Thursday 29 December 2016

सरत वर्ष गाजल नोटबंदीन

                                            जुन्या हजाराच्या नोटा आता इतिहास जमा होणार 

दिवाळीचा सण संपला तरीही आसमंतात फटाक्यांचे आवाज घुमत होते फेस्टिव्ह मूडमधून पुरते बाहेर न पडलेल्या लोकांना मोदींनी फोडलेल्या ऑटोंबाँम्बन खडबडुन जाग केल आठ नोव्हेंबरला मोदींनी दहा तारखेपासून पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून बाद झाल्याच जाहीर केल आणि नागरिकांची झोप उडाली आठ नोव्हेंबर पाचशे आणि हजारांच्या नोटांसाठी शेवटची ठरली आता चलनबंदीमुळे त्या कोठेही दिसणार नव्हत्या, चालणार नव्हत्या आजवर ज्या नोटांनी नागरिकांचा प्रेस्टिज पॉईंट वाढवला त्याच नोटा लोकांसाठी डोकेदुखी ठरणार होत्या आणि " नको ती पाचशे हजाराची नोट" ! अस प्रत्येकाला वाटू लागल
टेन्शनची ती रात्र संपून सकाळ होताच जो,तो आपल्याजवळच्या पाचशे हजाराच्या नोटा घेऊन खरेदीसाठी बाहेर पडला एरव्ही दूध,भाजीवाला व इत्तर ठिकाणी चिल्लर घेऊन जाणारे नागरिकही पाचशे हजाराच्या नोटा घेऊन गेल्याने जिथे तिथे ह्या नोटा दिसू लागल्या पण चलन बंदीने कोणीही त्या नोटा स्वीकारत नव्हते ज्यांना हा निर्णय माहीत नव्हता त्यांनी ह्या नोटा स्वीकारल्या पण बहुतेक ठिकाणी हि बातमी पोहोचली होती
शिवाय एरवी भाजी मार्केटमध्ये शंभर,पन्नासची चिल्लर मिळत नाही तिथे ह्या न चालणारया नोटांची चिल्लर कोण देणार?

                                       जुन्या पाचशेच्या नोटांनाही आता चालनबंदी 

लोकांनी आपले पैसे गुंतवण्यासाठी सोनाराच्या दुकानात गर्दी केली पण तिथेही ह्या नोटा स्वीकारल्या जात नव्हत्या आणि घेतल्या तर त्यात कमिशन घेऊन मग कोण खरेदी करणार? पण तरीही सोन्याचे भाव त्या दिवशी सर्वसामान्यांसाठी तीस ऐवजी चवतीस हजार जिल्याच्या ठिकाणी तर मुंबई दिल्लीला चक्क साठ हजारावर गेले आणि नंतर सत्तर हजार रुपये तोळ्यांनी सोने विक्री झाली पण मोदींनी सोने घेण्यावर व विक्रीवर बंधने आणताच सोनारांची दुकाने ओस पडली ती आजतागायत कारण सध्या सोन्याचे भाव उतरले असले अन लोकांजवळ पैसे असले तरी ते काढता किंवा खर्चता येत नाहीत ह्याचा सर्वाधिक फटका भर लग्नसराईत प्रामाणिकपणे कर भरणारया नागरिकांना बसला
मोदींच्या देशहिताच्या व काळा पैसे पकडण्यासाठीच्या ह्या निर्णयाचे स्वागत करत दहा तारखेपासून  लोकांनी इतर कामे सोडून नोटबदलांसाठी व पैसे बँकेत भरण्यासाठी बँकेसमोर, ATM  समोर लांबच लांब रांगा लावल्या त्या अजूनही आहेतच
बँकिंगच हे कामही सोप नव्हतच!  कारण पैसे भरण्यासाठी किंवा बदलण्यासाठी आपल्याच बँकेत कित्येक वर्षांची ओळख असताना देखील प्रूफ I D द्यावा लागत होता व्होटिंग कार्ड ,पॅन कार्ड,आधार कार्डचे झेरॉक्स काढण्यासाठी वेगळी कसरत नागरिक करत होते त्यातही अडीच किंवा साडेचारहजारच्या जागी थोडीही कमी जास्त रक्कम असली कि तो फॉर्म रिजेक्ट होत होता त्या मुळे लोक वैतागले होतेच पण मोदींनी आधी ठराविक तारखेनंतर जास्त रक्कम काढता येईल अस सांगूनही नंतर त्यावरही मर्यादा घातली आणि नोट बदलांची प्रक्रियाच बंद करून टाकत फक्त बँकेतच पैसे जमा करता येतील असा नवा निर्णय जाहीर केला आजपर्यंत त्यांनी कित्येक निर्णय बदलले त्या मुळेही लोक त्रासलेत शिवाय बरेच दिवस झाले तरीही पाचशेच्या नव्या नोटा बँकेत पोहोचल्याच नव्हत्या कारण त्या कमी प्रमाणात छापल्या गेल्याने त्यांचा तुटवडा असल्याच  यवतमाळ येथील S B I बँकेच्या मॅनेजरनी सांगितल होत आणि नव्या नोटांच्या वेगळ्या डिझाईन बदलामुळे ATM मशिनही बंद होती

                                                नव्या दोन हजाराच्या नोटेच स्वागत 

                                                                                                                                        फोटो -R B I
सुरवातीला दोन हजाराची नोट मिळताच काही उत्साही तरुणाईने त्या सोबत सेल्फी काढत तो सोशल मीडियावर शेअर करून आपला आनंद द्विगुणित केला पण जसजसे दिवस पुढे सरकत गेले तेव्हा ह्या नोटांचीही डोकेदुखी सुरु झाली कारण दोन हजारची चिल्लर मिळेना त्या मुळे त्याही कोणी स्वीकारत नाहीत अस हैदराबादमधील एका मोठ्या व्यापाऱयाने  सांगितलं कारण त्यांच्याकडे आधीच दोन हजाराच्या खूप नोटा आहेत पण त्या बदलण्यासाठी तिथल्या व्यापाऱयांना पन्नास रुपये कमी मिळतात त्या मुळे लोक दोन हजाराची नोट घेतच नाहीत
नोटबंदीमुळे सर्वच व्यावसायिक त्रस्त झालेत कारण अगदी छोटया व्यावसायिकांपासून मोठया कारखानदारांचा व्यवसाय ठप्प झालाय काहींचा मंदावलाय तर काहींनी बंदच केलाय भाजीमार्केटमधील भाजी कधी नव्हे ते स्वस्त झाल्याने गृहिणी खुश आहेत पण भाजीवाल्यांचं मात्र नुकसान होतंय
ह्या नोटबंदीन सुरवातीच्या दिवसात मोदी सरकारनं लोकांना जुन्या काळात नेल नांदेड जिल्यातील एका  खेडयात पैसे हातात नसल्याने वस्तूंच्या बदल्यात किराणा माल खरीदला गेल्याची बातमी पाहायला मिळाली
अनेक ठिकाणी असा व्यवहार केला गेला
ह्या नोटबंदीचा फटका गृहिणींनाही झाला त्यांनी काटकसरीने जमवलेले पैसेहि बँकेत भरावे लागले त्यातून ज्यांची घरी आर्थिक पिळवणूक होते त्यांनी वेळप्रसंगी उपयोगी पडेल म्हणून लपवलेल्या पैशाची ठिकाणही मीडियाने बातमी देण्याच्या नादात सर्वांपुढे आणल्याने त्यांच्या संकटात भर पडलीय
ह्या नोटबंदीचा परिणाम इतर सेवेप्रमाणे एयर लाईन्स वरही झाला तिथल्या कर्मचारयांची प्रतिक्रिया घेतल्यावर त्यांनी मोदींचा निर्णय चांगला असला तरीही नियोजन मात्र योग्य नाही असं सांगितलं आम्ही अहोरात्र ड्युटीवर असतो तेव्हा बँकेत लाईन कशी लावणार ? अशी संतप्त प्रतिक्रियाही व्यक्त केल्या गेली तर एका महिला पोलीस अधिकाऱयाची नोटबंदीच्या काळातच दिल्लीहून हैद्राबादला बदली झाली त्यामुळे तिला कृत्रिम आर्थिक टंचाईला सामोरे जावं लागल तिचे पतीही नोकरी करतात त्या मुळे त्यांचाही पगार अडकलेला अशा वेळी घरातील रक्कम पुरेशी नव्हती तेव्हा त्यांना त्यांच्या मुलीची पिगी बँक कामी आली ती फोडून त्यांना वापरावी लागली  नोटबंदी आधी पुरेशा प्रमाणात नव्या नोटा छापून लोकांना उपलब्ध करायला हव्या होत्या असच सारे म्हणतात  एअर इंडियानेही आपल्या कर्मचाऱयांना स्वतःहून मदत केलीय कारण त्यांचे पगार अडकलेत अशीच परिस्थिती सर्वच नोकरदारांची झालीय
सुरवातीला मोदींना साथ देणारे नागरिक म्हणताहेत कि मोदींनी टेन्शन के दिन लाये ! कारण ज्यांच्या साठी आणि ज्या साठी मोदींनी हा निर्णय घेतला तो कितपत यशस्वी ठरलाय मुदत संपण्याआधीच नव्या नोटांचे गैरव्यवहार दररोज न्यूज चॅनल वरून पाहायला मिळत आहेत भ्रष्टाचारी आधीच सुटलेत प्रामाणिक नागरिकांना मात्र नाहक त्रास सोसावा लागला काहींचा नाहक जीव गेला
आता फक्त उद्याचा दिवस उरलाय आता दहा पेक्षा जास्त जुन्या नोटा बाळगणाऱयांना शिक्षा होईल अशी नवी घोषणा मोदींनी केलीय आता उद्या त्यात बदल झाल्यास नवल नाही ! जुन्या नोटासंग्रह करणाऱयांसाठी निदान दहा तरी जुन्या नोटा जवळ ठेवता येतील हे काही कमी नाही कारण आता त्या इतिहास जमा झाल्यात
नव्या नोटा आकर्षक रंगाच्या असल्या तरीही त्याला जुन्या पाचशे हजाराच्या नोटांची सर नाही! अशी प्रतिक्रिया व्यक्त होतेय

                                                      नवी पाचशेची नोट चलनात                फोटो -RBI

पण अजूनही नव्या नोटांचा तुटवडा जाणवणार आहेच कारण नव्या नोटांसाठी  लागणारया पेपरच देण्यात येणार टेंडर वेळेवर दिल्या न गेल्यान पेपर मिळण्यास वेळ लागेल आणि सध्या आहे तो पेपर पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही म्हणूनच नव्या नोटांसाठीच्या कागदाची प्रत वेगळी आहे आणि त्याचा परिणाम नोट छपाईवरही पाहायला मिळाला सुरवातीला नोटेचा रंग उडाल्याचीही बातमी आली तेव्हा सरकारकडून रंग जाण हेच नोटेच्या खरेपणाच लक्षण असल्याच सांगितल गेल मग जुन्या नोटा पाण्यात भिजल्या तरीही त्याचा रंग जात नव्हता तेव्हा त्या खोटया होत्या का ? हा प्रश्न उपस्थित केल्या जातोय
वर्ष सरतांना मोदींच्या ह्या चलन बंदींन मात्र चांगलाच धुमाकूळ घातलाय नोटा बंदीनंतर पकडल्या जाण्याच्या भीतीन श्रीमंतीची शान असणारया ह्या नोटा काहींनी कचऱयात फेकल्या ,काहींनी पाण्यात तर काहींनी त्या चक्क जाळल्या देखील वर्षभराच्या ठळक घडामोडींचा विसर पाडत नोटबंदीची चर्चा  मात्र चांगलीच रंगतेय

