Crew 1 Dragon चे अंतराळवीर Shannon Walker ,Victor Glover ,Michel Hopkins आणि जपानचे अंतराळवीर Soichi Noguchi पत्रकारांशी लाईव्ह संवाद साधताना -फोटो -नासा संस्था
नासा संस्था
नासा आणी Space X Crew Dragon च्या यशानंतर आता तिसऱ्यांदा Space X Dragon अंतराळ स्थानकात जाणार आहे 14 नोव्हेंबरला दुसऱ्यांदा Space X Crew Dragonअंतराळवीरांसहित अवकाश भरारी मारणार आहे आणि ह्या वेळेस मोहीम 64 चे चार अंतराळवीर Michael Hopkins,Victor Glover, Shannon Walker आणी जपानचे अंतराळवीर Soichi Noguchi स्थानकात राहायला जाणार आहेत मागच्या महिन्यात ह्या अंतराळवीरांनी अमेरिकेतील आघाडीच्या पत्रकारांशी आणि सोशल मीडिया वरून आलेल्या प्रश्नांना लाईव्ह संवाद साधून ह्या मोहिमेची माहिती दिली
प्रश्न - Michael ह्या Space X crew mission बद्दल,तुमच्या टिम बद्दल आणी launching ची तारीख बदलली आहे त्या बद्दल सांग तुम्ही सर्वच जण ह्या मोहिमेबद्दल काय सांगाल ? तुमचा अनुभव कसा होता
Mike - कोरोनाच्या ह्या कठीण काळात Space X Crew Dragon च launching करण खरोखरच challenging होत नासा संस्था आणी Space X ह्या दोघांच्या सहकार्याने ह्या कठीण काळातही आमच ट्रेनिंग व्यवस्थित पार पडल अर्थात त्यासाठीचे कठोर नियम आम्ही पाळले आम्ही प्रथम त्यांचे आभारी आहोत कारण त्यांनी आम्हाला हि संधी दिली नासाच्या अंतराळ विश्वातील नव्या अंतराळ मोहिमेचा प्रारंभ करण्याऱ्या युगात आम्ही सहभागी झालो आहोत हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे अमेरिकेच्या स्वनिर्मित यानातून अमेरिकेतूनच अंतराळात उड्डाण करण आमच्या साठी भाग्यकारक आहे ह्या मोहिमेबद्दल म्हणाल तर आम्ही Space X Crew Dragon मधून अंतराळ प्रवास करण्यासाठी उत्सुक आहोत exited आहोत आमच ट्रेनिंगही पूर्ण झालय ह्या आधीच्या Space X Dragon अंतराळ यानाला Doug आणि Bob ह्यांनी Endeavor हे नाव दिले होते आणि ते उड्डाणाच्या अखेरच्या क्षणापर्यंत गुपित ठेवले आणि अंतराळ प्रवासादरम्यान जाहीर केले पण आम्ही जास्ती उत्सुकता न ताणता नाव जाहीर करतोय आम्ही आमच्या Space X Dragon अंतराळ यानाला Resilience हे नाव दिलय
ह्या नावाबद्दल सांगायच तर सध्याचा काळ जागतिक महामारीचा आहे सार जग कोरोना मुळे त्रस्त झालय आणी ह्या बाबतीत कोणीही आक्षेप घेणार नाही कोरोनावर अजूनही प्रभावी औषध सापडल नाही सगळ्याच देशातील शास्त्रज्ञ औषध शोधण्यासाठी अहोरात्र मेहनत करत आहेत आणि लवकरच कोरोना प्रतिबंधक लस शोधण्यात त्यांना यश मिळेल अशा कठीण काळात ह्या देशाचे नेते,नागरिक, डॉक्टर्स,नर्सेस ह्यांच्या सोबतच नासा फॅमिली आणी आपल्या सर्वांचीच फॅमिली कोरोनाशी अत्यंत धैर्याने सामना करतेय म्हणूनच आम्ही ह्या कठीण काळातील सर्व कोरोना वॉरियर्सना हे नाव समर्पित करतोय तुम्ही पाहाल आमच्या Space X Dragon वर जो Logo आहे त्या वर कुठल्याही देशाच्या झेंड्याचे चित्र नाही कारण हि समस्या जागतिक आहे हा लोगो पाहून अनेकांना प्रेरणा मिळेल धैर्य येईल आणि भविष्यात नव्या पिढीला ह्या काळातील अंतराळ मोहिमेची आणि कोरोनाचीही माहिती मिळेल ह्या कठीण काळातील ट्रेनिंग दरम्यान आम्ही काय achieve केलय ह्याला मर्यादा नव्हती ह्या मोहिमे बद्दल सांगायच तर ह्या कोरोनाच्या महामारीच्या अत्यंत टेन्शनच्या काळातील अभूतपूर्व यशस्वी मोहीम असच म्हणाव लागेल कारण 2020 हे वर्ष साऱ्या जगासाठी challenging वर्ष आहे आणि ह्या कठीण काळातील हि अभूतपूर्व यशस्वी मोहीम आहे
