
सूर्याच्या अंतर्गत स्फोटक भागातुन शक्तीशाली आगीचे लोट आणि ज्वाळांचे उत्सर्जन होत असताना
Space News -11 नोव्हेंबर
सूर्याच्या अंतर्गत भागात सतत आग घुमसत असते आणि त्यातून अत्यंत वेगाने शक्तिशाली आणि उष्ण ज्वाळां उत्सर्जित होत असतात 11नोव्हेंबरला सकाळी सूर्याच्या अंतर्गत भागातून X5.1 प्रकारच्या अत्यंत शक्तिशाली आगीच्या ज्वाळा आणि आगीचे लोट अत्यंत वेगाने पृथ्वीच्या दिशेने बाहेर पडले 2024 नंतर सूर्याच्या अंतर्गत भागातून उत्सर्जित झालेल्या ह्या ज्वाळा ह्या वर्षातील आतापर्यंतच्या सर्वात शक्तीशाली तीव्र आणि उष्ण होत्या
गेल्या काही दिवसापासून सूर्याचा अंतर्गत भाग सक्रिय झाला असून त्या भागातून सतत अत्यंत उष्ण आगीच्या ज्वाळा बाहेर फेकल्या जात आहेत ह्या महिन्यात नऊ व दहा तारखेला पण सूर्याच्या अंतर्गत भागातून मोट्या प्रमाणात तीव्र व उष्ण ज्वाळा व आगीचे लोट बाहेर पडले सूर्याच्या अंतर्गत करोनल भागातील विस्फोटानंतर हे उत्सर्जन होते नासाच्या शास्त्रज्ञांनी प्रसारित केलेल्या माहिती नुसार ह्या ज्वाळा अत्यंत शक्तिशाली आणी तीव्र ऊष्णतेच्या असतात ह्या ज्वाळा ताशी 4.4 दशलक्ष मैल वेगाने पृथ्वीच्या दिशेने उत्सर्जित झाल्या
ह्या स्फोटक ज्वाळांच्या उत्सर्जनानंतर आफ्रिका व युरोपमधील काही भागात अंधार झाला आणि पृथ्वीच्या सूर्य प्रकाशीत भागातील High Frequency Radio Communication प्रभावित झाले नऊ नोव्हेंबरला बारा तासांच्या कालावधीत दोनवेळा सूर्याच्या अंतर्गत भागातून X 1.7 क्लास च्या शक्तिशाली ज्वाळा बाहेर फेकल्या गेल्या
सर्व जगाला प्रकाशमान करणारा सुर्य प्रत्यक्षात आगीचा पेटता गोळा आहे सुर्याच्या अंतर्गत भागातील मॅग्नेटिक फिल्ड मध्ये अंतराळातील प्रचंड वेगाने वाहणारे वारे धुळ आणी हानीकारक Cosmic कीरणे सतत आत ओढल्या जातात अंतर्गत भागातील ज्वलनशील पदार्थ आणी वायूमुळे सतत आग घुमसत असते आणी त्यापासून तयार होणारे आगीचे लोट,ज्वाळा,विध्युत भारीत किरणे वायुकण प्रचंड वेगाने सुर्याच्या करोना ह्या भागात फेकल्या जातात त्यामुळे तेथील भागात तीव्र उष्णता आणि प्रकाश असतो ह्या भागातील चुंबकीय क्षेत्रात ज्वलनशील पदार्थ,वायू,विद्युतभारीत किरणे,विद्युतभारीत कण गोलाकार फिरत असतात तेथे सतत ऊष्ण सौर वारे वहात असतात,सौरवादळे होतात जेव्हा ह्या वादळाची तिव्रता वाढते तेव्हा शक्तीशाली स्फोट होतात आणि त्यामुळे निर्माण झालेले आगीचे लोट ह्या चुंबकीय क्षेत्रातुन बाहेर अंतराळात फेकल्या जातात
No comments:
Post a Comment