सौरमालेबाहेर सापडलेला ब्रह्मांडातील W.D1856 b ग्रह मंद प्रकाशित पांढऱ्या बटू ताऱ्याभोवती भ्रमण करताना-फोटो -नासा संस्था
नासा संस्था -15 सप्टेम्बर
नासा संस्थेतील आंतरराष्ट्रीय खगोल शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना सध्या वापरात नसलेल्या Spitzer Space Telescope आणी TESS (Transiting Exoplanet survey Satellite ) ह्या द्वारे मिळालेल्या छायाचित्रात आपल्या सूर्यमालेबाहेर अंतराळात एक पांढरा तेजस्वी सूर्यासारखा प्रकाशमान तारा आणि त्या भोवती भ्रमण करणारा ग्रह सापडला आहे
हा नवा संशोधित ग्रह आपल्या पृथ्वीपेक्षा चाळीसपट मोठा आहे आणि ज्या पांढऱ्या प्रकाशित ताराभोवती तो फिरतोय त्याच्या पेक्षा सातपट मोठा आहे तो आपल्या सौरमालेतील गुरु ग्रहाच्या आकाराचा असून तो अत्यंत वेगाने भ्रमण करत आहे त्याचा भ्रमणवेग आपल्या सौरमालेतील बुध ग्रहाच्या साठपट जास्त असून तो 34 तासात एक फेरी पूर्ण करत आहे शास्त्रज्ञांनी ह्या ग्रहाला W.D 1856 b असे नाव दिले आहे
Wisconsin Madison University चे असिस्टंट प्रोफेसर Andrew Vanderburg ह्यांच्या मते जेव्हा एखादा सूर्यासारखा स्वयंप्रकाशित तारा त्याच्यातील पॉवर संपत आली की हळूहळू नष्ट होऊ लागतो तेव्हा नष्ट होताना त्याच्यातील प्रचंड उष्णतेमुळे तो लालसर होतो त्याचा आकार त्याच्या मूळ आकारापेक्षा शंभरपट किंवा हजारपटीने वाढतो आणि तो फुगतो ह्या प्रक्रियेदरम्यान त्याच्या वरच्या भागातुन गॅस बाहेर पडतो त्या मुळे हा तारा हळू हळू थंड होताना पांढऱ्या रंगात परावर्तित होतो आणि त्याचा आकारही लहान होतो
हा तारा जेव्हा नष्ट होतो तेव्हा त्याच्यातून बाहेर पडणाऱ्या प्रचंड उष्णता आणि वायू मुळे त्याच्या आजूबाजूच्या कक्षेतील तारे व तरंगत्या वस्तू नष्ट होतात ह्या ताऱ्याच्या चुंबकीय कक्षेत आलेल्या आकाशगंगेच्या पट्ट्यांनाही तो गिळंकृत करतो त्यांची राख होते प्रचंड उल्कापात होतो अशा वेळेस त्याच्या भोवती फिरणाऱ्या ह्या ग्रहाला पाहून आम्ही आश्चर्यचकित झालो आहोत हा फिरता तारा नष्ट कसा झाला नाही ह्याच आम्हाला आश्चर्य वाटतय
कदाचित हा फिरणारा ग्रह ह्या बटु ताऱ्याच्या कक्षेत तारा निर्माण होण्याच्या प्रक्रियेनंतर शिरला असेल कदाचित ह्या ताऱ्याच्या कक्षेच्या पन्नास पट दूरवर अंतराळात तो भ्रमण करत असेल व फिरता फिरता ह्या ताऱ्याच्या कक्षेत ओढल्या गेला असेल त्या मुळेच तो नष्ठ झाला नसावा
TESS satellite ची क्षमता अफाट असून तो अंतराळातील मोठा भाग व्यापतो आणि आपल्या सौरमाले बाहेर ब्रम्हांडात फिरणारे तारे,ग्रह किंवा इतर वस्तुंना शोधून त्यांचे निरीक्षण आणि त्यांच्यात होणारे बदल टिपतो आणि त्यांचे फोटो पृथ्वीवर पाठवतो
हा प्रकाशमान पांढरा बटु तारा व त्या भोवती फिरणारा ग्रह उत्तरेकडील भागातील तारका समुहापासून 80 प्रकाशवर्षे दूर आढळला आहे तो 1100 मैल अंतरावर भ्रमण करत असून हा तारा थंड असून दहा बिलियन वर्षे जुना असावा असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे
आता शास्त्रज्ञ ह्या ताऱ्याभोवती फिरणाऱ्या ग्रहाचे सखोल संशोधन करणार असून ह्या पृथ्वीसारख्या दिसणाऱ्या ग्रहावर सजीव सृष्टी साठी आवश्यक असणारे पृथ्वीसारखे वातावरण आणि पाणी आहे का ह्याचा शोध घेण्याचा प्रयत्न ते करत आहेत
No comments:
Post a Comment