महिला अंतराळवीर Kate Rubins अंतराळवीर Sergey Sverchkov आणि अंतराळवीर Sergey Rhyzhikov लाईव्ह संवाद साधताना फोटो -नासा संस्था नासा संस्था - 26 सप्टेंबर
नासाच्या अंतराळ मोहीम 63-64 चे अंतराळवीर Kate Rubins रशियन अंतराळवीर Sergey Rhyzhikov आणी Sergey Sverchkov हे सध्या रशियात आहेत 14 ऑक्टोबरला ते अंतराळस्थानकात राहायला जाणार आहेत जाण्याआधी Star City Russia येथील संस्थेतून त्यांनी ह्या मोहिमेविषयी पत्रकार व सोशल मीडियावरून आलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली Lock Down मूळे सोशल मीडियावरून त्यांना प्रश्न विचारण्यात आले नासा T.V. आणि संस्थेच्या Website वरून हि मुलाखत प्रकाशित झाली
ROSCOSMOS T.V. वरून
Sergey Sverchkov तू प्रथमच अंतराळ स्थानकात राहण्यासाठी जाणार आहेस तु काय फील करतोस तुझ्या सोबतचे दोन्हीही अंतराळवीर अनुभवी आहेत Sergey Rhyzhikov आणि तुमच्यातील नात कमांडर आणि crew अस आहे ते अनुभवी आहेत त्या मुळे तुमच्यात काही कॉम्प्लिकेशनस निर्माण झाले का? ट्रेनिंग दरम्यान काही प्रॉब्लेम आला का? त्या बद्दल आणि तुझ्या बद्दल सांग आणि तुझ्या लग्नाचा वाढदिवस आहे ना तुला आमच्या कडून आणी Cosmic Court कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!💐
"Happy Anniversary ! "
Sergey - Thanks! मी प्रथमच अंतराळ स्थानकात जाणार आहे त्या मुळे अत्यंत उत्सुक आहे Excited आहे माझ्या भावना शब्दातीत आहेत! मी 26 वर्षाचा असताना माझ नासा संस्थेत Selection झाल गेली दहा वर्ष मी ट्रेनिंग घेतोय मागच्या वर्षीच्या ऑगस्ट मध्ये माझ स्थानकात जाण्यासाठी Selection झाल तेव्हा मी खूप आनंदित झालो मी प्रथमच अंतराळ प्रवास करणार आहे अंतराळ स्थानकात राहाणार आहे तिथल्या लॅब मध्ये उपयुक्त असे सायंटिफिक experiments करणार आहे माझ्या सोबत अंतराळवीर Sergey असल्याने मला त्यांच्या अनुभवांचा फायदाच झाला कोणताही प्रॉब्लेम आला नाही ते बुद्धिमान आहेत फ्रेंडली आहेत त्या मुळे आमच्यात मित्रत्वाचे नाते निर्माण झाले आहे
Sergey तुमच लाँचिंग 14 ऑक्टोबरला आहे त्या दिवशी Protection of the Russian Blessed Holiday आहे आणि तुम्ही त्याच दिवशी स्थानकात राहायला जाणार आहात ह्या बद्दल तुझ काय मत आहे ?
