Sunday 27 December 2020

नासाच्या अंतराळवीरांनी स्थानकात नाताळ सण केला उत्साहात साजरा

      नासाचे अंतराळवीर Shannon ,Kate ,Soichi ,Hopkins आणि Victor स्थानकातून साधलेल्या लाईव्ह संवादा दरम्यान -फोटो नासा संस्था

नासा संस्था - 25 डिसेंबर 

सध्या अंतराळस्थानकात राहात असलेल्या मोहीम 64 च्या अंतराळवीरांनी नाताळ सण उत्साहात साजरा केला आणि पृथ्वीवरील नासा संस्थेशी लाईव्ह संवाद साधून सर्वांना नाताळच्या शुभेच्छाही दिल्या 

नाताळ साजरा करण्यासाठी सर्वच अंतराळवीरांनी त्यांची ह्या आठवड्यातील कामे लवकर आटोपून वेळ काढला आणि नाताळ साजरा केला अंतराळवीरांनी नाताळच्या पार्टीसाठी स्थानकातील डेक हॉलचा उपयोग केला तो सजवण्यासाठी सर्वच अंतराळवीरांची चढाओढ लागली होती सर्वानीच स्थानकातील मिळेल ते सामान आणून हॉल सजवला

 नासा च्या Johnson Space Center मधील प्रमुख लाईव्ह संवादादरम्यान अंतराळवीरांना डेकोरेशन दाखवताना -फोटो -नासा संस्था 

असेच चॅलेंज त्यांनी पृथ्वीवरील Houston येथील Johnson Space Center येथील मिशन कंट्रोल टीमला दिले आणि तिथल्या बिल्डिंग मध्ये असलेलेच सामान वापरून हॉल सजवायला सांगितले नासाच्या Flight Director Zebulon  ह्यांनी हे चॅलेंज स्वीकारले संस्थेतील सर्वांनी तेथील उपलब्ध सामान वापरून हॉल सजवला आणि अंतराळवीरांना दाखवला देखील त्या वेळी त्यांनी White dazzling Red आणि white coat परिधान केला आणि Flight Console वर चमकत्या माळा गुंडाळून केलेले डेकोरेशन दाखवले अंतराळवीरांसाठी सहा तारखेला स्थानकात पोहोचलेल्या कार्गोशिप मधून नाताळसाणासाठी Festive food पाठवल्याच नासाच्या Deputy Program Manager ह्यांनी ह्या वेळी सांगितल 

 नासाचे अंतराळवीर Mike Hopkins ,Victor Glover ,Kate Rubins ,Shannon Walker आणि Soichi Noguchi ह्या अंतराळवीरांनी खास व्हिडिओ काढून सोशल मीडियावर शेअर केला आणि सर्वांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या त्या वेळी संवाद साधताना अंतराळवीरांनी केलेली बातचीत

Mike Hopkins -आम्ही Space X Crew Dragon ला दिलेले Resilience हे नाव त्या सर्वांना समर्पित करतो ज्यांच्या मुळे आमच मिशन यशस्वी झाल आणि आम्ही इथे सुखरूप पोहोचलो आज स्थानकात उत्साहात नाताळ सण साजरा करतोय ते त्यांच्या मुळेच सर्वांना नाताळच्या हार्दिक शुभेच्छा !

Victor Glover -खरोखरच ह्या सारखे दुसरे समर्थक नाव असू शकत नाही ह्या वर्षीच्या कोरोना महामारीच्या कठीण काळात हे चॅलेंज स्वीकारून यशस्वी करण्यासारख दुसर असामान्य कर्तृत्व असूच शकत नाही आम्ही उत्साहात हा सण साजरा करतोय कारण आमच मिशन यशस्वी झालय आज माझी फॅमिली माझ्याच विचारात असेल माझ्यासाठी प्रार्थना करत असेल म्हणून मी त्यांचे फोटो प्रिंट असलेले पायमोजे घातलेत असे म्हणून त्यांनी सर्वांना पायमोजे दाखवले आणि सर्वांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या त्यांनी मिलिटरी आणि हेल्थ सर्व्हिस मेम्बर्सचे विशेष आभार मानले कारण त्यांच्या मते त्यांच्यामुळेच लोक सुरक्षित आणि फिट राहू शकतात 

अंतराळवीर Victor Glover लाईव्ह संवादादरम्यान फॅमिली फोटो प्रिंट पायमोजे घातलेले दाखवताना -फोटो -नासा संस्था

Shannon Walker -माझ्यासाठी ख्रिसमस म्हणजे फॅमिली,फ्रेंड्स ,फूड आणि सेलीब्रेशन इथे स्थानकात मला त्यांची उणीव प्रकर्षाने जाणवतेय तिथे पृथ्वीवर असताना त्यांची किंमत कळत नाही आज आम्ही आमच्या साठी आलेल्या खास पदार्थांचा जेवणात आस्वाद घेणार आहोत सर्वांना नाताळच्या शुभेच्छा !

Soichi Noguchi - आम्हा अंतराळवीरांसाठी जपानमधील शाळेतील मुलींनी खास तयार केलेले Canned mackerel आम्ही आज खाणार आहोत हे छोट आहे पण त्या साठी त्यांनी वर्षभर मेहनत घेतलीय त्या मुळे आमच्यासाठी ते मौल्यवान आहे नव्या वर्षाच कॅलेंडर बदलण्याआधी आपण नाताळ उत्साहात साजरा करू या आणि नविन वर्ष चांगल आणि निरोगी आयुष्य घेऊन येवो अशी प्रार्थना करू या ! सर्वांना नाताळच्या हार्दिक शुभेच्छा !

                  नासाचे अंतराळवीर स्थानकातून नाताळच्या शुभेच्छा देताना -फोटो -नासा संस्था

Kate Rubins - आज नाताळ सण साजरा करण्यासाठी हॉल सजवण्यासाठी अंतराळवीरांची स्पर्धा सुरु होती सर्वचजण हॉल आकर्षक सजवण्यासाठी धडपडत होते स्थानकात सगळीकडे सामान शोधत होते फिस्ट साठी तयारी करत होते त्यांनी स्थानकातील सगळीकडून मिळेल ते सामान आणून हॉल सजवलाय सारे खूप उत्साही आहेत आम्ही आनंदात आज नाताळ साजरा करतोय सर्वांना नाताळच्या हार्दिक शुभेच्छा !

ह्या सर्व अंतराळवीरांनी त्यांच्या चाहत्यांना सोशल मीडियावरून स्थानकातील नाताळ सेलिब्रेशनचा व्हिडिओ पाठवून शुभेच्छा दिल्या

Wednesday 16 December 2020

Space X Crew Dragon -3 साठी अंतराळवीरांची निवड भारतीय वंशाच्या राजा चारिंचीही निवड

composite photo showing NASA astronauts Raja Chari and Tom Marshburn, and ESA (European Space Agency) astronaut Matthias Maurer Space X Crew Dragon-3चे नासा अंतराळवीर Raja Chari Tom Marshburn आणि E.SAचे अंतराळवीर Mathias Maurer -फोटो -नासा संस्था 

नासा  संस्था - 14 डिसेंबर 

अमेरिकेचे अमेरिकन निर्मित Space X Crew Dragon आता तिसऱ्यांदा अंतराळात झेपावणार असून त्यातून अंतराळ प्रवास करणाऱ्या अंतराळवीरांची निवड निश्चित करण्यात आली आहेत अमेरिकेची नासा संस्था आणि युरोपियन E.SA संस्था ह्या दोघांनी मिळून Space X Crew Dragon -3 साठी तीन अंतराळवीरांची निवड केली आहे  नुकतेच Space X Crew Dragon Resilience मधून चार अंतराळवीर स्थानकात  सुखरूप पोहोचले आहेत ह्या आधीच्या Space X Crew Dragon च्या यशस्वी उड्डाणानंतर आता तिसऱ्यांदा Space X Crew Dragon अंतराळात झेपावणार आहे

सध्या निवड झालेल्या तीन अंतराळवीरांमध्ये भारतीय वंशाच्या राजा चारी ह्या अंतराळवीराचा समावेश आहे नुकतीच त्यांची 2024 च्या चांद्र मोहीम Artemis टीम मध्येही निवड झाली आहे 2021 मध्ये हे अंतराळवीर Space X Crew Dragon -3 मधून अंतराळ प्रवास करणार आहेत नासाचे अंतराळवीर राजा चारी,Tom Marshburn आणि E.SA चे अंतराळवीर Mathias Maurer हे तिघे अंतराळस्थानकात राहण्यासाठी जाणार आहेत ह्या मोहिमेत राजा चारी Crew Dragon च्या कमांडर पदाची तर Tom Marshburn Crew Dragonच्या Pilot पदाची जबाबदारी सांभाळतील Mathias Maurer हे मिशन specialist असतील चवथ्या अंतराळवीराची निवड अजून निश्चित झाली नसून नासा संस्था आणि त्यांचे इंटरनॅशनल पार्टनर लवकरच चवथ्या अंतराळवीराचे नाव निश्चित करतील 

राजा चारी ह्यांची हि पहिलीच अंतराळवारी असून 2017 साली त्यांची नासा संस्थेत अंतराळवीर म्हणून निवड झाली Milwaukee येथे जन्मलेले राजा चारी नंतर Lowa येथे स्थायिक झाले नासा संस्थेत येण्याआधी ते U.S.Force मध्ये कार्यरत होते नंतर त्यांची नासा संस्थेत Test Pilot पदासाठी निवड झाली त्यांना त्यांच्या करिअर मधला आकाशात 2,500 तास विमान उड्डाणाचा अनुभव आहे 

Marshburn हे North Carolina येथील रहिवासी आहेत आणि ते डॉक्टर आहेत 2004 मध्ये त्यांची नासा संस्थेत निवड झाली सुरवातीला ते नासाच्या Houston येथील Johnson Space Center मध्ये  Flight Surgeon पदावर कार्यरत होते नंतर त्यांची निवड  स्थानकातील अंतराळवीरांसाठीच्या  Medical Operation प्रमुखपदी झाली त्यांची हि तिसरी अंतराळवारी आहे ह्या आधी त्यांनी 2009 आणि 2013 साली अंतराळस्थानकात वास्तव्य केले आहे आता दुसऱ्यांदा स्थानकात ते जास्त  दिवस मुक्काम करणार आहेत 

Mathias Maurer हे  Sankt Wendel ह्या German State Of Saarland मधील रहिवासी आहेत Maurer हे देखील राजा चारी ह्यांच्या प्रमाणे प्रथमच अंतराळ प्रवास करणार आहेत अंतराळवीर म्हणून नासा संस्थेत निवड होण्याआधी त्यांनी इंजिनिअरींगच्या विविध शाखेत प्रावीण्य मिळवले असुन त्यांनी युनिव्हर्सिटी आणि E.SA संस्थेतील विविध शाखेत संशोधकपदी काम केलय 2016 मध्ये Under Sea Mission अंतर्गत त्यांनी समुद्राखाली 16 तास व्यतीत केले हि मोहीम   NASA संस्थेच्या Extreme Environment mission operations Space Analog अंतर्गत होती 

हे तिन्ही अंतराळवीर अंतराळस्थानकात सहा महिने राहून तेथील संशोधनात सहभागी होतील 2021च्या Spring मध्ये Space X Crew Dragon -3चे launching करण्यात येणार आहे सध्या अंतराळस्थानकात सात अंतराळवीर एकत्रित राहून तेथील संशोधनात सहभागी झाले आहे 

Tuesday 15 December 2020

नासाच्या चांद्र मोहिमेतील Artemis टीम मधील अंतराळवीरांची नावे जाहीर

नासा संस्था -15 डिसेंबर 

मागच्या आठवड्यात बुधवारी 9 तारखेला नासाच्या Florida येथील Kennedy Space Center मध्ये आठवी Space Council Meeting पार पडली ह्या मिटींगच्या वेळेस Vice President Mike Pence ह्यांनी 2024 मधल्या Artemis चांद्र मोहिमेतील सहभागी अंतराळवीरांची नावे जाहीर केली ह्या वेळेस बोलताना ते म्हणाले ,मी Artemis मोहिमेतील सहभागी अंतराळवीरांची नावे जाहीर करत आहे हे सर्व अंतराळवीर आपल्या देशाचे हिरो आपल्याला चंद्रावरच घेऊन जाणार नाहीत तर भविष्यातील Artemis पिढीचे प्रतिनिधित्व करणार आहेत ह्या Artemis मोहिमेत महिलेला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे ऐकून मला खूप आनंद झाला अमेरिकेतील अंतराळविश्वाचे भवितव्य उज्वल आहे ह्या टीममधील सहभागी अंतराळवीर वेगवेगळ्या भागातून आणि वेगवेगळ्या पेशातील अनुभव संपन्न तज्ञ आहेत 2024 मध्ये Artemis चंद्रावर पोहोचेल तेव्हा नासाची पहिली महिला चांद्रभूमीवर आपल्या पाऊलाचा ठसा उमटवेल आणि नव्या ऐतिहासिक युगाची सुरवात होईल 

 नासाचे अंतराळवीर 2024 मध्ये Artemis चांद्र मोहिमे अंतर्गत चंद्रावर जाणार आहेत आणि विशेष म्हणजे ह्या Artemis मोहिमेत अंतराळवीरांसोबत जाणाऱ्या महिला अंतराळवीराला चंद्रावर प्रथम पाऊलस्पर्श करण्याची संधी  देण्यात येणार आहे तीन अंतराळवीरांमध्ये एका महिला अंतराळवीराचा सहभाग असेल आणि चंद्रावर पोहोचताच ती प्रथम चांद्रभूमीवर उतरेल नंतर उर्वरित अंतराळवीर चंद्रावर उतरतील

ह्या मोहिमेबद्दल मत व्यक्त करताना नासाचे Administrator Jim Bridenstine म्हणाले आम्ही ह्या मोहिमेला परवानगी दिल्याबद्दल आणि First Woman next Man ह्या अभूतपूर्व संकल्पनेला आणि महिलेचे कर्तृत्व सिद्ध करण्याच्या संधीला मान्यता दिल्याबद्दल Mike Pence ह्यांचे आभारी आहोत शिवाय ह्या मोहिमेतील सहभागी NASA Science,Aeronautic Research Technology Development आणि Human Exploration Goals ह्या सर्व सहभागी टीमचे आभारी आहोत आम्ही सर्वचजण ह्या Artemis मोहिमेची उत्सुकतेने वाट पाहात आहोत कारण ह्यात पहिली महिला चंद्रावर उतरणार आहे 

 ह्या वेळेस Chief Astronaut Pat Forrester ह्यांनी देखील आपले मत व्यक्त केले आम्ही सर्व अंतराळवीर आम्हाला ह्या मोहिमेत सहभागी केल्याबद्दल तुमचे आभारी आहोत हि मोहीम यशस्वी करण्यासाठी चंद्रावर जाण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत Excited आहोत आम्ही त्या क्षणाची आतुरतेने वाट पाहात आहोत ह्या मोहिमेतील प्रथम महिला चांद्रभूमी स्पर्श संकल्पना नाविन्यपूर्ण आहे तिथे गेल्यावरच नाही तर तिथून पृथ्वीवर परतल्यानंतर तिथून आणलेल्या सॅम्पल्स वर संशोधन करण्याचे कामही महत्वपूर्ण आहे आता आमच्यावर हि मोहीम यशस्वी करण्याची मोठी जबाबदारी आहे आणि आम्ही ती निश्चितच यशस्वी करणार आहोत 

ह्या मोहिमेतील सहभागी अंतराळवीरांमध्ये भारतीय वंशाच्या राजा चारी आणि सध्या अंतराळस्थानकात राहात असलेल्या Kate Rubins ,Victor Glover आणि नुकतेच स्थानकातून परतलेल्या पहिल्या ओन्ली महिला स्पेस वॉकर जेसिका मीर आणि क्रिस्टिना कोच ह्यांचा समावेश आहे 

Joseph Acaba,Kayla Barron,Raja Chari ,Warren Hoburd Cristina Koch,Kjell Lindgren ,Nicole A.Mann,Anne McClain ,Jessica Meir Jasmin Moghbel,Kate Rubins ,Scott Tingle Jessica Watkins Stephanie Wilson ह्यांचा समावेश आहे

Tuesday 8 December 2020

अंतराळस्थानकात उगवलेल्या मुळ्याची Kate Rubins ने केली कापणी अंतराळवीरांनी घेतला आस्वाद

  Expedition 64 Flight Engineer Kate Rubins is pictured with radish bulbs

 नासाची अंतराळवीर Kate Rubins स्थानकातील व्हेजी चेंबर मध्ये उगवलेले मुळे दाखवताना -फोटो नासा संस्था 

नासा संस्था - 4 डिसेंबर 

 नासाच्या अंतराळ मोहीम 64 ची Flight Engineer Kate Rubins हिने नुकतीच अंतराळ स्थानकातील व्हेजी चेंबरमध्ये उगवलेल्या मुळ्याच्या रोपांना आलेल्या पानांची कापणी केली चार आठवड्यांपूर्वी अंतराळवीरांनी स्थानकातील लॅबमध्ये ह्या रोपांची लागवड केली होती मुळा व त्याची पाने आरोग्यदायी आहेत त्यात भरपूर व्हिटॅमिन्स असतात आणि मुळ्याचे उत्पादन कमी दिवसात होत असल्याने मुळ्याची निवड स्थानकातील Habitat-2 प्रोजेक्ट साठी करण्यात आली 

