अंतराळवीर Bob Behnken आणी Doug Hurley स्थानकातील वास्तव्यादरम्यान -फोटो -नासा संस्था
नासा संस्था-25 जुलै
अंतराळवीर Bob Behnken आणी Doug Hurley अमेरिकन भुमीवरुन अमेरिकन मेड अंतराळयान Space X
Dragon Endeavour मधून अंतराळ स्थानकात रहायला गेले होते अकरा वर्षानंतर अमेरीकेची बंद पडलेली
स्वयंपुर्ण अंतराळ मोहीम Space X Dragon मुळे पुन्हा सुरु झाली ह्या ऐतिहासिक Space X Dragon च्या Flight test 2 अंतर्गत हे दोघे अंतराळस्थानकात गेले होते
हे दोनही अंतराळवीर 30 मेला Endeavour अंतराळ यानातुन पृथ्वीवरुन अंतराळात झेपावले आणी एकोणीस तासांनी 31 मेला अंतराळ स्थानकात पोहोचले होते ह्या अमेरिकन मेड अंतराळयानाची रचना अत्याधुनिक, सुटसुटीत आणी आरामदायी असल्याच त्यांनी सांगितले होते
आता अंतराळ स्थानकातील त्यांच वास्तव्य संपवुन एक ऑगस्टला शनिवारी 7.34p.m.ला हे दोघे पृथ्वीवर येण्यासाठी स्थानकाबाहेर पडतील त्या आधी अंतराळ स्थानकात त्यांचा Farewell ceremony व Departure preparations प्रक्रिया पार पडेल रविवारी दोन ऑगस्टला हे दोघे पृथ्वीवर परततील पृथ्वीच्या कक्षेत पोहोचल्यावर
त्यांचे अंतराळयान Endeavour Atlantic Ocean कींवा Gulf of Mexico Coast Florida येथील समुद्रात ऊतरेल (बुडी मारेल)
हे दोन्ही अंतराळवीर पृथ्वीवर सुखरूप पोहोचल्यावर अमेरीकेची हि दुसरी यशस्वी अंतराळ मोहीम ठरेल
ह्या अंतराळविरांचा स्थानकातील Farewell Ceremony, त्याच्या स्थानकातून बाहेर पडण्यासाठीची अंतराळ यान आणी स्थानकातील Departure प्रक्रिया आणी परतीच्या प्रवासाचे लाईव्ह प्रक्षेपण नासा T.V.वरून करण्यात येणार आहे
अमेरिकेत कोरोनाच्या महामारी मुळे Lock Down सुरू असल्यामुळे पत्रकारांना ह्या अंतराळवीरांंना परतल्यानंतर वार्तांकन करण्यासाठी प्रत्यक्ष ऊपस्थीत राहता येणार नाही आणी अंतराळविरांची मुलाखतही घेता येणार नाही परंतु सोशल मिडिया वरुन काही निवडक पत्रकारांना यांच्याशी लाईव्ह संवाद साधता येईल
No comments:
Post a Comment