Saturday 24 December 2016

Christmas Celebration in Space Station

                  Peggy Whiston ची अंतराळ स्थानकातील  ख्रिसमस मूडमधली आनंदित मुद्रा
                                                                                                                                  फोटो -नासा संस्था
नासा संस्था- 23 डिसेंबर

आज जगभरात ख्रिसमसची धुम आहे  झिंगल बेल  SS झिंगल बेल SS झिंगल ऑल द वे  SS  चे सूर आनंदमयी वातावरणात सर्वत्र निनादताहेत सजावटीच्या,गीफ्टच्या  वस्तूंनी बाजारपेठ फुललीय
ख्रिसमस ट्री सजवण ,एकत्रित येऊन ,एकमेकांना भेटवस्तू देण त्या साठी सांताक्लाज बनून छोट्यांच्या आवडीच्या वस्तू पायमोज्यात घालून त्यांना सरप्राईज देण ह्यात ख्रिस्ती बांधव गुंतलेत आपल्या दिवाळी सणासारखाच हा सणही सर्वत्र उत्साहात साजरा होतो आप्तांना परिचितांना केक ,चॉकलेटची भेट दिल्या जाते
ह्या पृथ्वीपासून दूर अंतराळात फिरत्या अंतराळस्थानकात तरंगत्या अवस्थेत राहुन संशोधन करत असलेले  नासाचे अंतराळवीरही महिन्याच्या शेवटच्या आठवडयातील हा वीकएण्डला येणारा सण स्थानकात उत्साहात एकत्रित साजरा करणार आहेत
नासा संस्थेने लाईव्ह टेलिकास्ट द्वारे ह्या अंतराळ मोहीम 50 चे कमांडर Shane Kimbrough , Peggy Whitson  आणि  France चे अंतराळवीर  Thomas Pesquet ह्यांच्याशी संवाद साधून ते स्थानकात नाताळ कसा साजरा करणार आहेत आणि नेहमी ते हा सण कसा साजरा करतात ह्या विषयी जाणून घेतले Peggy  ने दोनदा संपर्क साधत नाताळविषयीच्या तिच्या आठवणी शेअर केल्या

  नासाची अंतराळ वीरांगना Peggy Whitson ,कमांडर Shane Kimbrough आणि फ्रेंच अंतराळवीर Thomas            Pesquet  लाईव्ह टेलीकास्टने संवाद साधत ख्रिसमस फूड दाखवताना  -   फोटो-नासा संस्था                                                                                                                              
पेगी हा सण दरवर्षी सर्वांसोबत साजरा करते  पण ह्यावर्षी कुटुंबियांच्या अनुपस्थितीत त्यांच्या आनंददायी आठवणी सोबत ती नाताळ इतर अंतराळ ह्यावीरांसोबत साजरा करणार आहे त्या साठी ख्रिसमस ट्री सजवण्यासाठी लागणार सामान आणि इतरांना देण्यासाठीच गिफ्ट ( अर्थातच सरप्राईज )तिने ह्या अंतराळ यात्रेला येण्यापूर्वीच बॅगेत ठेवल होत
आता अंतराळ स्थानकातच ती ख्रिसमस ट्री सजवणार आहे  ख्रिसमस  टेबल सजवण्यासाठी त्यांना खास ख्रिसमस फूड मिळाल आहे त्यांच्या कडे कुकीज ,कोको ,फ्रॉस्टिंग वै साहित्य आहे. पेगीची इच्छा होती की ,ख्रिसमसला सगळ्या अंतराळवीराची आपण कुकीज सजवण्याची स्पर्धा घेऊ पण इतरांना मात्र त्यात इंटरेस्ट नाही.
लाईव्ह टेलिकास्ट द्वारे संवाद साधताना तिला विचारले गेले कि,तू एकटीच महिला आहेस त्या मुळे तुला असुरक्षित वाटत का ?
नव्या वर्षात तू काही संकल्प करणार आहेस का?
आणि तुम्ही शॅंपेन पार्टी करणार का?
तू घरच्यांना मिस करतेस का ?
पेगीने सांगितले कि नाही !  तिला असुरक्षित वाटत नाही! सारेच जण चांगले आहेत कामाव्यतिरिक्तचा वेळ ते एकत्रित गप्पागोष्टीत आनंदात घालवतात ते रोज एकत्र जेवण करतात
ती पृथ्वीवरच्या सारख नव्या वर्षात वजन कमी करण किंवा वाढवण असे संकल्प करणार नाही
ते शॅंपेन पार्टी करणार नाहीत!
घरच्यांना नक्कीच मिस करतेय पण अंतराळस्थानकात राहून संशोधन करण हे तीच ध्येय आहे आणि ह्या वर्षीचा नाताळ पृथ्वी बाहेर राहून स्थानकात साजरा करण आणि  तीथून पृथ्वी न्याहळण्याचा क्षण अलौकिक आहे! रोमांचक आहे!
 ह्या मोहीमेचे कमांडर Shane Kimbrough  ह्यांनाही ख्रिसमस साजरा करायला खूप आवडत त्या दिवशी त्यांचे सर्व नातेवाईक एकत्र येतात कधी त्यांच्याकडे तर कधी नातेवाईकांकडे जमून ख्रिसमस ट्री लाइटिंगने सजवून म्युझिकच्या साथीने ते हे सेलिब्रेशन एन्जॉय करतात एकमेकांना गिफ्ट देतात त्यानांही घरच्यांची आठवण येतेय पण अंतराळस्थानकातील नाताळ सेलिब्रेशन अनोख आहे !
फ्रान्सचे अंतराळवीर Thomas Pesquet ह्यांचं बालपण पंचवीसजणांच्या कुटुंबात गेल ख्रिसमसला सारेजण एकत्र येत धमाल मस्ती करत ! आनंदात ख्रिसमस सण साजरा करत त्यावेळची सजावट व आनंददायी आठवणी आहेत ह्या वर्षी  मात्र ते साऱ्यांना मिस करताहेत  पण ख्रिसमसला ते त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतील त्यांची आजी त्यांच्यासाठी खास रेसिपी करायची तीच रेसिपी वापरून त्यांच्या फ्रेंच शेफने चिकन सूप ,जिंजर ब्रेड आणि त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवून पाठवलेत आणि ते साऱ्यांना पुरेल इतक आहे ते जिथे वाढले तिथला स्पेशल पदार्थ ते स्टार्टर म्हणून खातील
त्यांनाही स्थानकातील ख्रिसमस सेलिब्रेशन थ्रिलिंग  वाटतय
आता ह्या अंतराळवीरांचं ख्रिसमस सेलिब्रेशन अंतराळातील 


          अंतराळ  स्थानकातील सहाही अंतराळवीर फेस्टिव्ह मूडमध्ये   फोटो -नासा संस्था 

छोटयाशा जागेत ख्रिसमस ट्री सजवून ख्रिसमस टेबलवर खास युरोपियन ट्रॅडिशनल U.S. meal आणि फ्रेंच फूड , टर्की ,पोटॅटो,ग्रीन पीज ,आयरर्लंड मधला फेमस कोका, कॉर्न ब्रेड,Pineapple dessert , फ्रुट सॅलेड आणि चॉकलेट केक मांडुन एकत्रित येऊन एकमेकांना आपले पदार्थ आणि सरप्राईज गिफ्ट देऊन आपल्या आनंददायी आठवणी शेअर करीत आपल्या कुटुंबियांपासून दूर पण ह्या नव्या अंतराळातील कुटुंबात आनंदात साजरा करतील सध्या त्यांच्याकडे नुकतच आलेल नाताळसाठीच फूड तर आहेच शिवाय जापनीज अंतराळवीरांचेहि काही पदार्थ आहेत 
ह्या तिनही अंतराळ वीरांनी पृथ्वीवासीयांसाठी Happy Christmas ! म्हणत शुभेच्छा दिल्यात





  

Thursday 22 December 2016

नासाच्या अंतराळ विरांनी अभ्यासला स्थानकातील वातावरणाचा स्नायूंवर होणारा परिणाम

           नासाच्या मोहीम 50 चे कमांडर Shane Kimbrough स्थानकात दोन स्पेस सूट मधल्या जागेत आराम                                 करताना   फोटो -नासा संस्था

नासा संस्था -21 डिसेंबर
नासाच्या अंतराळ मोहीम 50 चे अंतराळवीर सध्या अंतराळ स्थानकात राहुन तिथल्या वातावरणाचा मानवी आरोग्यावर काय परिणाम होतो ह्याविषयावर सखोल संशोधन करत आहेत त्या साठी आवश्यक असे अनेक प्रयोग ते सतत करत असतात
नुकतेच ह्या अंतराळ वीरांनी अंतराळ स्थानकात राहून तिथल्या वातावरणात काम करताना आपल्या शरीरावर व स्नायूंवर काय परिणाम होतो ह्यावर संशोधन केले आहे
रशियाचे अंतराळवीर  Sargey Ryzhikov  आणि फ्रान्सचे अंतराळवीर  Thomas Pesquet ह्या दोघांनी मिळून Ultrasound Scanner व Electrodes च्या मदतीने सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचा गुडघ्यावर होणारा परिणाम व त्याची भविष्यात होणारी हानी ह्याचा अभ्यास केला
नासाच्या ह्या अंतराळ मोहीम 50 चे कमांडर Shane Kimbrough  व Peggy Whitson ह्यांनी स्थानकातील Electrostatic Levitation Furnace यंत्रणेचे काम पाहिले.अंतराळ स्थानकातील वातावरणाचा स्थानकात Gas व Liquid  ह्याच्यावर काय परिणाम होतो ह्याचही संशोधन केल तसेच  Medical Emergency Drill  मध्ये सहभागी होत  CPR Procedure व Medical Hardwareचाही आढावा घेतला
अंतराळवीरांनी केलेल्या ह्या आधुनिक संशोधनाचा उपयोग पृथ्वीवरील मानवी आरोग्यासाठी उपयोगी पडेलच शिवाय आगामी अंतराळ मोहिमेत दूरवरच्या ग्रहांवरील अंतराळ निवासासाठीही उपयुक्त ठरेल अशी आशा ह्या अंतराळ वीरांना वाटते