सध्या अंतराळस्थानकातील लॅब मध्ये पृथ्वी प्रमाणे कृत्रिम वातावरण निर्मिती करून बनविण्यात आलेल्या व्हेजी चेंबर मध्ये Habitat -02 ह्या प्रकल्पा अंतर्गत व्हेजी प्रोजेक्ट राबवण्यात येत आहे स्थानकातील झिरो ग्रॅविटीत भाजी,फळे,फुले आणि धान्य ह्यांची लागवड करून पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षणात होणारी वाढ आणि स्थानकातील गुरुत्वाकर्षण विरहित वातावरणात होणारी वाढ ह्यावर निरीक्षण नोंदवून त्यावर संशोधन करण्यात येत आहे त्या साठी स्थानकातील कृत्रिम बागेतील ह्या व्हेजी चेंबरमध्ये पृथ्वीसारखेच तापमान व वातावरण तयार करण्यात आले आहे शिवाय दिवस आणि रात्रीचा आभास निर्माण करून अंधार व उजेड निर्माण करण्यात आला आहे त्या साठी रंगीत लाईटचा वापर करण्यात आला आहे अंतराळस्थानकातील अंतराळवीर त्यांच्या संशोधनातून वेळ काढून ह्या रोपांची देखभाल करतात ह्या प्रोजेक्टचा उपयोग आगामी दूरवरच्या अंतराळ मोहीमांतील अंतराळवीरांना तेथील वास्तव्यादरम्यान स्वत:चे अन्न पिकवण्यासाठी होईल

गेल्या वीस वर्षांपासून अंतराळवीर अंतराळ स्थानकात राहून मानवी आरोग्यासाठी आवश्यक असे संशोधनात्मक प्रयोग करत आहेत त्यांना पृथ्वीवरून आलेले प्रिझर्व व फ्रोजन अन्न खावे लागते त्यासाठी त्यांना पृथ्वीवर अवलंबून राहावे लागते त्यामुळे स्थानकातील झिरो ग्रॅविटीत त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम नये त्यांना ताजे अन्न व भाजीपाला मिळावा म्हणून स्थानकातील अंतराळ वीरांनी हा  व्हेजी प्रोजेक्ट सुरु केला आणि त्यात त्यांना यशही मिळाले आहे सर्वात आधी नासाच्या रेकॉर्डब्रेकर अंतराळवीर  Peggy Whitson ह्यांनी अंतराळ स्थानकात कोबीची यशस्वी लागवड केली नंतर Scott Kelly,Andrew Margen,Jessica Meir हयांनी व इतर अनेक अंतराळवीरांनी हा व्हेजी प्रोजेक्ट यशस्वी करून स्थानकात उगवलेल्या भाजीचा आस्वाद घेतला मोहीम 61चे अंतराळवीर Andrew Margen आणि Jessica Meir ह्यांनी स्थानकात उगवलेल्या Mizzuna Mustard Green ह्या भाजीची देखभाल करून त्यांचा आस्वाद घेतला होता (वाचा ह्या संदर्भातील बातमी ह्याच ब्लॉगवर)

 Expedition 64 Flight Engineer Kate Rubins photographs radish leaves

 स्थानकातील Harmony Module मधल्या Work area मधील भिंतीवर चिटकवलेली पाने दाखवताना Kate Rubins फोटो -नासा संस्था

सद्या स्थानकात राहात असलेल्या अंतराळवीरांनी विशेषतः Kate Rubins आणि जपानचे अंतराळवीर Souchi Noguchi ह्यांनी ह्या मुळ्याच्या रोपाची काळजी घेतली नुकतीच ह्या दोघांनी ह्या रोपाला आलेल्या पानांची कापणी केली त्यातील काही पाने त्यांनी पृथ्वीवर नमुना म्हणून परत आणण्यासाठी ठेवली तर काही पानांचा त्यांच्या जेवणासोबत आस्वाद घेतला हि पाने त्यांनी स्थानकाच्या Harmony Module मधील त्यांच्या Work area मध्ये लटकावून त्याचे फोटो काढले आणि पृथ्वीवरील नासा संस्थेत पाठविले ह्या दोन अंतराळवीरांनी ह्या रोपांचे फोटो त्यांच्या चाहत्यांना देखील सोशल मीडियावरून शेअर केलेत

Sunday 29 November 2020

अंतराळवीरांनी केला स्थानकात Thanks Giving Day साजरा

 

नासाच्या मोहीम 64 चे अंतराळवीर स्थानकात Thanks Giving Day साजरा करताना पार्टी दरम्यान -फोटो नासा संस्था

नासा संस्था - 28 Nov. 

ह्या वर्षीचा Thanks Giving Day अमेरिकेसाठी वेगळा होता सर्व जगाप्रमाणेच अमेरिका देखील कोरोनाच्या महामारीने त्रस्त आहे लॉक डाऊन शिथिल होताच पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली आणि लोक पुन्हा घरात बंदिस्त  झाले दरवर्षी प्रमाणे अमेरिकन नागरिक एकमेकांच्या घरी जाऊन हॉटेलात सामुदायिकरित्या उत्साहात हा दिवस साजरा करू शकले नाहीत पण अंतराळ स्थानकात सद्या वास्तव्यास असलेल्या अंतराळवीरांनी मात्र एकत्रितपणे हा दिवस साजरा केला आणि त्याचे फोटो,व्हिडीओ सोशल मीडियावरून त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत

आपल्यावर केलेल्या उपकाराची जाणीव ठेवून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचे आभार मानण्यासाठी Thanks Giving Day दरवर्षी अमेरिकेत उत्साहात साजरा केला जातो ह्या दिवशी आपल्या कुटुंबियांसोबत खास पार्टीचे आयोजन करून त्यात त्यांचे मित्र व आप्तस्वकीय ह्यांना देखील आमंत्रित केल्या जाते त्या दिवशी पार्टीचा मेन्यू देखील खास असतो इतर पदार्थांसोबतच टर्की ह्या पक्षाच्या पदार्थाला विशेष महत्व असते 

सध्या स्थानकात सात अंतराळवीर वास्तव्य करत आहेत नासाचे अंतराळवीर Kate Rubins,Michael Hopkins Victor Gloverआणि Shannon Walker हे चोघे त्यांचे सहकारी जपानचे अंतराळवीर Soichi Noguchi रशियन अंतराळवीर Sergey Rhyzikov आणि Sergey Sverchkov ह्यांच्या सोबत एकत्रित पार्टी करून Thanks Giving Day साजरा करणार असल्याचे लाईव्ह संवादादरम्यान ह्या सर्वांनी सांगितले होते ह्या सर्वच अंतराळवीरांनी त्यांच्या संशोधनाची ह्या आठवड्यातील कामे लवकर आटोपून खास वेळ राखून ठेवत ह्या दिवसाच्या पार्टीची तयारी केली  ह्या अंतराळवीरांनी लाईव्ह संवादादरम्यान संस्थेतील प्रमुखांशी बातचीत केली

सुरवातीला Flight Engineer Kate Rubins ने सर्वाना Thanks Giving Day च्या शुभेच्छा देत संवाद साधताना सांगितल ,"हा दिवस स्थानकात साजरा करण माझ्यासाठी आनंददायी आहे ह्या वर्षी आम्ही चौघे अमेरिकन इथे स्थानकात एकत्र आलो आहोत जेव्हा हे चौघे Resilience Crew Dragon मधून स्थानकात पोहोचले तो  क्षण माझ्यासाठी खूप आनंददायी होता ह्या स्थानकातील घरात तुमच सहर्ष स्वागत!अस मी आनंदाने म्हटल होत आम्ही आज आमच्या इंटरनॅशनल मित्रांसोबत हा दिवस साजरा करणार आहोत आज स्पेशल डिनर घेणार आहोत त्या बद्दल माझे सहकारी अंतराळवीर तुम्हाला सांगतील 

Shannon Walker - हा दिवस दुसऱ्यांदा मी स्थानकात साजरा करतेय हा माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण आहे हा अमेरिकन नागरिकांचा पारंपारिक सण आहे आणि तो आम्ही आमच्या इंटरनॅशनल सहकाऱ्यांसोबत साजरा करतोय आम्ही खूप एन्जॉय करणार आहोत 

 नासाच्या अंतराळ मोहीम 64 Victor Glover Frozen Corn bread चे पॅकेट दाखवताना लाईव्ह संवादादरम्यान   -फोटो -नासा संस्था

Victor Glover-Awesome ! प्रथमच स्थानकातील झिरो ग्रॅविटीत Thanks Giving Day साजरा करायला मिळतय मी भाग्यवान आहे खरतर पृथ्वीवरून स्थानकात येतानाचा अंतराळ प्रवास आणि इथून स्थानकाच्या खिडकीतून पृथ्वीच अलौकिक सौन्दर्य पाहायला मिळण आणि आता Thanks Giving Day Celebration सारच अद्भुत !एरव्ही मी पृथ्वीवर माझ्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत हा सण साजरा केला असता पण आता मी आमच्या इंटरनॅशनल फ्रेंड्स सोबत हा दिवस साजरा करणार आहे आम्ही आमच्या पार्टीत फ्रोझन फूड खाणार आहोत असे म्हणत त्यांनी फ्रोझन Corn bread चे पॅकेट दाखवले आणि सर्वांना Thanks Giving Day च्या शुभेच्छा दिल्या 

Soichi Noguchi -हे 2020 च वर्ष कोरोना मुळे खूप टफ आहे पण इतक्या कठीण परिस्थितीतही अमेरिकेचे  Perseverance मंगळ यान  मंगळाच्या वाटेवर आहे आणि  Resilience Space X मधून आम्ही स्थानकात पोहोचलो आहोत त्या मुळे हे वर्ष Perseverance आणि Resilience च आहे आज आम्ही सर्वजण एकत्रित हा दिवस साजरा करतोय मी दुसऱ्यांदा स्थानकात हा दिवस साजरा करणार असल्याने मीही आनंदित आहे आमच्या पार्टी मेनूत Corn bread dressing ,Smoked turkey,green beans,mashed potatoes ह्याचा समावेश आहेच शिवाय जपानमधील high school student नि खास अंतराळवीरांसाठी तयार केलेल seafood आणि जापनीज curry rice ,red bean rice ह्याचाही समावेश आहे तुम्हा सर्वांना Happy Thanks Giving Day ! हा दिवस दिवसातील प्रत्येक क्षण तुम्हाला आनंदाचा जावो!                                     

Michael Hopkins - मीही दुसऱ्यांदा स्थानकात हा दिवस साजरा करतोय 2013 मध्ये मी स्थानकात हा दिवस साजरा केला होता हा दिवस माझ्यासाठी आणि माझ्या फॅमिलीसाठी स्पेशल असतो आता मी माझ्या इंटरनॅशनल फॅमिलीसोबत स्थानकात तो साजरा करतोय हा दिवस साजरा करताना पृथ्वीवर आणि आता इथेही खूप छान वाटत आम्ही खूप एन्जॉय करणार आहोत तुम्हा सर्वांना Thanks Giving Day निमित्य हार्दिक शुभेच्छा ! आम्ही सर्वजण आता आमच्या कुटुंबियांशी संवाद साधणार आहोत  अंतराळवीरांनी सांगितल्या प्रमाणे Thanks Giving Day साजरा केला आणि त्याचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावरून त्यांच्या चाहत्यांशी शेअरही केले .

Wednesday 25 November 2020

अंतराळ स्थानकात उगवली मुळ्यांची पाने अंतराळवीर Soichi नीं केली देखभाल

Expedition 64 Flight Engineer Soichi Noguchi of JAXA

 जपानचे अंतराळवीर Soichi Noguchi अंतराळ स्थानकातील Columbus Lab Module मधल्या व्हेजी चेंबरमध्ये उगवलेली मुळ्यांची पाने दाखवताना 

नासा संस्था -24nov.

नासाच्या अंतराळ मोहीम 64 चे अंतराळवीर Michal Hopkins ,Shannon,Victor आणि जपानी अंतराळवीर Soichi Noguchi नुकतेच Space X Dragon मधून अंतराळ स्थानकात पोहोचले आणी आता त्यांनी तिथे सुरु असलेल्या संशोधनात सहभागी होऊन आपले कामही सुरु केले आहे ह्या अंतराळवीरांनी आपल्या चाहत्यांना सोशल मीडियावरून त्यांचे व्हिडिओही शेअर केले आहेत अंतराळवीर Soichi ह्यांनी अंतराळ स्थानकातील Columbus Lab Module मधल्या व्हेजी चेंबर मध्ये लावण्यात आलेल्या मुळ्याच्या रोपांची पाहणी केली आणि त्याची देखभाल केली 

अंतराळवीरांना स्थानकातील निवासादरम्यान आपल्या सारखे ताजे अन्न मिळत नाही त्यांना पृथ्वी वरून आलेल्या प्रिझर्व अन्नावर अवलंबुन राहावे लागते म्हणूनच स्थानकातील झिरो ग्रॅविटीतील लॅब मध्ये व्हेजी चेंबर तयार करण्यात आला आहे त्यात रोपांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले पृथ्वीसारखे वातावरण निर्माण करून त्यात व्हेजी प्रोजेक्ट राबविल्या जात आहे आणि अंतराळवीरांना त्यात यशही मिळाले आहे

व्हेजी चेम्बरमध्ये रंगीत लाइटचा वापर करून दिवस व रात्रीसारखा प्रकाश व अंधार निर्माण केल्या जातो शिवाय रोपवाढीसाठी आवश्यक असणारे कमीजास्त  तापमानही निर्माण केल्या जाते गेल्या अनेक वर्षांपासून अंतराळवीर ह्या व्हेजी चेंबरमध्ये वेगवेगळ्या भाज्या,सलाद आणी धान्य लागवड करीत आहेत स्थानकातील झिरो ग्रॅविटीतील कृत्रिम बागेत ह्या आधी लेट्युस,लाल कोबी ह्या सारख्या भाज्याही उगवल्या आणि अंतराळवीरांनी त्यांचा आस्वादही घेतला आहे विशेष म्हणजे ह्या आधी स्थानकात गहू देखील अंकुरले होते (ह्या संबधीत बातम्या ह्या आधी blog वर प्रकाशित)

सध्या ह्या व्हेजी चेंबरमध्ये मुळ्यांची रोपे लावण्यात आली आहेत मुळा आरोग्यासाठी उपयुक्त आहे त्यात भरपूर व्हिटॅमिन्स असतात आणि ह्या रोपांची वाढही लवकर होते म्हणून संशोधनासाठी आणी अंतराळवीरांना खाण्यासाठी मुळ्यांची निवड करण्यात आलीय स्थानकातील झिरो ग्रॅविटीत मुळ्याची वाढ कशी होते पृथ्वीवरील वातावरणात आणि स्थानकातील वातावरणातील होणारी मुळ्याची वाढ ह्यातील फरकाचे निरीक्षण नोंदवून त्यावर संशोधन करण्यात येत आहे मुळा आणी त्याची पाने अंतराळवीरांच्या आरोग्यासाठी लाभदायक आहेत आता काही पाने अंतराळवीर पृथ्वीवर सॅम्पल म्हणून आणतील तर काहींचा आस्वाद घेतील 

अंतराळवीरांना ताजे अन्न मिळावे म्हणून हा प्रोजेक्ट राबविल्या जात आहे  ह्याचा उपयोग आगामी दूरवरच्या अंतराळ मोहीमांतील अंतराळवीरांना होईल अंतराळवीर चंद्र आणि मंगळावर जेव्हा निवास करतील तेव्हा त्यांना पृथ्वीवरच्या प्रिझर्व व फ्रोझन फूडवर अवलंबून राहावे लागणार नाही ते स्वत:साठीच अन्न,भाजीपाला व फळे पिकवू शकतील

Wednesday 18 November 2020

नासाचे चारही अंतराळवीर अंतराळस्थानकात सुखरूप पोहोचले

      View from within the Crew-1 cabin just before docking on Nov. 16, 2020अंतराळवीर Mike Hopkins आणि Pilot Victor Glover Space X Dragon स्थानकाजवळ पोहोचल्यावर  Docking आधी Screen वर पाहताना फोटो -नासा संस्था 

नासा संस्था- 17 Nov.

