Wednesday, 13 August 2025

नासाच्या Space X Crew -10 मोहिमेतील अंतराळवीर Anne ,Nicole ,Onishi आणि Kirill पृथ्वीवर परतले

  Image shows a spacecraft approaching the Pacific Ocean with four parachutes above

 Space X Crew Dragon अंतराळवीरांसह Pacific महासागराच्या San Diego येथील समुद्राच्या खाडीत उतरताना -फोटो -नासा संस्था

 नासा संस्था - 9 ऑगस्ट

नासाच्या Space X Crew -10 मोहिमेतील अंतराळवीर Anne  McClain ,NicoleAyers जपानी अंतराळवीर Takuya Onishi आणि रशियन अंतराळवीर Kirill Peskov स्थानकातील 148 दिवसांच्या वास्तव्यानंतर सुखरूप  पृथ्वीवर परतले आहेत हे चारही अंतराळवीर आठ तारखेला  संध्याकाळी 6.15 वाजता (स्थानिक वेळ)  पृथ्वीवर येण्यासाठी स्थानकाबाहेर पडले आणि नऊ तारखेला सकाळी 11.33 वाजता (स्थानिक वेळ) पृथ्वीवर पोहोचले ह्या चारही अंतराळवीरांसह Space X Dragon शनिवारी पॅराशूटच्या साहाय्याने अमेरिकेतील  Pacific महासागराच्या San Diego येथील समुद्राच्या खाडीत खाली उतरले 

हे सर्व अंतराळवीर पृथ्वीवर परतल्यानंतर Space X ची रिकव्हरी टीम,रिकव्हरी जहाज आणि दोन फास्ट बोटींसह तेथे पोहोचली त्यांनी क्रेनच्या साहाय्याने Dragon ला जहाजापर्यंत आणून सुरक्षितपणे जहाजाच्या डेकवर ठेवले त्या नंतर टीममधील डॉक्टरांनी त्यांचे प्राथमिक चेकअप केल्यानंतर टीममधील सदस्यांनी ह्या अंतराळवीरांना उचलून Dragon बाहेर काढले ह्या अंतराळवीरांना पुढील चेकअप साठी रिकव्हरी मेडिकल कॅम्प मध्ये नेण्यात आले त्या नंतर नासाच्या विमानाने त्यांना नासाच्या Huston येथील संस्थेत पोहोचवण्यात आले 

निघण्याआधी स्थानकात ह्या अंतराळवीरांचा नासा संस्थेच्या लाईव्ह संपर्कात Farewell Ceremony आणि Change of Command Ceremony पार पडला तेव्हा अंतराळवीरांनी त्यांचे मनोगत व्यक्त केल 

  JAXA astronaut Takuya Onishi (right) shakes hands with Roscosmos cosmonaut Sergey Ryzhikov (left) after handing him command of the International Space Station during the Change of Command Ceremony as the rest of the Expedition 73 crew observes.

नासाच्या मोहीम 73 चे अंतराळवीर स्थानकातील Space X -10 मोहिमेतील अंतराळवीरांच्या Farewell आणि Change of Commamd  ceremony दरम्यान -फोटो नासा संस्था

Anne -"आम्ही आता इथले वास्तव्य संपवून पृथ्वीवर परतत आहोत ह्या स्थानकात वास्तव्य करून संशोधन करण्याची संधी दिल्याबद्दल दोन्ही संस्थेचे आभारी आहोत आम्ही विचार करत होतो कि पुन्हा आम्हाला इथे एकत्रित येण्याची संधी मिळेल ना मिळेल  पृथ्वीवर कठीण परिस्थिती असताना लोक एकमेकांशी भांडत असताना आपण सर्वजण आनंदाने एकत्रीत वास्तव्य करून संशोधन करत आहोत स्थानकात विविध देशातील अंतराळवीर एकत्रीत वास्तव्य करून पृथ्वीच्या,मानवाच्या विकासासाठी अत्याधुनिक संशोधन करतात शोध लावतात हि खूप वैशिष्टपूर्ण बाब आहे गेल्या पंचवीस वर्षांपासून स्थानकात सतत अंतराळ मोहिमेतील अंतराळवीरांची येजा सुरु असते आम्ही ह्या मोहीमेचा छोटा भाग आहोत चाळीस वर्षांपूर्वी आता सारखीच परिस्थिती असताना काही सर्जनशील वृत्तीच्या शास्त्रज्ञांनी अंतराळातील स्थानकाची कल्पना मांडली तेव्हा अनेकांना हे काम अशक्य वाटल होत पण काही दूरदर्शी व्यक्तींनी त्यावर विश्वास ठेवला आणि सर्वांनी एकत्र येऊन सहभागी देशांच्या सहकार्याने सर्व देशातील शास्त्रज्ञ,तंत्रज्ञ आणि इंजिनीअर्सनी मिळून अशक्य वाटणाऱ्या अंतराळातील स्थानकाची निर्मिती केली आम्ही मोहीम 10 मधील अंतराळवीर ह्या सर्वांसोबत गेल्या चार महिन्यांपासून एकत्र रहात आहोत आणि नासा संस्थेतील सर्व देशातील टीम प्रमुख आम्हाला दररोज मार्गदर्शन करत होते आणि हे शक्य करीत होते ह्या मानवतावादी दृष्ठीकोनामुळे एकत्रीत वास्तव्य करून एकमेकांच्या चांगुलपणाच्या साथीने हे संशोधन करता येऊ शकते ह्या वर विश्वास बसू शकला आम्ही अशाच सर्वांचे प्रतिनिधित्व करतो त्या साठी नासा संस्थेतील सहभागी सर्वांचे आमच्या कुटूंबियांचे आणि मित्रांचे आभार त्यांनी प्रेरित केल्यामुळेच आम्ही इथे येऊ शकलो धन्यवाद!"