ह्या Space X Flight बद्दल सांग पुर्वीच्या तुलनेत सोयुझ आणी ह्या यानात काय फरक आहे
ह्या Space X Dragon बद्दल सांगायच तर ती नेहमीची regular flight नाही त्या मुळे ह्या नव्या अमेरिकन निर्मित यानाच्या अंतराळ मोहिमेतील प्रवासा दरम्यान अंतराळातील हवामान आणि हवेच्या Pressure चा अभ्यास करण आवश्यक होत आधीच्या flight चा अनुभव होताच आम्ही गेल्या सहा महिन्यांपासून ह्या मोहिमेसाठी ट्रेनिंग घेतोय उड्डाणपूर्व test घेतल्या जात आहेत आणि त्यात काही अडचणी आल्यास त्यावर उपाय शोधला जातोय आवश्यक सूचना दिल्या जात आहेत शेवटी नैसर्गिक Environment Control महत्वाचा आहे शिवाय मी Flight engineer म्हणून Pilot पदाची जवाबदारी माझ्यावर सोपवण्यात आलीय आणि कमांडरपदही त्या मुळे Launch पासून re entry पर्यंतची सर्व जबाबदारी माझ्यावर आहे सोबत Victor ही असेल आणि Shannon आणि Noguchi mission Specialists असतील Dynamic Launching आणि Re-entry च्या वेळेस हे दोघे आम्हाला मदत करतील ह्या वेळेस आम्ही चॊघे जाणार आहोत आणि स्थानकात जास्त दिवस वास्तव्य करणार आहोत dragon ला काही नवे हार्डवेअर बसविण्यात आले आहेत आधीच्या तुलनेत स्थानक आणि यानाच्या hatching आणि dockingची प्रक्रिया सुलभ झालीय Doug आणी Bob ह्यांच्या वेळेसचा अनुभव नवा होता आता आम्हाला त्यांच्या अनुभवाचा फायदा मिळेल त्या अनुभवाची आम्ही पुन्हा पडताळणी करणार आहोत
तुम्ही चौघे वेगवेगळ्या भागातून ,वातावरणातून एकत्रित आलात तेव्हा तुमचा ट्रेनिंग दरम्यानचा अनुभव कसा होता Glover पहिल्यांदाच अंतराळ प्रवास करणार आहे तुमच्या तिघात तो नवा आहे तेव्हा ट्रेनिंग दरम्यान काही अडचण आली का ?
Mike - खूप छान ! कोरोनाच्या Lock Down काळात ह्या ट्रेनिंग दरम्यान आम्ही चौघे एकत्र आलो आणी आमच खूप छान ट्युनिंग जमल आमची टीम छान आहे ह्या लॉक डाउन दरम्यान चोवीस तास आम्ही एकत्र घालवले त्या मुळे आमच बॉण्डिंग घट्ट झाल Glover अननुभवी असला तरीही तो नेव्हीत होता तिथला त्याचा अनुभव आम्हाला काही ठिकाणी उपयोगी पडला तर Shannon आणि Noguchi ह्या दोघांचा पूर्वानुभव आम्हाला कामी आला जेव्हा जेवणासाठी आम्ही टेबलवर एकत्र जमायचो तेव्हा चौघांकडूनही एकमेकाला काहीतरी नव शिकायला मिळायच आम्ही चर्चा करायचो Glover नवा असला तरी तो आमच्यात छान मिक्स झाला
Shannon -मी दुसऱ्यांदा स्थानकात रहायला जाणार आहे ह्या सहा महिन्यांचा ट्रेनिंगचा काळ अत्यंत धावपळीचा आणी तणावपूर्ण होता पण आम्ही आता स्थानकात जाण्यासाठी उत्सुक आहोत Exited आहोत मला ट्रेनिंग मध्ये ह्या आधीचा स्थानकातील वास्तव्याचा अनुभव ऊपयोगी पडला तसेच Bob आणी Doug कडुनही त्यांच्या अंतराळ प्रवासाची उपयुक्त माहिती मिळाली आमची टिम छान आहे