नासाचे मोहीम 64 चे अंतराळवीर Michael Hopkins,Shannon Walker,Victor Glover आणी जपानचे अंतराळ वीर Soichi Noguchi सोमवारी रात्री 11 वाजता स्थानकात सुखरूप पोहोचले नासा आणी Space X ह्यांचे Resilience अंतराळ यान 27 तासांच्या अंतराळ प्रवासानंतर अंतराळ स्थानकाजवळ पोहोचताच Space X dragon मधील स्वयंचलीत यंत्रणा कार्यरत झाली आणि यानातील अंतराळ विरांनी स्थानकातील Kate Rubin's आणी सहकारी अंतराळ वीरांशी संपर्क साधला सर्व यंत्रणा व्यवस्थित काम करत असल्याची खात्री झाल्यावर Resilience  अंतराळ यान आणी स्थानक एकमेकांना जोडले गेले 

त्याआधी स्थानकात flight engineer Kate Rubin's ने ह्या यानाच्या Docking आणी Hatching ची पुर्व तयारी केली रात्रीच्या वेळेस स्थानक व यान ह्या मधील संपर्क साधताना काही त्रुटी राहु नये म्हणून Kate तयारी करत होती स्थानकातील वायर जोडणी करून टॉर्चच्या प्रकाशात चेकिंग करत होती सर्व ठिक असल्याची खात्री होताच यानाशी संपर्क साधला गेला त्यानंतर यानाच्या स्वयंचलित यंत्रणेने Hatching आणि docking प्रक्रिया पार पडली आणी स्थानकाचा दरवाजा ऊघडल्या गेला

स्थानकाचा दरवाजा ऊघडताच सर्व प्रथम ह्या मोहिमेचे कमांडर अंतराळवीर Michael Hopkins ह्यांनी स्थानकात प्रवेश केला त्यानंतर Pilot Victor Glover आणी Shannon Walkerआत आले सर्वात शेवटी जपानी अंतराळवीर Soichi Noguchi ह्यांनी यानात प्रवेश केला सर्व अंतराळवीर आत येताच Kate Rubin's ,Sergey  Rhyzikov आणी Sergey Sverchkov ह्या अंतराळवीरांनी त्यांचे स्थानकात स्वागत केले सर्व अंतराळवीर 27 तासांचा अंतराळ प्रवास करुन स्थानकात सुखरुप पोहोचल्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता त्यानंतर सर्वांनी एकमेकांची विचारपुस करीत काही वेळ संवाद साधला अंतराळवीर Mike,Soichi आणी Shannon ह्यांनी स्थानकाच्या बदललेल्या अद्ययावत स्वरूपाचे काही वेळ निरीक्षण केले

  The four Commercial Crew astronauts (front row from left) Shannon Walker, Victor Glover, Michael Hopkins and Soichi Noguchi are welcomed aboard the station. In the back row from left are, NASA astronaut Kate Rubins and cosmonauts Sergey Ryzhikov and Sergey Kud-Sverchkov. Welcoming Ceremony दरम्यान नासा संस्थेशी संवाद साधताना अंतराळवीर Shannon,अंतराळवीर Victor, कमांडर Michal आणि जपानचे अंतराळवीर Soichi स्थानकातील अंतराळवीर Kate Rubins रशियन अंतराळवीर Sregey Rhyzikov आणि Sergey Sverchkov सोबत फोटो -नासा संस्था 

अंतराळवीर स्थानकात पोहोचल्यावर काही वेळातच नासा संस्थेतर्फे ह्या अंतराळवीरांचा Welcoming  Ceremony कार्यक्रम पार पडला सातही अंतराळवीर स्थानकाच्या Harmony Module मध्ये एकत्र जमले तेव्हा त्यांचा नासा संस्थेतर्फे पृथ्वीवर लाईव्ह संवाद साधला गेला नासाच्या Jonson Space Center Huston येथून संवाद साधताना नासाच्या Associate Administrator Kathy Lueders  म्हणाल्या तुम्हाला सुखरूप स्थानकात पोहोचलेले पाहून मला आनंद होतोय मी नासा संस्था आणि Space X  तर्फे  हि मोहीम यशस्वी केल्याबद्दल आणि तुमच्या  Successful Ride & dockingबद्दल तुमचे अभिनंदन करतेय Congratulations ! तुमचा अंतराळप्रवास कसा झाला ह्या बद्दल सांगा 

 मिशनचे कमांडर Mike म्हणाले Excellent ! Amazing smooth Ride! great Work! thanks NASA &Space X Congratulations !  तुम्ही आमच्यासाठी खूप छान काम केलय Space X Dragon चा अनुभव खूप छान होता लाँचिंगच्या वेळेस  विशेतः रॉकेट लाँच होताना प्रत्यक्ष पाहण खूप थरारक होता तो क्षण! We are exited! We enjoyed every movements ! आम्ही Resilience मधला 27 तासांचा प्रवास खूप एन्जॉय केला आम्ही देखील स्थानकात सुखरूप पोहोचल्यामुळे आनंदित आहोत आता लवकरच प्रत्यक्ष काम सुरु करू 

ह्याच लाईव्ह कार्यक्रमात जपानच्या Tsukuba Space Center JAXA चे President Hiroshi Yamakava देखील सहभागी झाले हि मोहीम यशस्वी केल्याबद्दल नासा संस्था आणी स्पेस X चे त्यांनी अभिनंदन केले आगामी दूरवरच्या मंगळ आणि चांद्र मोहिमेत हा अनुभव ऊपयुक्त ठरेल आम्ही ह्या पुढील मोहिमेतही तुम्हाला सहकार्य करू Soichi तू ह्या Space X Crew Dragon मधून अंतराळ प्रवास करणारा पहिला जपानी अंतराळवीर आहेस Congratulations ! Good Luck Enjoy ! अशी शाबासकीची थाप देत त्यांनी तुला काही त्रास झाला का ? Space X Dragon मधील प्रवासाचा अनुभव कसा होता  विचारले 

 Soichi Noguchi म्हणाले Amazing ride! Mike ने सांगितले तस खूप छान अंतराळ प्रवास झाला Space X Dragon चा अनुभव नवा आणी रोमांचक होता ह्या 27 तासाच्या प्रवासात आम्ही खूप exited होतो त्यामुळे बोअर झाल नाही आम्ही चौघांनीही every movement enjoy केला

Monday 16 November 2020

अखेर नासाचे Space X Crew Dragon 1 अंतराळ स्थानकाच्या वाटेवर मार्गस्थ

The SpaceX Falcon 9 rocket lifts off with four Commercial Crew astronauts inside the Crew Dragon vehicle from Kennedy Space Center in Florida.            Resilience अंतराळयान Florida उड्डाणस्थळावरून अवकाशात झेपावताना -फोटो नासा संस्था 

नासा संस्था - 16 Nov 

नासाचे Space X Crew Dragon 1 अंतराळ यान चार अंतराळवीरांना घेऊन स्थानकाच्या दिशेने रविवारी अंतराळात मार्गस्थ झाले गेल्या ऑक्टोबर महिन्यांपासून तीनवेळा ह्या अंतराळयानाच्या उड्डाणाची तारीख यानाच्या तांत्रिक कामासाठी पुढे ढकलण्यात आली होती आताही यानाचे उड्डाण शेवटच्या टप्प्यात असताना हवामान समाधानकारक नसल्याने 14 तारखे ऐवजी 15 तारखेला करण्यात आले आणि अखेर सर्व अडथळ्यांवर यशस्वी मात करीत अंतराळयान स्थानकाच्या दिशेने व्यवस्थित प्रवास करत आहे 

नासाच्या फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटर मधील 39A Launch Complex येथून रविवारी 15 तारखेला  संद्याकाळी 7.27 वाजता Space X Crew Dragon 1 चार अंतराळवीरांसह अवकाशात झेपावले ह्या अंतराळ यानातून नासाचे अंतराळवीर Michel Hopkins,Victor Glover,Shannon Walker आणि जपानचे अंतराळवीर Soichi Noguchi हे चौघे स्थानकात राहण्यासाठी गेले आहेत ह्या यानाला अंतराळवीरांनी Resilience हे नाव दिले असून हे नाव कोरोना वॉरियर्स आणी ह्या कठीण काळात हि मोहीम यशस्वी करून असामान्य काम करणाऱ्या स्पेस X आणी नासा संस्थेतील सर्वांना समर्पित केले आहे Resilience यान Falcon 9 रॉकेटच्या साहाय्याने अंतराळात यशस्वीपणे झेपावताच नासा संस्थेतील सर्वांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला फ्लोरिडातील उड्डाणस्थळी Resilience यानातील 299 फूट उंचीचे रॉकेट ऊड्डाणाच्या अखेरच्या क्षणी प्रचंड उष्णतेने प्रज्वलित झाले आणी अत्यंत वेेेगाने वातावरण भेदत अंतराळात झेपावले यानाने काही वेळातच प्रथम आणि द्वितीय चरण यशस्वीपणे पार केले त्या नंतर नियोजीत वेळी  Resilience यान रॉकेट पासून वेगळे झाले आणि 27,000 प्रती तास इतक्या प्रचंड वेगाने स्थानकाच्या दिशेने मार्गस्थ झाले सध्या यान व्यवस्थित अंतराळ प्रवास करत असल्याचे अंतराळवीरांनी संस्थेशी काही वेळातच लाईव्ह संपर्क साधून सांगितले शिवाय त्यांना यानातील आतील दृश्यही दाखविले 

जाण्याआधी ह्या चारही अंतराळवीरांची उड्डाणपूर्व तपासणी करण्यात आली आणि स्पेससूट घालून त्यात काही त्रुटी तर नाही ना ह्याची चाचणी करण्यात आली हे चारही अंतराळवीर अंतराळ स्थानकात जाण्यासाठी उत्सुक होते आणि उड्डाणाची आतुरतेने वाट पाहात होते पण सतत यानाच्या तांत्रिक दुरुस्तीमुळे ऊड्डाणाची तारीख लांबत होती पण ह्या काळात चारही अंतराळवीरांची टीम मैत्रीच्या नात्याने एकत्रित बांधल्या जात होती कुटुंबापासून दूर लॉक डाउन मुळे आम्ही आणखी जवळ आल्याचे आणि वाढलेल्या ट्रेनिंग काळ एन्जॉय करत असल्याचे त्यांनी साधलेल्या लाईव्ह संवादादरम्यान सांगितले होते अखेर यानाच्या सुरक्षित आणी यशस्वी उड्डाणामुळे तेही आनंदित झाले आहेत  

NASA astronauts Shannon Walker, left, Victor Glover, and Mike Hopkins, and JAXA astronaut Soichi Noguchi, right                     नासा अंतराळवीर Shannon Walker, Victor Glover, Michel Hopkins आणि जपानी अंतराळवीर Soichi Noguchi उड्डाण स्थळाकडे जाताना -फोटो -नासा संस्था 

Resilience यान सोमवारी 11 p.m. ला स्थानकात पोहोचेल यान स्थानकाच्या समोरच्या Harmony Module जवळ पोहोचताच यानाच्या स्वयंचलित यंत्रणेद्वारे यान आणि स्थानक एकमेकांशी जोडले जातील सद्या स्थानकात रहात असलेल्या Kate Rubins आणि सहकारी अंतराळवीर ह्या चार अंतराळवीरांचे स्थानकात स्वागत करतील हे चारही अंतराळवीर स्थानकात पोहोचल्यावर तेथे सुरु असलेल्या संशोधनात सहभागी होतील 

ह्या यानाचे ऐतिहासिक उड्डाण पाहण्यासाठी अमेरिकेचे Vice President Mike Pence उड्डान स्थळापासून काही मैल अंतरावरील नासा संस्थेत उपस्थित होते त्यांनी Resilience यानाच्या यशस्वी ऊड्डानाचा आनंद व्यक्त करीत हि मोहीम यशस्वी केल्याबद्दल टिममधील सर्वांचे अभिनंदन केले 

 हा दिवस आमच्या साठी आणि जपानसाठी Great Day आहे असे मत नासाचे Administrator Jim Bridenstine ह्यांनी व्यक्त केले तर नासाच्या Human Exploration & Operation associate Administrator Kathy Lueder म्हणतात ह्या उड्डाणाची आम्ही सर्वजण आतुरतेने वाट पाहात होतो ह्या ऐतिहासिक उड्डाणाचे रोमांचक क्षण अनुभवण्यासाठी उत्सुक होतो हि मोहीम यशस्वी झाल्याचा आनंद सर्वांनीच टाळ्या वाजवून साजरा केला 

ह्या यानाच्या उड्डाणापासून ते यानाच्या डॉकिंग पर्यंतचे लाईव्ह प्रक्षेपण नासा T.V. वरून करण्यात येणार आहे शिवाय मागच्या प्रमाणेच ह्याही वेळेस हौशी नागरिकांना नासा संस्थेतर्फे Space X Dragon च्या अंतराळप्रवासात व्हर्च्युअली सहभागी होण्याची आणि सहभागी नागरिकांची नावे नासा T.V. वर झळकावण्याची सुवर्ण संधी जाहीर कारण्यात आली होती त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला

Saturday 7 November 2020

Space X crew Dragon च्या अंतराळ विरांनी साधला लाईव्ह संवाद

Crew 1 Dragon चे अंतराळवीर Shannon Walker ,Victor Glover ,Michel Hopkins आणि जपानचे अंतराळवीर Soichi Noguchi पत्रकारांशी  लाईव्ह संवाद साधताना -फोटो -नासा संस्था

नासा संस्था

नासा आणी Space X Crew Dragon च्या यशानंतर आता तिसऱ्यांदा Space X Dragon अंतराळ स्थानकात जाणार आहे  14 नोव्हेंबरला दुसऱ्यांदा Space X Crew  Dragonअंतराळवीरांसहित अवकाश भरारी मारणार आहे आणि ह्या वेळेस मोहीम 64 चे चार अंतराळवीर Michael Hopkins,Victor Glover, Shannon Walker आणी जपानचे अंतराळवीर Soichi Noguchi  स्थानकात राहायला  जाणार आहेत मागच्या महिन्यात ह्या अंतराळवीरांनी अमेरिकेतील आघाडीच्या पत्रकारांशी  आणि सोशल मीडिया वरून आलेल्या प्रश्नांना लाईव्ह संवाद साधून ह्या मोहिमेची माहिती दिली 

प्रश्न - Michael  ह्या Space X crew mission बद्दल,तुमच्या टिम बद्दल आणी launching ची तारीख बदलली आहे त्या बद्दल सांग तुम्ही सर्वच जण ह्या मोहिमेबद्दल काय सांगाल ? तुमचा अनुभव कसा होता  

 Mike  - कोरोनाच्या ह्या कठीण काळात Space X Crew Dragon च launching करण खरोखरच challenging होत नासा संस्था आणी Space X ह्या दोघांच्या सहकार्याने ह्या कठीण काळातही आमच ट्रेनिंग व्यवस्थित पार पडल अर्थात त्यासाठीचे कठोर नियम आम्ही पाळले आम्ही प्रथम त्यांचे आभारी आहोत कारण त्यांनी आम्हाला हि संधी दिली नासाच्या अंतराळ विश्वातील नव्या अंतराळ मोहिमेचा प्रारंभ करण्याऱ्या युगात आम्ही सहभागी झालो आहोत हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे अमेरिकेच्या स्वनिर्मित यानातून अमेरिकेतूनच अंतराळात उड्डाण करण आमच्या साठी भाग्यकारक आहे ह्या मोहिमेबद्दल म्हणाल तर आम्ही Space  X Crew Dragon मधून अंतराळ प्रवास करण्यासाठी उत्सुक आहोत exited आहोत आमच ट्रेनिंगही पूर्ण झालय ह्या आधीच्या Space X Dragon अंतराळ यानाला Doug आणि Bob ह्यांनी Endeavor हे नाव दिले होते आणि ते उड्डाणाच्या अखेरच्या क्षणापर्यंत गुपित ठेवले आणि अंतराळ प्रवासादरम्यान जाहीर केले पण आम्ही जास्ती उत्सुकता न ताणता नाव जाहीर करतोय  आम्ही आमच्या Space X Dragon अंतराळ यानाला Resilience हे नाव दिलय 

ह्या नावाबद्दल सांगायच तर सध्याचा काळ जागतिक महामारीचा आहे सार जग कोरोना मुळे त्रस्त झालय आणी ह्या बाबतीत कोणीही आक्षेप घेणार नाही कोरोनावर अजूनही प्रभावी औषध सापडल नाही सगळ्याच देशातील शास्त्रज्ञ औषध शोधण्यासाठी अहोरात्र मेहनत करत आहेत आणि लवकरच कोरोना प्रतिबंधक लस शोधण्यात त्यांना यश मिळेल अशा कठीण काळात ह्या देशाचे नेते,नागरिक, डॉक्टर्स,नर्सेस ह्यांच्या सोबतच नासा फॅमिली आणी आपल्या सर्वांचीच फॅमिली कोरोनाशी अत्यंत धैर्याने सामना करतेय म्हणूनच आम्ही ह्या कठीण काळातील सर्व कोरोना वॉरियर्सना हे नाव समर्पित करतोय तुम्ही पाहाल आमच्या Space X Dragon वर जो Logo आहे त्या वर कुठल्याही देशाच्या झेंड्याचे चित्र नाही कारण हि समस्या जागतिक आहे हा लोगो पाहून अनेकांना प्रेरणा मिळेल धैर्य येईल आणि भविष्यात नव्या पिढीला ह्या काळातील अंतराळ मोहिमेची आणि कोरोनाचीही माहिती मिळेल ह्या कठीण काळातील ट्रेनिंग दरम्यान आम्ही काय achieve केलय ह्याला मर्यादा नव्हती ह्या मोहिमे बद्दल सांगायच तर ह्या कोरोनाच्या महामारीच्या अत्यंत टेन्शनच्या काळातील अभूतपूर्व यशस्वी मोहीम असच म्हणाव लागेल कारण 2020 हे वर्ष साऱ्या जगासाठी challenging वर्ष आहे आणि ह्या कठीण काळातील हि अभूतपूर्व यशस्वी मोहीम आहे 

ह्या Space X Flight बद्दल सांग पुर्वीच्या तुलनेत सोयुझ आणी ह्या यानात काय फरक आहे

ह्या Space X Dragon बद्दल सांगायच तर ती नेहमीची regular flight नाही त्या मुळे ह्या नव्या अमेरिकन निर्मित यानाच्या अंतराळ मोहिमेतील प्रवासा दरम्यान अंतराळातील हवामान आणि हवेच्या Pressure चा अभ्यास करण आवश्यक होत आधीच्या flight चा अनुभव होताच आम्ही गेल्या सहा महिन्यांपासून ह्या मोहिमेसाठी ट्रेनिंग घेतोय उड्डाणपूर्व test घेतल्या जात आहेत आणि त्यात काही अडचणी आल्यास त्यावर उपाय शोधला जातोय आवश्यक सूचना दिल्या जात आहेत शेवटी नैसर्गिक Environment Control महत्वाचा आहे शिवाय मी Flight engineer   म्हणून Pilot पदाची जवाबदारी माझ्यावर सोपवण्यात आलीय आणि कमांडरपदही त्या मुळे Launch पासून re entry पर्यंतची सर्व जबाबदारी माझ्यावर आहे सोबत Victor ही असेल आणि Shannon आणि Noguchi mission Specialists असतील Dynamic Launching आणि Re-entry च्या वेळेस हे दोघे आम्हाला मदत करतील ह्या वेळेस आम्ही चॊघे जाणार आहोत आणि स्थानकात जास्त दिवस वास्तव्य करणार आहोत dragon ला  काही नवे हार्डवेअर बसविण्यात आले आहेत आधीच्या  तुलनेत स्थानक आणि यानाच्या hatching आणि dockingची प्रक्रिया सुलभ झालीय Doug आणी Bob ह्यांच्या वेळेसचा अनुभव नवा होता आता आम्हाला त्यांच्या अनुभवाचा फायदा मिळेल त्या अनुभवाची आम्ही पुन्हा पडताळणी करणार आहोत 

 तुम्ही चौघे वेगवेगळ्या भागातून ,वातावरणातून एकत्रित आलात तेव्हा तुमचा ट्रेनिंग दरम्यानचा अनुभव कसा होता Glover पहिल्यांदाच अंतराळ प्रवास करणार आहे तुमच्या तिघात तो नवा आहे तेव्हा ट्रेनिंग दरम्यान काही अडचण आली का ?

