Blue Origin NS-36 मोहिमेतील अंतराळ पर्यटक -फोटो- Blue Origin
Blue Origin - 8 आक्टोंबर
Blue Origin ची अंतराळ पर्यटन मोहीम आता नियमीत सुरु झाली आहे ह्या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळत आहे Blue Origin च्या NS -36 अंतराळ पर्यटन मोहिमे अंतर्गत सहा नागरिक आठ आक्टोंबरला अंतराळ पर्यटन करून परतले आहेत आणि हि ह्या वर्षातील आठवी मानवी अंतराळ पर्यटन मोहीम होती
ह्या अंतराळ पर्यटकामध्ये Jeff Elgin, Danna Karagussova,Dr.Clint Kelly III,Aaron Newman,Vittalli Ostrovsky,Will Lewis ह्यांचा समावेश होता Blue Origin चे हे15वे मानवी पर्यटन होते आतापर्यंत 86 नागरिक ह्या मोहिमे अंतर्गत अंतराळ पर्यटनास जाऊन आले आहेत
ऊद्योजक Jeff ह्यांची Franchise Industry आहे गेल्या पंचवीस वर्षात त्यांच्या ऊद्योगाचे नेटवर्क संपूर्ण युनायटेड स्टेटस मध्ये पसरले असून त्या द्वारे ते होतकरु ऊद्योजकांना मार्गदर्शन करतात
गेल्या पंचवीस वर्षांपासून Danna मिडिया वितरण विभागात कार्यरत आहेत त्यांनी पोर्टलची सहस्थापना देखील केली आहे धाडसी कल्पना वास्तवात रुपांतरित करण्याऱ्या कर्तृत्वान Danna ह्यांना गीर्यारोहणाची आवड आहे त्यांनी किलीमांजरो,माऊंट एलब्रस पर्वतावर गीर्यारोहण केले आहे अंतराळ पर्यटन म्हणजे केवळ मनोरंजन नाही तर मानवी विकासाचे परीवर्तनकारी ऐतिहासिक पाऊल आहे असे त्यांचे मत आहे कझाकस्थानातील अंतराळ पर्यटन करणाऱ्या पहिल्या महिला अंतराळयात्री होण्याचा मान त्यांनी प्राप्त केला आहे
Clint- Electrical Engineer(PHD) आणि संशोधक आहेत Computer Science &Robotics ह्या विभागातील सरकार आणी ऊद्योग संशोधन विकास प्रमुख पदावर काम केले Clint ह्यांनी 1984 मध्ये DARPA येथे Autonomous Land Vehicle प्रकल्पाची सुरवात केली त्यामुळे आताच्या ड्रायव्हर लेस कारना चालना मिळाली त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेसाठी अवकाश संवेदन संशोधन केले त्यांना वन्यजीव संशोधन व छायाचित्रणाची आवड आहे त्यांनी त्यांच्या पत्नी सोबत अनेक खंडातील मोठ्या मांजरी,ध्रुवीय अस्वल व 21 प्रकारच्या पेंग्विन प्रजाती आणि वन्यजीवांची संशोधीत माहिती गोळा केली त्यांचे पेग्विन विषयी 486 पानाचे संशोधित पुस्तक प्रकाशित झाले आहे त्यांचे हे दुसरे अंतराळ पर्यटन होते ह्या आधी Blue Origin च्या NS -22 मोहिमेअंतर्गत ते अंतराळ पर्यटनास गेले होते
Aaron -मालिका उद्योजक व संशोधक आहेत त्यांनी पाच यशस्वी Software Startup ची स्थापना केली ते लेखक आहेत त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली असुन सहा पेटंटचे मालकी हक्क त्यांच्याकडे आहेत त्यांनी संशोधनासाठी टायटॅनिक च्या काठावर प्रवास केला त्यांना देखील गिर्यारोहणाची आवड आहे त्यांनी दोनदा एव्हरेस्ट शिखरावर चढण्याचा प्रयत्न केला ते पहिल्या आखाती युद्धातील अनुभवी स्वाभिमानी अमेरिकन सैनिक आहेत त्यांच्या Exploration Deep World संस्थेमार्फत पृथ्वीवरील समुद्रातील खोल पाण्याचे अन्वेषण,संवर्धन आणि वैज्ञानिक संशोधन केल्या जाते
