नासाची अंतराळवीर Kate Rubins स्थानकातील व्हेजी चेंबर मध्ये उगवलेले मुळे दाखवताना -फोटो नासा संस्था
नासा संस्था - 4 डिसेंबर
नासाच्या अंतराळ मोहीम 64 ची Flight Engineer Kate Rubins हिने नुकतीच अंतराळ स्थानकातील व्हेजी चेंबरमध्ये उगवलेल्या मुळ्याच्या रोपांना आलेल्या पानांची कापणी केली चार आठवड्यांपूर्वी अंतराळवीरांनी स्थानकातील लॅबमध्ये ह्या रोपांची लागवड केली होती मुळा व त्याची पाने आरोग्यदायी आहेत त्यात भरपूर व्हिटॅमिन्स असतात आणि मुळ्याचे उत्पादन कमी दिवसात होत असल्याने मुळ्याची निवड स्थानकातील Habitat-2 प्रोजेक्ट साठी करण्यात आली
सध्या अंतराळस्थानकातील लॅब मध्ये पृथ्वी प्रमाणे कृत्रिम वातावरण निर्मिती करून बनविण्यात आलेल्या व्हेजी चेंबर मध्ये Habitat -02 ह्या प्रकल्पा अंतर्गत व्हेजी प्रोजेक्ट राबवण्यात येत आहे स्थानकातील झिरो ग्रॅविटीत भाजी,फळे,फुले आणि धान्य ह्यांची लागवड करून पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षणात होणारी वाढ आणि स्थानकातील गुरुत्वाकर्षण विरहित वातावरणात होणारी वाढ ह्यावर निरीक्षण नोंदवून त्यावर संशोधन करण्यात येत आहे त्या साठी स्थानकातील कृत्रिम बागेतील ह्या व्हेजी चेंबरमध्ये पृथ्वीसारखेच तापमान व वातावरण तयार करण्यात आले आहे शिवाय दिवस आणि रात्रीचा आभास निर्माण करून अंधार व उजेड निर्माण करण्यात आला आहे त्या साठी रंगीत लाईटचा वापर करण्यात आला आहे अंतराळस्थानकातील अंतराळवीर त्यांच्या संशोधनातून वेळ काढून ह्या रोपांची देखभाल करतात ह्या प्रोजेक्टचा उपयोग आगामी दूरवरच्या अंतराळ मोहीमांतील अंतराळवीरांना तेथील वास्तव्यादरम्यान स्वत:चे अन्न पिकवण्यासाठी होईल
गेल्या वीस वर्षांपासून अंतराळवीर अंतराळ स्थानकात राहून मानवी आरोग्यासाठी आवश्यक असे संशोधनात्मक प्रयोग करत आहेत त्यांना पृथ्वीवरून आलेले प्रिझर्व व फ्रोजन अन्न खावे लागते त्यासाठी त्यांना पृथ्वीवर अवलंबून राहावे लागते त्यामुळे स्थानकातील झिरो ग्रॅविटीत त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम नये त्यांना ताजे अन्न व भाजीपाला मिळावा म्हणून स्थानकातील अंतराळ वीरांनी हा व्हेजी प्रोजेक्ट सुरु केला आणि त्यात त्यांना यशही मिळाले आहे सर्वात आधी नासाच्या रेकॉर्डब्रेकर अंतराळवीर Peggy Whitson ह्यांनी अंतराळ स्थानकात कोबीची यशस्वी लागवड केली नंतर Scott Kelly,Andrew Margen,Jessica Meir हयांनी व इतर अनेक अंतराळवीरांनी हा व्हेजी प्रोजेक्ट यशस्वी करून स्थानकात उगवलेल्या भाजीचा आस्वाद घेतला मोहीम 61चे अंतराळवीर Andrew Margen आणि Jessica Meir ह्यांनी स्थानकात उगवलेल्या Mizzuna Mustard Green ह्या भाजीची देखभाल करून त्यांचा आस्वाद घेतला होता (वाचा ह्या संदर्भातील बातमी ह्याच ब्लॉगवर)
स्थानकातील Harmony Module मधल्या Work area मधील भिंतीवर चिटकवलेली पाने दाखवताना Kate Rubins फोटो -नासा संस्था
सद्या स्थानकात राहात असलेल्या अंतराळवीरांनी विशेषतः Kate Rubins आणि जपानचे अंतराळवीर Souchi Noguchi ह्यांनी ह्या मुळ्याच्या रोपाची काळजी घेतली नुकतीच ह्या दोघांनी ह्या रोपाला आलेल्या पानांची कापणी केली त्यातील काही पाने त्यांनी पृथ्वीवर नमुना म्हणून परत आणण्यासाठी ठेवली तर काही पानांचा त्यांच्या जेवणासोबत आस्वाद घेतला हि पाने त्यांनी स्थानकाच्या Harmony Module मधील त्यांच्या Work area मध्ये लटकावून त्याचे फोटो काढले आणि पृथ्वीवरील नासा संस्थेत पाठविले ह्या दोन अंतराळवीरांनी ह्या रोपांचे फोटो त्यांच्या चाहत्यांना देखील सोशल मीडियावरून शेअर केलेत
No comments:
Post a Comment