Mike  - खूप छान ! कोरोनाच्या Lock Down  काळात ह्या ट्रेनिंग दरम्यान आम्ही चौघे एकत्र आलो आणी आमच खूप छान ट्युनिंग जमल आमची टीम छान आहे ह्या लॉक डाउन दरम्यान चोवीस तास आम्ही एकत्र घालवले त्या मुळे आमच बॉण्डिंग घट्ट झाल Glover अननुभवी असला तरीही तो नेव्हीत होता तिथला त्याचा अनुभव आम्हाला काही ठिकाणी उपयोगी पडला तर Shannon आणि Noguchi ह्या दोघांचा पूर्वानुभव आम्हाला कामी आला जेव्हा जेवणासाठी आम्ही टेबलवर एकत्र जमायचो तेव्हा चौघांकडूनही एकमेकाला काहीतरी नव  शिकायला मिळायच आम्ही चर्चा करायचो Glover नवा असला तरी तो आमच्यात छान मिक्स झाला  

Shannon -मी दुसऱ्यांदा स्थानकात रहायला जाणार आहे ह्या सहा महिन्यांचा ट्रेनिंगचा काळ अत्यंत धावपळीचा आणी तणावपूर्ण होता पण आम्ही आता स्थानकात जाण्यासाठी उत्सुक आहोत Exited आहोत मला ट्रेनिंग मध्ये ह्या आधीचा स्थानकातील वास्तव्याचा अनुभव ऊपयोगी पडला तसेच Bob आणी Doug कडुनही त्यांच्या अंतराळ प्रवासाची उपयुक्त माहिती मिळाली आमची टिम छान आहे 

Noguchi- आमची टिम,टिमवर्क diversity आणी यानाच नाव सारच अभुतपुर्व आहे मी तिसऱ्यांदा स्थानकात जाण्यासाठी ऊत्सुक आहे आमच्या टिममधील सर्वांनीच ह्या मोहिमेसाठी अथक मेहनत केलीय सगळ्यांनीच काही ना काही add केलय त्यामुळे आमची टिम ह्या नावासाठी योग्य आहे सगळेच Wonderful आहेत गेल्या विस वर्षांपासून अंतराळवीर अंतराळ स्थानकात रहायला जात आहेत तीथे नवनवीन संशोधन करून सुरक्षित परतत आहेत मानवी आरोग्यासाठी, पृथ्वी संरक्षणासाठी, ऊद्योगवाढीसाठी आणी भविष्य कालीन दुरवरच्या अंतराळ मोहिमेतील ग्रहनीवासासाठी ऊपयुक्त संशोधनात्मक प्रयोग करत आहेत 

Glover- आम्ही त्याच काळात स्थानकात रहायला जाणार आहोत हे आमच्या साठी अभिमानास्पद आहे आम्ही लकी आहोत Mike न सांगितल्या प्रमाणे आमची टिम खूप छान आहे  टिमवर्क मुळे मिळालेल यश असामान्य आणी अतुलनीय आहे हे सर्व अनुभवी आहेत मी प्रथमच स्थानकात रहायला जातोय पण ह्या सर्वांनी मला सामावून घेतल मी नवखा आहे अस जाणवु दिल नाही मला ह्या सर्वांच्या अनुभवाचा फायदाच झाला 

तुम्ही चौघे स्थानकात एकत्रित जाताय प्रवासात अडचण होणार नाही का ?शिवाय अंतराळ स्थानकात आता तुम्ही सातजण एकत्र राहणार आहात तेव्हा जागा अपुरी पडेल का ?

 Shannon -. Space X Dragon स्पेसीअस असल्याने भरपूर जागा आहे उलट सोयूझ यानात तीन अंतराळवीर प्रवास करतात तेव्हा खूप कमी जागेत अवघडून बसावे लागते शिवाय आता स्थानकातही आम्ही सातजण एकत्र राहाणार असलो तरीही तिथेही भरपूर जागा आहे तिथल्या वेगवेगळ्या भागात आम्ही राहणार आहोत रशियन सेगमेंट अमेरिकन सेगमेंट मध्ये शिवाय सर्वजण एकाच वेळेस एकत्र प्रयोग करणार नाही सर्वजण वेगवेगळ्या वेळेस प्रयोग करतील काही जण स्थानकातील इतर कामे करतील आमच्या वेळा आणि कामे वाटलेली असतात त्या मुळे अडचण होत नाही

तुम्ही स्थानकात कोणते सायंटिफिक प्रयोग करणार आहात?

Glover- मी Food technology वर संशोधन करणार आहे मी फुडी आहे मला वेगवेगळ्या भाज्या,फळे खायला खूप आवडतात त्यामुळे मी त्यावरच जास्त संशोधन करणार आहे अंतराळवीरांच्या आगामी दुरवरच्या अंतराळ मोहिमेत निरोगी आणी healthy आरोग्यासाठी ताजी भाजी आणि फळे आवश्यक आहेत त्यामुळे फळे आणी भाज्यामधील nutrients,omega fatty acids ह्यावर संशोधन करून त्यातील nutrients amount वाढविण्यासाठी संशोधन करणार आहे शीवाय biotechnology वरही संशोधन करणार आहे

Soichi - मी पण Biotechnology gene technology वर संशोधन करणार आहे शीवाय ह्या वेळेस मी Microsoft departmentमधल्या Kibo airlock वरही संशोधन करणार आहे कारण आजवर कोणीही त्यावर संशोधन केले नाही आणी ते अत्यंत ऊपयुक्त आहे शीवाय स्थानकात रोजचा दिवस नवा असतो,नवी संधी नवे आव्हान घेऊन येतो त्याचा ऊपयोग नव्या संशोधनासाठी करणार आहे 

Shannon - मी मागच्या वेळेस जे मिस केल त्याचा अनुभव आता घेणार आहे अत्यंत कठीण परिस्थितीत आम्हाला Hard work करून हि संधी मिळाली त्या मुळे ह्या अमुल्य संधीचा ऊपयोग करून नवीन संशोधन करणार आहे

 Soichi तुमच्या Space Suite आणी Helmet बद्दल सांगा त्यांची डिझाईन नवीन आहे ना?

नवीन डिझाईन सुटेबल आहे ,मला काळा हेलमेट आवडतो पण स्पेस X टिमने बनविलेला पांढऱ्या रंगाचा हेलमेटही छान आहे आधीचा स्पेससुट पण चांगला होता आणी आताचा Fantastic डिझाईन !

शेवटी सर्वानीच सध्या उड्डाणपूर्व ट्रेनिंग दरम्यान त्यांची टीम एन्जॉय करीत असून लवकरच स्थानकात जाऊन संशोधन यशस्वी करून सुरक्षितपणे पृथ्वीवर आणि त्यांच्या फॅमिलीत परतणार असल्याचे सांगितले

Thursday 22 October 2020

अंतराळवीर Chris Cassidy,रशियन अंतराळवीर Ivan Vagner आणि Anatoly Ivanishine पृथ्वीवर सुखरूप पोहोचले

NASA astronaut Chris Cassidy returns from 196 days in space on Oct. 21, 2020.अंतराळवीर Chris Cassidy बुधवारी त्यांच्या तिसऱ्या अंतराळमोहीमेनंतर कझाकस्थानातील Dehezkazgan येथे पृथ्वीवर  परतल्याच्या आनंदात -फोटो -नासा संस्था  

 नासा संस्था -22 Oct.

नासाच्या अंतराळ मोहीम 63 चे अंतराळवीर Chris Cassidy Ivan Vagner आणि Anatoly Ivanishine अंतराळ स्थानकातील 196 दिवसांच्या वास्तव्यानंतर बुधवारी पृथ्वीवर परतले आहेत 

हे तीनही अंतराळवीर त्यांच्या सोयूझ MS -16 ह्या अंतराळयानातून 7.32am ला स्थानकातून पृथ्वीवर येण्यासाठी बाहेर पडले आणि 10.54p.m.ला पृथ्वीवर परतले कझाकस्थानातील Dehezkazgan येथे परतल्यानंतर ह्या अंतराळवीरांचे संस्थेतील मेडिकल टीम मधील डॉक्टरांनी प्राथमिक चेकअप केले सर्व आवश्यक प्रक्रिया पार पडल्यानंतर अंतराळवीर त्यांच्या गावी परतले अंतराळवीर Chris Cassidy ह्यांना नासाच्या विमानाने Houston येथे पोहोचविण्यात आले तर रशियन अंतराळवीर Anatoly Ivanishine आणी Ivan Vagner  ह्यांना त्यांच्या Star City येथे पोहोचवण्यात आले 

पृथ्वीवर परतण्याआधी अंतराळवीरांचा निरोप समारंभ आणि Commander change ceremony पार पडला Chris Cassidy ह्यांनी अंतराळ मोहीम 64अंतराळवीर Rhyzhikov ह्यांच्या हाती कमांडर पदाची जबाबदारी सोपवली 

अंतराळवीर Chris Cassidy ह्यांनी त्यांच्या स्थानकातील वास्तव्यादरम्यान अंतराळ मोहीम 63 चे कमांडरपद सांभाळले शिवाय स्थानकात आलेल्या Space X Crew Dragon च्या डॉकिंगच्या प्रक्रियेत सहभागी होऊन अंतराळवीर Bob आणि Hurley ह्यांचे स्थानकात स्वागत केले अंतराळवीर Chris Cassidy ह्यांनी अंतराळवीर Bob  Behnken ह्यांच्या सोबत स्थानकाच्या तांत्रिक कामासाठी चारवेळा स्पेसवॉक केला आणि त्या साठी त्यांनी अंतराळात 23तास आणि 37 मिनिटे व्यतीत केले आणि आजवरच्या अंतराळ मोहिमात त्यांनी 378 दिवस स्थानकात वास्तव्य केले असून अमेरिकन अंतराळवीरांच्या अंतराळ स्थानकातील वास्तव्याच्या यादीत ते पाचव्या क्रमांकावर आहेत 

शिवाय ह्या वेळेसच्या स्थानकातील वास्तव्यात त्यांनी तेथे सुरु असलेल्या सायंटिफिक प्रयोगात सहभाग नोंदवला त्यांनी cancer वरील संशोधनात स्किन पॅचेस वर उपयुक्त छोटे बँडेज निर्मिती आणि अंतराळ स्थानकातील झिरो ग्रॅविटीत Electrolytic gas evolution ,bubbles created using electrolysis ह्या सारख्या प्रयोगात सहभाग नोंदवून झिरो ग्रॅविटीत  bubbles growth कशी होते ह्याचे निरीक्षण नोंदवले शिवाय Astrobee ह्या क्यूबच्या आकाराच्या  रोबोट वरही काम केले ह्या संशोधनाचा उपयोग कॅन्सर वरील अत्याधुनिक उपचारासाठी आणि औषध निर्मितीसाठी होईल 

Monday 19 October 2020

नासाच्या Space X Crew Dragon -1 Mission च्या अंतराळवीरांचे launching आता नोव्हेंबर मध्ये

 Mission specialist Shannon Walker, left, pilot Victor Glover, Crew Dragon commander Michael Hopkins – all NASA astronauts – and Japan Aerospace Exploration Agency (JAXA) astronaut and mission specialist Soichi Noguchi, right, will launch to the International Space Station on the agency’s SpaceX Crew-1 mission.

नासाच्या Space X Crew Dragon चे अंतराळवीर Shannon Walker ,Victor Glover ,Michal Hopkins आणि जपानचे अंतराळवीर Soichi Noguchi -फोटो -नासा संस्था 

नासा संस्था -10 Oct.

नासाच्या Space X Crew Dragonचे अंतराळवीर आता 31ऑक्टोबर ऐवजी नोव्हेंबर मध्ये अंतराळ स्थानकात राहायला जाणार आहेत Space X Dragon च्या तांत्रिक दुरुस्तीमुळे हे लाँचिंग नियोजित तारखेला होणार नाही आधीच्या Space X मिशन मध्ये आधळलेल्या काही त्रुटी दूर करून त्या जागी नवीन तंत्रज्ञान वापरून हे अंतराळ यान अद्ययावत करण्यात येत आहे 

सध्या ह्या यानाची दुरुस्ती आणि टेस्टिंग सुरु आहे ह्या यानाचे redesign करण्यात येत असून Space X अंतराळ यानाच्या समोरच्या Trunk ह्या भागातील Thermal protection system आणी Ventilation system ची डिझाईन बदलून त्यात सुधारणा करण्यात आली आहे शिवाय पॅराशूट साठी लागणारे barometric pressure ही चेक करण्यात येत असून अंतराळयान अंतराळातून पृथ्वीवर परतताना लँडिंगच्या वेळेस सुमुद्रातील Splash down मध्ये अडथळे येऊ नये म्हणूनही प्रयत्न करण्यात येत आहेत 

ह्या Space X मोहिमेबद्दल बोलताना नासाचे Administrator Jim Bridenstine म्हणतात हि मोहीम पुन्हा एकदा अंतराळ विश्वात मैलाचा दगड ठरेल अमेरिकेच्या स्वनिर्मित यानातून दुसऱ्यांदा अमेरिकेच्या भूमीवरून अंतराळवीर अंतराळात भरारी मारणार आहेत 

नासाच्या Associate Administrator Kathy Lueders म्हणतात खरोखरच अमेरिकन अंतराळवीरांनी स्वनिर्मित यानातून अमेरिकेतूनच अंतराळ भरारी मारावी हे आमचे खूप वर्षांचे स्वप्न होते ते आता दुसऱ्यांदा साकारत आहे आता आगामी अंतराळमोहिमात अंतराळवीर Space X अंतराळ यानातून अंतराळ प्रवास करतील तेव्हा ह्या मोहिमेचा अनुभव त्यांना मार्गदर्शक ठरेल 

Space X Dragon चे Senior Director Benji Reed देखील ह्या दुसऱ्या मोहिमेसाठी उत्साहित आहेत ह्या आधीची   मोहीम यशस्वी ठरल्यानंतर आता दुसरी मोहीम यशाच्या वाटेवर जाण्यासाठी शेवटच्या टप्प्यावर पोहोचली आहे This is Super Cool ! असे मत त्यांनी व्यक्त केले आहे

ह्या अंतराळ यानातून नासाचे अंतराळवीर Michael Hopkins Victor Glover ,Shannon Walker आणि जपानचे अंतराळवीर Soichi Noguchi अंतराळ स्थानकात राहण्यासाठी जाणार आहेत

Thursday 15 October 2020

नासाची अंतराळवीर Kate Rubins रशियन अंतराळवीर Sergey Rhyzhikov आणि Sergey Sverchkov अंतराळ स्थानकात सुखरूप पोहोचले

 Expedition 64 crew members (from left) Kate Rubins of NASA and Sergey Ryzhikov and Sergey Kud-Sverchkov of Roscosmos in front of the Soyuz MS-17 spacecraft. नासाच्या अंतराळ मोहीम 64चे अंतराळवीर Kate Rubins रशियन अंतराळवीर Sergey Rhyzhikov आणि Sergey Sverchkov सोयूझ यानापुढे निघण्याच्या तयारीत -फोटो -नासा संस्था 

नासा संस्था -14 Oct.