Vitalli -युक्रेनियन हॉटेल उद्योजक,रियल इस्टेट गुंतवणूकदार ,सिस्टीम अनॅलिस्ट आणि वेब डेव्हलपर आहेत कामानिमित्त त्यांनी गेल्या दहा वर्षात शंभरहून अधिक देशात वास्तव्य केले असून त्यात आर्क्टिक सर्कल पासून अंटार्क्टिकाचा बर्फ़ाळ भागाचा समावेश आहे
हे सहाही अंतराळ पर्यटक Blue Origin च्या West Texas येथील उड्डाण स्थळावरून New Shepard अंतराळयानातून सकाळी 9.40 मिनिटांनी अंतराळ पर्यटनास निघाले आणि अवघ्या काही मिनिटात त्यांचे यान अंतराळ आणि पृथ्वीमधील सीमारेषा कर्मन लाईन भेदून अंतराळात पोहोचले अंतराळातील झीरो ग्रव्हिटित पोहोचताच सर्वांच्या तोंडुन ऊत्स्फुर्त प्रतिक्रिया बाहेर पडल्या सर्वांनी अंतराळातील झीरो ग्ग्रॅव्हिटित तरंगण्याचा आनंद घेतला सर्वांनी एकमेकांना आपण खरेच अंतराळात पोहोचल्याची जाणीव करून दिली
WOW! WOW ! We are Flying , Its Amazing ! Oh !My God !आपण पृथ्वीच्या वर कर्मन रेषेच्या वर अंतराळात पोहोचलो आहोत ह्या मोठ्या खिडकीतून चंद्र पहा ! पृथ्वीकडे पहा असे म्हणत अंतराळातील झीरो ग्रँव्हिटित तरंगण्याचा आनंद लुटला आणी हा अदभूत आनंद अनुभवुन हे पर्यटक दहा बारा मिनिटात पृथ्वीवर परतले तेव्हा त्यांना भेटण्यासाठी त्यांचे नातेवाईक हजर होते
ह्या सर्व पर्यटकांना Blue Origin कंपनीतर्फे त्यांची कर्तृत्व वैशिष्ट्ये कोरलेला patch आणी ते अंतराळवीर झाल्याचे सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात आले

Blue Origin NS-36 च्या अंतराळ पर्यटकांसाठी तयार करण्यात आलेला Patch
Clint ह्यांच्या साठी चंद्र आणी पृथ्वी हे अंतराळप्रवास आणी व्यापाराचे प्रतिक,Danna साठी कझाकस्थानातील पर्वत ह्या विशाल पर्वताची ऊत्तुंगता पाहून Danna ला मानवाच्या छोटेपणाची जाणीव होते Vitalli ह्यांचे चिन्ह युक्रेन मधील तारांकित आकाश त्यांच्या जन्मभुमी व कर्मभूमीची आठवण देणारे Aaron ह्यांंच्या महासागराचे संशोधन आणी संवर्धनासाठीचे प्रतिक चिन्ह Jeff ह्यांचे Mercury Capsule Alan shepard च्या ऊड्डाण आणी Jeff ह्यांंचे अंतराळ ऊड्डाण स्वप्न पुर्तता दर्शवतात
ह्या यशस्वी अंतराळपर्यटनाने Blue Originचे वरिष्ठ ऊपाध्यक्ष आनंदित झाले ते म्हणतात हे अंतराळयात्री जेव्हा प्रुथ्वी ते अंतराळ प्रवास करून परततात तेव्हा त्यांच्या पृथ्वी कडे पहाण्याच्या द्रुष्टी कोनात बदल होतो पृथ्वी सौंदर्य पाहून त्यांना जागतिक एकात्मकतेची जाणीव होते आणी पृथ्वी संरक्षणासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे
No comments:
Post a Comment