Wednesday 14 December 2016

नोटबंदी आणि जयललिताच्या निधनाने सात डिसेंबरला तिरुपती मंदिरात कमी गर्दी


                         नोटबंदी आणि जयललितांच्या निधनाने तिरुपतीच्या मंदिरातील शुकशुकाट

तिरुपती -7 डिसेंबर
पर्यटक आणि भाविकांच्या गर्दीन गजबजलेल्या तिरुपती तिरुमला देवस्थान मंदिरात सात डिसेंबरला शुकशुकाट जाणवत होता  एरव्ही भक्तांच्या रांगाचरांगा असणाऱया रांगेंची ठिकाण देखील रिकामी होती त्या बाबतीत अधिक माहिती घेतली असता हा नोटा बंदीचा परिणाम असल्याची माहिती मिळाली आधीच नोटबंदीने पर्यटकांची गर्दी कमी त्यातून सहा तारखेला जयललिताच्या निधनामुळे तामिळनाडूतील बससेवा व रेल्वेसेवाही बंद होती त्या मुळे सात डिसेंबरला मंदिरात अत्यंत कमी गर्दी होती आधीच तिरुपतीचे तिकीट काढून ठेवलेल्या भक्तांना तिरुपतीत वेळेवर पोहचता आले नाही मात्र आठ डिसेंबरला तिरुपतीच्या मंदिरात भक्तांचा गजबजाट होता पण नेहमीपेक्षा कमीच!  नोटबंदीमुळे तिथे येणारया भाविकांची संख्या जशी रोडावली आहे तसेच तिथल्या दुकानदारांच्या धंद्यांवर देखील नोटबंदीचा परिणाम झाला आहे सर्वच दुकानदार मंदीचा सामना करत असून नोटबंदीने त्रस्त असल्याच तिथल्या काही व्यावसायिकांनी सांगितल           
 नोटबंदी आणि जयललिताच्या निधनाने सात डिसेंबरला तिरुपती मंदिरात कमी गर्दी असली तरीही तिथली सुरक्षा व्यवस्था मात्र चोख होती तिथे प्रवेश करणारी वाहने ,भाविक आणि पर्यटकांची कडक तपासणी होत होती त्या नंतरच लोकांना तिरुपतीत प्रवेश मिळत होता
एरव्ही तिरुपतीच्या दर्शनाला येणारया भाविकांचा ओघ प्रचंड असतो दर्शन रांगा गर्दीने भरून जातात भाविकांचे जथ्थे सतत तिरुपतीत दाखल होतात ह्या गर्दीतही लोक शिस्तीत दर्शन घेत असतात सर्वात श्रीमंत देव अशी तिरुपतीची ख्याती आहे अर्ध्या रात्री सकाळच्या सुप्रभातम साठी रांग लागते ते दिवसभरच्या सर्व सेवा पूर्ण करून शेवटच्या एकांत सेवा संपेपर्यंत रांग सुरूच असते शिवाय इतर दर्शन रांगातून गोविंदा SSS गोविंदा चा जयघोष सुरूच असतो
तिरुपती तिरुमला देवस्थान समितीच व्यवस्थापन खरोखरच वाखाणण्याजोग आहे मग ती स्वच्छता असो की दानपेटीतुन आलेली प्रचंड रक्कम तिरुपतीचा लाडू प्रसाद प्रसिद्ध आहे दररोज तिथे लाखोंच्या संख्येत लाडू बनवले जातात दर्शन रांगेत बुंदीचे लाडू ,दहीभात ,चिंचेचा भात आलटून पालटून वाटल्या जातो लाडू विक्री केंद्रात पैसे भरून कुपन काढून लाडू विकत मिळतो दर्शन रांगा आणि जागोजागी तैनात सुरक्षा व्यवस्था सारच एकदम चोख आहे तिथले नियमही एकदम कडक मंदिरातील गाभाऱयातील विशेष सेवांच्या वेळी सील्कचे धोतर किंवा लुंगी व शाल घालावी लागते तरीही तेथे दररोज लाखो लोक दर्शनासाठी येतात श्रद्धेपोटी केसदान करतात अगदी बायका,मुलही मुंडन करून देवाला केस अर्पण करतात त्यासाठीही विशेष सोय केली आहे तिरुपतीत अशी असंख्य मुंडन करून डोक्याला चंदन लावलेली कुटुंब पाहायला मिळतात

                        तिरुपतीच्या वाटेवर सप्तरंगांची उधळण करत अस्ताला जाणारा सूर्य

तिरुपतीहून तिरुमला देवस्थानात जातानाची सप्तगिरीतील घाटाची वाट निसर्गदत्त नैसर्गिक वनसंपदेने समृद्ध आहे दुर्मिळ औषधी वनस्पतीची विपुलता तिथे पाहायला मिळते
तिरुपती तिरुपती देवस्थान समितीने खालून वर तिरुमलाच्या बालाजीचे दर्शन घेण्यासाठी पायी जाणारया भाविकांसाठी हा परिसर निसर्गरम्य आणि सुशोभित केलाय ह्या वाटेवर देवळे व थकलेल्यांना विसाव्यासाठी रमणीय ठिकाणेही आहेत सप्तगिरीचा हा परिसर घनदाट वृक्षांनी वेढलेला आहे त्या मुळे तिथे वन्यप्राण्यांचा वावर आहे देवस्थान प्रशासनाने ह्या वाटेवर तिरुपती तिरुमला प्राणीसंग्रहालय विकसित केल आहे अशाच विसाव्याच्या ठिकाणी वसलेल हे डियर पार्क येणाऱ्या जाणारया भाविकांना आकर्षित करत
             
                                     तिरुपतीच्या वाटेवरचा आर्कषक सुंदर हरिणांचा हा एकत्रित कळप

                                  फळे खाण्यासाठी जमलेला हा डौलदार हरणांचा कळप
 एरव्ही  प्रवासात जंगलवाटेवर माणसांना पाहुन वायुवेगाने पळणारी हरण आपण पहातो पण इथली हरीण मात्र चांगलीच माणसाळलीत तिथून प्रवास करणारी वाहन ह्या हरीण दर्शनासाठी थांबतात तिथे विकत मिळणारी  कडू काकडी (वाळूक) ,पपई आणि इतर फळे विकत घेऊन ती हरिणांना खायला देतात हरणही ती खाण्यासाठी गर्दी करतात तिरुपतीला येणारे भाविक पर्यटन प्लस भक्ती ह्याचा सुरेल मेळ साधतात 

Friday 2 December 2016

कार्गो स्पेस क्राफ्ट Progress 65 उड्डाणानंतर काही वेळातच पेटले


          Progress 65  कार्गो स्पेस क्राफ्ट गुरुवारी सकाळी कझाकस्थानातील बैकोनूर येथून उड्डाण करताना
                                                                                                                                     फोटो -नासा संस्था
नासा संस्था - 1 डिसेंबर
गुरुवारी सकाळी रशियाच्या  Progress 65  ह्या कार्गो स्पेस क्राफ्टने अंतराळात उड्डाण केल्या नंतर काही वेळातच पेट घेतला रशियाच्या रॉसकॉसमॉस ह्या रशियन स्पेस एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार
प्रोग्रेस 65 ह्या रशियन बनावटीच्या मालवाहू अंतरिक्ष यानाने गुरुवारी सकाळी कझाकस्थानातील बैकोनूर येथून  9.51a.m .ला अंतराळ स्थानकाकडे व्यवस्थित झेप घेतली पण उड्डाणानंतर काही वेळातच त्याचा संस्थेशी असलेला संपर्क तुटला आणि त्याने पेट घेतला सोयूझ ह्या रॉकेट द्वारे Progress 65 कार्गो स्पेस क्राफ्ट अंतराळात सोडण्यात आले होते पण काही वेळानंतर रशियातील तुवा ह्या पर्वतीय क्षेत्रात 190 km उंचीवर पोहोचल्यानंतर अचानक हे यान पेटले
सद्या अंतराळस्थानकात राहात असलेल्या सहा अंतराळवीरांसाठी लागणारे आवश्यक सामान घेऊन हे मालवाहू यान अंतराळ स्थानकाकडे जात होते आता हे कार्गो स्पेस क्राफ्ट जळाल्यामुळे त्यातील 2.4 टन वजनाचे इंधन ,खाद्य पदार्थ व इतर आवश्यक रिसर्च हार्डवेअरचे साहित्यही जळून खाक झाले आहे
नासा संस्थेने ह्या अंतराळवीरांशी live telecast द्वारे संवाद साधत त्यांना ह्या अपघाताची माहिती दिली व त्यांच्या सुरक्षिततेविषयी विचारपूस केली असता सहाही अंतराळवीरांनी आम्ही सुरक्षित असल्याचे सांगीतले शिवाय त्यांना लागणारे आवश्यक सामान सद्यातरी पुरेसे असल्याची माहितीही दिली
लवकरच 9 डिसेंबरला जपानच्या JAXA एजन्सीचे HTV-6 हे कार्गोशिप स्पेस क्राफ्ट अंतराळ वीरांना लागणारे सामान घेऊन स्थानकात जाणार आहे

Friday 25 November 2016

अंतराळ वीरांचा स्थानकात Happy Thanksgiving Day साजरा



 नासा संस्था -24 nov.
अमेरिकेत नोव्हेंबर महिन्यातील चवथ्या गुरुवारी दरवर्षी Thanks giving Day उत्साहात साजरा केला जातो
ह्या वर्षी हा दिवस 24 नोव्हेंबरला साजरा झाला
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump ह्यांनी Thanks giving Day निमित्य अमेरिकन नागरिकांना शुभेच्छा दिल्या
हा दिवस अमेरिकन नागरिक आपल्या कुटुंबियांसोबत मेजवानीचे आयोजन करून एकत्रित साजरा करतात शिवाय आपले स्नेही,मित्रपरिवार आणि आप्तस्वकीयांनाही आमंत्रित केले जाते ह्या दिवशी वर्षभरात आपल्याला केलेल्या साहाय्याची ,मदतीची उपकारांची जाणीव ठेवून त्या त्या व्यक्तींचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली जाते
अमेरिकेतील नासा संस्थेनेही सर्वांना Thanks Giving  Day निमित्य शुभेच्छा दिल्या त्यांच्या मते साधे जेवणही मग ते पृथ्वीवर आपल्या समोरील ताटात आलेले असो कि अंतराळस्थानकातील पॅकबंद डब्यातून तरंगत आपल्या हातात आलेले अन्न असो ते शिजवून आपले पोट भरणाऱयांचे आभार मानायला हवेतच
ह्या दिवशी राष्ट्रीय सुटीचा दिवस असल्याने तो दिवस कुटुंबियांसोबत आनंदात टर्की जेवणाचा आस्वाद घेत साजरा होतो
अंतराळस्थानक निवासी सहाही अंतराळवीरांनी मात्र ह्या वर्षीचा Thanks Giving  Day अंतराळ स्थानकातच साजरा केला  अंतराळ मोहीम 50 च्या ह्या सहा अंतराळवीरांनी Re-hydrated Turky  पदार्थ ,Stuff Potato आणि Vegetables युक्त मेजवानीचा आस्वाद घेत Thanks Giving Day साजरा केला

    नासाच्या मोहीम 50 चे  सहा अंतराळवीर स्थानकात Thanks Giving Dayच्या मेजवानीचा आस्वाद  घेताना
                                                                                                                        फोटो -नासा संस्था