Sergey Rhyzhikov
माझ्यासाठी सगळेच दिवस सारखे आणि चांगले आहेत आम्ही ह्या कोरोनाच्या कठीण काळात लॉक डाउन चे नियम पाळून आमच ट्रेनिंग पूर्ण केलय आमची तयारीही व्यवस्थित सुरु आहे अशा वेळेस आम्हाला स्थानकात जायला मिळतय म्हणून आम्ही आनंदीआहोत
NASA T.V. वरून -Kate Rubins साठी
Kate ह्या वर्षी अंतराळ स्थानकातील मानवी वास्तव्याला वीस वर्षे पूर्ण झाली ह्या बाबतीत तुझा अनुभव कसा होता काय सांगशील तू आधीही तिथे वास्तव्य केलय आता दुसऱ्यांदा स्थानकात राहणार आहेस
Kate Rubins - ह्या वर्षी अंतराळ स्थानकातील मानवी वास्तव्याला विस वर्षे पूर्ण होत असताना आम्ही स्थानकात असु हे आमच्या साठी भाग्यकारक आणी आनंददायी आहे आम्ही स्थानकातील वास्तव्यातच विसावा वर्धापन दिन साजरा करणार आहोत ते ऐतिहासिक क्षण अनुभवणार आहोत आमच्या साठी हि अभिमानास्पद बाब आहे
मी दुसऱ्यांदा स्थानकात रहायला जाणार आहे खरोखरच आम्ही जेव्हा सोयुझ यानातुन अंतराळ स्थानकात प्रवेश करतो तेव्हा स्थानकाची अत्याधुनिक रचना आणी भव्यता पाहून क्षणभर थक्क होतो आणी आपसूकच Amazing! अद्भुत ! अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया आमच्या तोंडुन बाहेर पडते अंतराळ स्थानक मोठे आहे अद्ययावत सोयीसुविधांनी परिपूर्ण आहे तीथली lab अत्याधुनिक यंत्रणेने आणी सुविधेने सुसज्ज आहे सायंटिफिक संशोधन करण्यासाठी तीथे भरपूर जागा आहे तिथे रहाण्यासाठी व्यायामासाठीही भरपूर जागा आहे एकावेळी सहा अंतराळवीरांना तीथे राहून संशोधन करता येत तिथे व्यायामाची साधन आहेत आणी आता तर स्थानक अधिकाधिक अतद्ययावत तंत्रज्ञानानी ऊपयुक्त बनल आहे स्थानक बनवणाऱ्या तंत्रज्ञांंनी,ईंजीनीअर्सनी अंतराळवीरांसाठी खूप छान काम केलय त्यांची कुशलता असामान्य बुध्दीमत्ता कौतुकास्पद आहे अभिमानास्पद आहे
Moscow Studio
Sergey Sverchkov . तुझ्या साठी प्रश्न आहे एका आठ वर्षाच्या मुलाने विचारलाय
Sergey तुम्ही आमच्या शहरात आमच्या शाळेत आला होतात तेव्हा Drawing competition होती आपण दोघांनी मीळुन चित्र काढल होत ते चीत्र मी माझ्या घरी फ्रेम करून लावलय मी तुम्हाला fallow करतो आता तुम्ही स्थानकात रहायला जाणार आहात launching नंतर जाताना यानातुन तुम्ही आमच्या Naryanmar सिटीचा फोटो काढून मला पाठवाल का? मग मी तोही फोटो त्या फ्रेम जवळ लावेन
Sergey Sverchkov - हो! मलाही आठवतय खूप छान आठवण आहे ती! पण आमच्या launching च ठिकाण Naryanmar पासून खूप लांब असल्याने आम्हाला ते दिसणार नाही पण मी दुसरे काढलेले फोटो शेअर करेन तु माझ्या आठवणीत नेहमीच रहाशील प्रयत्न करत रहा आणी मी पृथ्वीवर परतल्यावर तुला नक्की भेटेन लहान मुलाच्या ह्या प्रश्नाने सारेच प्रभावीत झाले तीथे ऊपस्थीत असलेल्या अंतराळ मोहीम 63-64 च्या अंतराळवीरांनी हा प्रश्न विचारणाऱ्या मुलाचे कौतुक केले आता सद्या lock down मुळे शाळा बंद आहेत अशावेळेस मुले टि.वी. वर हा कार्यक्रम पाहतात,प्रश्न विचारतात हे कौतुकास्पद आहे आपल्या देशाच भवितव्य ऊज्वल असल्याच मत त्यांनी व टि.वी.वरील पत्रकारांनी व्यक्त केल
Sergey Sverchkov ,तुम्ही अंतराळस्थानकातुन पृथ्वीवर संपर्क कसे करता विषेशतः कठीण प्रसंगी ?
आम्ही स्थानकात जीथे रहाणार आहोत त्या रशियन सेगमेंट मधल्या संपर्क यंत्रणेने आम्ही पृथ्वीवरील संस्थेत संपर्क करतो Satellite,Internet आणी Russian Broadband वरून Roscosmos संस्था आणी घरच्यांशी आम्ही संवाद साधु शकतो पण समजा काही विपरीत परीस्थिती ऊद्भवल्यास आणी सर्व यंत्रणा ठप्प झाली तर अशी आपत्कालीन परीस्थिती कशी हाताळायची ह्याच प्रशिक्षण आम्हाला ट्रेनिंग दरम्यान दिल जात
Sergey Sverch.- तु अमेरीकन आणी रशियन Spacesuits try केलेस ह्या दोन्हीत कोणता फरक जाणवला? कुठला Spacesuit चांगला आणी आरामदायी वाटला?