नासाच्या अंतराळ मोहीम 64 चे अंतराळवीर Kate Rubins रशियन अंतराळवीर Sergey Rhyzhikov आणि Sergey Sverchkov अंतराळस्थानकात सुखरूप पोहोचले आहेत त्यांचे सोयूझ MS-17 हे अंतराळयान दुपारी 1.45a.m.ला ( 10.45 a.m. लोकल वेळ )  काझाकस्थानातील बैकोनूर कॉस्मोड्रोम वरून अंतराळात झेपावले आणि तीन तासांच्या अंतराळ प्रवासानंतर स्थानकाजवळ पोहोचले यानाने अंतराळात दोन फेऱ्या मारल्या त्या नंतर स्थानक आणि यानातील अंतर कमी झाल्यावर यान स्थानकाशी जोडल्या गेले स्थानक आणि सोयूझ यांच्यातील हॅचिंग आणि डॉकिंग प्रक्रिया पूर्ण झाल्यावर स्थानकाचे दार उघडल्या गेले आणि तीनही अंतराळ वीरांनी स्थानकात प्रवेश केला 

ह्या तीनही अंतराळवीरांनी उड्डाणाआधी रशियातील अंतराळ संस्थेतील(ROSCOSMOS) Traditional प्रक्रिया पूर्ण केल्या हे तीनही अंतराळवीर उड्डाणपूर्व ट्रेनिंग दरम्यान बैकोनूर येथील Cosmonaut Crew Hotel मध्ये वास्तव्यास होते निघण्यापूर्वी तेथील परंपरेनुसार ह्या अंतराळवीरांनी Cosmonaut Hotel च्या दारावर स्वत:ची सही केली त्या नंतर त्यांचे उड्डाणपूर्व चेकअप करण्यात आले ह्या अंतराळवीरांना त्यांचा स्पेससूट घालून स्पेससूटचीही तपासणी करण्यात आली स्पेससूटमध्ये Air leak होत नाही ना ? Air pressure व्यवस्थित आहे कि नाही हे व्यवस्थित check  करण्यात आले सर्व चेकअप पूर्ण झाल्यानंतर अंतराळवीरांना निरोप देण्यात आला एरव्ही ह्या अंतराळवीरांना पाहण्यासाठी त्यांना निरोप देण्यासाठी त्यांचे नातेवाईक मित्र व नागरिकांची गर्दी असते परंतु कोरोनाच्या लॉक डाऊन मुळे काही मोजकेच आमंत्रित व कर्मचारी तेथे उपस्थित होते सर्वानी ह्या तिन्ही अंतराळवीरांना शुभेच्छा दिल्या तेव्हा अंतराळवीरांनी त्यांचा तिथला ट्रेनिंगचा काळ खूप छान गेल्याचे सांगितले 

उड्डाण स्थळी शेवटच्या क्षणी ROSCOSMOS संस्थेच्या Space Stationच्या Program Managers नी निवडक आमंत्रित आणि मान्यवरांच्या उपस्थितीत ह्या तिन्ही अंतराळवीरांचे ते इथपर्यंत पोहोचल्याबद्दल अभिनंदन केले आणि Kate Rubinsचा वाढदिवस असल्याने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि शेवटी संस्थेतर्फे तिघांचे आभार मानत ह्या अंतराळ विरांना निरोप देण्यात आला आणि प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या        Soyuz MS-17 spacecraft launches at 1:45 a.m. EDT Wednesday, Oct. 14, 2020                   सोयूझ MS -17 अंतराळवीरांसह अंतराळात झेपावताना -फोटो  -नासा संस्था 

Soyuz अंतराळ यानाने अंतराळात यशस्वी झेप घेतल्यानंतर सर्वांनी जल्लोष करत एकमेकांचे अभिनंदन केले यानाची हॅचिंग प्रक्रिया पूर्ण होताच 7.07a.m.ला अंतराळवीर स्थानकात दाखल झाले प्रथम अंतराळवीर Sergey Sverchkov ह्यांनी स्थानकात प्रवेश केला नंतर Kate Rubins आणि शेवटी Sergey Rhyzhikov ह्यांनी स्थानकात प्रवेश केला स्थानकात सध्या राहात असलेल्या Chris Cassidy आणि सहकारी अंतराळवीरांनी स्थानकात ह्या तिघांचे स्वागत केले Kate स्थानकात प्रवेशताच तिनही अंतराळवीरांनी तिला तिच्या वाढदिवसानिमित्य शुभेच्छा दिल्या उड्डाणापूर्वीच्या अंतिम मुलाखतीत Kate ला सोशल मीडियावरून तिचा हेअरकट आवडल्याचे सांगितले होते व ती जाण्याआधी इथेच हेअरकट करणार का ? असे विचारण्यात आले होते तेव्हा तिने हेअरकट करणार नसल्याचे सांगितले होते आणि विशेष म्हणजे रशीयन स्टाईलने दोन वेण्या घातलेली Kate खूप सुंदर आणि आनंदी दिसत होती 

 (Front row from left) Expedition 64 crew members Kate Rubins, Sergey Ryzhikov and Sergey Kud-Sverchkov join Expedition 63 crew members (back row from left) Ivan Vagner, Anatoly Ivanishin and Chris Cassidy inside the space station's Zvezda service module.             Kate Rubins रशियन अंतराळवीर Sergey Rhyzhikov आणि Sergey Sverchkov स्थानकातून संवाद साधताना फोटो -नासा संस्था 

स्थानकात पोहोचल्यानंतर ह्या सर्व सहाही अंतराळवीरांशी पृथ्वीवरील बैकोनुर येथील ROSCOSMOS संस्थेतील प्रमुखांनी लाईव्ह संवाद साधून त्यांना प्रवास कसा झाला काही त्रास झाला का हे विचारले तेव्हा अंतराळवीरांनी प्रवास निर्विघ्न पार पडल्याचे सांगितले तेव्हा ह्या अंतराळवीरांचे त्यांनी अभिनंदन केले आणि तुम्ही आनंदी आणि फ्रेश दिसत असल्याचे सांगितले शिवाय  launching Wonderful! docking Wonderful! अशा शब्दात त्यांनी अंतराळवीरांचे विशेषतः अंतराळवीर आणि कमांडर Chris Cassidy चे विशेष कौतुक करताना त्यांनी खूप कुशलतेने हि प्रक्रिया पार पाडल्याचे त्यांनी सांगितले

आता 20 आक्टोबरला Command Change Ceremony पार पडेल आणि 21 तारखेला अंतराळवीर Chris Cassidy Anatoly Ivanishin आणि Ivan Vagner पृथ्वीवर परततील आणि नवीन तिन अंतराळवीर स्थानकात राहायला जातील तोवर हे तिन्ही अंतराळवीर स्थानकात राहून तिथे सुरु असलेल्या सायंटिफिक प्रयोगात सहभागी होतील  

Thursday 1 October 2020

नासाची महिला अंतराळवीर Kate Rubins रशियन अंतराळवीर Sergey Rhyzhikov आणि Sergey Sverchkov ह्यांनी साधला लाइव्ह संवाद


महिला अंतराळवीर Kate Rubins अंतराळवीर Sergey Sverchkov आणि अंतराळवीर Sergey Rhyzhikov लाईव्ह संवाद साधताना फोटो -नासा संस्था 

नासा संस्था - 26 सप्टेंबर 

नासाच्या अंतराळ मोहीम 63-64 चे अंतराळवीर Kate Rubins रशियन अंतराळवीर Sergey Rhyzhikov आणी Sergey Sverchkov हे सध्या रशियात आहेत 14 ऑक्टोबरला ते अंतराळस्थानकात राहायला जाणार आहेत जाण्याआधी  Star City Russia  येथील संस्थेतून त्यांनी ह्या मोहिमेविषयी पत्रकार व सोशल मीडियावरून आलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली Lock Down मूळे सोशल मीडियावरून त्यांना प्रश्न विचारण्यात आले नासा T.V. आणि संस्थेच्या Website वरून हि मुलाखत प्रकाशित झाली 

 ROSCOSMOS T.V. वरून 

Sergey Sverchkov तू प्रथमच अंतराळ स्थानकात राहण्यासाठी जाणार आहेस तु काय फील करतोस तुझ्या सोबतचे दोन्हीही अंतराळवीर अनुभवी आहेत Sergey Rhyzhikov आणि तुमच्यातील नात कमांडर आणि crew अस आहे ते अनुभवी आहेत त्या मुळे तुमच्यात काही कॉम्प्लिकेशनस निर्माण झाले का? ट्रेनिंग दरम्यान काही प्रॉब्लेम आला का? त्या बद्दल आणि तुझ्या बद्दल सांग आणि तुझ्या लग्नाचा वाढदिवस आहे ना तुला आमच्या कडून आणी Cosmic Court कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!💐

 "Happy Anniversary ! " 

Sergey -  Thanks! मी  प्रथमच अंतराळ स्थानकात जाणार आहे त्या मुळे अत्यंत उत्सुक आहे Excited  आहे माझ्या भावना शब्दातीत आहेत! मी 26 वर्षाचा असताना माझ नासा संस्थेत Selection झाल गेली दहा वर्ष मी ट्रेनिंग घेतोय मागच्या वर्षीच्या ऑगस्ट मध्ये माझ स्थानकात जाण्यासाठी Selection झाल तेव्हा मी खूप आनंदित झालो मी प्रथमच अंतराळ प्रवास करणार आहे अंतराळ स्थानकात राहाणार आहे तिथल्या लॅब मध्ये उपयुक्त असे सायंटिफिक experiments करणार आहे माझ्या सोबत अंतराळवीर Sergey असल्याने मला त्यांच्या अनुभवांचा फायदाच झाला कोणताही प्रॉब्लेम आला नाही ते बुद्धिमान आहेत फ्रेंडली आहेत त्या मुळे आमच्यात मित्रत्वाचे नाते निर्माण झाले आहे 

Sergey तुमच लाँचिंग 14 ऑक्टोबरला आहे त्या दिवशी Protection of the Russian Blessed Holiday आहे आणि तुम्ही त्याच दिवशी स्थानकात  राहायला जाणार आहात ह्या बद्दल तुझ काय मत आहे ? 

Sergey Rhyzhikov 

माझ्यासाठी सगळेच दिवस सारखे आणि चांगले आहेत आम्ही ह्या कोरोनाच्या कठीण काळात लॉक डाउन चे नियम पाळून आमच ट्रेनिंग पूर्ण केलय आमची तयारीही व्यवस्थित सुरु आहे अशा वेळेस आम्हाला स्थानकात जायला मिळतय म्हणून आम्ही आनंदीआहोत 

 NASA T.V. वरून -Kate Rubins साठी 

 Kate ह्या वर्षी अंतराळ स्थानकातील मानवी वास्तव्याला वीस वर्षे पूर्ण झाली ह्या बाबतीत  तुझा अनुभव कसा होता काय सांगशील तू आधीही तिथे वास्तव्य केलय आता दुसऱ्यांदा स्थानकात राहणार आहेस 

Kate Rubins - ह्या वर्षी अंतराळ स्थानकातील मानवी वास्तव्याला विस वर्षे पूर्ण होत असताना आम्ही स्थानकात असु हे आमच्या साठी भाग्यकारक आणी आनंददायी आहे आम्ही स्थानकातील वास्तव्यातच विसावा वर्धापन दिन साजरा करणार आहोत ते ऐतिहासिक क्षण अनुभवणार आहोत आमच्या साठी हि अभिमानास्पद बाब आहे 

मी दुसऱ्यांदा स्थानकात रहायला जाणार आहे खरोखरच आम्ही जेव्हा सोयुझ यानातुन अंतराळ स्थानकात प्रवेश करतो तेव्हा स्थानकाची अत्याधुनिक रचना आणी भव्यता पाहून क्षणभर थक्क होतो  आणी आपसूकच Amazing! अद्भुत ! अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया आमच्या तोंडुन बाहेर पडते  अंतराळ स्थानक मोठे आहे अद्ययावत सोयीसुविधांनी परिपूर्ण आहे तीथली  lab अत्याधुनिक यंत्रणेने आणी सुविधेने सुसज्ज आहे सायंटिफिक संशोधन करण्यासाठी तीथे भरपूर जागा आहे तिथे रहाण्यासाठी व्यायामासाठीही भरपूर जागा आहे एकावेळी सहा अंतराळवीरांना तीथे राहून संशोधन करता येत तिथे व्यायामाची साधन आहेत आणी आता तर स्थानक अधिकाधिक अतद्ययावत तंत्रज्ञानानी ऊपयुक्त बनल आहे स्थानक बनवणाऱ्या तंत्रज्ञांंनी,ईंजीनीअर्सनी अंतराळवीरांसाठी खूप छान काम केलय त्यांची कुशलता असामान्य  बुध्दीमत्ता कौतुकास्पद आहे अभिमानास्पद आहे 

Moscow Studio 

Sergey Sverchkov  . तुझ्या साठी प्रश्न आहे एका आठ वर्षाच्या मुलाने विचारलाय 

Sergey तुम्ही आमच्या शहरात आमच्या शाळेत आला होतात तेव्हा Drawing competition होती आपण दोघांनी  मीळुन चित्र काढल होत ते चीत्र मी माझ्या घरी फ्रेम करून लावलय मी तुम्हाला fallow करतो आता तुम्ही स्थानकात रहायला जाणार आहात launching नंतर जाताना यानातुन तुम्ही आमच्या Naryanmar सिटीचा फोटो काढून मला पाठवाल का? मग मी तोही फोटो त्या फ्रेम जवळ लावेन

Sergey Sverchkov  - हो! मलाही आठवतय खूप छान आठवण आहे ती! पण आमच्या launching च ठिकाण Naryanmar पासून खूप लांब असल्याने आम्हाला ते दिसणार नाही पण मी दुसरे काढलेले फोटो शेअर करेन तु माझ्या आठवणीत नेहमीच रहाशील प्रयत्न करत रहा आणी मी पृथ्वीवर परतल्यावर तुला नक्की भेटेन लहान मुलाच्या ह्या प्रश्नाने सारेच प्रभावीत झाले तीथे ऊपस्थीत असलेल्या अंतराळ मोहीम 63-64 च्या अंतराळवीरांनी हा प्रश्न विचारणाऱ्या मुलाचे कौतुक केले आता सद्या lock down मुळे शाळा बंद आहेत अशावेळेस मुले टि.वी. वर हा कार्यक्रम पाहतात,प्रश्न विचारतात हे कौतुकास्पद आहे आपल्या देशाच भवितव्य ऊज्वल असल्याच मत त्यांनी व टि.वी.वरील पत्रकारांनी व्यक्त केल 

Sergey Sverchkov ,तुम्ही अंतराळस्थानकातुन पृथ्वीवर संपर्क कसे करता विषेशतः कठीण प्रसंगी ?

आम्ही स्थानकात जीथे रहाणार आहोत त्या रशियन सेगमेंट मधल्या  संपर्क यंत्रणेने आम्ही पृथ्वीवरील संस्थेत संपर्क करतो Satellite,Internet आणी Russian Broadband वरून Roscosmos संस्था आणी घरच्यांशी  आम्ही संवाद साधु शकतो पण समजा काही विपरीत परीस्थिती ऊद्भवल्यास आणी सर्व यंत्रणा ठप्प झाली तर अशी आपत्कालीन परीस्थिती कशी हाताळायची ह्याच प्रशिक्षण आम्हाला ट्रेनिंग दरम्यान दिल जात

Sergey Sverch.- तु अमेरीकन आणी रशियन Spacesuits try केलेस ह्या दोन्हीत कोणता फरक जाणवला? कुठला Spacesuit चांगला आणी आरामदायी वाटला?

हो! ट्रेनिंग दरम्यान मी अमेरिकन आणी रशियन स्पेससुट ट्राय केले खरच दोन्हीही आरामदायी व ऊपयुक्त आहेत चांगले आहेत त्यामुळे विषेश फरक जाणवला नाही दोन्ही स्पेससुट बनवणाऱ्या ईंजीनीयरच काम ऊत्कृष्ठ आहे त्यांनी अंतराळवीरांसाठी ईतका चांगला स्पेससुट बनवला आहे की त्यांच्या कल्पकतेच कौतुक वाटत!

तुम्हाला जर स्थानकात पेट न्यायला मिळाले तर कुठला प्राणी न्याल?

Sergey  Sverch -माझ्या कडे पेट नाही त्यामुळे ह्याच ऊत्तर Kate सांगु शकेल कारण तीची हि दुसरी अंतराळवारी आहे

Kate Rubins -हो! माझ्या कडे पेट Dog आहेत  Abelca आणी Stroka  मी स्थानकातील वास्तव्यात त्यांना मिस करेन पण स्थानकात त्यांना नेऊ शकत नाही कारण ती जागा Dog साठी ऊपयुक्त नाही तीथे फक्त मानवच जाऊ आणि राहू शकतात

Kate तुझ रशियन ईंग्लिश छान आहे तुझे सोशल Accounts पाहून रशियन नागरिक प्रभावित झाले आहेत विषेशतः विद्यार्थी त्यांनी तुला प्रश्न विचारले आहेत

Kate तुझा हेअरकट छान आहे आता तुझे केस वाढले आहेत तीथे स्थानकात तुला केस कापताना त्रास होईल तर तु इथेच हेअर कट करून जाणार का? तुझी हेअरस्टाईल बदलणार का? 

नाही!  आता ईथे मी केस कट करणार नाही आणि माझा हेअरकट बदलणार नाही

Kate तु ह्या आधी ईबोला सारख्या रोगावर लस शोधली आहेस आता ह्ना वेळेस स्थानकात कोरोनावर लस शोधणार का?

नाही ! तसा विचार नाही कारण कोव्हिड हा भयंकर रोग आहे स्पेस स्टेशन मध्ये संशोधन करण घातक आहे सद्या सार जग कोरोना महामारीने त्रस्त आहे ईथे पृथ्वीवर भरपूर lab आहेत सर्व देशातील शास्त्रज्ञ लस शोधण्यासाठी अहोरात्र परीश्नम करत आहेत आणी लवकरच त्यांना यश मिळेल 

तुम्हाला अंतराळ प्रवासादरम्यान किंवा स्थानकातील वास्तव्यादरम्यान Vaccine ची गरज पडणार आहे का?

Kate-  नाही! आम्ही तिघेही एकदम फिट आहोत आम्ही आमच्या ट्रेनिंग दरम्यान lock down चे सर्व नियम पाळले आमच्या मशीन Sanitize  करण sanitizer वापरण,मास्क वापरण आणी सोशल डिस्टंसिंग पाळण त्यामुळे आम्हाला Vaccineचीज गरज वाटत नाही आणी स्पेस स्टेशन तर एकदम चांगल आहे  safe आहे तीथे अजूनतरी कोरोनाचा शिरकाव झालेला नाही

तुम्ही तिघेही ह्या मोहीमेत कोणते नवे प्रयोग करणार आहात?