अंतराळ स्थानकातील नासाची सगळ्यात अनुभवी अंतराळवीरांगना Peggy Whitson आता तिसऱयांदा अंतराळस्थानकात राहण्यासाठी गेली आहे  Peggy ,Oleg Novitsky  आणि Thomes Pesquet ह्यांचा हा अंतराळ स्थानकातील पहिला आठवडा आहे आता त्यांच्या नव्या घरी राहण्यासाठी त्यात आवश्यक असलेल्या सुधारणा हे अंतराळवीर करत आहेत
काल Thanks Giving Day ला ह्या अंतराळवीरांनी नासा t.v. वरून नासा संस्थेतील त्यांचे सहकारी व पत्रकारांशी संवाद साधत सारयांना Thanks Giving Day निमित्य शुभेच्छा दिल्या व हा दिवस अंतराळस्थानकात साजरा करण्याचा आनंद अनोखा व थरारक असल्याच त्यांनी सांगितल
Thomes Pesquet ह्यांनी त्यांना अंतराळस्थानकात उपयुक्त प्रत्येक वस्तू उपलब्ध केल्या बद्दल आभार मानत Thanks Giving Day च्या शुभेच्छा दिल्या
Peggy Whitsonने स्थानकातील plumbingचे काम करून लिकेजची दुरुस्ती केली आणि अनावश्यक कचरा साफ केला
 Oleg Novitskiy ह्यांची हि दुसरी अंतराळवारी आहे तर Thomes Pesquet ह्यांची हि पहिलीच अंतराळवारी आहे ते प्रथमच अंतराळ स्थानकात राहून संशोधनात सहभाग नोंदवणार आहेत तर फ्रेंच अंतरराळवीरांमध्ये  स्थानकात राहणारे ते चवथे अंतराळवीर आहेत
अंतराळ स्थानकात आता हे अंतराळवीर तिथल्या वातावरणातील breathingचे नमुने घेऊन Bone Marrow Blood cell वर त्याचा काय परिणाम होतो ह्या वर संशोधन करणार आहेत


Monday 14 November 2016

अंतराळ मोहीम 49-50 चे तीन अंतराळवीर 17 नोव्हेंबरला अंतराळस्थानकात जाणार


       Thomas Pesquet(Esa).Oleg Novitskiy (Roscosmos) आणि Peggy Whitson (नासा )  फोटो-नासा संस्था

नासा संस्था 10 nov.
नासाच्या अंतराळ मोहीम 49-50 चे तीन अंतराळवीर Peggy Whitson- नासा ,Thomas Pesquet -इसा आणि
Oleg  Novitskiy  -Roscosmos हे  सोयूझ MS-03 ह्या अंतराळ यानातून अंतराळस्थानकाकडे झेप घेणार आहेत 17 नोव्हेंबरला 3.20 pm ला त्यांचे अंतराळयान कझाकस्थानातील बैकोनूर येथून अंतराळ स्थानकाकडे उड्डाण करेल व 19 नोव्हेंबरला ते स्थानकात पोहोचेल त्या आधी दोन दिवस ते अवकाशात भ्रमण करेल  स्थानकात पोहोचल्यानंतर त्यांचे स्वागत अंतराळवीर Shane Kimbrough आणि त्यांचे दोन सहकारी करतील

 जाण्याआधी कझाकस्थातील Baikonur मध्ये हॉटेल crew quarters मध्ये हसतमुखाने पोज देताना अंतराळवीर    
अंतराळ स्थानकात जाण्याआधी  ह्या अंतराळ वीरांनी अंतराळ स्थानकातील निवासासाठीचे आवश्यक ट्रेनींग पूर्ण केले आता त्यांची तयारी पूर्ण झाली असून जाण्याआधी ह्या अंतराळवीरांनी स्थानकात राहण्यासाठी आवश्यक असलेले ट्रेनिंग आणि फिटनेस टेस्टची प्रक्रिया पूर्ण केली (मेडिटेशन ,वृक्षारोपण ,अंतराळवीरांचा पोशाख घालून कमी जागेत अत्यंत वेगाने फिरणारया खुर्चीत बसून आवश्यक चाचणी आणि इतर आवश्यक बाबींची पूर्तता ) ऑगस्ट मध्ये  ट्रेनिंगआधी आणि आता उड्डाणासाठी सज्ज झाल्यावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली

                अंतराळवीर Cosmonaut Hotel Crew Quarters येथे वृक्षारोपण करताना  फोटो- नासा संस्था

अंतराळ स्थानकात पोहोचल्यानंतर हे तीन अंतराळवीर त्यांच्या सहा महिन्यांच्या वास्तव्यात तिथे असलेल्या अंतराळ वीरांसोबत स्थानकात सुरु असलेल्या वैज्ञानिक प्रयोगात सहभाग नोंदवतील
Peggy Whitson  जेव्हा अंतराळ स्थानकात पोहचून ह्या मोहिमेची सूत्रे हाती घेईल तेव्हा ती स्थानकात राहून दुसऱयांदा command करणारी पहिली अमेरिकन महिला अंतराळवीर ठरेल 2007 सालच्या अंतराळ मोहिमेत तिने पहिल्यांदा अंतराळ मोहिमेचे नेतृत्व केले होते 
Peggy ने Biochemistry मध्ये डॉक्टरेट केले असून 1996 मध्ये तिची नासा संस्थेत अंतराळवीर म्हणून निवड झाली होती  तिने आतापर्यंत नासा संस्थेत वेगवेगळ्या पदांवर काम केले असून तीने  2009-  2012 पर्यंत नासाची Cheif Astronaut officer म्हणून काम केले आहे 
Peggy ने Houston येथील NBL Jonson  स्पेस सेंटर मध्ये पाण्याखाली स्पेस वॉक करण्याचे विशेष प्रशिक्षण घेतले आहे तिने अंतराळात 377 दिवस मुक्काम केला असून 6 वेळा स्पेस वॉक केला आहे
आताची तिची हि तिसरी अंतराळ मोहीम आहे 


Wednesday 2 November 2016

अंतराळ वीरांगना केट रूबिन्स आपल्या दोन सहकारी अंतराळवीरांसह अंतराळ स्थानकातुन पृथ्वीवर परतली


                            अंतराळवीर पृथ्वीवर परतल्यानंतर       फोटो -नासा संस्था

नासा संस्था -30 ऑक्टोबर
नासाची अंतराळ वीरांगना केट रूबिन्स, रशियाचे अंतराळवीर Anatoly Lvanishin व जपानचे अंतराळवीर Takuya Onishi  हे अंतराळ स्थानकातुन 30 ऑक्टोबरला पृथ्वीवर सुरक्षित परतले आहेत
शनिवारी 11.58 pm ला हे तीनही अंतराळवीर  MS-01 ह्या सोयूझ अंतराळ यानातून कझाकस्थान येथे पोहोचले
ह्या तीनही अंतराळवीरांना सोयुझ अंतराळ यानातून बाहेर काढून पृथ्वीवरील सुरक्षित वातावरणात adjust होण्यासाठी रशियाच्या recovery team ने मदत केली त्यांना ब्लँकेट्सने उब देऊन व्हील चेअरवर बसवण्यात आले कझाकस्थानच्या कॉस्मोड्रोम वरून त्यांना helicopter ने आणण्यात आले
तिथून केट रूबिन्स व  Takuya Onishi हे दोघे Houston येथे तर Anatoly Lvanishin हे त्यांच्या रशियातील ट्रेनिंग सेंटरकडे रवाना झाले आहेत जाण्याआधी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली
ह्या तिन्ही अंतराळ वीरांनी अंतराळ स्थानकात राहून नव नवीन संशोधन करून आपली हि मोहीम यशस्वी केली आहे

                     केट रूबिन्स सोयूझ अंतराळ यानातून उतरल्यावर  फोटो -नासा संस्था

नासाच्या अंतराळ मोहीम 49 ची केट रूबिन्स हि अंतराळस्थानकात राहून DNA Sequence वर संशोधन करणारी पहिलीच यशस्वी महिला संशोधक आहे MicroBiology ची पदवीधर असलेल्या केटने अंतराळ स्थानकातील फिरत्या प्रयोग शाळेत Biomolecular Sequence वर संशोधन केले ह्या प्रयोगामुळे अंतराळ वीरांच्या शरीरातील अंतराळात वाढणाऱया microbes ओळखून त्यांच्या आजारावर नियंत्रण ठेवता येईल व त्यातील धोकादायक जीन्स तपासता येतील अशी आशा संशोधकांना वाटतेय
अंतराळ स्थानकातील वास्तव्यात केट रूबिन्स हिने स्थानकाच्या तांत्रिक कामासाठी दोनदा स्पेस वॉक केला ह्या मोहीम 49 च्या अंतराळ संशोधकांनी Biology,Biotechnology,Physical Science,Earth Science ह्या विषयांवर अनेक यशस्वी प्रयोग केले शिवाय त्यांनी स्थानकात आलेल्या कार्गो स्पेस क्राफ्टचे स्वागत केले
केट रूबिन्स आणि Takuya Onishi ह्यांनी अंतराळ स्थानकात 115 दिवस तर Anatoly Lvanishin ह्यांनी त्यांच्या दोन अंतराळ मोहिमे दरम्यान 280 दिवस वास्तव्य केले आहे       

Thursday 20 October 2016

नासाचे तीन अंतराळवीर स्थानकाकडे रवाना


            अंतराळवीर Andry ,Shane आणि  Sergey अंतराळस्थानकात राहण्यासाठी जाण्याच्या तयारीत असताना

नासा संस्था -19 ऑकटोबर
बुधवारी 19 ऑक्टोबरला दुपारी 4 वाजून 5  मिनिटांनी कझाकस्थानातील बैकोनूर येथील कॉस्मोड्रोम वरून सोयूझ MS-02 ह्या अंतराळ यानाने नासाच्या तीन अंतराळवीरांना घेऊन अंतराळ स्थानकाकडे झेप घेतली
नासाच्या अंतराळ मोहिम 49 अंतरगत अंतराळ स्थानकात राहण्यासाठी गेलेल्या अंतराळवीरांमध्ये
नासाचे अंतराळवीर Shane Kimbrough , रशियाचे अंतराळवीर Sergey Ryzhikov व  Andry Borisenko ह्यांचा समावेश आहे
बुधवारी पृथ्वीवरून स्थानकाकडे प्रयाण केलेले हे यान शुक्रवारी 21 ऑक्टोबरला अंतराळ स्थानकात पोहोचेल हे तीन अंतराळवीर 5.59 am ला अंतराळस्थानकाच्या Poisk module मध्ये प्रवेश करतील तेव्हा अंतराळ स्थानकातील सद्या राहात असलेले अंतराळवीर त्यांचे स्थानकात स्वागत करतील
हे तीन अंतराळवीर आणि आधीचे तीन असे सहा अंतराळवीर आता स्थानकात राहून त्यांचे तिथे सुरु असलेले सायंटिफिक प्रयोग चालू ठेवतील 
ह्या अंतराळवीरांनी स्थानकात राहण्यासाठी आवश्यक असलेले ट्रेनिंग आणि फिटनेस टेस्टची प्रक्रिया पूर्ण केली जाण्याआधी त्यांनी मेडिटेशन ,वृक्षारोपण आणि नासा म्युझियमला भेट दिली
त्या नंतर त्यांनी अंतराळवीरांचा पोशाख घालून कमी जागेत अत्यंत वेगाने फिरणारया खुर्चीत बसून आवश्यक चाचणी पूर्ण केली
अंतराळ मोहिम 49 चे  रशियाचे कमांडर Lvanishin , नासाची फ्लाईट इंजिनीअर Kate Rubins आणि जपानचे अंतराळवीर Takuya Onishi  हे तीघेही तीस ऑक्टोबरला पृथ्वीवर परत येतील
Kimbrough ,Ryzhikov आणि Borisenko हे तीन अंतराळवीर फेब्रुवारी पर्यंत स्थानकात राहतील

