
नासा संस्था -20 नोव्हेंबर
नासाच्या अंतराळमोहीम 73 चे अंतराळवीर Chris Williams रशियन अंतराळवीर Sergey Kud-Sverchkov आणि Sergei Mikaev हे तिघे 27 नोव्हेंबरला आठ महिन्यांच्या वास्तव्यासाठी स्थानकात जाणार आहेत
गुरुवारी कझाकस्थानातील बैकोनूर उड्डाणस्थळावरून दुपारी 4 वाजून 27 मिनिटांनी (2.27a.m. स्थानिक वेळ) Soyuz MS -28 अंतराळयानातून हे तिन्ही अंतराळवीर स्थानकात जाण्यासाठी अंतराळात झेपावतील आणि तीन तासांच्या अंतराळ प्रवासानंतर स्थानकाच्या जवळ पोहोचतील
त्या नंतर सोयूझ अंतराळयान स्थानकाभोवती दोन फेऱ्या मारेल सोयूझ यान 7 वाजून 38 मिनिटांनी स्थानकाच्या Rassvet Module जवळ पोहोचताच अंतराळयानातील स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित होईल त्यानंतर स्थानक आणि सोयूझ अंतराळयान ह्यांच्यातील Docking आणि Hatching प्रक्रिया पार पडेल 9.50 मिनिटाला हि प्रक्रिया पूर्ण होईल आणि हे तीनही अंतराळवीर दहा वाजता स्थानकात प्रवेश करतील स्थानकात सध्या राहात असलेले मोहीम 73 चे अंतराळवीर ह्या तीनही अंतराळवीरांचे स्थानकात स्वागत करतील
हे अंतराळवीर स्थानकातील अंतराळमोहीम 73-74 मध्ये सहभागी होतील आणि आठ महिने स्थानकात वास्तव्य करून तेथे सुरु असलेल्या सायंटिफिक संशोधनात सहभागी होतील अंतराळवीर Williams हे अंतराळस्थानकातील अंतराळवीरांच्या दीर्घकालीन वास्तव्यादरम्यान निरोगी आरोग्यासाठी उपयुक्त संशोधन,पृथ्वीवरील विकासासाठी अत्याधुनिक यंत्रणा आणि Modular Workout System ,Cryogenic Fuel efficiency &grow Semiconductor Crystals in Space ह्या विषयी संशोधन करणार आहेत
अंतराळवीर Chris आणि अंतराळवीर Mikaev हे प्रथमच स्थानकात राहायला जाणार आहेत अंतराळवीर Sergey Kud -Sverchkov मात्र दुसऱ्यांदा स्थानकात राहायला जाणार आहेत हे सर्वजण 2026 च्या उन्हाळ्यात पृथ्वीवर परततील
ह्या अंतराळवीरांच्या स्थानकाकडील उड्डाण आणि स्थानकातील प्रवेशाचे लाईव्ह प्रसारण नासा टी वी वरून करण्यात येणार आहे
No comments:
Post a Comment