स्वर्णगिरी मंदिरातील पाण्यातील विष्णूची सुंदर मूर्ती
स्वर्णगिरी मंदिर -12 डिसेंबर
हैद्राबाद पासून जवळ स्वर्णगिरी पर्वतावरील निसर्गरम्य परिसरात नव्यानेच निर्माण झालेले व्यंकटेश स्वामी मंदिर म्हणजे दाक्षिणात्य द्रविडीयन शैलीतील उत्कृष्ठ वास्तुकलेचा अप्रतिम नमुना ह्या मंदिराचे वैशिष्ठ म्हणजे मंदिराच्या मागच्या भागात खाली छोट्या तळ्यातील पाण्यात विष्णूची काळ्या दगडात कोरलेली अप्रतिम सुंदर मूर्ती आणि वर डोंगरावर विष्णूची बारा फूट उंच मूर्ती असलेले आणि लक्ष्मीची आकर्षक मूर्ती असलेले प्रमुख मंदिर आणि इतरत्र छोटी देवांची मंदिरे बाहेर हनुमानाची भव्य मूर्ती आहे इथे येणाऱ्या भाविक पर्यटकांना इथल्या भक्तीमय वातावरणा बरोबरच तळ्यातील विष्णूची अप्रतिम मूर्ती आकर्षित करते इथे देखील तिरुपती ,तिरुमला देवस्थाना प्रमाणेच दररोज वेगवेगळ्या पूजा अर्चना अभषेक वै केल्या जातात 2018/2024 दरम्यान ह्या मंदिराची निर्मिती तज्ज्ञ वास्तुशास्त्रज्ञ आणि प्रथितयश उद्योगपती ह्याच्या सहकार्याने झाली आहे मंदिर नवीन असल्यामुळे आता हळूहळू त्याचा लौकिक वाढत आहे ह्या मंदिराची कीर्ती सर्वत्र पसरत असतानाच इथल्या निसर्गरम्य पवित्र वातावरणात सिनेमाचे शुटिंग करण्याची इच्छा सिनेदिग्दर्शकांना देखील झाली नऊ डिसेंबरला प्रसिद्ध तेलगू अभिनेता संदीप माधव ह्यांच्या राम बजरंग ह्या सिनेमातील गाण्याचे शूटिंग इथे झाले
स्वर्णगिरी मंदिरात नेहमीप्रमाणेच भाविकांची गर्दी तिकीटाची रांग,दर्शनाची रांग,लक्ष्मी विष्णू आणि हनुमानाच्या भव्य मूर्तीच्या दर्शनाने तृप्त झालेल्या पर्यटकांची पावले आपसूकच मंदिराच्या मागे तळ्यातील झोपलेल्या विष्णूचे अप्रतिम सौन्दर्य पाहण्यासाठी तेथील सौदर्य कॅमेराबद्ध करण्यासाठी वळलेली सगळ्यांचीच फोटो काढण्यासाठीची धडपड तेथील निखळ निळ्या पाण्यातील फवारे आणी त्यातील मुर्ती सौन्दर्य आणि स्वत:ची छबी कॅमेराबद्ध करून सोशल मीडियावर अपलोड करण्यात मग्न दर्शनानंतर तिरुपती सारखेच चिंचेचा भात (पुलिआरु)आणि लाडूचा प्रसाद घेण्यासाठी गर्दी अर्थात रांग आणि बायकांची नारळ फोडण्यासाठीची लगबग इथे बायका सहजतेने नारळ फोडत होत्या
अशातच मंदिरात सिने दिग्दर्शकाची सिनेमाचे गाणे शूट करण्यासाठीची तयारी सुरू होती सिने कॅमेऱ्यासाठी ट्रॉली त्या साठी रूळ ठेवलेले दिसले तेव्हा पहिल्यांदा तिरुपती प्रमाणे वेगवेगळ्या सेवाचे लाईव्ह चित्रण होत असेल असे वाटले पण हळूहळू तेथे स्पॉटबॉय,सहाय्यक कर्मचारी,हिरोला ऊन लागु नये म्हणून छत्री धरलेला स्पॉट बॉय दिसला सहज चौकशी केली तेव्हा तिथल्या तेलगू भाषिक सहाय्यकाने तिथे बजरंग बाजी सिनेमातील गाण्याचे शूटिंग होणार असल्याचे ह्या सिनेमातील हिरो प्रथितयश पण हिरोईन नवोदित असल्याचे सांगितले लंच ब्रेक असल्याने त्यांचे जेवण सुरु असल्याने त्यांना यायला वेळ होता अर्थातच भाषा प्रॉब्लेम आला पण हिंदी आणि इंग्रजीत संवाद साधला
काही वेळातच इथे शुटिंग सुरु असल्याची बातमी सर्वत्र पसरली तेलगू भाषिक भाविक आणि इतर उपस्थित पर्यटकांची तेथे गर्दी जमली समोर प्रोड्युसर मॅडम आणि दिग्दर्शक बसले होते संदीप माधवन येताच सर्वांनी टाळ्या वाजवत जल्लोष केला कोरिओग्राफरने हिरो संदीप ह्यांना आणि डान्स ग्रुप मधील सर्व कलाकारांना नृत्याच्या स्टेप दाखवल्या,रिहर्सल झाली त्या नंतर Action,Cut Retake चा सिलसिला सुरु झाला दहाबारा रिटेक नंतर दिग्दर्शकाच्या मनाप्रमाणे स्टेप झाल्यानंतर डान्स मधील काही ओळींचे शूटिंग OK झाले विशेष म्हणजे सिनेमाचे हिरो संदीप ह्यांनी ह्या सर्व स्टेप्स समजून घेत न थकता तेव्हढ्याच जोशात शूटिंग पूर्ण केले .