                            नासाचे अंतराळवीर  Shane Kimbrough  लाँचिंग नंतर अंगठा दाखवताना

त्यांच्या ह्या निवासा दरम्यान ते अंतराळ स्थानकात येणारया मालवाहु अंतरिक्ष यानाचे स्वागत करतील त्या मध्ये 23 ऑक्टोबरला सोमवारी व्हर्जिनिया येथून स्थानकात जाणारया Orbital AT KS Cygnus कार्गोशिपचा समावेश आहे ह्या कार्गोशिप मधून 5,100 पाउंड वजनाचे अंतराळ वीरांना सायंटिफिक प्रयोगासाठी लागणारे सामान व हार्डवेअर पाठवण्यात येईल
Cygnus shipment मधून अंतराळ स्थानकात सुरु असलेल्या फायर स्टडी करण्यासाठी आवश्यक असलेले पेलोड , अंतराळवीरांच्या शरीरातील अंतराळस्थानकातील वातावरणात होणारे बदल ,त्यांची नियमित झोप व आवश्यक हालचालीवर होणारा लाईट इफेक्ट ह्या विषयीच्या संशोधनासाठी आवश्यक साहित्य  व Neurans वरील नवीन संशोधनासाठीचे आवश्यक साहित्य पाठवण्यात येईल
जपानी कार्गोशिप मधून नवीन lithium ion बॅटरीज पाठवण्यात येतील सध्या अंतराळ स्थानकात वापरण्यात आलेल्या निकेल हायड्रोजन बॅटरीज  डिसेंबर मध्ये बदलण्यात येतील
या शिवाय Space X 10th कमर्शियल रिसप्लायशिप आणि दोन रशियन प्रोग्रेस रिसप्लाय मिशन मधून हजारो टॅन अन्न ,इंधन आणि इतर आवश्यक सामुग्री पाठवण्यात येईल
गेल्या पंधरा वर्षांपासून सतत सातत्याने अंतराळवीर अंतराळस्थानकात राहून मानवी आरोग्यासाठी व जीवनासाठी आवश्यक असे व पृथ्वीवर करता न येणारे प्रयोग अंतराळस्थानकातील फिरत्या प्रयोग शाळेत करत आहेत हे प्रयोग आगामी काळातील दूरवरच्या व खोलवरच्या अंतराळ मोहिमेसाठी मानवाला अंतराळात राहण्यासाठी आणि रोबोटिक मिशन साठी उपयुक्त ठरतील अशी संशोधकांना आशा वाटतेय

Saturday 15 October 2016

ऑनलाईन शॉपिंगला भुलू नका



सद्या दिवाळी जवळ आल्याने ऑनलाईन शॉपिंगचा धंदा जोरात सुरु आहे रोज नवनवीन वस्तूंची आकर्षक जाहिरात पेपर मधुन दिली जातेय फोटोतील वस्तू स्वस्त मिळत असल्याची जाहिरात वाचून चोखंदळ ग्राहक साहजिकच अशा वस्तू घेण्यासाठी ऑर्डर बुक करतात प्रत्यक्षात जेव्हा ह्या वस्तू ग्राहकांना मिळतात तेव्हा त्या आणि जाहिरातीतील वस्तूतील बदल त्यांच्या लक्षात येतो ह्या वस्तू अत्यंत पातळ पत्र्यापासून बनवलेल्या, लहान आकाराच्या व वजनाच्या निघतात
जेव्हा ग्राहक हि ऑर्डर बुक करतो तेव्हा वस्तूंची जाहिरातीत लिहलेली साइझ न बघता त्यांचे आकर्षक फोटो आणि कमी किंमत पहातो त्या मुळे साहजिकच ग्राहक फसतो शिवाय लिहलेल्या किमतीपेक्षा डिलिव्हरी चार्जेस एक्सट्रा घेतल्या गेल्यामुळे ह्या वस्तूंची किंमत वाढते आणि हा माल परतही घेतला जात नाही म्हणूनच ऑनलाईन शॉपिंगला भुलू नका त्या ऐवजी जिथे सेल सुरु आहे तिथे जाऊन प्रत्यक्ष अशा वस्तू बघून घेतल्यास ग्राहकांची फसवणूक होणार नाही  






Friday 14 October 2016

यवतमाळातील दुर्गोत्सव

यवतमाळात दरवर्षी प्रमाणे यंदाही उत्साहात दुर्गोत्सव सुरु आहे ठिकठिकाणच्या मंडळात दुर्गेच्या वेगवेगळ्या रूपातील आकर्षक सुंदर मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे
ह्या वर्षी काही मंडळांनी देवीपुढे मंदिर व राजमहालाचा देखावा साकारला आहे चलतचित्र देखाव्या ऐवजी ह्या वर्षी सजावटीवर भर दिला गेला आहे दुर्गेच्या मूर्तीही विलोभनीय आहेत दुर्गा मंडळा समोरील रस्ते लोकांच्या गर्दीमुळे गजबजून गेले असून संध्याकाळी दुर्गेच्या मंडळा पुढील विजेच्या दिव्यांच्या रोषणाईने यवतमाळ झगमगत आहे विशेष म्हणजे अजूनही यवतमाळ येथे अधून मधून पाऊस पडत असताना आणि कृत्रिम पाणी टंचाईने , रस्त्यावरील खड्डे व इतर समस्येने त्रस्त असताना देखील लोक दुर्गादेवी पाहण्यासाठी गर्दी करत आहेत
काही मंडळांनी जनजागृती अभियान राबवत लोकांना मदतीचे आवाहन केले आहे
माळीपुऱ्यातील युवक मंडळाने उरी येथील पाकिस्तानच्या दहशतवादी हल्ल्यात देशाचे रक्षण करताना वीरमरण आलेल्या जवानांच्या फोटोंचा फलक लाऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे व त्यांच्या कुटुंबींयांसाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे तर बालाजी चौकातील युवकांनी बळीराजा चेतना अभियाना अंतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकरयांच्या कुटुंबियांसाठी लोकांना मदतीचे आवाहन करत तिथे दानपेट्याही ठेवल्या आहेत लोकांच्या सुरक्षेसाठी जागोजागी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे

Photo Gallery

Wednesday 28 September 2016

गुरूचा चंद्र Europa वर उडताहेत पाण्याचे फवारे

                           यूरोपावरील पृष्ठभागावर उडणारे पाण्याचे फवारे                                    -फोटो नासा संस्था

नासा संस्था - 28 सप्टेंबर
नासाच्या  Space Telescope Science Institute ( Baltimore )येथील प्रमुख खगोल शास्त्रज्ञ William Sparks व त्यांच्या टीमने हबल टेलिस्कोप च्या साहाय्याने काही छायाचित्रे टिपली
तेव्हा त्यांना युरोपाच्या पृष्ठभागावर पक्षांच्या पिसांप्रमाणे दिसणारे पाण्याचे फवारे उडताना दिसले त्यांनी त्या छायाचित्रांचे सखोल निरीक्षण केले
यूरोपा हा गुरूचा चंद्र गुरु ग्रहाभोवती भ्रमण करत असताना हबल टेलिस्कोपने टिपलेल्या काही छायाचित्रांच्या निरीक्षणा नंतर त्यांनी हि माहिती प्रसारित केली आहे
हे पाण्याचे फवारे 125 मैल उंचीचे असण्याच्या शक्यतेबरोबरच ते समुद्राच्या पाण्यातुन निघत असावेत व हे फवारे त्यांच्या सोबत समुद्रातील पदार्थ यूरोपाच्या पृष्ठभागावर आणत असावेत असा निष्कर्षही शास्त्रज्ञांनी काढला आहे

                              यूरोपाच्या पृष्ठभागावर उडणारी पाण्याची कारंजी                               फोटो -नासा संस्था

यूरोपावर प्रचंड मोठा समुद्र अस्तित्वात असून पृथ्वीवरील समुद्राच्या पाण्याच्या दुप्पट पाणीसाठा त्यात असल्याची व हा पाणीसाठा बर्फाच्या जाड थराखाली संरक्षित असणयाची शक्यताही  शास्त्रज्ञांना वाटतेय
ह्या बर्फाच्या थराची जाडी मोजण्यासाठी ह्या थरांमध्ये ड्रिल करून बर्फ खणुन त्याचा नमुना घ्यावा लागेल
आणि जर हे उडणारे फवारे पाण्याचे किंवा वाफेचे असतील तर ड्रिल न करताच निरीक्षणे नोंदवता येतील
ह्या टीमचा मुख्य उद्देश यूरोपावर विरळ वातावरण आहे का ? ह्याचा शोध घेणे हा होता पण अचानक त्यांना युरोपा वर हे पाण्याचे फवारे उडताना दिसले त्या मुळे आता यूरोपावर सौर मंडळाच्या प्रभावाखाली समुद्र व जीवसृष्टी अस्तित्वात असण्याची शक्यता बळावली आहे
2012 साली Lorenz Roth व त्यांच्या टीमने युरोपाच्या बर्फ़ाळ भागावर पाण्याचे वाफारे असंल्याची शक्यता वर्तवली होती त्यांच्या शोधाला आता पृष्ठी मिळाली आहे
जर युरोपा वर पाण्याचे अस्तित्व असल्याचे सिद्ध झाले तर पाणी असणारा तो दुसरा चंद्र ठरेल
ह्या आधी 2005 साली नासाच्या Cassini Orbiter ने शनीच्या Enceladus ह्या चंद्रावर धूळ मिश्रीत पाण्याचे फवारे उडत असल्याचे निरीक्षण नोंदवले होते
असे असले तरीही ह्या छायाचित्रांच्या नोंदीतून ह्या दोनही चंद्रांवर पाणी असण्याची शक्यता आहे पण तसा ठोस पुरावा सद्या तरी उपलब्ध नाही पण लवकरच नासाच्या
आगामी अंतराळ मोहीम 2018 अंतर्गत प्रक्षेपित करण्यात येणाऱया James Webb Space Telescope च्या  साहाय्याने मात्र पाणी अस्तित्वात असल्याचा ठोस पुरावा मिळवता येईल अशी खात्री खगोल शास्त्रज्ञांना वाटतेय शिवाय नासाच्या आगामी अंतराळ मोहिमेत प्रत्यक्ष युरोपा वर जाऊन तिथल्या पृष्ठभागावर उतरुन पाण्याच्या अस्तित्वाचे पुरावे गोळा करण्यासाठी नासाचे वैज्ञानिक प्रयत्नशील आहेत

Thursday 22 September 2016

नासाचे तीन अंतराळवीर 23 सप्टेंबरला अंतराळ स्थानकात जाणार

              नासा अंतराळवीर Shane Kimbrough  व रशियाचे अंतराळवीर Sergey Ryzhikov Andrey Borisenko
                                                                                                                                      फोटो -नासा संस्था

