Mars Express आणि Exo Mars TGO ने कॅमेराबद्ध केलेल्या मंगळभूमीवरील चक्रीवादळातील वाऱ्यासोबत उडणाऱ्या घुलीकणांची हालचाल (Dancing dust devils)-फोटो- Esa -संस्था
युरोपियन स्पेस एजन्सी (Esa) -31 डिसेंबर
युरोपियन स्पेस.एजन्सी(ESa) च्या Mars Express आणी Exo Mars Trace Gas Orbiter Spacecraft मधील अद्ययावत कॅमेऱ्याद्वारे विस वर्षात घेतलेल्या फोटो व व्हिडीओंच्या सखोल संशोधना नंतर शास्त्रज्ञांनी मंगळावरील Tornado सारख्या 1039 चक्रीवादळातील वावटळीचा मागोवा घेतला मंगळावरील धुळ ह्या वावटळीत हवेत कशी ओढल्या जाते आणी वादळ क्षमल्यावर भुभागावर कशी वहात जाते किंवा ऊडत जाते ह्याची शास्त्रज्ञांनी संशोधीत केलेली हि माहिती Science Advances मध्ये ऑक्टोबर महिन्यात प्रसिद्ध झाली आहे
शास्त्रज्ञांनी काढलेल्या प्रथमिक निष्कर्षा नुसार मंगळावरील चक्रीवादळ व वहाणाऱ्या वाऱ्याचा वेगाची तिव्रता पृथ्वीवरील वादळी वाऱ्यापेक्षा जास्त असते हे ह्या संशोधनमुळे कळाले आहे ह्या फोटोमध्ये वादळी वावटळीतील धुलीकणाची हालचाल,वेग आणी दिशा कॅमेराबद्ध करण्यात यानातील अद्ययावत यंत्रणा यशस्वी झाली ह्या आधी अशी डिटेल माहिती मिळाली नव्हती
अनेक वर्षांपासून शास्त्रज्ञ मंगळावरील चिकट धुळीवर ऊपाय शोधत आहेत कारण मंगळावरील वादळात अंतराळयान त्यावरील सौरपॅनल्स,रोबोटिक ऊपकरणे रोबोटिक आर्म्स ह्यावर तेथील चक्रिवादळात ऊडालेली धुळ.धुळीकण जमतात आणी चिकटपणा मुळे ती धुळ पृथ्वीवरच्या धुळीसारखी सहजासहजी ऊडुन जात नाही किंवा आकाशातील ढगात जमुन पावसाळ्यात धुऊन निघत नाही त्यामुळे अंतराळयाने आणि त्यातील यंत्रणा ठप्प होते कधी वादळानंतर काही दिवसांनी अंतराळयान कार्यरत होते तर कधी हि यंत्रणा निकामी होते त्यामुळे संशोधनात बाधा येते
ह्या फोटो मुळे धुलीकणाच्या प्रवासाची गती व दिशाचे मोजमाप करणे शास्त्रज्ञांना शक्य झाले आधी असा संशोधित डेटा ऊपलब्ध नव्हता मंगळभूमीवर मोठ्या प्रमाणात विस्तीर्ण पसरलेले वाळवंट व ज्वालामुखी प्रवण क्षेत्र आहे ज्वालामुखी मुळे तयार झालेले खड्डे आहेत,उंचसखल भाग व गुहा आहेत मंगळावर सर्वत्र पसरलेली हि धुळ दिवसा सुर्याच्या ऊष्णतेपासुन संरक्षण करू शकते आणी रात्री थंडीपासून बचावासाठी ब्लॅंकेट सारखे काम करु शकते असे शास्त्रज्ञांचे मत आहे
वादळी वाऱ्यामुळे वातावरणात उडालेल्या धुळीचे कण आकाशातील ढग तयार करण्यासाठीच्या प्रक्रियेची सुरवात करतात आणी वादळ पाण्याची वाफ हवेत सोडतात पृथ्वीवर पावसाने धुळ वाहून जाते पण मंगळावर बराच काळ राहते आणी ग्रहावर पसरते म्हणून मंगळावरील हवामान समजण्यासाठी हि संशोधित माहिती उपयुक्त ठरेल मंगळ भूमीवरील चक्री वादळात गोलाकार वाहणारे आणि प्रचंड वेगाने धुळ आत खेचणारे वारे हे धुळीचे कण,माती कुठे कधी आणि कशी ऊचलतात ह्याची आणखी सखोल संशोधीत माहिती मिळवण्यासाठी शास्त्रज्ञ ऊत्सुक आहेत

मंगळभूमीवरील चक्रीवादळातील वेगवान वाऱ्यासोबत हवेत उडणारे धुळीचे कण (Dust Devils) फोटो - युरोपियन स्पेस एजन्सी
2004 पासुन Mars Express आणी 2016 पासून ExoMars Trace Gas Orbital मार्फत घेतलेल्या फोटो व व्हिडिओ मुळे हि संशोधीत माहिती मिळवण्यात शास्त्रज्ञांना यश मिळाले ह्या माहिती मुळे भविष्य कालीन मानवसहित अंतराळमोहिमेतील अंतराळवीरांना मंगळावरील निवासासाठी तेथे पाऊल ठेवण्यासाठी पूर्व नियोजन करताना ऊपयुक्त ठरेल आमच्या अपेक्षेपेक्षा हि संशोधीत माहिती सखोल आहे असे Esa चे Project Scientists Colin Wilson म्हणतात
No comments:
Post a Comment