि सध्याच्या वर्तमानकालीन वातावरणाविषयी संशोधित माहिती गोळा केल्या जाईल हि माहिती प्रामुख्याने भविष्यकालीन मंगळ मोहिमेतील अंतराळयानातील अद्ययावत यंत्रणा ,रोबोटिक उपकरणांच्या संरक्षणासाठी आवश्यक आहेच पण ह्या मोहिमेतील अंतराळवीरांच्या सुरक्षिततेसाठीही महत्वाची आहे कारण तेथे पृथ्वीसारखे पोषक वातावरण नाही !" 

ESCAPADE अंतराळयान मंगळावर जाणार असले तरीही सध्या पृथ्वी आणि मंगळ सूर्याच्या विरुद्ध दिशेला आहेत त्यामुळे डायरेक्ट मंगळाच्या दिशेने जाणे यानाला कठीण आहे त्या मुळे मंगळावर जाण्याआधी पृथ्वीपासून दहा लाख मैल अंतरावरील Lagrange Point 2 येथे जाईल आणि काही काळ तेथे भ्रमण करेल जेव्हा पुढच्या वर्षी  नोव्हेंबर 2026 मध्ये पृथ्वी आणि मंगळ जवळ येथील तेव्हा हे अंतराळयान पुन्हा पृथ्वीच्या कक्षेत शिरून पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणीय वातावरणाचा उपयोग करून मंगळाच्या कक्षेत शिरेल दहा महिन्यांनी सप्टेंबर 2027मध्ये मंगळावर पोहोचेल आणि 2028 मध्ये कार्यरत होऊन संशोधनास सुरवात करेल 

Blue Origin चे CEO Dave Limp ह्यांनी देखील यशस्वी उड्डाणा नंतर आनंद व्यक्त केला आणि ह्या टीममधील सर्वांचा मला अभिमान वाटत असल्याचे सांगून सर्वांचे अभिनंदन केले   

No comments:

Post a Comment