नासा संस्था - 22  सप्टेंबर
नासाच्या अंतराळ मोहीम 49 चे तीन अंतराळवीर 23 सप्टेंबरला अंतराळ स्थानकात राहण्यासाठी जाणार आहेत ह्या अंतराळ मोहिमेत
नासाचे अंतराळवीर Shane Kimbrough
रशियाचे अंतराळवीर Sergey Ryzhikov
व  Andrey Borisenko ह्या तीन अंतराळवीरांचा समावेश आहे
कझाकस्थानातील बैकोनूर येथून सोयूझ MS -02 ह्या अंतरिक्ष यानातून  2.16 p.m.ला हे तीन अंतराळवीर
अंतराळ स्थानकाकडे उड्डाण करतील  (24 sap.12.16 a.m. स्थानिक वेळ व तारिख )
ह्या अंतराळवीरांच्या स्थानकाकडे होणारया उड्डाणाचे लाइव प्रक्षेपण नासा t.v. वरून केल्या जाणार आहे
अंतराळ मोहीम 49/50 चे हे अंतराळवीर पाच महिने अंतराळ स्थानकात राहतील व फेब्रुवारी मध्ये पृथ्वीवर परत येतील
अंतराळ स्थानकात पोहोचण्या आधी दोन दिवस हे अंतराळवीर सोयुझ MS -02 ह्या अंतरिक्ष यानातच राहुन भ्रमण करतील आणि ह्या यानाच्या वेगवेगळ्या systems ची चाचणी घेतील
रविवारी 25 सप्टेंबरला रात्री  3.32 वाजता हे अंतराळवीर अंतराळ स्थानकात प्रवेश करतील
सध्या स्थानकात राहात असलेले केट रुबिन्स ,Lvanishin ,Tokuya Onishi हे तीन अंतराळवीर त्यांचे स्थानकात स्वागत करतील
स्थानकात राहून हे तीन अंतराळवीर तिथे सुरु असलेल्या वैज्ञानिक विषयावरील संशोधनात सहभागी होतील

Sunday 18 September 2016

अंतराळ वीरांगना केट रूबिन्सने अंतराळातून कॅन्सर पीडित रुग्णांशी साधला संवाद

                    केट रूबिन्स  स्थानकातून संवाद साधत पोज घेताना -  फोटो नासा संस्था

नासा संस्था - 17 सप्टेंबर
टेक्सास मधल्या MD अँडरसन कॅन्सर सेंटर Houston इथल्या कॅन्सर पीडित बालकांशी अंतराळ वीरांगना केट रूबिन्सने शुक्रवारी दुपारी अंतराळ स्थानकातून थेट संवाद साधत त्यांच्या प्रश्नांना हसतमुखाने उत्तरे दिली  विशेष म्हणजे ह्या वेळेस तिने परिधान केलेला कलरफुल आकर्षक फ्लाईट सूट  कॅन्सर पीडित  रुग्णांनी 2015 मध्ये तयार केला होता
 कॅन्सर पीडित बालकांनी तिला विचारलेल्या ,
अंतराळ स्थानकात राहून तू काय शिकलीस ?
अंतराळवीरांसाठी स्थानकात रहाण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत ?
तुझ अंतराळवीरांगना व्हायच स्वप्न होत का ? ह्या प्रश्नांना
केटन हसतमुखान उत्तर दिल लहानपणापासूनच तिला अंतराळवीरांगना व्हायच होत आणि बायॉलॉजीत विशेषतः: जीन्स मध्ये रिसर्च करायचं होत
कठोर परिश्रम आणि आपलं स्वप्न साकार करण्याची जिद्द ह्या जोरावर तीच स्वप्न आता पूर्ण झालय
अंतराळ स्थानकात राहण आणि तिथे  राहून रिसर्च करण अत्यंत कठीण असल तरीही आव्हानात्मक व रोमांचक आहे अंतराळवीरांना स्थानकात राहताना कठीण परिस्थितीला सामोरे जाव लागत कठीण संघर्ष करावा लागतो त्या साठी सतर्कता कुतूहल ,जिद्द आणि चिकाटी हवी त्या मुळेच अंतराळ स्थानकातून रोजच दिसणारया आजूबाजूंच्या ग्रहांचे दुर्बिणीच्या साहाय्याने व अत्याधुनिक कॅमेऱ्याने फोटो घेता येतात इथे रोजच नवीन गोष्टी शिकायला मिळतात, वेगवेगळे प्रयोग करता येतात
तिला अंतराळ मोहिमेच्या प्रशिक्षणा दरम्यान व स्थानकातील निवासामुळे स्थानकाशी संबंधित अत्याधुनिक तांत्रिक गोष्टी शिकता आल्या
केटने  कॅन्सर बायॉलॉजी मध्ये डॉक्टरेट केले असून ती सध्या अंतराळवीरांच्या शरीरात अंतराळस्थानकात राहताना होणारया जिनेटिकल बदलांवर व तिथे उद्भवणाऱ्या समस्यांवर उपाय शोधण्यासाटी संशोधन करतेय
नासा संस्थेतील वरिष्ठांच्या उपस्थितीत जवळपास वीस मिनिटे तिने कॅन्सर रुग्णांशी
 थेट अंतराळ स्थानकातून, " Hi ! हॅलो !सी you ! " म्हणत संवाद साधला

           फोटो -नासा संस्था

 कॅन्सर पीडित बालकांमध्ये जागृती निर्माण व्हावी ह्या हेतूने तिने मेडिसिन आणि आर्ट ह्याचा सुरेख मेळ साधत  COURAGE हा आकर्षक कलरफुल फ्लाईट सूट परिधान केला होता
 M D अँडरसन सेंटर आणि नासाच्या जॉन्सन स्पेस सेंटर ह्यांच्या संयुक्त विद्यमाने हा सुट तयार करण्यात आला निवृत्त अंतराळवीर Nicole Stott आणि इतर अंतराळवीरांच्या साहाय्याने ह्या सुटचे डिझाईन तयार करण्यात आले जर्मनी ,रशिया आणि जपान मधील कॅन्सर सेंटर मधल्या बऱया झालेल्या रुग्णांनी मिळून तो सूट पेंट करून आकर्षित केला
ह्या प्रकल्पा अंतर्गत HOPE ,COURAGE , आणि UNITY असे तीन फ्लाईट सूट तयार केले गेले विशेष म्हणजे तिने हा सूट तयार झाला तेव्हा रंगवण्याआधी पाहिला होता आणि नंतर तो रंगवताना त्या मुळे अंतराळ स्थानकात जेव्हा हा सूट पोहोचला तेव्हा तो कसा दिसतोय हे पाहण्याची अनिवार इच्छा तिला झाली होती म्हणून तो सूट आधी पाहण्याची इच्छा तिने इतर अंतराळ वीरांना केली होती आणि त्यांनी ती पूर्ण देखील केली तेव्हा तिने COURAGE ह्या सुटची निवड केली
जेकब ह्याने तिला जेव्हा विचारले कि," केट तुला हा सूट आवडला का ? हा घातल्यानंतर तुला कसे वाटतेय ?"
तेव्हा केट म्हणाली कि,"अमेझिंग ! आणि प्रेरणादायी वाटतेय !" तुम्ही जेव्हा हा सूट पेंट करत होतात तेव्हा निश्चितच तुमच्या मनात मी हा सूट परिधान केल्यावर कशी दिसेन असा विचार आला असेल ना! आता तुमचा सूट अंतराळ स्थानकात पोहोचलाय आणि मी तो परिधान केलाय असे म्हणत केटन त्याच्यासाठी खास पोज देत  स्थानकात स्वत: भोवती गोल फिरत व उंचावून तो सुट तिला कसा दिसतोय हेही त्याला दाखवले आणि तो तयार कारणाऱयांचे विशेष आभार मानले

Thursday 8 September 2016

नासाच्या मोहीम 48 चे अंतराळवीर पृथ्वीवर सुखरूप परतले

                                अंतराळ मोहीम 48 चे अंतराळवीर- फोटो -नासा संस्था

नासा संस्था -7 सप्टेंबर
नासाच्या अंतराळ मोहीम 48 चे अंतराळवीर जेफ विल्यम्स , रशियाचे अंतराळवीर Alexey Ovchinin आणि Oleg Skripochka  
हे सहा सप्टेंबरला सोयूझ T M A -20 M ह्या अंतरिक्ष यानाने अंतराळ स्थानकातून कझाकस्थानातील Dzhezkazgan येथे रात्री 9.13 वाजता सुखरूप परतले  आहेत 
( कझाकस्थानातील  तारीख 7sep व वेळ  7.13 a.m.)


            अंतराळवीर जेफ विल्यम्स पृथ्वीवर परतल्यानंतर                                       फोटो -नासा संस्था

जेफ विल्यम्स यांनी त्यांच्या चार मोहिमेत अंतराळस्थानकात 534 दिवस वास्तव्य केले असून त्यांनी अमेरिकन अंतराळवीरांचा स्थानकात जास्त दिवस राहण्याचा विक्रम मोडला आहे आता त्यांनी अंतराळस्थानकात जास्त दिवस राहणारया अंतराळवीरांच्या यादीत प्रथम स्थान नोंदवले आहे
जेफ विल्यम्स कुशल व अनुभवी अंतराळवीर असून त्यांनी 2000 सालापासून अंतराळवारी केली आहे त्यांच्या सुरवातीच्या अंतराळ मोहिमेच्या वेळी तर अंतराळ स्थानकाची बांधणीही पूर्ण झाली नव्हती आता मात्र अंतराळस्थानक अत्याधुनिक सोयीनीं परिपूर्ण करण्यात येत आहे अंतराळस्थानकाला आता व्यावसायिक स्वरूप देण्यावर भर देण्यात येत आहे शिवाय science आणि टेकनॉलॉजी सारख्या अनेक विषयांवर हे अंतराळवीर स्थानकात राहून सतत नवनवीन संशोधन करत आहेत
इंटर नॅशनल स्पेस स्टेशनचे प्रोग्राम मॅनेजर Shireman म्हणतात कि ,जेफ यांनी स्थानकात राहून भविष्यात स्थानकात येणारया व्यावसायिक अंतरिक्ष यानाच्या पार्किंगची सोय करून मोलाची मदत केली आहे त्यांचा आम्हाला अभिमान वाटतोय
रशियाचे अंतराळवीर Oleg Skripochka ह्यांनी 331 दिवस अंतराळ स्थानकात वास्तव्य केले असून हि त्यांची दुसरी अंतराळ मोहीम होती आणि रशियाचे दुसरे अंतराळवीर Alexey Ovchinin ह्यांची  मात्र हि पहिलीच अंतराळ मोहीम होती त्यांनी त्यांच्या ह्या पहिल्याच अंतराळ मोहिमेत 172 दिवस स्थानकात वास्तव्य केले 
ह्या अंतराळ वीरांच्या स्थानकातील वास्तव्या दरम्यान त्यांनी स्थानकात आलेल्या पाच अंतरिक्ष यानांचे स्वागत केले आणि शंभराहून अधिक वैज्ञानिक विषयांच्या संशोधनात सहभाग नोंदविला
सध्या अंतराळ स्थानकात Anatoly Lvanishin,Takuya Onishi हे दोन रशियाचे अंतराळवीर व केट रुबिन्स हि नासाची अंतराळ वीरांगना अंतराळ स्थानकात राहून त्यांच्या वैज्ञानिक विषयांवर संशोधन करत आहेत
23 सप्टेंबरला आणखी तीन अंतराळवीर स्थानकात राहण्यासाठी जाणार असून मोहीम 49 च्या अंतराळ मोहिमेत
Shane Kimbrough (Nasa)
Sergey Ryzhikov व  Andrey Borisenko (Roscosmos) ह्या अंतराळवीरांचा त्यात समावेश आहे