Kate- मी Biologist आहे त्यामुळे Microbe आणी Cell वर संशोधन करणार आहे शिवाय Cold Atom वरही संशोधन करणार आहे अंतराळ स्थानकातील झीरो ग्रव्हिटीत हे Microbes कसे behave करतात त्यांच्यात काय बदल होतात ह्या वर मी संशोधन करणार आहे मी भरपूर नमुने गोळा केले आहेत शिवाय माझे आधी तीथे सुरू असलेले सायंटिफिक प्रयोगही करणार आहे 

Sergey Sverch.- मी प्रथमच स्थानकातील lab मध्ये संशोधन करणार असल्याने excited आहे मी Stem Cell वर संशोधन करणार आहे आणी तिथले नमुने पृथ्वीवर आणणार आहे त्यांचे निष्कर्ष पृथ्वीवरच्या labमध्ये पहाण माझ्या साठी interesting असणार आहे 

Sergey Rhyzhikov- आम्ही तीथे 56 सायंटिफिक प्रयोग करणार आहोत त्यातले काही नवे तर काही तीथे सद्या सुरू असलेले आहेत काही नवीन संशोधन आम्ही करणार आहोत काही आगामी भविष्य कालीन अंतराळ मोहिमेतील अंतराळवीरांना ऊपयुक्त असतील तर काही अत्याधुनिक तंत्रज्ञान पृथ्वीवरिल मानवी आरोग्यासाठी आणी ऊद्योगासाठी ऊपयुक्त असतील

Sergey Rhyzhikov  -

तुम्ही अंतराळ प्रवासात कोणी परग्रहवासी पाहिलाय का? आणी समजा तुम्हाला तो भेटला तर तुम्ही त्याच्याशी कसे वागाल तो तुमचा किंवा तुम्ही त्याचा encounter कराल का?

अजून तरी असा परग्रहवासी कोणाला भेटला कींवा दिसला नाही अंतराळ प्रवासात फक्त पृथ्वीवरील अंतराळवीरच स्थानकात जातात आणी तिथे राहतात पण जर भविष्यात असा कोणी परग्रहवासी मानव भेटला तर आम्ही त्याच्याशी मैत्रीचा हात पुढे करू त्याने encounter करण्याआधीच 

Kate अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या वेळेस तू स्थानकात असशील मग तू तिथून तुझ मत देणार का ?

हो ! मी स्थानकातून माझा मतदानाचा हक्क बजावणार व माझे मत देणार आहे 

तुम्ही तिघेही स्थानकातून सोशल मीडियावर सक्रिय राहणार का ? आणी तुमच्या follower शी संपर्क साधणार का ?

Sergey Rhyzhicov - मी इथेच फारसा सोशल मीडियावर सक्रिय नसतो त्या मुळे मी तिथूनही सोशल मीडियावरून संपर्क साधणार नाही फक्त कुटुंबियांच्या संपर्कात राहीन आणि मिळालेल्या मोकळ्या वेळेत मी माझे आधीच्या मोहिमेतील सायंटिफिक प्रयोग करणार आहे आणि तिथे सुरु असलेल्या संशोधनात वेळ घालवीन 

Sergey Sverch -मी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतो आता अंतराळ प्रवासात आणि स्थानकातील वास्तव्यात अंतराळातील आणि स्थानकातील नवनवीन फोटो आणि Short Stories माझ्या सोशल मीडिया account वरून शेअर करणार आहे 

Kate -मीही सोशल मीडियावर सक्रिय असते माझ्या face book आणि twitter वरील account वर मी नेहमीच फोटो व videos शेअर करते आधीच्या अंतराळ मोहिमेत मी स्थानकातून माझ्या follower शी संपर्क साधला आताही साधेन

माझ्या followers ना विशेषतः विध्यार्थ्यांना अंतराळातील घडामोडींचे फोटो आणि videos पाहायला खूप आवडतात 

-आता शेवटचा प्रश्न तुम्ही तुमच्या सोबत स्थानकात कोणत्या वस्तू किंवा सामान नेणार आहात ?

Sergey Rhyzhicov -मी फक्त गरजेचे सामान आणि सायंटिफिक प्रयोगासाठी लागणार सामान नेणार आहे

Kate Rubins -मी देखील गरजेचे सामान आणि सायंटिफिक प्रयोगाच आवश्यक सामान नेणार आहे शिवाय तिथल्या संशोधनातून मिळालेल्या मोकळ्या वेळेत मी जास्तीचे सायंटिफिक प्रयोग करणार आहे त्या साठी वेगळे सामान नेणार आहे 

Sergey Sverch - मी प्रथमचअंतराळ प्रवास करणार आहे स्थानकात राहणार आहे त्या मुळे माझ्या कुटुंबीयांनी स्थानकात नेण्यासाठी छोटा अंतराळवीर बनवला आहे तो मी त्यांची आठवण म्हणून सोबत नेणार आहे शिवाय आवश्यक सामानही नेणार आहे

Saturday 19 September 2020

ब्रम्हांडात सूर्यमालेबाहेर बाहेर सापडला तेजस्वी बटू तारा आणि त्या भोवती फिरणारा पृथ्वीसमान ग्रह

In this illustration, WD 1856 b, a potential Jupiter-size planet, orbits its much smaller host star, a dim white dwarf

सौरमालेबाहेर सापडलेला ब्रह्मांडातील W.D1856 b ग्रह मंद प्रकाशित पांढऱ्या बटू ताऱ्याभोवती भ्रमण करताना-फोटो -नासा संस्था

नासा संस्था -15 सप्टेम्बर 

नासा संस्थेतील आंतरराष्ट्रीय खगोल शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना सध्या वापरात नसलेल्या Spitzer Space Telescope आणी TESS (Transiting Exoplanet survey Satellite ) ह्या द्वारे मिळालेल्या छायाचित्रात  आपल्या सूर्यमालेबाहेर अंतराळात एक पांढरा तेजस्वी सूर्यासारखा प्रकाशमान तारा आणि त्या भोवती भ्रमण करणारा ग्रह सापडला आहे 

हा नवा संशोधित ग्रह आपल्या पृथ्वीपेक्षा चाळीसपट मोठा आहे आणि ज्या पांढऱ्या प्रकाशित ताराभोवती तो  फिरतोय त्याच्या पेक्षा सातपट मोठा आहे तो आपल्या सौरमालेतील गुरु ग्रहाच्या आकाराचा असून तो अत्यंत वेगाने भ्रमण करत आहे त्याचा भ्रमणवेग आपल्या सौरमालेतील बुध ग्रहाच्या साठपट जास्त असून तो 34 तासात एक फेरी पूर्ण करत आहे शास्त्रज्ञांनी ह्या ग्रहाला W.D 1856 b असे नाव दिले आहे 

Wisconsin Madison University चे असिस्टंट प्रोफेसर Andrew Vanderburg ह्यांच्या मते जेव्हा एखादा सूर्यासारखा स्वयंप्रकाशित तारा त्याच्यातील पॉवर संपत आली की हळूहळू नष्ट होऊ लागतो तेव्हा नष्ट होताना त्याच्यातील प्रचंड उष्णतेमुळे तो लालसर होतो त्याचा आकार त्याच्या मूळ आकारापेक्षा शंभरपट किंवा हजारपटीने वाढतो आणि तो फुगतो ह्या प्रक्रियेदरम्यान त्याच्या वरच्या भागातुन गॅस बाहेर पडतो त्या मुळे हा तारा हळू हळू थंड होताना पांढऱ्या रंगात परावर्तित होतो आणि त्याचा आकारही लहान होतो 

हा तारा जेव्हा नष्ट होतो तेव्हा त्याच्यातून बाहेर पडणाऱ्या प्रचंड उष्णता आणि वायू मुळे त्याच्या आजूबाजूच्या कक्षेतील तारे व तरंगत्या वस्तू नष्ट होतात ह्या ताऱ्याच्या चुंबकीय कक्षेत आलेल्या आकाशगंगेच्या पट्ट्यांनाही तो गिळंकृत करतो त्यांची राख होते प्रचंड उल्कापात होतो अशा वेळेस त्याच्या भोवती फिरणाऱ्या ह्या ग्रहाला पाहून आम्ही आश्चर्यचकित झालो आहोत हा फिरता तारा नष्ट कसा झाला नाही ह्याच आम्हाला आश्चर्य वाटतय 

कदाचित हा फिरणारा ग्रह ह्या  बटु ताऱ्याच्या कक्षेत तारा निर्माण होण्याच्या प्रक्रियेनंतर शिरला असेल कदाचित ह्या ताऱ्याच्या कक्षेच्या पन्नास पट दूरवर अंतराळात तो भ्रमण करत असेल व फिरता फिरता ह्या ताऱ्याच्या कक्षेत ओढल्या गेला असेल त्या मुळेच तो नष्ठ झाला नसावा 

 TESS  satellite ची क्षमता अफाट असून तो अंतराळातील मोठा भाग व्यापतो आणि आपल्या सौरमाले बाहेर ब्रम्हांडात फिरणारे तारे,ग्रह किंवा इतर वस्तुंना शोधून त्यांचे निरीक्षण आणि त्यांच्यात होणारे बदल टिपतो आणि त्यांचे फोटो पृथ्वीवर पाठवतो 

हा प्रकाशमान पांढरा बटु तारा व त्या भोवती फिरणारा ग्रह उत्तरेकडील भागातील तारका समुहापासून 80 प्रकाशवर्षे दूर आढळला आहे तो 1100 मैल अंतरावर भ्रमण करत असून हा तारा थंड असून दहा बिलियन वर्षे जुना असावा असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे 

आता शास्त्रज्ञ ह्या ताऱ्याभोवती फिरणाऱ्या ग्रहाचे सखोल संशोधन करणार असून ह्या पृथ्वीसारख्या दिसणाऱ्या ग्रहावर सजीव सृष्टी साठी आवश्यक असणारे पृथ्वीसारखे वातावरण आणि पाणी आहे का ह्याचा शोध घेण्याचा प्रयत्न  ते करत आहेत

Tuesday 15 September 2020

नासाची महिला अंतराळवीर Kate Rubins स्थानकात जाण्याआधी पत्रकारांशी साधणार संवाद

  NASA astronaut Kate Rubins in front of the windows in the International Space Station’s cupola module in 2016

महिला अंतराळवीर Kate Rubins अंतराळमोहीम 49 दरम्यान अंतराळ स्थानकातील Cupula मधून बाहेरील अंतरिक्ष न्याहाळताना - फोटो -नासा संस्था 

नासा संस्था -11सप्टेंबर 

नासाची महिला अंतराळवीर आणि Biologist Kate Rubins येत्या ऑक्टोबर महिन्यात  दुसऱ्यांदा अंतराळ स्थानकात राहायला जाणार आहे जाण्याआधी 25 सप्टेंबरला ती पत्रकारांशी संवाद साधणार आहे आणि तिच्या ह्या दुसऱ्या अंतराळ मोहिमे संदर्भात विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देणार आहे  Kate Rubins च्या  Star City Russia  येथील ह्या मुलाखतीचे लाईव्ह प्रक्षेपण नासा T.V. वरून करण्यात येणार आहे 

नासा संस्थेच्या website वर ह्या live संवादाचे प्रक्षेपण 7a.m. ते 8.30a.m. ह्या वेळेत करण्यात येईल त्या आधी 6.30 वाजता  Kate Rubins च्या पहिल्या अंतराळ मोहिमेतील वास्तव्यातील ठळक घडामोडींचा माहितीपर व्हिडिओ T.V. वर दाखवण्यात येईल ह्या व्हिडिओ मध्ये तिचा पहिला अंतराळ प्रवास,अंतराळ स्थानकातील वास्तव्य ,त्या दरम्यान तिने केलेले सांयटिफ़िक संशोधन व इतर घडामोडींचा समावेश असेल 

Kate Rubins 14 ऑक्टोबरला  Soyuz MS-17 ह्या अंतराळयानातून अंतराळ स्थानकात राहायला जाण्यासाठी अंतराळप्रवास करणार आहे कझाकस्थानातील बैकोनूर येथील Cosmodrome वरून अंतराळयान सोयूझ अंतराळात झेपावेल तिच्या सोबत अंतराळ मोहीम 63-64 चे रशियन अंतराळवीर Sergey Ryzhikov आणि  Sergey Kud Sverchkov हे दोघेही अंतराळ स्थानकात राहायला जाणार आहेत 

Kate Rubins हिने ह्या आधीच्या अंतराळमोहिमेत 2016 साली अंतराळस्थानकात वास्तव्य केले होते त्या दरम्यान तिने प्रथमच अंतराळस्थानकातील झिरो ग्रव्हीटी मध्ये मानवी शरीरातील पेशींमधील DNA sequence मध्ये काय बदल होतात ह्या वर संशोधन केले आणि हे संशोधन करणारी ती पहिली महिला अंतराळवीर ठरली शिवाय तिने स्थानकातील वातावरणात मानवी Heart मधील Cardiovascular system कसे कार्य करते त्यात काय बदल होतात ह्यावरही संशोधन केले होते  तिथल्या फिरत्या लॅब मध्ये जाऊन पुन्हा संशोधन करण्यासाठी ती उत्सुक असल्याच तिने ह्या आधी पत्रकारांशी साधलेल्या संवादात सांगितले होते 

अंतराळ स्थानकातील मानवी वास्तव्याला यंदा वीस वर्षे पूर्ण होतील  Kate Rubins तिच्या ह्या दुसऱ्या अंतराळ मोहिमेदरम्यान दोन नोव्हेंबरला स्थानकाचा विसावा वर्धापन दिन तिच्या सहकारी अंतराळवीरांसोबत साजरा करणार आहे ह्या वीस वर्षात अमेरिकेने अंतराळविश्वात अफाट प्रगती केलीय शिवाय पुन्हा एकदा अमेरिकन भूमीवरून अमेरिकन निर्मित अंतराळयानातून अंतराळवीर मंगळ आणि चंद्रावर यशस्वी मानवासहित यशस्वी अंतराळमोहीम राबवणार आहेत

Wednesday 9 September 2020

Perseverance मंगळ यानाचे Twine Model OPTIMISM मंगळ यान पृथ्वीवर कार्यरत होणार

Technicians move an engineering version of the Perseverance Mars rover

 नासाचे नासाच्याJPL lab मधील engineers Twine Model OPTIMISM  Mars Rover Mars Yard मध्ये नेताना फोटो -नासा संस्था

नासा संस्था-4 sap.

नासाचे Perseverance मंगळयान मंगळाच्या वाटेने निर्विघ्नपणे अंतराळ प्रवास करत असतानाच नासा संस्थेने आता Perseverance मंगळ यानाचे जुळे मॉडेल बनविले असून नुकतीच त्याची चाचणी यशस्वी झाली आहे पण हे जुळे मॉडेल अंतराळात झेपावणार नसून पृथ्वीवरील Mars Yard मध्ये कार्यरत होणार आहे 

नासाच्या साऊथ कॅलिफोर्निया येथील Jet Propulsion lab मध्ये Perseverance मंगळयानाचे जुळे मॉडेल OPTIMISM Mars Rover ची एक सप्टेंबरला घेण्यात आलेली चाचणी यशस्वी झाल्यानंतर आता पुढच्या आठवड्यात OPTIMISM नासा संस्थेतील Mars यार्डात कार्यरत होणार आहे 

जुळ्या मंगळयानाचे डिझाईन हुबेहूब Perseverance मंगळ यानासारखेच आहे त्याचे वजन,चाके,कॉम्प्युटर्स,रोबोटिक आर्म,पॉवरफुल कॅमेरे स्वयंपूर्ण व अत्याधुनिक यंत्रणेने सज्ज आहेत ह्या full scale engineering version Mars 2020 Twin मंगळ यानाला OPTIMISM असे नाव देण्यात आले आहे हे जुळे मंगळ यान नासाने तयार केलेल्या पृथ्वीवरील कृत्रिम मंगळ भूमीवर कार्यरत रहाणार आहे ह्या Mars Yard मध्ये मंगळ ग्रहावर अस्तित्वात असलेल्या भूमीप्रमाणेच जमीन तयार करण्यात आली आहे त्यातील दगड,गोटे लाल माती मिनरल्स मंगळावरील भूमीसारखेच आहेत शिवाय मंगळ ग्रहाप्रमाणेच वातावरण निर्मिती करण्यात आली आहे नासाच्या JPL Labच्या Mobility test bed चे प्रमुख engineer Anais Zarifian म्हणतात आम्ही Perseverance मंगळावर पोहोचेपर्यंत न थांबता  ह्या Twine Mars Rover ची निर्मिती केली आहे  सध्या Perseverance मंगळाच्या वाटेवर आहे तो मंगळावर उतरण्याआधीच आम्ही हा Twine OPTIMISM पृथ्वीवरील Mars Yard वर कार्यरत करणार आहोत

 Perseverance च्या अंतराळ प्रवासादरम्यान किंवा यान मंगळाच्या भूमीवर पोहोचल्यावर त्याच्या स्वयंचलित यंत्रणेत काही बिघाड झाल्यास आम्हाला ह्या twine मंगळ  यानामुळे तात्काळ माहिती मिळेल त्या मुळे आम्हाला त्यावर मात करता येईल शिवाय ह्या शास्त्रज्ञ निर्मित पृथ्वीवरील आभासी मंगळ भूमीवर OPTIMISM कार्यरत झाल्याने आणि हे twine मॉडेल असल्यामुळे प्रत्यक्ष Perseverance मंगळावर पोहोचल्यानंतर तेथील भूमीवरील वातावरण,तापमान आणि  लॅण्डिंगचे ऐतिहासिक क्षण आम्हाला इथे बसून अनुभवता येतील OPTIMISM मुळे Perseverance मंगळ यानाचे मार्गक्रमण,क्रियाशीलता,स्वयंचलित यंत्रणेची कार्यक्षमता,रोबोटिक आर्मचे कार्य अत्याधुनिक पॉवरफुल computersची बुद्धिमत्ता आणि कॅमेऱ्याने टिपलेली मंगळावरील भूमीची छायाचित्रे तात्काळ पृथ्वीवरून पाहायला मिळतील आणि आम्ही त्या क्षणांचा आनंद अनुभवू शकू 

