नासा संस्था -15 डिसेंबर
मागच्या आठवड्यात बुधवारी 9 तारखेला नासाच्या Florida येथील Kennedy Space Center मध्ये आठवी Space Council Meeting पार पडली ह्या मिटींगच्या वेळेस Vice President Mike Pence ह्यांनी 2024 मधल्या Artemis चांद्र मोहिमेतील सहभागी अंतराळवीरांची नावे जाहीर केली ह्या वेळेस बोलताना ते म्हणाले ,मी Artemis मोहिमेतील सहभागी अंतराळवीरांची नावे जाहीर करत आहे हे सर्व अंतराळवीर आपल्या देशाचे हिरो आपल्याला चंद्रावरच घेऊन जाणार नाहीत तर भविष्यातील Artemis पिढीचे प्रतिनिधित्व करणार आहेत ह्या Artemis मोहिमेत महिलेला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे ऐकून मला खूप आनंद झाला अमेरिकेतील अंतराळविश्वाचे भवितव्य उज्वल आहे ह्या टीममधील सहभागी अंतराळवीर वेगवेगळ्या भागातून आणि वेगवेगळ्या पेशातील अनुभव संपन्न तज्ञ आहेत 2024 मध्ये Artemis चंद्रावर पोहोचेल तेव्हा नासाची पहिली महिला चांद्रभूमीवर आपल्या पाऊलाचा ठसा उमटवेल आणि नव्या ऐतिहासिक युगाची सुरवात होईल
नासाचे अंतराळवीर 2024 मध्ये Artemis चांद्र मोहिमे अंतर्गत चंद्रावर जाणार आहेत आणि विशेष म्हणजे ह्या Artemis मोहिमेत अंतराळवीरांसोबत जाणाऱ्या महिला अंतराळवीराला चंद्रावर प्रथम पाऊलस्पर्श करण्याची संधी देण्यात येणार आहे तीन अंतराळवीरांमध्ये एका महिला अंतराळवीराचा सहभाग असेल आणि चंद्रावर पोहोचताच ती प्रथम चांद्रभूमीवर उतरेल नंतर उर्वरित अंतराळवीर चंद्रावर उतरतील
ह्या मोहिमेबद्दल मत व्यक्त करताना नासाचे Administrator Jim Bridenstine म्हणाले आम्ही ह्या मोहिमेला परवानगी दिल्याबद्दल आणि First Woman next Man ह्या अभूतपूर्व संकल्पनेला आणि महिलेचे कर्तृत्व सिद्ध करण्याच्या संधीला मान्यता दिल्याबद्दल Mike Pence ह्यांचे आभारी आहोत शिवाय ह्या मोहिमेतील सहभागी NASA Science,Aeronautic Research Technology Development आणि Human Exploration Goals ह्या सर्व सहभागी टीमचे आभारी आहोत आम्ही सर्वचजण ह्या Artemis मोहिमेची उत्सुकतेने वाट पाहात आहोत कारण ह्यात पहिली महिला चंद्रावर उतरणार आहे
ह्या वेळेस Chief Astronaut Pat Forrester ह्यांनी देखील आपले मत व्यक्त केले आम्ही सर्व अंतराळवीर आम्हाला ह्या मोहिमेत सहभागी केल्याबद्दल तुमचे आभारी आहोत हि मोहीम यशस्वी करण्यासाठी चंद्रावर जाण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत Excited आहोत आम्ही त्या क्षणाची आतुरतेने वाट पाहात आहोत ह्या मोहिमेतील प्रथम महिला चांद्रभूमी स्पर्श संकल्पना नाविन्यपूर्ण आहे तिथे गेल्यावरच नाही तर तिथून पृथ्वीवर परतल्यानंतर तिथून आणलेल्या सॅम्पल्स वर संशोधन करण्याचे कामही महत्वपूर्ण आहे आता आमच्यावर हि मोहीम यशस्वी करण्याची मोठी जबाबदारी आहे आणि आम्ही ती निश्चितच यशस्वी करणार आहोत
ह्या मोहिमेतील सहभागी अंतराळवीरांमध्ये भारतीय वंशाच्या राजा चारी आणि सध्या अंतराळस्थानकात राहात असलेल्या Kate Rubins ,Victor Glover आणि नुकतेच स्थानकातून परतलेल्या पहिल्या ओन्ली महिला स्पेस वॉकर जेसिका मीर आणि क्रिस्टिना कोच ह्यांचा समावेश आहे
Joseph Acaba,Kayla Barron,Raja Chari ,Warren Hoburd Cristina Koch,Kjell Lindgren ,Nicole A.Mann,Anne McClain ,Jessica Meir Jasmin Moghbel,Kate Rubins ,Scott Tingle Jessica Watkins Stephanie Wilson ह्यांचा समावेश आहे
No comments:
Post a Comment