
मंगळभूमीवरील Coloe Fossae ह्या भागात आढळलेल्या पुरातन कालीन हिमयुगातील प्रवाहित पाण्याच्या अस्तित्वाच्या खुणा -फोटो -युरोपियन स्पेस एजन्सी (ESA)
E.SA News- 12 नोव्हेंबर -
(Science &Exploration/ Space Science/Mars Express )
पुरातनकाळी मंगळ ग्रहावरही पृथ्वीसारखे पोषक वातावरण होते तेथे पाण्याचे अस्तित्व होते एव्हढेच नाही तर तेथे पृथ्वीसारखे हिमयुगही होऊन गेले असे संकेत मिळाले आहेत युरोपियन स्पेस एजन्सीच्या Mars Express वरील High Resolution Stereo Camera ने घेतलेल्या नव्या फोटोतून मिळालेल्या संशोधित माहितीतून शास्त्रज्ञांनी हा निष्कर्ष काढला आहे
मंगळावरील उत्तरेकडील भागातील Coloe Fossae ह्या भागात हिमयुगाच्या अस्तित्वाच्या खुणा आढळल्या आहेत ह्या पाठारी भागातील खोल दऱ्या,खोरे आणी गोलाकार लहान मोठे पाणवठ्याचे आटलेले खड्डे पाहून मंगळावरील पुरातन काळच्या हिमयुगाचे संकेत मिळतात असे शास्त्रज्ञांचे मत आहे
प्राचीन काळी 2.5 बिलियन वर्षांपूर्वी जवळपास 20,000 वर्षांपूर्वी फक्त पृथ्वीवरच हिमयुग नव्हते तर सौरमालेतील इतर ग्रहांवरही होते त्या वेळेस पृथ्वीचे तापमान अत्यंत थंड 7-10 C.पेक्षाही कमी होते आणि ह्याचे कारण आतासारखे ग्लोबल वार्मिंग नव्हते तर त्या काळी झालेल्या भूगर्भातील,भूपृष्ठावरील आणि वातावरणातील अनैसर्गिक घडामोडीमुळे अती उष्ण अती थंडी ,पाऊस पूर ह्या सारख्या आस्मानी संकटामुळे तेथील वातावरण बदलत गेले आणि हळूहळू नष्ठ होत गेले
ह्या काळात सूर्यप्रकाशाच्या कमतरतेमुळे आणि अती थंडीमुळे तेथे प्रवाहित असलेले पाणी गोठले आणि त्याचे बर्फात रूपांतर झाले काही ठिकाणी ह्या खड्ड्यात बर्फ साचून तेथे Glaciers निर्माण झाले सरोवर गोठल्यामुळे बर्फ़ाच्छादित झाले त्यावर बर्फ़ाचे शिट्स तयार झाले कालांतराने तेथील हवामान उष्ण झाले तेव्हा हे बर्फ वितळले आणि हिमनगाच्या स्वरूपात प्रवाहित झाले

अशा हिमयुगाच्या खुणा आपल्या पृथ्वीवरही आढळतात युरोपियन स्पेस एजन्सीच्या Mars Express वरील High Resolution Stereo Camera ने घेतलेल्या नव्या फोटोत ह्या भागातील भूपृष्ठावर प्रवाहित पाण्याच्या समांतर रेषा आढळल्या हा भाग Coloe Fossae ह्या नावाने ओळखला जातो ह्या रेषा जमिनीला पडलेल्या भेगांमुळे निर्माण होतात अंतराळातून येणारे खडक भूमीवर आढळल्यामुळे तेथे खड्डे पडले असावेत हे खड्डे लहान मोठे काही ठिकाणी एकत्रित काही ठिकाणी असमान इकडे तिकडे पडलेले आहेत काही पुरातन खडबडीत तर काही नवीन घर्षणाने गुळगुळीत झालेले दिसतात
ह्या भागातील खोल दऱ्यामधील प्रवाहित पाण्याच्या रेषा हिमयुगातील पाण्याच्या अस्तित्वाचे संकेत देतात मंगळावरील हिमयुगाच्या काळात तेथून बर्फ़ाचे ढिगारे वाहात गेल्यामुळे तयार झाले असावेत ह्या खुणा पृथ्वीवरील हिमनद्यांसारख्या दिसतात आणि बाजूला दगडांचा दाट थर दिसतो
सध्या मंगळावरील वातावरण शुष्क असले तरीही पुरातन काळी मंगळावरील ध्रुवीय वातावरण बदलांमुळे बर्फ गोठवणारी थंडी आणि कालांतराने बर्फ वितळवणारी उष्णता निर्माण झाल्यामुळे ह्या भागात ह्या खुणा निर्माण झाल्या
थंडीच्या काळात मंगळाच्या ध्रुवापासून मध्य अक्षांशापर्यंत बर्फ पसरतो नंतर उष्ण वातावरणात तो मागे हटतो पण काही खुणा मागे राहतात तसेच हिमयुगात तेथे दरी,खड्डे पडून तो भाग बर्फाच्छादित झाला असावा असा शास्त्रज्ञांनी निष्कर्ष काढला आहे
No comments:
Post a Comment