Noguchi- आमची टिम,टिमवर्क diversity आणी यानाच नाव सारच अभुतपुर्व आहे मी तिसऱ्यांदा स्थानकात जाण्यासाठी ऊत्सुक आहे आमच्या टिममधील सर्वांनीच ह्या मोहिमेसाठी अथक मेहनत केलीय सगळ्यांनीच काही ना काही add केलय त्यामुळे आमची टिम ह्या नावासाठी योग्य आहे सगळेच Wonderful आहेत गेल्या विस वर्षांपासून अंतराळवीर अंतराळ स्थानकात रहायला जात आहेत तीथे नवनवीन संशोधन करून सुरक्षित परतत आहेत मानवी आरोग्यासाठी, पृथ्वी संरक्षणासाठी, ऊद्योगवाढीसाठी आणी भविष्य कालीन दुरवरच्या अंतराळ मोहिमेतील ग्रहनीवासासाठी ऊपयुक्त संशोधनात्मक प्रयोग करत आहेत
Glover- आम्ही त्याच काळात स्थानकात रहायला जाणार आहोत हे आमच्या साठी अभिमानास्पद आहे आम्ही लकी आहोत Mike न सांगितल्या प्रमाणे आमची टिम खूप छान आहे टिमवर्क मुळे मिळालेल यश असामान्य आणी अतुलनीय आहे हे सर्व अनुभवी आहेत मी प्रथमच स्थानकात रहायला जातोय पण ह्या सर्वांनी मला सामावून घेतल मी नवखा आहे अस जाणवु दिल नाही मला ह्या सर्वांच्या अनुभवाचा फायदाच झाला
तुम्ही चौघे स्थानकात एकत्रित जाताय प्रवासात अडचण होणार नाही का ?शिवाय अंतराळ स्थानकात आता तुम्ही सातजण एकत्र राहणार आहात तेव्हा जागा अपुरी पडेल का ?
Shannon -. Space X Dragon स्पेसीअस असल्याने भरपूर जागा आहे उलट सोयूझ यानात तीन अंतराळवीर प्रवास करतात तेव्हा खूप कमी जागेत अवघडून बसावे लागते शिवाय आता स्थानकातही आम्ही सातजण एकत्र राहाणार असलो तरीही तिथेही भरपूर जागा आहे तिथल्या वेगवेगळ्या भागात आम्ही राहणार आहोत रशियन सेगमेंट अमेरिकन सेगमेंट मध्ये शिवाय सर्वजण एकाच वेळेस एकत्र प्रयोग करणार नाही सर्वजण वेगवेगळ्या वेळेस प्रयोग करतील काही जण स्थानकातील इतर कामे करतील आमच्या वेळा आणि कामे वाटलेली असतात त्या मुळे अडचण होत नाही
तुम्ही स्थानकात कोणते सायंटिफिक प्रयोग करणार आहात?
Glover- मी Food technology वर संशोधन करणार आहे मी फुडी आहे मला वेगवेगळ्या भाज्या,फळे खायला खूप आवडतात त्यामुळे मी त्यावरच जास्त संशोधन करणार आहे अंतराळवीरांच्या आगामी दुरवरच्या अंतराळ मोहिमेत निरोगी आणी healthy आरोग्यासाठी ताजी भाजी आणि फळे आवश्यक आहेत त्यामुळे फळे आणी भाज्यामधील nutrients,omega fatty acids ह्यावर संशोधन करून त्यातील nutrients amount वाढविण्यासाठी संशोधन करणार आहे शीवाय biotechnology वरही संशोधन करणार आहे
Soichi - मी पण Biotechnology gene technology वर संशोधन करणार आहे शीवाय ह्या वेळेस मी Microsoft departmentमधल्या Kibo airlock वरही संशोधन करणार आहे कारण आजवर कोणीही त्यावर संशोधन केले नाही आणी ते अत्यंत ऊपयुक्त आहे शीवाय स्थानकात रोजचा दिवस नवा असतो,नवी संधी नवे आव्हान घेऊन येतो त्याचा ऊपयोग नव्या संशोधनासाठी करणार आहे
Shannon - मी मागच्या वेळेस जे मिस केल त्याचा अनुभव आता घेणार आहे अत्यंत कठीण परिस्थितीत आम्हाला Hard work करून हि संधी मिळाली त्या मुळे ह्या अमुल्य संधीचा ऊपयोग करून नवीन संशोधन करणार आहे
Soichi तुमच्या Space Suite आणी Helmet बद्दल सांगा त्यांची डिझाईन नवीन आहे ना?
नवीन डिझाईन सुटेबल आहे ,मला काळा हेलमेट आवडतो पण स्पेस X टिमने बनविलेला पांढऱ्या रंगाचा हेलमेटही छान आहे आधीचा स्पेससुट पण चांगला होता आणी आताचा Fantastic डिझाईन !
शेवटी सर्वानीच सध्या उड्डाणपूर्व ट्रेनिंग दरम्यान त्यांची टीम एन्जॉय करीत असून लवकरच स्थानकात जाऊन संशोधन यशस्वी करून सुरक्षितपणे पृथ्वीवर आणि त्यांच्या फॅमिलीत परतणार असल्याचे सांगितले
No comments:
Post a Comment