नासाच्या अंतराळ मोहीम 64चे अंतराळवीर Kate Rubins रशियन अंतराळवीर Sergey Rhyzhikov आणि Sergey Sverchkov सोयूझ यानापुढे निघण्याच्या तयारीत -फोटो -नासा संस्था
नासा संस्था -14 Oct.
नासाच्या अंतराळ मोहीम 64 चे अंतराळवीर Kate Rubins रशियन अंतराळवीर Sergey Rhyzhikov आणि Sergey Sverchkov अंतराळस्थानकात सुखरूप पोहोचले आहेत त्यांचे सोयूझ MS-17 हे अंतराळयान दुपारी 1.45a.m.ला ( 10.45 a.m. लोकल वेळ ) काझाकस्थानातील बैकोनूर कॉस्मोड्रोम वरून अंतराळात झेपावले आणि तीन तासांच्या अंतराळ प्रवासानंतर स्थानकाजवळ पोहोचले यानाने अंतराळात दोन फेऱ्या मारल्या त्या नंतर स्थानक आणि यानातील अंतर कमी झाल्यावर यान स्थानकाशी जोडल्या गेले स्थानक आणि सोयूझ यांच्यातील हॅचिंग आणि डॉकिंग प्रक्रिया पूर्ण झाल्यावर स्थानकाचे दार उघडल्या गेले आणि तीनही अंतराळ वीरांनी स्थानकात प्रवेश केला
ह्या तीनही अंतराळवीरांनी उड्डाणाआधी रशियातील अंतराळ संस्थेतील(ROSCOSMOS) Traditional प्रक्रिया पूर्ण केल्या हे तीनही अंतराळवीर उड्डाणपूर्व ट्रेनिंग दरम्यान बैकोनूर येथील Cosmonaut Crew Hotel मध्ये वास्तव्यास होते निघण्यापूर्वी तेथील परंपरेनुसार ह्या अंतराळवीरांनी Cosmonaut Hotel च्या दारावर स्वत:ची सही केली त्या नंतर त्यांचे उड्डाणपूर्व चेकअप करण्यात आले ह्या अंतराळवीरांना त्यांचा स्पेससूट घालून स्पेससूटचीही तपासणी करण्यात आली स्पेससूटमध्ये Air leak होत नाही ना ? Air pressure व्यवस्थित आहे कि नाही हे व्यवस्थित check करण्यात आले सर्व चेकअप पूर्ण झाल्यानंतर अंतराळवीरांना निरोप देण्यात आला एरव्ही ह्या अंतराळवीरांना पाहण्यासाठी त्यांना निरोप देण्यासाठी त्यांचे नातेवाईक मित्र व नागरिकांची गर्दी असते परंतु कोरोनाच्या लॉक डाऊन मुळे काही मोजकेच आमंत्रित व कर्मचारी तेथे उपस्थित होते सर्वानी ह्या तिन्ही अंतराळवीरांना शुभेच्छा दिल्या तेव्हा अंतराळवीरांनी त्यांचा तिथला ट्रेनिंगचा काळ खूप छान गेल्याचे सांगितले
उड्डाण स्थळी शेवटच्या क्षणी ROSCOSMOS संस्थेच्या Space Stationच्या Program Managers नी निवडक आमंत्रित आणि मान्यवरांच्या उपस्थितीत ह्या तिन्ही अंतराळवीरांचे ते इथपर्यंत पोहोचल्याबद्दल अभिनंदन केले आणि Kate Rubinsचा वाढदिवस असल्याने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि शेवटी संस्थेतर्फे तिघांचे आभार मानत ह्या अंतराळ विरांना निरोप देण्यात आला आणि प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या सोयूझ MS -17 अंतराळवीरांसह अंतराळात झेपावताना -फोटो -नासा संस्था
Soyuz अंतराळ यानाने अंतराळात यशस्वी झेप घेतल्यानंतर सर्वांनी जल्लोष करत एकमेकांचे अभिनंदन केले यानाची हॅचिंग प्रक्रिया पूर्ण होताच 7.07a.m.ला अंतराळवीर स्थानकात दाखल झाले प्रथम अंतराळवीर Sergey Sverchkov ह्यांनी स्थानकात प्रवेश केला नंतर Kate Rubins आणि शेवटी Sergey Rhyzhikov ह्यांनी स्थानकात प्रवेश केला स्थानकात सध्या राहात असलेल्या Chris Cassidy आणि सहकारी अंतराळवीरांनी स्थानकात ह्या तिघांचे स्वागत केले Kate स्थानकात प्रवेशताच तिनही अंतराळवीरांनी तिला तिच्या वाढदिवसानिमित्य शुभेच्छा दिल्या उड्डाणापूर्वीच्या अंतिम मुलाखतीत Kate ला सोशल मीडियावरून तिचा हेअरकट आवडल्याचे सांगितले होते व ती जाण्याआधी इथेच हेअरकट करणार का ? असे विचारण्यात आले होते तेव्हा तिने हेअरकट करणार नसल्याचे सांगितले होते आणि विशेष म्हणजे रशीयन स्टाईलने दोन वेण्या घातलेली Kate खूप सुंदर आणि आनंदी दिसत होती
Kate Rubins रशियन अंतराळवीर Sergey Rhyzhikov आणि Sergey Sverchkov स्थानकातून संवाद साधताना फोटो -नासा संस्था
स्थानकात पोहोचल्यानंतर ह्या सर्व सहाही अंतराळवीरांशी पृथ्वीवरील बैकोनुर येथील ROSCOSMOS संस्थेतील प्रमुखांनी लाईव्ह संवाद साधून त्यांना प्रवास कसा झाला काही त्रास झाला का हे विचारले तेव्हा अंतराळवीरांनी प्रवास निर्विघ्न पार पडल्याचे सांगितले तेव्हा ह्या अंतराळवीरांचे त्यांनी अभिनंदन केले आणि तुम्ही आनंदी आणि फ्रेश दिसत असल्याचे सांगितले शिवाय launching Wonderful! docking Wonderful! अशा शब्दात त्यांनी अंतराळवीरांचे विशेषतः अंतराळवीर आणि कमांडर Chris Cassidy चे विशेष कौतुक करताना त्यांनी खूप कुशलतेने हि प्रक्रिया पार पाडल्याचे त्यांनी सांगितले
आता 20 आक्टोबरला Command Change Ceremony पार पडेल आणि 21 तारखेला अंतराळवीर Chris Cassidy Anatoly Ivanishin आणि Ivan Vagner पृथ्वीवर परततील आणि नवीन तिन अंतराळवीर स्थानकात राहायला जातील तोवर हे तिन्ही अंतराळवीर स्थानकात राहून तिथे सुरु असलेल्या सायंटिफिक प्रयोगात सहभागी होतील
No comments:
Post a Comment