Wednesday 25 November 2020

अंतराळ स्थानकात उगवली मुळ्यांची पाने अंतराळवीर Soichi नीं केली देखभाल

Expedition 64 Flight Engineer Soichi Noguchi of JAXA

 जपानचे अंतराळवीर Soichi Noguchi अंतराळ स्थानकातील Columbus Lab Module मधल्या व्हेजी चेंबरमध्ये उगवलेली मुळ्यांची पाने दाखवताना 

नासा संस्था -24nov.

नासाच्या अंतराळ मोहीम 64 चे अंतराळवीर Michal Hopkins ,Shannon,Victor आणि जपानी अंतराळवीर Soichi Noguchi नुकतेच Space X Dragon मधून अंतराळ स्थानकात पोहोचले आणी आता त्यांनी तिथे सुरु असलेल्या संशोधनात सहभागी होऊन आपले कामही सुरु केले आहे ह्या अंतराळवीरांनी आपल्या चाहत्यांना सोशल मीडियावरून त्यांचे व्हिडिओही शेअर केले आहेत अंतराळवीर Soichi ह्यांनी अंतराळ स्थानकातील Columbus Lab Module मधल्या व्हेजी चेंबर मध्ये लावण्यात आलेल्या मुळ्याच्या रोपांची पाहणी केली आणि त्याची देखभाल केली 

अंतराळवीरांना स्थानकातील निवासादरम्यान आपल्या सारखे ताजे अन्न मिळत नाही त्यांना पृथ्वी वरून आलेल्या प्रिझर्व अन्नावर अवलंबुन राहावे लागते म्हणूनच स्थानकातील झिरो ग्रॅविटीतील लॅब मध्ये व्हेजी चेंबर तयार करण्यात आला आहे त्यात रोपांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले पृथ्वीसारखे वातावरण निर्माण करून त्यात व्हेजी प्रोजेक्ट राबविल्या जात आहे आणि अंतराळवीरांना त्यात यशही मिळाले आहे

व्हेजी चेम्बरमध्ये रंगीत लाइटचा वापर करून दिवस व रात्रीसारखा प्रकाश व अंधार निर्माण केल्या जातो शिवाय रोपवाढीसाठी आवश्यक असणारे कमीजास्त  तापमानही निर्माण केल्या जाते गेल्या अनेक वर्षांपासून अंतराळवीर ह्या व्हेजी चेंबरमध्ये वेगवेगळ्या भाज्या,सलाद आणी धान्य लागवड करीत आहेत स्थानकातील झिरो ग्रॅविटीतील कृत्रिम बागेत ह्या आधी लेट्युस,लाल कोबी ह्या सारख्या भाज्याही उगवल्या आणि अंतराळवीरांनी त्यांचा आस्वादही घेतला आहे विशेष म्हणजे ह्या आधी स्थानकात गहू देखील अंकुरले होते (ह्या संबधीत बातम्या ह्या आधी blog वर प्रकाशित)

सध्या ह्या व्हेजी चेंबरमध्ये मुळ्यांची रोपे लावण्यात आली आहेत मुळा आरोग्यासाठी उपयुक्त आहे त्यात भरपूर व्हिटॅमिन्स असतात आणि ह्या रोपांची वाढही लवकर होते म्हणून संशोधनासाठी आणी अंतराळवीरांना खाण्यासाठी मुळ्यांची निवड करण्यात आलीय स्थानकातील झिरो ग्रॅविटीत मुळ्याची वाढ कशी होते पृथ्वीवरील वातावरणात आणि स्थानकातील वातावरणातील होणारी मुळ्याची वाढ ह्यातील फरकाचे निरीक्षण नोंदवून त्यावर संशोधन करण्यात येत आहे मुळा आणी त्याची पाने अंतराळवीरांच्या आरोग्यासाठी लाभदायक आहेत आता काही पाने अंतराळवीर पृथ्वीवर सॅम्पल म्हणून आणतील तर काहींचा आस्वाद घेतील 

अंतराळवीरांना ताजे अन्न मिळावे म्हणून हा प्रोजेक्ट राबविल्या जात आहे  ह्याचा उपयोग आगामी दूरवरच्या अंतराळ मोहीमांतील अंतराळवीरांना होईल अंतराळवीर चंद्र आणि मंगळावर जेव्हा निवास करतील तेव्हा त्यांना पृथ्वीवरच्या प्रिझर्व व फ्रोझन फूडवर अवलंबून राहावे लागणार नाही ते स्वत:साठीच अन्न,भाजीपाला व फळे पिकवू शकतील

No comments:

Post a Comment