नासाची अंतराळवीर Megan,Shane Kimbrough जपानचे अंतराळवीर Hoshide आणि Thomas Pesquet फोटो -नासा संस्था
नासा संस्थेच्या Florida स्पेस सेंटर येथील उड्डाण स्थळावरून Falcon रॉकेटच्या साहाय्याने Space X Crew -2 अंतराळयान अंतराळ स्थानकात जाण्यासाठी अवकाशात झेपावेल ह्या स्पेस X अंतराळ यानातून चार अंतराळवीर अंतराळ प्रवास करणार असून नुकतेच Space X अंतराळ यानाचे ऐतिहासिक उड्डाण यशस्वी करून पृथ्वीवर परतलेल्या अंतराळवीर Bob Behnken ह्यांची पत्नी Megan ह्यांची ह्या अंतराळ यानाची Pilot म्हणून निवड करण्यात आली आहे तर अंतराळवीर Shane Kimbrough हे मिशनचे कमांडरपद सांभाळतील ह्या दोघांसोबत अंतराळवीर Akihiko Hoshide(JAXA)आणी अंतराळवीर Tomas Pesquet (ESA ) हेही ह्या अंतराळ यानातून प्रवास करणार आहेत हे चारही अंतराळवीर स्थानकात सहा महिने वास्तव्य करून तिथल्या संशोधनात सहभागी होणार आहेत
Megan MC Arthur ह्यांची हि दुसरी अंतराळवारी आहे 2009 सालच्या अंतराळ मोहीम STS-125 अंतर्गत त्यांनी अंतराळ स्थानकात बारा दिवस एकवीस तास व्यतीत केले आणि रोबोटिक आर्मच्या साहाय्याने केलेल्या मोहिमेतील कामात सहभाग नोंदवला ह्या मिशनमधील पायलटपदाच्या नियुक्तीमुळे अमेरिकन निर्मित अमेरिकन अंतराळ यानाच्या ऐतिहासिक उड्डाणाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणारे पहिले अंतराळवीर दाम्पत्य म्हणून Bob Behnken आणी Megan ह्यांची नोंद होईल
Thomas Pesquet हे दुसऱ्यांदा स्थानकात राहायला जाणार आहेत ते ह्या आधीच्या अंतराळ मोहीम 50-51अंतर्गत अंतराळ स्थानकात राहायला गेले होते आणि त्यांनी 196 दिवस स्थानकात राहून तेथील संशोधनात सहभाग नोंदवला होता
अंतराळवीर Hoshide ह्यांची हि तिसरी अंतराळवारी असून त्यांनी ह्या आधी स्थानकात 124 दिवस वास्तव्य केले आहे 2008सालच्या मोहीम STS-124 अंतर्गत व 2012सालच्या मोहीम 32-33 अंतर्गत ते स्थानकात गेले होते सध्या ह्या Space X Crew -2 मोहिमेतील अंतराळयान आणि rocket ची उड्डाणपूर्व चाचपणी करण्यात येत असून अंतराळवीरांचेही उड्डाणपूर्व ट्रेनिंग सुरु आहे
No comments:
Post a Comment