18 Feb 2021 ला Perseverance मंगळावर पोहोचेल तेव्हा OPTIMISM मंगळ यानामुळे आम्हाला पृथ्वीवरून कमांड न देताही Perseverance यानातील Software व hardware स्वयंचलित यंत्रणेने कसे कार्यरत होतात हे समजेल ह्या जुळ्या मंगळ यानातील Mobility System,Top Driving Speed,Features,Remote Mast Sensing Mast head Science Instruments,Cameras,Computer Brains अगदी सारखेच असले तरीही ह्या दोन्ही यानाची पॉवर यंत्रणा मात्र वेगळी आहे Perseverance मंगळ यान यानात बसविलेल्या Multi Mission radio-isotope thermo-electric generator वर तयार झालेल्या पॉवरवर कार्यान्वित होतॊ तर Twine OPTIMISM मंगळ यान Umbilical cord च्या  साहाय्याने जोडलेल्या Electric power वर कार्यान्वित होतो दोन वर्षापासुन नासा संस्थेतील ईंजीनीयरची टिम ह्या Twine Mars Roverची निर्मिती करण्यासाठी अथक परीश्रम करत होते


Thursday 27 August 2020

Space X Crew-2 Mission ची तयारी अंतिम टप्प्यात अंतराळवीरांची नावे जाहीर

Megan McArthur, Shane Kimbrough, Akihiko Hoshide, and Thomas Pesquet

 नासाची अंतराळवीर Megan,Shane Kimbrough जपानचे अंतराळवीर Hoshide आणि Thomas Pesquet फोटो -नासा संस्था 

 नासा संस्था -
नासा संस्था आणि Space X निर्मित Space X Crew Dragon अंतराळ मोहीम यशस्वी राबवून अंतराळवीर Bob Behnken आणि Doug Hurley अंतराळस्थानकातुन नुकतेच पृथ्वीवर सुखरूप परतल्यानंतर आता नासा संस्थेतर्फे दुसऱ्या अंतराळ मोहिमेची तयारी सुरु झाली आहे मागच्या महिन्यात ह्या Space X Crew -2 mission मधील सहभागी अंतराळवीरांची नावे निश्चित करण्यात आली असुन 2021च्या spring मध्ये हे यान अंतराळ स्थानकात जाण्यासाठी अंतराळात झेपावणार आहे आता मागच्या आठवड्यात Space X अंतराळयान आणि Falcon Rocket नासाच्या Florida येथील केनेडी स्पेस सेंटर मध्ये अंतिम चाचणी साठी दाखल झाले असुन नासा संस्थेतील टीम ह्या मोहिमेची जय्यत तयारी करत आहे

 नासा संस्थेच्या Florida स्पेस सेंटर येथील उड्डाण स्थळावरून  Falcon रॉकेटच्या साहाय्याने Space X Crew -2 अंतराळयान अंतराळ स्थानकात जाण्यासाठी अवकाशात झेपावेल ह्या स्पेस X अंतराळ यानातून चार अंतराळवीर अंतराळ प्रवास करणार असून नुकतेच Space X अंतराळ यानाचे ऐतिहासिक उड्डाण यशस्वी करून पृथ्वीवर परतलेल्या अंतराळवीर Bob Behnken ह्यांची पत्नी Megan ह्यांची ह्या अंतराळ यानाची Pilot म्हणून निवड करण्यात आली आहे तर अंतराळवीर Shane Kimbrough हे मिशनचे कमांडरपद सांभाळतील ह्या दोघांसोबत अंतराळवीर Akihiko Hoshide(JAXA)आणी अंतराळवीर Tomas Pesquet (ESA ) हेही ह्या अंतराळ यानातून प्रवास करणार आहेत हे चारही अंतराळवीर स्थानकात सहा महिने वास्तव्य करून तिथल्या संशोधनात सहभागी होणार आहेत

अंतराळवीर Kimbrough ह्यांची हि तिसरी अंतराळवारी आहे ह्या आधी ते 2008 च्या अंतराळमोहीम STS-126 व 2016 ला अंतराळ मोहीम 49-50 अंतर्गत स्थानकात दोनदा राहायला गेले होते आता ते तिसऱ्यांदा स्थानकात राहायला जाणार आहेत त्यांनी स्थानकात 189 दिवस वास्तव्य करून तेथील संशोधनात सहभाग नोंदवला व स्थानकाच्या कामासाठी सहावेळा स्पेसवॉकही केला आहे 

Megan MC Arthur ह्यांची हि दुसरी अंतराळवारी आहे 2009 सालच्या अंतराळ मोहीम STS-125 अंतर्गत त्यांनी अंतराळ स्थानकात बारा दिवस एकवीस तास व्यतीत केले आणि रोबोटिक आर्मच्या साहाय्याने केलेल्या मोहिमेतील कामात सहभाग नोंदवला ह्या मिशनमधील पायलटपदाच्या नियुक्तीमुळे अमेरिकन निर्मित अमेरिकन अंतराळ यानाच्या ऐतिहासिक उड्डाणाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणारे पहिले अंतराळवीर दाम्पत्य म्हणून Bob Behnken आणी Megan ह्यांची नोंद होईल 

Thomas Pesquet हे दुसऱ्यांदा स्थानकात राहायला जाणार आहेत ते ह्या आधीच्या अंतराळ मोहीम 50-51अंतर्गत अंतराळ स्थानकात राहायला गेले होते आणि त्यांनी 196 दिवस स्थानकात राहून तेथील संशोधनात सहभाग नोंदवला होता 

अंतराळवीर Hoshide ह्यांची हि तिसरी अंतराळवारी असून त्यांनी ह्या आधी स्थानकात 124 दिवस वास्तव्य केले आहे 2008सालच्या मोहीम STS-124 अंतर्गत व  2012सालच्या मोहीम 32-33 अंतर्गत ते स्थानकात गेले होते सध्या ह्या Space X Crew -2 मोहिमेतील अंतराळयान आणि rocket  ची उड्डाणपूर्व चाचपणी करण्यात येत असून  अंतराळवीरांचेही उड्डाणपूर्व ट्रेनिंग सुरु आहे

Wednesday 5 August 2020

अंतराळवीर Bob आणी Doug ह्यांच Johnson Space Center मध्ये जोशात स्वागत

                           SpaceX capsule with NASA astronauts makes first splashdown in 45 years
                        अंतराळवीर Bob Behnken विमानातून उतरल्यानंतर -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -4 ऑगस्ट
अंतराळवीर Bob Behnken आणी Doug Hurley Houston येथे पोहोचताच नासाच्या Johnson Space Center जवळील Ellington Field येथे त्यांचे जोशात स्वागत करण्यात आले त्या नंतर अंतराळवीरांचा Well Come Home ceremony हा कार्यक्रम पार पडला ह्या कार्यक्रमाला lock down मुळे नासा संस्थेतील निवडक आमंत्रित उपस्थीत होते  नासाचे प्रमुख Administrator Jim Bridenstine,Johnson Space Centerचे Director Geyer,Kathy,Steve आणी Space X Dragonचे Elon Musk ह्यांनी ह्या अंतराळवीरांनी हि मोहीम यशस्वी केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले Jim Bridenstine म्हणाले ,"अंतराळवीर Bob आणि Doug ह्या दोघांनी हि असामान्य कामगिरी पार पाडली आहे त्यांनी Space X Dragon व्यवस्थितपणे अंतराळात नेऊन पुन्हा सुरक्षित पणे पृथ्वीवर आणले आहे हे काम अत्यंत कठीण होते त्यामुळे त्यांचे अभिनंदन त्यांच्या ह्या यशाचा ऊपयोग आगामी अंतराळ मोहिमासाठी होईल"!
                          NASA astronauts speak after historic SpaceX return
अंतराळवीर Bob Behnken आणी Doug Hurley Johnson Space Center मध्ये संवाद साधताना
फोटो -नासा संस्था
Space X Dragon चे Elon Musk अंतराळवीरांना पाहून क्षणभर भावुक झाले ह्या दोघांना Space X मधून स्थानकात पाठवून परत सुरक्षित पृथ्वीवर आणण्याची अवघड जबाबदारी माझ्यावर होती दोघांनी हि मोहीम यशस्वी केल्यामुळे मी निश्चिंत झालो आहे त्यांच्या कुटुंबीयांनी ह्या मोहीमेत जाण्यासाठी त्यांना परवानगी देऊन माझ्या वर जो विश्वास दाखवला तो सार्थ ठरला हि मोहीम जोखमीची होती पण आता मी ह्या दोघांनी मिळवलेल्या यशाने भारावून गेलोय ह्या दोघांचे अभिनंदन!
ह्या नंतर अंतराळवीरांना त्यांचा अनुभव शेअर करण्यास सांगण्यात आले तेव्हा दोघांनीही आता लगेच आम्ही ऊभे राहु शकत नाही दोन महिने स्थानकातील वास्तव्यात आम्ही तरंगत्या अवस्थेत राहिलो त्यामुळे बसूनच संवाद साधतो असे सांगितले 
Doug म्हणाले,"आमचा Space X Dragon मधला प्रवास नाविन्यपूर्ण आणी आरामदायी होता ह्या ऐतिहासिक मोहिमेत आम्हाला संधी मिळाली आम्ही भाग्यवान आहोत त्यासाठी नासा संस्था आणी Space X चे आम्ही आभारी आहोत आज आमच्या स्वागतासाठी तुम्ही उपस्थीत राहिलात त्या बद्दल आभार! गेल्या सहा वर्षापासून आपण ह्या मोहिमेसाठी प्रयत्न केले ते सार्थकी लागले खरोखरच ह्या यानातील सुविधा आरामदायी होत्या ड्रायव्हिंग स्मुथ होत स्थानकातील अनुभव अविमरणीय होता सारेच अंतराळवीर आम्हाला मदत करत होते नासा संस्थेने आमचा वेळोवेळी कुटुंबीयांशी संवाद साधुन दिला त्यांच्या परवानगी मुळे आज ते ह्या कार्यक्रमाला आमच्या स्वागतासाठी ईथे उपस्थित राहु शकले त्या बद्दल आभार! लवकरच आम्ही पत्रकारांशी लाईव्ह संवाद साधुन आणखी माहिती देऊ"
अंतराळ वीर Bob Behnken म्हणाले," की आमचा Space X मधला अंतराळ प्रवास आरामदायी आणी आनंददायी होता नाविन्यपूर्ण होता Launching चा अनुभव चांगला होता पण परततानाचा अनुभव थरारक होता अंतराळातून वातावरणात शिरताना यानाचा वेग प्रचंड होता दाट वातावरण भेदताना यानाचा प्रचंड आवाज येत होता तो सामान्य मशीनरी सारखा नव्हता तर गगन भेदी,भयानक मोठा हिस्त्र पशुसारखा होता एकाचवेळी अंतराळात असंख्य हिस्त्र पशु जोरजोरात ओरडत आहेत आणी आपण त्यांच्या तोंडी सापडलो आहोत अस वाटुन क्षणभर भीतीने अंगावर रोमांच ऊभे राहिले पण हळूहळू आवाज कमी झाला आणी हायस वाटल !"
"खरोखरच गेल्या सहा वर्षापासून आपण ह्या मोहिमेसाठी अहोरात्र कष्ट केले ह्या मोहिमेतील ईंजीनीअर, तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ आणी कर्मचाऱ्याचे कष्ट कौतुकास्पद आहेत आम्ही ह्या मोहिमेत सहभागी झालो हे आमच भाग्य आम्हाला ह्या मोहीमेत सहभागी केल्यबद्दल नासा आणी Space X चे आभार!अजूनही अमेरिकेतली परिस्थिती कोरोना मुळे गंभीर आहे अशा वेळेस नासा स्ंस्थेने आम्हाला कुटुंबीयांशी लाईव्ह संवाद साधुन दिला त्या बद्दल आभार आजही येण्याआधी माझ्या मुलाने लाईव्ह संवाद साधत तुमची आतुरतेने वाट पहात असल्याचे सांगितले आमचा अंतराळ प्रवास आधी पेक्षा वेगळा होता अमेरीकेची अंतराळ मोहीम बंद झाली तेव्हा वाईट वाटल पण आपण भविष्यात पुन्हा ह्या ऐतिहासिक मोहिमेचा भाग होऊ असे स्वप्नात देखील वाटले नव्हते पण नासा आणी Space X मुळे हि संधी मिळाली स्थानकातील दिवस मजेत गेले Chris Cassidy  आम्हाला मदत करायला तत्पर असायचा तीनही अंतराळवीरांनी आम्हाला मदत केली त्यांच्या सोबतचे सायंटिफिक प्रयोग,Space Walk चा अनुभव अविस्मरणीय आहे तुम्ही आमच्या स्वागतासाठी आलात त्या बद्दल आभार !"
शेवटी ऊपस्थित सर्व मान्यवरांनी आणी Jim Bridenstine ह्यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करुन त्यांच्या सन्मानार्थ  टाळ्या वाजवून त्यांचा गौरव केला त्या नंतर हे दोन्ही अंतराळवीर त्यांच्या कुटुंबीयांसोबत त्यांच्या घरी परतले

अंतराळवीर Doug Hurley आणी Bob Behnken दोन तारखेला पृथ्वीवर सुखरूप परतले


The SpaceX Crew Dragon Endeavour spacecraft is seen as it lands with NASA astronauts Robert Behnken and Douglas Hurley onboard in the Gulf of Mexico off the coast of Pensacola, Florida, Sunday, Aug. 2, 2020.
नासाचे Endeavour Space X Crew Dragon Gulf Of Mexico Florida येथे समुद्रात उतरताना -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -2ऑगस्ट
नासाच्या Space X Crew Dragon ह्या व्यावसायिक अंतराळयानातून अंतराळवीर Doug Hurley आणी Bob Behnken अंतराळ स्थानकात राहायला गेले होते नासा आणी Space X ह्यांच्या सहकार्याने Endeavour ह्या अमेरिकन निर्मित अंतराळयानाच्या Demo -2 Test Flight अंतर्गत अमेरिकन भूमीवरून ह्या यानाचे उड्डाण करण्यात आले होते आता स्थानकातील 62  दिवसांच्या वास्तव्यानंतर हे दोन्ही अंतराळवीर शनिवारी 7.34p.m.ला अंतराळ स्थानकातून पृथ्वीवर येण्यासाठी निघाले आणि एकोणीस तासांच्या प्रवासानंतर ते दोन तारखेला 2.48p.m.ला पृथ्वीवर सुखरूप परतले
स्थानकात पार पडला Farewell Ceremony
पृथ्वीवर येण्याआधी स्थानकात अंतराळवीरांचा Farewell कार्यक्रम पार पडला ह्या कार्यक्रमादरम्यान सर्व अंतराळवीरांनी स्थानकातून पृथ्वीवरील नासा संस्थेशी लाईव्ह संवाद साधला अंतराळवीर Doug आणी Bob ह्यांनी स्थानकातील त्यांनी व्यतीत केलेला काळ आरामदायी आणि आनंदात गेल्याचे सांगितले विशेषतः Chris Cassidy बुद्धिमान आहे त्याची पुन्हा स्थानकात भेट झाली त्याच्या सोबत राहताना,Space Walkआणी सायंटिफिक प्रयोग करतानाचे क्षण अविस्मरणीय असल्याचे त्यांनी सांगितले Bob ह्यांनीही अशाच भावना व्यक्त केल्या आता परतताना आम्ही स्थानकात आणलेला अमेरिकेचा झेंडा परत पृथ्वीवर आणणार आहोत शिवाय आमच्या मुलांनी दिलेला Tremor डायनोही परत आणणार आहोत मुले आमच्याबरोबर त्याची देखील वाट पाहात आहेत आम्हाला ह्या ऐतिहासिक उड्डाणाची संधी दिल्याबद्दल आम्ही नासा संस्थेचे आभारी आहोत आमचा इथे येतानाचा प्रवास आरामदायी होता आता परततानाही तो आरामदायी होईल अशी आशा करतो असे ते म्हणाले
पंचेचाळीस वर्षांनी प्रथमच Endeavor अंतराळयान सुमुद्रात उतरले ह्या दोन्ही अंतराळवीरांनी अंतराळातून प्रचंड वेगाने वातावरण भेदत यानाला पृथ्वीच्या कक्षेत आणले आणि यानाच्या वेगावर नियंत्रण करीत यान Florida तील Gulf Of Mexico  येथील  सुमुद्रात पॅराशूटच्या साहाय्याने सुरक्षित खाली उतरवले 
    
Dragon Endeavour is lifted out of the waters of the Gulf of Mexico and onto the SpaceX "GO Navigator" recovery vessel
   Endeavour अंतराळयान जहाजावर आणताना -फोटो -नासा संस्था

ह्या यानाच्या समुद्रातील लँडिंग आधी सुमुद्रातील प्रायव्हेट बोटींना आधीच कॅप्सूल मधून बाहेर पडणाऱ्या विषारी वायूंपासून लोकांना धोका असल्याने दूर जाण्यास  सांगण्यात आले होते
अंतराळ यान समुद्रात बुडी मारताच काही क्षणातच नासा संस्थेतील Recovery टीमच्या चार बोटी यानाजवळ पोहोचल्या यानाचा जहाजाशी संपर्क व्हावा म्हणून मार्ग तयार करण्यात आला त्या नंतर यान सुरक्षितपणे जहाजावर आणण्यात आले त्या नंतर चाळीसजणांची डॉक्टर,नर्सेस आणी कर्मचाऱ्यांची Recovery टीम तेथे पोहोचली त्यांनी  दोन्ही अंतराळवीरांना कॅप्सूल मधून सुरक्षितपणे बाहेर काढले प्रथम recovery टीम मधील डॉक्टरांनी अंतराळवीरांचे चेक अप केले त्या नंतर ह्या अंतराळवीरांना बोटीतून किनाऱ्यापर्यंत पोहोचविण्यात आले त्यानंतर ह्या दोन्ही अंतराळवीरांना नासाच्या विमानाने Huston येथे पोहोचविण्यात आले