Saturday 3 September 2016

नासाचे जेफ विल्यम्स व दोन अंतराळवीर सहा तारखेला पृथ्वीवर परतणार

           अंतराळवीर जेफ विल्यम्स  ,Alexey Ovchinin  आणि Oleg Skripochka              फोटो -   नासा संस्था 


नासा संस्था -3 सप्टेंबर
नासाच्या अंतराळ मोहीम 48 चे कमांडर जेफ विल्यम्स ,सोयूझ कमांडर Alexey Ovichinin  आणि फ्लाईट इंजिनीअर Oleg Skripochka (Roscosmos) हे तीन अंतराळवीर सहा सप्टेंबरला अंतराळ स्थानकातून पृथ्वीवर परतणार आहेत (कझाकस्थानची तारीख सात सप्टेंबर )
सोयूझ T M A-20 M ह्या अंतरिक्ष यानातून हे तीन अंतराळवीर पृथ्वीवर परतणार आहेत
संध्याकाळी 5.51 मिनिटांनी हे अंतराळवीर अंतराळ स्थानकातून निघतील व  रात्री  9.14 वाजता ते कझाकस्थान येथे पोहोचतील
5 सप्टेंबरला सकाळी 9  वाजता जेफ विल्यम्स अंतराळ स्थानकाच्या कमांडर पदाची सूत्रे अंतराळवीर Anatoly Lvanishin  ह्याच्या हातात देतील
दुपारी 2.15 वाजता  अंतराळ स्थानकात फेअरवेलचा कार्यक्रम होईल आणि  संध्याकाळी 5.51 वाजता
अंतराळवीर अंतराळ स्थानक सोडतील
हे अंतराळवीर मार्च महिन्यात अंतराळ स्थानकात राहण्यासाठी गेले होते व ह्या अंतराळ वीरांनी 172 दिवस स्थानकात मुक्काम केला
मोहीम 48 च्या अंतराळवीरांनी मिळुन Earth Science,Physical science ,Biology ,Biotechnology ह्या विषयांचे शंभरहून अधिक वैज्ञानिक प्रयोग करून त्यावर सखोल संशोधन केले आहे आता त्यांचा कार्यकाळ पूर्ण करून ते पृथ्वीवर परतणार आहेत
              जेफ विल्यम्स ह्यांनी 2000 सालापासूनच्या त्यांच्या चार अंतराळ मोहिमे दरम्यान अंतराळ स्थानकात 534 दिवस राहण्याचा विक्रम केला आहे आणि आतापर्यंतच्या अमेरिकन अंतराळवीरांच्या जास्त दिवस अंतराळ स्थानकात राहण्याचा विक्रम मोडला आहे त्यांनी ह्या अंतराळ मोहिमेत स्थानकाच्या कामासाठी दोनवेळा स्पेस वॉक केला हा त्यांचा पाचवा स्पेस वॉक होता  
हे तीनही अंतराळवीर पृथ्वीवर परतल्यानंतर आता अंतराळ स्थानकाच्या अंतराळ मोहीम 49 ह्या पथकाची सूत्रे रशियाचे अंतराळवीर  Anatoly Lvanishin हे  सांभाळतील
आता केट रूबिन्स ,Takuya Onishi व Anatoly हे तीन अंतराळवीर नवीन तीन अंतराळवीर स्थानकात येईपर्यंत दोन आठवडे अंतराळ स्थानकात राहून त्यांचे वैज्ञानिक संशोधन सुरु ठेवतील  

Friday 2 September 2016

अंतराळवीर जेफ विल्यम्स व केट रूबिन्स ह्यांचा स्पेसवॉक संपन्न



                                                 अंतराळवीर जेफ विल्यम्स आणि केट रूबिन्स  -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -2 सप्टेंबर
अंतराळवीर जेफ विल्यम्स व केट रूबिन्स ह्यांचा एक सप्टेंबरचा स्पेसवॉक संपन्न झाला
हा स्पेस वॉक ठरल्या प्रमाणे सकाळी आठ वाजता सुरु झाला व सहा तास अठ्ठेचाळीस मिनिटांनी दुपारी दोन वाजून एक्केचाळीस मिनिटाला संपला
आधी दिलेल्या बातमीनुसार ह्या स्पेस वॉक दरम्यान ह्या दोन्ही अंतराळवीरांनी अंतराळ स्थानकाबाहेरील थर्मल रॅडिएटर काढणे .स्थानकाला दोन उच्च प्रतीचे कॅमेरे बसवणे आणि सोलर array च्या जॉईंटचा बोल्ट टाईट करणे हि कामे नियोजित वेळेत अत्यंत कुशलतेने पूर्ण केली आहेत
आतापर्यंत अंतराळवीरांनी जवळपास 1,217 तासांचा स्थानकाच्या कामासाठी अंतराळस्थानका बाहेर स्पेस वॉक केला आहे 

Wednesday 31 August 2016

नासाच्या अंतराळवीरांचा 1 सप्टेंबरला पुन्हा स्पेस वॉक

                    अंतराळवीर स्पेसवॉक करताना -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -30ऑगस्ट

दोन आठवडयाच्या आत नासाचे अंतराळवीर जेफ विल्यम्स व केट रूबिन्स स्थानकाबाहेर पुन्हा स्पेस वॉक करणार आहेत  1 सप्टेंबरला अंतराळस्थानकाच्या तांत्रिक कामासाठी ते हा स्पेस वॉक करणार आहेत
जेफ विल्यम्स अंतराळस्थानका बाहेरील पोर्ट साईडचे तांत्रिक काम करणार आहेत तर केट रूबिन्स स्थानकाबाहेरील कुलिंग सिस्टीमचे रेडियेटर काढण्याचे काम करणार आहे स्थानकातील कुलिंग सिस्टीम मधून अमोनिया गॅस लीक होत असल्यामुळे पर्यायी व्यवस्थेसाठी हा रेडीयेटर बसवण्यात आला होता
आता तो काढण्याचे काम ती करेल व स्थानकाबाहेरील सोलर सिस्टीमचा रॉड टाईट करण्याचे काम ती
करेल स्थानकाबाहेर लाईटस व उच्च दर्जाचा कॅमेरा बसविण्याचे कामही केट करणार आहे हा कॅमेरा बसविल्या मुळे अंतराळवीरांना स्थानकातून बाहेरच्या घडामोडीवर लक्ष ठेवता येईल
शीवाय अंतराळस्थानकात येणारया व जाणारया अंतराळवीरांच्या अंतरिक्ष यानावर व मालवाहू यानावरही नजर ठेवता येईल

                                           अंतराळवीर जेफ विल्यम्स -  फोटो -नासा संस्था

आतापर्यंतचा अंतराळवीरांचा अंतराळस्थानकाबाहेरील हा 195 वा स्पेस वॉक असेल
जेफ विल्यम्स यांचा हा पाचवा स्पेस वॉक आहे शिवाय जेफ विल्यम्स ह्यांनी 24ऑगस्टला अंतराळ स्थानकात 520 दिवस राहण्याचा विक्रम केला असून त्यांनी ह्या आधीचा स्कॉट केली ह्यांचा जास्ती दिवस अंतराळ स्थानकात राहण्याचा विक्रम मोडला आहे  
केट रुबिन्स हिचा हा दुसरा स्पेस वॉक असेल त्यांच्या ह्या स्पेस वॉकच्या कामात जपानचे अंतराळवीर Takuya Onishi हे अंतराळ स्थानकातुन त्यांना मदत करतील
1 सप्टेंबरला गुरुवारी (अमेरिकन तारीख व वेळ ) सकाळी आठ वाजता हा स्पेस वॉक सुरु होईल आणि जवळपास सहा साडेसहा तासानंतर तो संपेल नासा टी वी वरून ह्याचे थेट प्रक्षेपण केल्या जाईल
    

Friday 26 August 2016

Orion स्पेसक्राफ्टची वॉटर ड्रॉप टेस्ट यशस्वी

                                 Orion स्पेस क्राफ्टची वॉटर ड्रॉप टेस्ट फोटो -नासा संस्था

नासा संस्था -26 ऑगस्ट
25 ऑगस्टला नासाच्या व्हर्जिनिया येथील Langley Research Center ,Hampton मध्ये 
Orion स्पेसक्राफ्टची वीस फूट खोल हायड्रो इम्पॅक्ट बेसिन मध्ये वॉटर ड्रॉप टेस्ट करण्यात आली 
आगामी मंगळ मोहिमेसाठी  Orion अंतरिक्ष यान बनवण्यात आले आहे
ह्या  Orion वॉटर ड्रॉप टेस्टच्या वेळी नासाचे Eric Gillard  व Mark Boldnin उपस्थित होते
Orion  हे संशोधित नवीन अंतरिक्ष यान आहे हे यान आधीच्या यानापेक्षा वेगळे असून ह्या यानात अंतराळवीरांसाठी आधीपेक्षा जास्त सुविधा देण्यात आल्या आहेत अंतराळवीरांचा दूरवरचा अंतरिक्ष प्रवास सुखकर व्हावा व संकट आल्यास त्यांना त्यातून निर्विघ्नपणे बाहेर पडता यावे ह्या साठी विशेष सोय ह्या यानात करण्यात आली आहे
ह्या वॉटर ड्रॉप टेस्ट मुळे इंजिनीअर्संना ह्या यानातून पृथ्वीवर परतणारया अंतराळवीरांची सुरक्षितता व ह्या यानाची  क्षमता पडताळून पाहता आली विशेषतः अंतराळवीरांना घेऊन येणारे अंतरिक्ष यान जेव्हा परतते तेव्हा अंतराळातून पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करते आणि पॅसिफिक महासागराकडे झेपावत पॅसिफिक महासागरात शिरते
पॅसिफिक महासागरात शिरल्या नंतर Orion अंतरिक्ष यान यानातील अंतराळवीरांची सुरक्षितता राखण्यास सक्षम आहे का? याची चाचणी घेण्यात आली    

