नासाच्या अंतराळ मोहीम 74चे जपानी अंतराळवीर Kimiya Yui अंतराळवीर Mike Fincke,Chris williams आणि Zena Cardman स्थानकातून लाईव्ह संवादाद्वारे पृथ्वी वासियांना ख्रिसमस निमित्त शुभेच्छा देताना -फोटो -नासा संस्था
नासा संस्था - 24 डिसेंबर
नासाच्या अंतराळ मोहीम 74चे अंतराळवीर Mike Fincke अंतराळवीर Zena Cardman अंतराळवीर Chris Williams आणि जपानी अंतराळवीर Kimiya Yui ह्यांनी पृथ्वीवासीयांना लाईव्ह संवादा द्वारे Christmas च्या शुभेच्छा दिल्या
अंतराळवीर Mike -"तुम्हा सर्वांना आमच्या मोहीम 74 मधील अंतराळवीरांतर्फे नाताळच्या शुभेच्छा!आता आम्ही अंतराळातील स्थानकातून भ्रमण करत असताना तुम्हा सर्वांबद्दल सणांच्या सुट्टीबद्दल विचार करत आहोत ह्या सुट्टीच्या काळात आपण आपल्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत आनंदात ख्रिसमस साजरा करतो आणि हे वर्ष कस गेल ह्याचा विचार करतो आमच्यासाठी हे वर्ष खूप वैशिष्टपूर्ण आहे कारण आम्ही इथे स्थानकातील आमच्या अंतराळवीर मित्रांसोबत आहोत आम्हाला नुकत्याच पृथ्वीवर परतलेल्या आमच्या मोहीम 73मधील अंतराळवीरांची उणीव जाणवतेय आमची फॅमिली पण इथे नाही ह्याच वाईट वाटत असल तरी आमची हि स्पेस फॅमिली इथे आहे आणि आम्ही एकत्रित ख्रिसमस सण साजरा करणार आहोत आणि फक्त आम्हीच नाही तर जगभरातील नासा संस्थेतील आमच्या टीममधील सर्वजण Houston,Huntsville,Munich,Moscow,Scubaआणि Japan जिथे,जिथे हा सण साजरा होतो त्या देशातील नागरिकांसोबत आम्ही हा सण साजरा करणार आहोत !"
Chris- "ह्या सणातील पारंपारिक गोष्टी इथे आम्ही करू शकत नसलो तरीही आम्ही इथे नव्या गोष्ठीची सुरवात करणार आहोत त्या साठी आम्ही स्थानकात डेकोरेशन केले आहे आमच्याकडे छोटेसे ख्रिसमस ट्री आहे त्याला आम्ही डेकोरेट केलय इथल्या Airlock ला काही बुट अडकवले आहेत हे सार cheerful आहे आम्ही इथे नवी परंपरा सुरु केलीय ती खूप सुंदर आहे आणि स्पेशलही आम्ही हे सार इथे करू शकलो म्हणून आनंदित आहोत आणि ख्रिसमस साजरा करण्यासाठी उत्सुक आहोत !"
Zena -"मला वाटत आपल्यापैकी अनेकजण अनेक कारणाने ख्रिसमसच्या सुट्टीत घराबाहेर असताना इतरत्र हा सण साजरा करतात इथे स्थानकातही अनेक अंतराळवीर येऊन गेले त्यांनी देखील कुटुंबियांपासून दूर स्थानकात ख्रिसमस साजरा केला Mike ने सांगितल्याप्रमाणे हा सण आमच्यासाठी स्पेशल आहे अंतराळ स्थानकातील अंतराळ मित्रांसोबत हा सण आम्ही साजरा करणार आहोत आणि ह्या टीममधील पृथ्वीवरील सर्वांसोबत आम्ही ख्रिसमस साजरा करणार आहोत नासा संस्थेतील सर्वांनी आमची आमच्या कुटुंबीयांची काळजी घेतली त्या बद्दल त्यांचे आभार त्यांच्यामुळेच इथे स्थानकात हा सण साजरा करण्याची अमूल्य संधी मिळाली मला वाटत आम्ही Santa च्या थोडेसे वर अंतराळात भ्रमण करत ख्रिसमस साजरा करतोय
Kimiya -ख्रिसमस जपानमध्येही आम्ही साजरा करतो आणि New year पण आम्ही साजरा करतो आम्ही नासा संस्थेचे,कुटुंबियांचे आभार मानतो त्यांच्यामुळेच आम्हाला स्थानकातील स्पेस फॅमिली सोबत ख्रिसमस साजरा करायला मिळाला त्यांच्या मुळेच आम्ही इथे सुरक्षित आहोत आणि विशेष म्हणजे मी माझ्या ह्या अंतराळवीर मित्रांना जापनीज फुड देणार आहे
पृथ्वीवासियांनो आनंदात ख्रिसमस साजरा करा आणि सुखी भविष्यकाळाची आशा करा !
आम्हा चौघांतर्फे Happy Christmas ! Merry Christmas ! & Happy Happy New Year !

No comments:
Post a Comment