त्यांच्याशी बोलण्याची त्यांच्या विषयी जाणून घेण्याची इच्छा असल्याने आधीच त्यांच्या सहाय्यकातर्फे परवानगी घेतली होती मधल्या काही वेळात फ्रेश झाल्यानंतर संदीप ह्यांनी त्यांच्या विषयी,ह्या सिनेमाविषयी माहिती दिली वेळ खूप कमी होता तरीही त्यांनी संवाद साधला ते म्हणाले ह्या आधी त्यांनी तीनचार सिनेमात हिरोचे काम केले आहे आता राम बजरंग सिनेमाचे शूटिंग सुरु आहे त्यातील गाण्यातील हा शेवटचा काही भाग इथे चित्रित होत आहे त्यांना ह्या सिनेमाविषयीच्या भावना काय असे विचारले तेव्हा त्यांनी खूप छान! असे सांगत जास्ती माहिती तुम्हाला सिने दुग्दर्शक सांगतील असे म्हटले ते कुठे आहेत असे विचारल्यावर त्यांना बोलवून त्यांची ओळख करून दिली तुमची हिरोईन कुठे आहे असे विचारल्यावर ह्या गाण्यात तिचे काम नाही असे सांगितले दिग्दर्शकांनी तुम्ही महाराष्ट्रीयन आहात का?असे विचारत हा सिनेमा मराठीत पण येणार असून राम बजरंग हा सिनेमा उन्हाळ्यात रिलीज होईल असे सांगितले ह्यात श्रद्धा आणि व्यक्तिगत स्टोरी देखील आहे असे सांगितले !
तेलगू अभिनेता संदीप माधव व सिने दिग्दर्शक सिनेमा विषयी संवाद साधताना
तेलगू अभिनेते संदीप माधव हैदराबादचे रहिवासी आहेत शाळा कॉलेज मध्ये असल्यापासूनच त्यांना अभिनय आणि खेळाची आवड आहे सुरवातीच्या काळात त्यांनी लोफर ,ज्योती लक्षमी ह्या सारख्या सिनेमात काम केले त्यांनी नाटकातही हिरोच्या भूमिका केल्या 2012 मध्ये त्यांनी रेल्वे स्टेशन ह्या सिनेमात काम केले 2013 मध्ये दलम आणि जॉर्ज रेड्डी ह्या सिनेमाचे दिग्दर्शक जीवन रेड्डी ह्याच्या सोबत त्यांनी अभीनयासोबतच सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले हा सिनेमा उस्मानिया युनिव्हर्सिटी मधील विध्यार्थी युवा नेत्याच्या जीवनावर आधारित होता राम गोपाल वर्मा दिग्दर्शित Vangaveeti ह्या सिनेमातील त्यांची हिरोची भूमिका लोकप्रिय झाली
संदीप माधव ह्यांची निगर्वी आणि सहजतेने त्यांच्या चाहत्यांसोबत संवाद साधण्याची वृत्ती त्यांना भविष्यात लोकप्रियता आणि यशाच्या मार्गावर नेईल ह्याची खात्री पटते राम बजरंगचे दिग्दर्शक सुधीर रेड्डी देखील निगर्वी आहेत


No comments:
Post a Comment