हो! ट्रेनिंग दरम्यान मी अमेरिकन आणी रशियन स्पेससुट ट्राय केले खरच दोन्हीही आरामदायी व ऊपयुक्त आहेत चांगले आहेत त्यामुळे विषेश फरक जाणवला नाही दोन्ही स्पेससुट बनवणाऱ्या ईंजीनीयरच काम ऊत्कृष्ठ आहे त्यांनी अंतराळवीरांसाठी ईतका चांगला स्पेससुट बनवला आहे की त्यांच्या कल्पकतेच कौतुक वाटत!
तुम्हाला जर स्थानकात पेट न्यायला मिळाले तर कुठला प्राणी न्याल?
Sergey Sverch -माझ्या कडे पेट नाही त्यामुळे ह्याच ऊत्तर Kate सांगु शकेल कारण तीची हि दुसरी अंतराळवारी आहे
Kate Rubins -हो! माझ्या कडे पेट Dog आहेत Abelca आणी Stroka मी स्थानकातील वास्तव्यात त्यांना मिस करेन पण स्थानकात त्यांना नेऊ शकत नाही कारण ती जागा Dog साठी ऊपयुक्त नाही तीथे फक्त मानवच जाऊ आणि राहू शकतात
Kate तुझ रशियन ईंग्लिश छान आहे तुझे सोशल Accounts पाहून रशियन नागरिक प्रभावित झाले आहेत विषेशतः विद्यार्थी त्यांनी तुला प्रश्न विचारले आहेत
Kate तुझा हेअरकट छान आहे आता तुझे केस वाढले आहेत तीथे स्थानकात तुला केस कापताना त्रास होईल तर तु इथेच हेअर कट करून जाणार का? तुझी हेअरस्टाईल बदलणार का?
नाही! आता ईथे मी केस कट करणार नाही आणि माझा हेअरकट बदलणार नाही
Kate तु ह्या आधी ईबोला सारख्या रोगावर लस शोधली आहेस आता ह्ना वेळेस स्थानकात कोरोनावर लस शोधणार का?
नाही ! तसा विचार नाही कारण कोव्हिड हा भयंकर रोग आहे स्पेस स्टेशन मध्ये संशोधन करण घातक आहे सद्या सार जग कोरोना महामारीने त्रस्त आहे ईथे पृथ्वीवर भरपूर lab आहेत सर्व देशातील शास्त्रज्ञ लस शोधण्यासाठी अहोरात्र परीश्नम करत आहेत आणी लवकरच त्यांना यश मिळेल
तुम्हाला अंतराळ प्रवासादरम्यान किंवा स्थानकातील वास्तव्यादरम्यान Vaccine ची गरज पडणार आहे का?
Kate- नाही! आम्ही तिघेही एकदम फिट आहोत आम्ही आमच्या ट्रेनिंग दरम्यान lock down चे सर्व नियम पाळले आमच्या मशीन Sanitize करण sanitizer वापरण,मास्क वापरण आणी सोशल डिस्टंसिंग पाळण त्यामुळे आम्हाला Vaccineचीज गरज वाटत नाही आणी स्पेस स्टेशन तर एकदम चांगल आहे safe आहे तीथे अजूनतरी कोरोनाचा शिरकाव झालेला नाही
तुम्ही तिघेही ह्या मोहीमेत कोणते नवे प्रयोग करणार आहात?
