अंतराळवीर Bob Behnken विमानातून उतरल्यानंतर -फोटो -नासा संस्था
नासा संस्था -4 ऑगस्ट
अंतराळवीर Bob Behnken आणी Doug Hurley Houston येथे पोहोचताच नासाच्या Johnson Space Center जवळील Ellington Field येथे त्यांचे जोशात स्वागत करण्यात आले त्या नंतर अंतराळवीरांचा Well Come Home ceremony हा कार्यक्रम पार पडला ह्या कार्यक्रमाला lock down मुळे नासा संस्थेतील निवडक आमंत्रित उपस्थीत होते नासाचे प्रमुख Administrator Jim Bridenstine,Johnson Space Centerचे Director Geyer,Kathy,Steve आणी Space X Dragonचे Elon Musk ह्यांनी ह्या अंतराळवीरांनी हि मोहीम यशस्वी केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले Jim Bridenstine म्हणाले ,"अंतराळवीर Bob आणि Doug ह्या दोघांनी हि असामान्य कामगिरी पार पाडली आहे त्यांनी Space X Dragon व्यवस्थितपणे अंतराळात नेऊन पुन्हा सुरक्षित पणे पृथ्वीवर आणले आहे हे काम अत्यंत कठीण होते त्यामुळे त्यांचे अभिनंदन त्यांच्या ह्या यशाचा ऊपयोग आगामी अंतराळ मोहिमासाठी होईल"!
अंतराळवीर Bob Behnken आणी Doug Hurley Johnson Space Center मध्ये संवाद साधताना
फोटो -नासा संस्था
Space X Dragon चे Elon Musk अंतराळवीरांना पाहून क्षणभर भावुक झाले ह्या दोघांना Space X मधून स्थानकात पाठवून परत सुरक्षित पृथ्वीवर आणण्याची अवघड जबाबदारी माझ्यावर होती दोघांनी हि मोहीम यशस्वी केल्यामुळे मी निश्चिंत झालो आहे त्यांच्या कुटुंबीयांनी ह्या मोहीमेत जाण्यासाठी त्यांना परवानगी देऊन माझ्या वर जो विश्वास दाखवला तो सार्थ ठरला हि मोहीम जोखमीची होती पण आता मी ह्या दोघांनी मिळवलेल्या यशाने भारावून गेलोय ह्या दोघांचे अभिनंदन!
ह्या नंतर अंतराळवीरांना त्यांचा अनुभव शेअर करण्यास सांगण्यात आले तेव्हा दोघांनीही आता लगेच आम्ही ऊभे राहु शकत नाही दोन महिने स्थानकातील वास्तव्यात आम्ही तरंगत्या अवस्थेत राहिलो त्यामुळे बसूनच संवाद साधतो असे सांगितले
Doug म्हणाले,"आमचा Space X Dragon मधला प्रवास नाविन्यपूर्ण आणी आरामदायी होता ह्या ऐतिहासिक मोहिमेत आम्हाला संधी मिळाली आम्ही भाग्यवान आहोत त्यासाठी नासा संस्था आणी Space X चे आम्ही आभारी आहोत आज आमच्या स्वागतासाठी तुम्ही उपस्थीत राहिलात त्या बद्दल आभार! गेल्या सहा वर्षापासून आपण ह्या मोहिमेसाठी प्रयत्न केले ते सार्थकी लागले खरोखरच ह्या यानातील सुविधा आरामदायी होत्या ड्रायव्हिंग स्मुथ होत स्थानकातील अनुभव अविमरणीय होता सारेच अंतराळवीर आम्हाला मदत करत होते नासा संस्थेने आमचा वेळोवेळी कुटुंबीयांशी संवाद साधुन दिला त्यांच्या परवानगी मुळे आज ते ह्या कार्यक्रमाला आमच्या स्वागतासाठी ईथे उपस्थित राहु शकले त्या बद्दल आभार! लवकरच आम्ही पत्रकारांशी लाईव्ह संवाद साधुन आणखी माहिती देऊ"
अंतराळ वीर Bob Behnken म्हणाले," की आमचा Space X मधला अंतराळ प्रवास आरामदायी आणी आनंददायी होता नाविन्यपूर्ण होता Launching चा अनुभव चांगला होता पण परततानाचा अनुभव थरारक होता अंतराळातून वातावरणात शिरताना यानाचा वेग प्रचंड होता दाट वातावरण भेदताना यानाचा प्रचंड आवाज येत होता तो सामान्य मशीनरी सारखा नव्हता तर गगन भेदी,भयानक मोठा हिस्त्र पशुसारखा होता एकाचवेळी अंतराळात असंख्य हिस्त्र पशु जोरजोरात ओरडत आहेत आणी आपण त्यांच्या तोंडी सापडलो आहोत अस वाटुन क्षणभर भीतीने अंगावर रोमांच ऊभे राहिले पण हळूहळू आवाज कमी झाला आणी हायस वाटल !"
"खरोखरच गेल्या सहा वर्षापासून आपण ह्या मोहिमेसाठी अहोरात्र कष्ट केले ह्या मोहिमेतील ईंजीनीअर, तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ आणी कर्मचाऱ्याचे कष्ट कौतुकास्पद आहेत आम्ही ह्या मोहिमेत सहभागी झालो हे आमच भाग्य आम्हाला ह्या मोहीमेत सहभागी केल्यबद्दल नासा आणी Space X चे आभार!अजूनही अमेरिकेतली परिस्थिती कोरोना मुळे गंभीर आहे अशा वेळेस नासा स्ंस्थेने आम्हाला कुटुंबीयांशी लाईव्ह संवाद साधुन दिला त्या बद्दल आभार आजही येण्याआधी माझ्या मुलाने लाईव्ह संवाद साधत तुमची आतुरतेने वाट पहात असल्याचे सांगितले आमचा अंतराळ प्रवास आधी पेक्षा वेगळा होता अमेरीकेची अंतराळ मोहीम बंद झाली तेव्हा वाईट वाटल पण आपण भविष्यात पुन्हा ह्या ऐतिहासिक मोहिमेचा भाग होऊ असे स्वप्नात देखील वाटले नव्हते पण नासा आणी Space X मुळे हि संधी मिळाली स्थानकातील दिवस मजेत गेले Chris Cassidy आम्हाला मदत करायला तत्पर असायचा तीनही अंतराळवीरांनी आम्हाला मदत केली त्यांच्या सोबतचे सायंटिफिक प्रयोग,Space Walk चा अनुभव अविस्मरणीय आहे तुम्ही आमच्या स्वागतासाठी आलात त्या बद्दल आभार !"
शेवटी ऊपस्थित सर्व मान्यवरांनी आणी Jim Bridenstine ह्यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करुन त्यांच्या सन्मानार्थ टाळ्या वाजवून त्यांचा गौरव केला त्या नंतर हे दोन्ही अंतराळवीर त्यांच्या कुटुंबीयांसोबत त्यांच्या घरी परतले
No comments:
Post a Comment