Nicole - "Anne च्या ह्या सुंदर शब्दाबद्दल आभार ,स्थानकातून पृथ्वीवर परतताना मी भावनावश झालेय आता विचार करताना जाणवत नासा संस्थेने आम्हाला दिलेली हि संधी किती अमूल्य आहे इथल्या अद्भुत वातावरणात प्रवेश करताना वास्तव्य करताना इथून पृथ्वीच अलौकिक सौदर्य पाहतानाचे क्षण अविस्मरणीय आहेत इथे ह्या अंतराळवीरा सोबत वास्तव्य करताना संशोधन करतानाचा काळ हास्यविनोदात खूप मजेत गेला त्या साठी ह्या टीमचे आभार पृथ्वीवर परतल्यानंतर ह्या सर्वांची आठवण येईल मी तिथून स्थानक आता कुठे आहे ते पाहीन नासा संस्थेने दिलेल्या ह्या संधीबद्दल सर्वांचे आभार !"

Kirill -"इथे ह्या सर्वांसोबत वास्तव्य करताना संशोधन करताना दिवस आनंदात गेले त्या बद्दल सर्वांचे आभार नासा संस्थेने आम्हाला इथे येण्याची हे अद्भुत वातावरण अनुभण्याची आणि पृथ्वीसौन्दर्य पाहण्याची संधी दिल्याबद्दल संस्थेचे आभार टीममधील सर्वांच्या अथक परिश्रमामुळे हे शक्य झाले ह्या अंतराळ मोहिमा अशाच सुरु राहोत हीच सदिच्छा !

Onishi -आज ह्या दोन्ही समारंभात बोलतानाचा आणि ह्या मोहीम 73 मधील अंतराळवीरांना सोडून जातानाचा क्षण सुखदुःखाचा आहे आता घरी परतण्याची वेळ झालीय ह्या वर विश्वास बसत नाहीय ह्या सर्वांसोबतचा काळ आनंदात गेला मला Huston संस्थेतील Flight Director Nicole Maloy ह्यांचे विशेष आभार मानावयाचे आहेत त्यांच्या उत्कृष्ट लीडरशिप बद्दल त्यांनी नियोजनात बदल करून हि मोहीम विकासात्मक,सुविधाजनक आणी यशस्वी केली Nicole तुझ्या उत्साही पॅझिटिव्ह विचारांचा सर्वावर प्रभाव पडला तू इथले वातावरण आनंदी ठेवलेस तुझयासारख्या  चांगल्या खेळकर व्यक्तिमत्वाची इथे खूप गरज असते Johnny तु खूप मेहनती आहेस ह्या आधी मी तुझ्यासारखी व्यक्ती पाहिली नव्हती पुढच्या सेगमेंट साठी तुझ्यावर शंभर टक्के विश्वास आहे मला तुझ्याशी बोलताना आनंदी वाटायच कारण तू हसतमुख असतोस आणि नेहमी विनोद करतोस त्या मुळे तुझ्यासोबतचे लोक आनंदी होतात तुझ्या मित्रत्वाबद्दल आभार ! नासा संस्थेतील सर्वांचे आभार ह्या वेळी Onishi ह्यांनी स्थानकाची सूत्रे Sergey ह्यांच्या हाती सोपविली तेव्हा अंतराळवीरांनी घंटा वाजवून त्यांचे स्वागत केले Sergey ह्या मोहिमेतील नेतृत्वाबद्दल आभार आपण खूप गप्पा मारल्या आणि नेहमी एकमेकांना मदत केली अनेक आव्हानात्मक प्रसंगावर मात केली आता तुम्ही सर्वजण आनंदात संशोधन करा ह्या मोहीम 73 च्या दुसऱ्या भागाचे नेतृत्व मी आता योग्य हाती सोपवत आहे इथे खूप साऱ्या गोष्टी मिळत नाहीत पण अनेक अशा गोष्ठी मिळतात ज्या पृथ्वीवर मिळत नाहीत स्थानकात केल जाणार संशोधन पृथ्वीवर करता येत नाही ते सुरु ठेवा 

Sergey -Thanks ! आपल्या मोहीम 73ची सुरवात अपोलो च्या पन्नासाव्या वर्धापन दिनी झाली आपण सर्वांनी स्थानकात एकत्र तो दिवस साजरा केला अंतराळस्थानकाचाही पंचविसावा वर्धापनदिन साजरा केला पृथ्वीवरील इतिहास पाहिला तर लोक एकमेकांसोबत सहकार्याने राहात नाहीत पण इथे स्थानकात एकिच स्वरूप पाहायला मिळत सर्वजण एकत्रित वास्तव्य करून संशोधन करतात ह्या चार महिन्यांच्या आनंदी वास्तव्याबद्दल आभार आता तुम्ही पृथ्वीवर सुखरूप पोहोचावे हि सदिच्छा! आम्ही नक्कीच हे संशोधन सुरु ठेवू आणि आनंदात हास्यविनोदात वास्तव्य करून हि मोहीम यशस्वी करू ! 

त्या नंतर सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला आणि अंतराळवीर पृथ्वीवर येण्यासाठी स्थानका बाहेर पडले


No comments:

Post a Comment