Saturday 1 August 2020

नासाचे Perseverance Mars Rover मंगळाच्या दिशेने मार्गस्थ

A United Launch Alliance Atlas V rocket with NASA’s Mars 2020 Perseverance rover onboard launches from Space Launch Complex 41
                  Perseverance Mars Rover मंगळाच्या दिशेने अवकाशात झेपावताना -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -30जुलै
नासाच्या मंगळ मोहिमे अंतर्गत Perseverance मंगळ यान तीस तारखेला 7.50a.m.ला अमेरिकेतील Florida Cape Canaveral Air Force Station येथुन मंगळाच्या दिशेने मार्गस्थ झाले ह्या मंगळयानासोबत Ingenuity Mars Helicopter ही मंगळप्रवासास गेले आहे V.l.A Rocket पृथ्वीच्या ठराविक अंतरावरील कक्षेत पोहोचताच रॉकेटची  बर्निंग प्रक्रिया पार पडली आणी यान Rocket पासून वेगळे झाले त्यानंतर यानाचा मंगळग्रहाकडील अंतराळ प्रवास सुरु झाला  
Perseverance यान अंतराळात झेपावल्यानंतर काही वेळातच  9.15a.m.ला अंतराळ यानाने सिग्नल देणे सुरू केले सुरवातीला यान पृथ्वीच्या सावलीत आल्याने यानातील वातावरण बाहेरील वातावरणापेक्षा आणी शास्त्रज्ञांच्या अपेक्षेपेक्षा जास्त थंड झाल्याने काही काळ अडथळा निर्माण झाला पण काही क्षणातच यानातील अत्याधुनिक स्वयंचलित यंत्रणेने त्यावर मात केली आणी यानाचा अंतराळ प्रवास सुरळीतपणे सुरू झाला यानाने दिलेला पहिला सिग्नल स्पष्ट नव्हता पण नंतर 11.30 a.m.ला मंगळयानाने दिलेला सिग्नल स्पष्ट होता यानातील यंत्रणा व्यवस्थित कार्यरत झाली असून यानाचा अंतराळ प्रवास मंगळाच्या वाटेवर व्यवस्थित सुरू असल्याचे संकेत यानाने नासाच्या Ground Station ला पाठविले

NASA Administrator Jim Bridenstine conducts a briefing July 29 at Kennedy Space Center in advance of the Mars 2020 launch..
नासा Administrator Jim Bridenstine Perseverance Mars Rover Launch झाल्यानंतर संस्थेतील टीमशी
संवाद साधताना-फोटो -नासा संस्था

कारच्या आकाराचे Perseverance मंगळयान अत्याधुनिक यंत्रणेनी सुसज्ज असुन त्यात बसविण्यात आलेले कॅमेरे Computers, Microphone व ड्रील अत्याधुनिक यंत्रणेनी बनविलेले असुन त्यात लेसर प्रणालीचा वापर करण्यात आला आहे त्या मुळे मंगळावरील सूक्ष्म घडामोडींचा आवाज, Micro organisms चे अवशेष,आणी वातावरणातील वायू आणी तापमानाचे नमुने आणी नोंद घेऊन त्याचे फोटो Perseverance वरित पृथ्वीवर पाठवेल मंगळयानाच्या रोबोटिक Arm च्या सहाय्याने मंगळावरील भुमीवरील व भूगर्भातील Geological माहिती गोळा केल्या जाईल शिवाय तेथील पाण्याचे पुरातन अस्तित्व व सजीव सृष्ठीला दुजोरा देणाऱ्या पुराव्यांचे नमुने Perseverance येताना  प्रुथ्वीवर आणेल 
Perseverance मध्ये बसविण्यात आलेल्या अत्याधुनिक ऊपकरणापैकी Moxie ह्या ऊपकरणाद्वारे मंगळावरील वातावरणातील अस्तित्वात असलेल्या कार्बन डाय आँक्साईडचे रुपांतर आँक्सिजनमध्ये करण्याचा प्रयोग करण्यात येणार आहे हा प्रयोग यशस्वी झाल्यास आगामी मानवसहीत मंगळ मोहिमेत मानवी निवासासाठी आणी ईंधनासाठी त्याचा उपयोग होईल
Ingenuity helicopter आगामी मंगळ मोहिमेसाठी मंगळावरील मानवी वस्तीसाठी पोषक वातावरण शोधणार आहे
आता सात महिन्यांच्या अंतराळ प्रवासानंतर Perseverance मंगळावर पोहोचेल सद्या यान दुसरी कमांड मिळेपर्यंत ह्याच मोडमध्ये राहील 
ह्या Perseverance च्या यशस्वी launching नंतर नासा संस्थेतील ह्या मोहिमेतील Perseverance टिम आनंदी झाली आहे नासाचे Administrator Jim Bridenstine ह्यांनी ह्या मंगळ मोहिमेतील सर्व शास्त्रज्ञ ,इंजिनीअर्स ,तंत्रज्ञ आणी टिम मधील सर्व कर्मचाऱयांचे आभार मानले आहेत सद्याच्या कोरोना महामारीच्या कठीण काळात हि मोहीम यशस्वी करण सोप नव्हत पण नासा संस्थेतील टिमने ते करुन दाखवल हि खरोखरच असाधारण कामगिरी आहे खरेतर मंगळावर मंगळयान पाठविणेच कठीण आहे,पण नासा संस्थेने ह्या आधीही यशस्वी मंगळमोहिम राबविली असुन मंगळावर आधीचे मंगळयान व्यवस्थित कार्यरत आहे आता Perseverance यानाने जर अशीच असामान्य कामगिरी पार पाडुन तिथले नमुने पृथ्वीवर परत आणले तर नासाची आगामी मानवसहीत मंगळमोहिमही अशीच यशस्वी ठरेल अशी आम्हाला खात्री आहे म्हणूनच ह्या यानाचे नाव Perseverance म्हणजे धृढ निश्चय असे ठेवल्याचे त्यांनी सांगितले हि मोहीम यशस्वी केल्याबद्दल नासा तील सर्वच प्रमुखांनी टीम मधील साऱयांचे कौतुक केले असुन टिमचे अभिनंदन केले आहे

Thursday 30 July 2020

अंतराळवीर Bob Behnken आणी Doug Hurley पृथ्वीवर परतणार

The International Space Station's two newest crew members, NASA astronauts Bob Behnken, left, and Doug Hurley
            अंतराळवीर Bob Behnken आणी Doug Hurley स्थानकातील वास्तव्यादरम्यान  -फोटो -नासा संस्था

नासा संस्था-25 जुलै
अंतराळवीर Bob Behnken आणी Doug Hurley अमेरिकन भुमीवरुन अमेरिकन मेड अंतराळयान Space X 
Dragon Endeavour मधून अंतराळ स्थानकात रहायला गेले होते अकरा वर्षानंतर अमेरीकेची बंद पडलेली
स्वयंपुर्ण अंतराळ मोहीम Space X Dragon मुळे पुन्हा सुरु झाली ह्या ऐतिहासिक Space X Dragon च्या Flight test 2 अंतर्गत हे दोघे अंतराळस्थानकात गेले होते 
हे दोनही अंतराळवीर 30 मेला Endeavour अंतराळ यानातुन पृथ्वीवरुन अंतराळात झेपावले आणी एकोणीस तासांनी 31 मेला अंतराळ स्थानकात पोहोचले होते ह्या अमेरिकन मेड अंतराळयानाची रचना अत्याधुनिक, सुटसुटीत आणी आरामदायी असल्याच त्यांनी सांगितले होते 
आता अंतराळ स्थानकातील त्यांच वास्तव्य संपवुन एक ऑगस्टला  शनिवारी 7.34p.m.ला हे दोघे पृथ्वीवर येण्यासाठी स्थानकाबाहेर पडतील त्या आधी अंतराळ स्थानकात त्यांचा Farewell ceremony व Departure preparations प्रक्रिया पार पडेल रविवारी दोन ऑगस्टला हे दोघे पृथ्वीवर परततील पृथ्वीच्या कक्षेत पोहोचल्यावर
त्यांचे अंतराळयान Endeavour Atlantic Ocean कींवा Gulf of Mexico Coast Florida येथील समुद्रात ऊतरेल (बुडी मारेल) 
हे दोन्ही अंतराळवीर पृथ्वीवर सुखरूप पोहोचल्यावर अमेरीकेची हि दुसरी यशस्वी अंतराळ मोहीम ठरेल 
ह्या अंतराळविरांचा स्थानकातील Farewell Ceremony, त्याच्या स्थानकातून बाहेर पडण्यासाठीची अंतराळ यान आणी स्थानकातील Departure प्रक्रिया आणी परतीच्या प्रवासाचे लाईव्ह प्रक्षेपण नासा T.V.वरून करण्यात येणार आहे 
अमेरिकेत कोरोनाच्या महामारी मुळे Lock Down सुरू असल्यामुळे पत्रकारांना ह्या अंतराळवीरांंना परतल्यानंतर वार्तांकन करण्यासाठी प्रत्यक्ष ऊपस्थीत राहता येणार नाही आणी अंतराळविरांची मुलाखतही घेता येणार नाही परंतु सोशल मिडिया वरुन काही निवडक पत्रकारांना यांच्याशी लाईव्ह संवाद साधता येईल 

Wednesday 29 July 2020

Perseverance Mars Rover उद्या मंगळाकडे झेपावणार नासाने दिली Excitement शेअर करण्याची संधी


NASA's Mars 2020 Perseverance rover and NASA's Ingenuity Mars Helicopter (shown in an artist's concept)
              Perseverance Mars Rover आणी Ingenuity Mars Helicopter -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -23 जुलै
नासाचे Perseverance मंगळ यान उद्या मंगळ ग्रहावर जाण्यासाठी अंतराळ प्रवासास निघणार आहे अमेरिकेतील कोरोना महामारीच्या संकटावर मात करत नासाने ह्या मंगळ मोहीमेची जय्यत तयारी पूर्ण केली आहे
उद्या 30 जुलैला गुरुवारी 7.50 a.m.ला अमेरिकेतील Florida Cape Canaveral Air Force Station येथील उड्डाण भूमीवरून Perseverance यान मंगळ प्रवासासाठी अंतराळात झेपावणार आहे
तब्बल सात महिन्यांच्या अंतराळ प्रवासानंतर हे यान 18 फेब्रुवारी 2021ला मंगळ ग्रहावर पोहोचेल आणि तेथील Jezero Crater ह्या भागात उतरुन तेथेच स्थिरावेल ह्या 2,300 पाउण्ड (1,043 kg) वजनाच्या रोबोटिक सायंटिस्ट सोबत  प्रथमच परग्रहावर अत्याधुनिक यंत्रणेने अद्ययावत Ingenuity Mars Helicopter ही पाठवण्यात येणार आहे
Perseverance मंगळ यान अत्याधुनिक यंत्रणेने सुसज्ज असून यानातील कॅमेरे,computer आणि रोबोटिक आर्मच्या साहायाने मंगळ ग्रहांच्या भूपृष्ठावरील आणि भूगर्भातील भूमीचे उत्खनन करून तेथील माती,खडक ,मिनरल्स आणि मंगळ ग्रहावर अस्तित्वात असलेल्या पुरातन सजीवांचे सूक्ष्म स्वरूपातील (Fossils )अवशेष शोधून त्यांचे नमुने गोळा करून पृथ्वीवर आणणार आहे शिवाय मंगळावर पुरातन काळी सजीव सृष्टी अस्तित्वात होती ह्याला दुजोरा देणारे आटलेले नदीचे प्रवाह ,स्रोत,पाण्याचे पुरावे देणारी ठिकाणे ,किनारे शोधून त्यांचे फोटो त्वरित पृथ्वीवर पाठवणार आहे मंगळ ग्रहावरील वातावरणात अस्तित्वात असलेले वायू आणि आगामी भविष्यकालीन मानवी निवास आणि वस्तीसाठी पोषक वातावरण असलेले मंगळ ग्रहावरील ठिकाणही हे यान शोधणार आहे मंगळावर मागच्या वर्षी प्रचंड धुलीवादळ झाले होते त्या मुळे ह्या आधीच्या मोहिमेतील मंगळयान भरकटले आणि त्यातील यंत्रणा काही काळ ठप्प झाली नंतर बंद पडली होती म्हणून ह्या वेळेस ह्या सारख्या संकटावर मात करण्यासाठी काही नव्या सुधारित यंत्रणेचा वापर यानात करण्यात आला आहे अशा वेळेस यान वर उडू शकत नाही पण यानासोबत पाठवण्यात येणारे Ingenuity Helicopter मात्र अशा संकटकालीन परिस्थितीत वर उडून इतरत्र सुरक्षित स्थळी जाऊ शकते आणि सुरक्षित स्थळ शोधूही शकते शिवाय तेथील परिस्थितीचे फोटो आणि इतर माहिती पृथ्वीवर पाठऊ शकते म्हणून यानासोबत Helicopter पाठवण्यात येणार आहे
 NASA संस्थेने संस्थेने दिली Excitement शेअर करायची संधी 
 #Countdown To Mars
Perseverance च्या launching ची तारीख जसजशी जवळ येतेय तसतशी उत्साही अमेरिकन नागरिकांची Excitementही वाढतेय पण ह्या वेळेस कोरोना महामारी मुळे जाहीर झालेल्या लॉक डाऊनच्या कडक निर्बंधामुळे हौशी नागरिकांना ह्या ऐतिहासिक मंगळ यानाच launching प्रत्यक्ष उपस्थीत राहून पाहता येणार नाही म्हणून नासा संस्थेतर्फे नागरिकांना सोशल मीडियावरून हा launching सोहळा पाहण्याची संधी देण्यात आली आहे एरव्ही launching स्थळी उपस्थित असलेल्या Guest कडून नागरिकांना माहिती दिली जाते ह्या वेळेस lock down मुळे पत्रकारांनाही वार्तांकन करण्यासाठी तिथे उपस्थित राहण्याची परवानगी नाही फक्त Florida स्थित निवडक नासा संस्थेतील पत्रकारांना उपस्थित राहण्याची संधी मिळाली आहे नासा संस्थेने लोकांचा उत्साह पाहून त्यांच्या Excitement शेअर करण्याची संधी दिली आहे कोणत्याही वयाच्या व्यक्तींना त्यांच्या भावना #Countdown To Mars ह्या id वर video द्वारे रेकॉर्ड करून  किंवा tagging करून  शेअर करण्याची संधी  देण्यात आलीय त्यातील निवडक video launching च्या  लाईव्ह प्रक्षेपण कार्यक्रमादरम्यान दाखवले जाणार आहेत
 Virtual NASA Social                          
उत्साही नागरिकांचा हिरमोड होऊ नये म्हणून नासा संस्थेने सोशल मीडियावरून Virtually उपस्थित राहण्याची संधीही जाहीर केली आहे Public Face Book Group द्वारे Behind -the -scenes -look at the mission अंतर्गत नागरिक आभासी उपस्थित राहून ह्या संधीचा लाभ घेऊ शकतात अर्थात त्या साठी नासा संस्थेकडून रीतसर परवानगी घेणे  आवश्यक आहे
 Mars Photo Booth
 ह्या मोहिमे अंतर्गत ह्या ऐतिहासिक Perseverance मंगळयान launching सोहळ्याला आभासी उपस्थित राहण्याची आणि उपस्थित राहिल्याची आठवण म्हणून नासाच्या Mars Photo Booth वर स्वत:चा स्मरणीय फोटो काढण्याची संधीही दिलीय त्या साठी आपला फोटो सोशल मीडियावर अपलोड करून नासा संस्थेतील
Jet Propulsion Lab California ,Atlas V Rocket ,Mars Rover ह्या पैकी कुठलेही बॅकग्राउंड निवडून त्यावर आपला फोटो स्टिक करून पाठवता येईल अर्थात त्या साठीही नासा संस्थेची रीतसर परवानगी घेणे आवश्यक आहे
Send Your Names To Mars, Again !
ह्या आधी नासा संस्थेने हौशी इच्छुक नागरिकांना मंगळ ग्रहावर पाठविण्यासाठी त्यांची नावे द्यायची संधी दिली होती त्याला जगभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि तब्बल 10.9 millionलोकांनी आपली नावे पाठवली ती सर्व नावे मायक्रो chip वर कोरून सर्पाकृती पातळ अल्युमिनियम पट्टीवर चिटकवून यानासोबत पाठवण्यात येणार आहे आता पुन्हा नासा संस्थेने Perseverance Mars Rover launching निमित्ताने इच्छुक लोकांना त्यांची नावे  मंगळावर पाठविण्यासाठी देण्याची संधी जाहीर केली असून आगामी अंतराळ मोहिमेदरम्यान ती मंगळ ग्रहावर पाठविण्यात येतील
कोरोनाच्या ह्या जीवघेण्या संकटकाळातील Perseverance Mars Rover च्या launching ची आतुरतेने वाट  पाहणारे अमेरिकन नागरिक ह्या सर्व मोहिमांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत
 ह्या Perseverance Mars Rover च्या launching चे लाईव्ह प्रक्षेपण नासा TV वरून करण्यात येणार आहे आणि ह्या प्रक्षेपण कार्यक्रमात अमेरिकेची Grammy Award Winner गायिका आणी गीतलेखिका Gregory Porter "America The Beautiful "हे गीत सादर करून आपल्या भावना व्यक्त करणार आहे