Kate- मी Biologist आहे त्यामुळे Microbe आणी Cell वर संशोधन करणार आहे शिवाय Cold Atom वरही संशोधन करणार आहे अंतराळ स्थानकातील झीरो ग्रव्हिटीत हे Microbes कसे behave करतात त्यांच्यात काय बदल होतात ह्या वर मी संशोधन करणार आहे मी भरपूर नमुने गोळा केले आहेत शिवाय माझे आधी तीथे सुरू असलेले सायंटिफिक प्रयोगही करणार आहे
Sergey Sverch.- मी प्रथमच स्थानकातील lab मध्ये संशोधन करणार असल्याने excited आहे मी Stem Cell वर संशोधन करणार आहे आणी तिथले नमुने पृथ्वीवर आणणार आहे त्यांचे निष्कर्ष पृथ्वीवरच्या labमध्ये पहाण माझ्या साठी interesting असणार आहे
Sergey Rhyzhikov- आम्ही तीथे 56 सायंटिफिक प्रयोग करणार आहोत त्यातले काही नवे तर काही तीथे सद्या सुरू असलेले आहेत काही नवीन संशोधन आम्ही करणार आहोत काही आगामी भविष्य कालीन अंतराळ मोहिमेतील अंतराळवीरांना ऊपयुक्त असतील तर काही अत्याधुनिक तंत्रज्ञान पृथ्वीवरिल मानवी आरोग्यासाठी आणी ऊद्योगासाठी ऊपयुक्त असतील
Sergey Rhyzhikov -
तुम्ही अंतराळ प्रवासात कोणी परग्रहवासी पाहिलाय का? आणी समजा तुम्हाला तो भेटला तर तुम्ही त्याच्याशी कसे वागाल तो तुमचा किंवा तुम्ही त्याचा encounter कराल का?
अजून तरी असा परग्रहवासी कोणाला भेटला कींवा दिसला नाही अंतराळ प्रवासात फक्त पृथ्वीवरील अंतराळवीरच स्थानकात जातात आणी तिथे राहतात पण जर भविष्यात असा कोणी परग्रहवासी मानव भेटला तर आम्ही त्याच्याशी मैत्रीचा हात पुढे करू त्याने encounter करण्याआधीच
Kate अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या वेळेस तू स्थानकात असशील मग तू तिथून तुझ मत देणार का ?
हो ! मी स्थानकातून माझा मतदानाचा हक्क बजावणार व माझे मत देणार आहे
तुम्ही तिघेही स्थानकातून सोशल मीडियावर सक्रिय राहणार का ? आणी तुमच्या follower शी संपर्क साधणार का ?
Sergey Rhyzhicov - मी इथेच फारसा सोशल मीडियावर सक्रिय नसतो त्या मुळे मी तिथूनही सोशल मीडियावरून संपर्क साधणार नाही फक्त कुटुंबियांच्या संपर्कात राहीन आणि मिळालेल्या मोकळ्या वेळेत मी माझे आधीच्या मोहिमेतील सायंटिफिक प्रयोग करणार आहे आणि तिथे सुरु असलेल्या संशोधनात वेळ घालवीन
Sergey Sverch -मी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतो आता अंतराळ प्रवासात आणि स्थानकातील वास्तव्यात अंतराळातील आणि स्थानकातील नवनवीन फोटो आणि Short Stories माझ्या सोशल मीडिया account वरून शेअर करणार आहे
Kate -मीही सोशल मीडियावर सक्रिय असते माझ्या face book आणि twitter वरील account वर मी नेहमीच फोटो व videos शेअर करते आधीच्या अंतराळ मोहिमेत मी स्थानकातून माझ्या follower शी संपर्क साधला आताही साधेन
माझ्या followers ना विशेषतः विध्यार्थ्यांना अंतराळातील घडामोडींचे फोटो आणि videos पाहायला खूप आवडतात
-आता शेवटचा प्रश्न तुम्ही तुमच्या सोबत स्थानकात कोणत्या वस्तू किंवा सामान नेणार आहात ?
Sergey Rhyzhicov -मी फक्त गरजेचे सामान आणि सायंटिफिक प्रयोगासाठी लागणार सामान नेणार आहे
Kate Rubins -मी देखील गरजेचे सामान आणि सायंटिफिक प्रयोगाच आवश्यक सामान नेणार आहे शिवाय तिथल्या संशोधनातून मिळालेल्या मोकळ्या वेळेत मी जास्तीचे सायंटिफिक प्रयोग करणार आहे त्या साठी वेगळे सामान नेणार आहे
Sergey Sverch - मी प्रथमचअंतराळ प्रवास करणार आहे स्थानकात राहणार आहे त्या मुळे माझ्या कुटुंबीयांनी स्थानकात नेण्यासाठी छोटा अंतराळवीर बनवला आहे तो मी त्यांची आठवण म्हणून सोबत नेणार आहे शिवाय आवश्यक सामानही नेणार आहे
No comments:
Post a Comment