Space X Crew Dragon-3चे नासा अंतराळवीर Raja Chari Tom Marshburn आणि E.SAचे अंतराळवीर Mathias Maurer -फोटो -नासा संस्था
नासा संस्था - 14 डिसेंबर
अमेरिकेचे अमेरिकन निर्मित Space X Crew Dragon आता तिसऱ्यांदा अंतराळात झेपावणार असून त्यातून अंतराळ प्रवास करणाऱ्या अंतराळवीरांची निवड निश्चित करण्यात आली आहेत अमेरिकेची नासा संस्था आणि युरोपियन E.SA संस्था ह्या दोघांनी मिळून Space X Crew Dragon -3 साठी तीन अंतराळवीरांची निवड केली आहे नुकतेच Space X Crew Dragon Resilience मधून चार अंतराळवीर स्थानकात सुखरूप पोहोचले आहेत ह्या आधीच्या Space X Crew Dragon च्या यशस्वी उड्डाणानंतर आता तिसऱ्यांदा Space X Crew Dragon अंतराळात झेपावणार आहे
सध्या निवड झालेल्या तीन अंतराळवीरांमध्ये भारतीय वंशाच्या राजा चारी ह्या अंतराळवीराचा समावेश आहे नुकतीच त्यांची 2024 च्या चांद्र मोहीम Artemis टीम मध्येही निवड झाली आहे 2021 मध्ये हे अंतराळवीर Space X Crew Dragon -3 मधून अंतराळ प्रवास करणार आहेत नासाचे अंतराळवीर राजा चारी,Tom Marshburn आणि E.SA चे अंतराळवीर Mathias Maurer हे तिघे अंतराळस्थानकात राहण्यासाठी जाणार आहेत ह्या मोहिमेत राजा चारी Crew Dragon च्या कमांडर पदाची तर Tom Marshburn Crew Dragonच्या Pilot पदाची जबाबदारी सांभाळतील Mathias Maurer हे मिशन specialist असतील चवथ्या अंतराळवीराची निवड अजून निश्चित झाली नसून नासा संस्था आणि त्यांचे इंटरनॅशनल पार्टनर लवकरच चवथ्या अंतराळवीराचे नाव निश्चित करतील
राजा चारी ह्यांची हि पहिलीच अंतराळवारी असून 2017 साली त्यांची नासा संस्थेत अंतराळवीर म्हणून निवड झाली Milwaukee येथे जन्मलेले राजा चारी नंतर Lowa येथे स्थायिक झाले नासा संस्थेत येण्याआधी ते U.S.Force मध्ये कार्यरत होते नंतर त्यांची नासा संस्थेत Test Pilot पदासाठी निवड झाली त्यांना त्यांच्या करिअर मधला आकाशात 2,500 तास विमान उड्डाणाचा अनुभव आहे
Marshburn हे North Carolina येथील रहिवासी आहेत आणि ते डॉक्टर आहेत 2004 मध्ये त्यांची नासा संस्थेत निवड झाली सुरवातीला ते नासाच्या Houston येथील Johnson Space Center मध्ये Flight Surgeon पदावर कार्यरत होते नंतर त्यांची निवड स्थानकातील अंतराळवीरांसाठीच्या Medical Operation प्रमुखपदी झाली त्यांची हि तिसरी अंतराळवारी आहे ह्या आधी त्यांनी 2009 आणि 2013 साली अंतराळस्थानकात वास्तव्य केले आहे आता दुसऱ्यांदा स्थानकात ते जास्त दिवस मुक्काम करणार आहेत
Mathias Maurer हे Sankt Wendel ह्या German State Of Saarland मधील रहिवासी आहेत Maurer हे देखील राजा चारी ह्यांच्या प्रमाणे प्रथमच अंतराळ प्रवास करणार आहेत अंतराळवीर म्हणून नासा संस्थेत निवड होण्याआधी त्यांनी इंजिनिअरींगच्या विविध शाखेत प्रावीण्य मिळवले असुन त्यांनी युनिव्हर्सिटी आणि E.SA संस्थेतील विविध शाखेत संशोधकपदी काम केलय 2016 मध्ये Under Sea Mission अंतर्गत त्यांनी समुद्राखाली 16 तास व्यतीत केले हि मोहीम NASA संस्थेच्या Extreme Environment mission operations Space Analog अंतर्गत होती
हे तिन्ही अंतराळवीर अंतराळस्थानकात सहा महिने राहून तेथील संशोधनात सहभागी होतील 2021च्या Spring मध्ये Space X Crew Dragon -3चे launching करण्यात येणार आहे सध्या अंतराळस्थानकात सात अंतराळवीर एकत्रित राहून तेथील संशोधनात सहभागी झाले आहे
No comments:
Post a Comment