Sunday 21 August 2016

अंतराळवीर जेफ विल्यम्स आणि केट रुबिन्स ह्यांचा स्पेसवॉक यशस्वी

             केट रूबिन्स स्पेसवॉक दरम्यान स्थानकाबाहेर अडॉप्टर जोडणीचे काम करताना -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -20 ऑगस्ट
नासाच्या अंतराळ मोहीम 48 चे कमांडर जेफ विल्यम्स आणि  फ्लाईट इंजीनिअर केट रुबिन्स ह्यांनी 19ऑगस्टला  तांत्रिक कामासाठी केलेला स्पेसवॉक यशस्वी झाला
ह्या स्पेसवॉक साठी केटने तिच्या प्रशिक्षणादरम्यान सराव केला होता त्या मुळेच तिने अंतराळ स्थानकाला अडॉप्टर जोडण्याचे काम कुशलतेने व निडरतेने केले जेफ विल्यम्स ह्यांचा हा चवथा स्पेसवॉक असल्याने ते अनुभवी होते पण केटचा मात्र हा पहिलाच स्पेसवॉक होता  ह्या स्पेसवॉक आधी ह्या दोन अंतराळवीरांनी त्यांच्या स्पेससूटची बॅटरी चार्ज केली होती जेफ विल्यम्स ह्यांच्या स्पेससूटवर लाल रंगांच्या रेषा तर केट रूबिन्स हिच्या स्पेससूट वर पांढरया रंगांच्या रेषा होत्या अंतराळवीरांनी केलेला हा 194वा स्पेस वॉक होता
अंतराळ स्थानकात आगामी काळात येणारया बोईंग आणि स्पेस X कमर्शियल क्रू स्पेसक्राफ्टच्या तयारीसाठी हा स्पेसवॉक करण्यात आला 5 तास 58 मिनिटांच्या स्पेसवॉक मध्ये ह्या दोन अंतराळवीरांनी पहिले दोन इंटर नॅशनल डॉकिंग अडॉप्टर अंतराळस्थानकाला यशस्वीपणे जोडण्याचे अत्यंत कठीण व जिकिरीचे काम यशस्वीपणे पार पाडले
अडॉप्टर जोडल्यामुळे हे दोन स्पेसक्राफ्ट अंतराळस्थानकात येण्यासाठी व पार्किंगसाठी मार्ग तयार करण्यात आला आहे नासाच्या कमर्शियल क्रू प्रोग्राम अंतर्गत हे अडॉप्टर बनवण्यात आले आहेत

            फोटो -नासा संस्था

अमेरिकेच्या फ्लोरिडा येथील स्पेस कोस्ट वरून अंतराळस्थानकाकडे होणारया अंतराळवीरांच्या उड्डाणांचा उपयोग मानवी अंतराळमोहिमेसाठी व वैज्ञानिक प्रयोगासाठी होतोय
शिवाय ब्रह्मांडातील दूरवरच्या ग्रहांच्या आगामी अंतराळमोहिमेसाठी विशेषतः मंगळ मोहिमेसाठीही ह्या अंतराळमोहिमांचा उपयोग होईल असे शास्त्रज्ञांना वाटतेय
स्पेसवॉक करणे सोपे नसते कारण अंतराळात कुठलीही वस्तू गुरुत्वाकर्षणाच्या अभावामुळे तरंगते अगदी अंतराळवीर सुद्धा ! आणि त्यांच्या ह्या यांत्रिक जोडणीसाठीचे सामान सुद्धा! म्हणूनच आपला तोल सांभाळून हे सामान पकडत काम करण कठीणच असत त्यात खाली आणि आजूबाजूला अथांग पोकळी ! ह्या स्पेसवॉकच दृश्य सामान्यजनांसाठी थरारक ! काळजाचा ठोका चुकवणार असल तरी ह्या अंतराळवीरांना मात्र त्याची तमा नसते त्यांच्यासाठी हा स्पेसवॉक आव्हानात्मक  आनंददायी असतो ,त्यांच्या बुद्धीचा कस लावणार असतो
विशेष म्हणजे फ्लाईट इंजिनीअर केट सारख्या एका अंतराळवीरांगनेन केलेला हा पहिला यशस्वी स्पेसवॉक म्हणजे तमाम महिलावर्गाला अभिमानास्पदच !



Tuesday 16 August 2016

अंतराळवीर Jeff Williams व Kate Rubins 19 ऑगस्टला स्पेस वॉक करणार

                        नासाचे अंतराळवीर तांत्रिक जोडणीची तयारी करताना -फोटो -नासा संस्था   

नासा संस्था -16 ऑगस्ट 
19ऑगस्टला नासाच्या अंतराळ मोहीम 48चे कमांडर Jeff Williams व Flight Engineer Kate Rubins हे दोघे अंतराळ स्थानकाबाहेर आवश्यक तांत्रिक कामासाठी स्पेस वॉक  करणार आहेत
15 ऑगस्टला दुपारी दोन वाजता अमेरिकेतील होस्टन इथल्या जॉन्सन स्पेस सेंटर मधून अंतराळ स्थानकातील अंतराळवीर व कमर्शियल crew एक्सपर्ट ह्यांच्यात ह्या स्पेस वॉक संदर्भात आवश्यक असलेल्या अडॉप्टरच्या तांत्रिक जोडणीसंबंधित चर्चा करण्यात आली ह्या चर्चेचे लाईव्ह प्रक्षेपण पत्रकारांना दाखवण्यात आले नासाच्या अंतराळ मोहीम 48 चे अंतराळवीर स्थानकात पोहोचल्या नंतरच्या ह्या पहिल्या  इंटर नॅशनल डॉकिंग अडॉप्टर (I D As ) च्या स्थानकाशी करण्यात येणारया जोडणी बद्दल ह्या कार्यक्रमात अंतराळ वीरांशी थेट स्थानकात संवाद साधत आवश्यक सूचना देण्यात आल्या
अंतराळ स्थानकातील अंतराळवीर Jeff Williams व फ्लाईट इंजिनीअर Kate Rubins ह्यांनी ह्या संवादादरम्यान  विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली आणि त्यांची ह्या स्पेस वॉक साठीची तयारी पूर्ण झाली असल्याचे सांगितले
           केट रूबिन्स आणि जेफ विल्यम्स  अंतराळस्थानकात स्पेसवॉकची तयारी करताना

                                                                                                                              फोटो -नासा संस्था 
Kate Rubins हिचा हा पहिलाच स्पेस वॉक आहे त्या मुळे तूला ह्या स्पेस वॉक बद्दल काय वाटतेय !
तू  त्या साठी तयार आहेस का ? असे विचारताच केट म्हणाली ," कि तिने आधीच तिच्या ट्रेनिंग दरम्यान ह्या स्पेस वॉक साठी आवश्यक तयारी केली असल्यामुळे ती ह्या स्पेस वॉक साठी तयार आहेच शिवाय हा पहिलावहिला स्पेस वॉक चा अनुभव तिच्यासाठी थरारक  रोमांचकारी आणि आनंददायी असेल "
Jeff  Williams ह्यांचा मात्र हा चवथा स्पेस वॉक असल्यामुळे ते अनुभवी आहेत स्पेस वॉक करणे अत्यंत कठीण आणि धोकादायक असले तरीही तो उपयुक्त आणि आवश्यक कामासाठीच करावा लागतो त्यांच्यासाठीही स्पेस वॉकचा अनुभव आनंददायी व थरारक असतो त्या साठी खूप तयारी मात्र करावी लागते असं त्यांनी सांगितल
19 ऑगस्टला करण्यात येणारया ह्या स्पेस वॉक मध्ये करण्यात येणारया अडॉप्टरच्या तांत्रिक जोडणीमुळे स्थानकात आगामी काळात येणारया Boeing Space व  X Commercial Crew Spacecraft च्या पार्किंग साठी जागा व मार्ग तयार करण्यात येईल हे अडॉप्टर वीस जुलैलाच अंतराळ स्थानकात पाठवले होते आता 19ऑगस्टला ते अंतराळस्थानकाला जोडण्यात येईल जपानचे अंतराळवीर Onishi  ह्या दोन अंतराळवीरांना स्पेस वॉक दरम्यान मदत करणार असून त्यांच्या अँक्टिव्हिटीज वर लक्ष ठेवतील
सकाळीआठ वाजून पाच  मिनिटाला हा स्पेस वॉक सुरु होईल सहा साडेसहा तासांच्या ह्या अंतरिक्षातील स्पेस वॉकचे लाईव्ह प्रक्षेपण नासा टी वी वरून केले जाणार आहे
ह्या अंतराळवीर जेफ विल्यम्स यांनी स्पेस वॉकची तयारी पूर्ण झाल्याचे twitter वरून कळवले आहे

Friday 12 August 2016

मंगळ ग्रहावरील भविष्यातील मानवी निवासाच्या नियोजनासाठी सहा कंपन्यांची निवड

           अंतराळातील भविष्यातील मानवी निवासाचे काल्पनिक मॉडेल                          फोटो -नासा संस्था

नसा संस्था -12 ऑगस्ट

नासाचे शास्त्रज्ञ आगामी मानव सहित मंगळ मोहिमेची जोरदार तयारी करत आहेत आतापर्यंतच्या त्यांच्या यशस्वी मंगळमोहीमेमुळे त्यांचा उत्साह द्विगुणित झाला असून आता नासाचे शास्त्रज्ञ मंगळावर मानव पाठवण्या सोबतच मानवाच्या तिथल्या निवासासाठीही प्रयत्नशील आहेत
भविष्यात जर नासाच्या संशोधकांच्या मानवासहित मंगळ मोहिमेला यश मिळाले आणि मानवाला तिथे राहण्यायोग्य वातावरण सापडले तर मानव निश्चितच तिथे निवास करेल आणि त्या साठी त्याला तिथे घराची आवश्यकता भासेल
म्हणूनच नासाचे शास्त्रज्ञ आतापासूनच भविष्यातील मंगळ ग्रहावरील वसाहतीचे नियोजन करण्यासाठी प्रयत्न करत आहेत
आणि त्याच उपक्रमाअंतर्गत नासाने आता अमेरिकेतील सहा कंपन्यांची ह्या मंगळावरील वसाहतीच्या नियोजनासाठीचे मॉडेल बनवण्यासाठी निवड केली आहे

Bigelow Aerospace-Las Vegas
Boeing Of Pasadena-Texas
Lockheed Martin- Denver
Orbital ATK-Dulles,Virginia
Sierra Nevada Corporations Space Systems of Louisville-Coloorado
NanoRacks of Webster-Texas

 ह्या सहा अमेरिकन कंपन्या मिळुन येत्या दोन वर्षात भविष्यातील मंगळ ग्रहावरील मानवी निवासासाठी अपेक्षित मॉडेल बनवतील त्या साठी नासा संस्थेतर्फे 65 मिलियन डॉलर खर्च होईल असा संशोधकांचा अंदाज आहे
 2016 व  2017  ह्या वर्षात सुरु असलेल्या ह्या प्रोजेक्ट मध्ये जर अपेक्षेपेक्षा जास्त खर्च आला तर नासा संस्था  2018  साली ह्या जास्तीच्या खर्चाचा भार उचलेल तर ह्या सहा कंपन्यांतर्फे तीस टक्के खर्च करण्यात येईल
नासाच्या हॅबिटेशन सिस्टीम अंतर्गत मंगळ ग्रहावर मानवी निवासासाठी पोषक वातावरण असलेली सुरक्षित जागा शास्त्रज्ञ शोधत आहेत
नासाच्या अमेरिकन  अंतरिक्ष एजन्सीचे प्रमुख निर्देशक  Jason Crusan  म्हणतात कि,शास्त्रज्ञ 
आता मानवाच्या आगामी अंतरिक्ष मोहिमेसाठी आणि मानवाच्या इतर ग्रहावरील निवासासाठीही प्रयत्नशील आहेत  
सध्या शास्त्रज्ञ मंगळ ग्रहावरील मानवी वस्ती निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत
आता जर मंगळावर मानव पोहोचला किंवा भविष्यात तेथे मानवी वस्ती निर्माण केली तर त्यांना पृथ्वीवरून आवश्यक सामान पाठवण्याची गरज भासू नये आणि त्यांना पृथ्वीवर विसंबुन न राहताही महिनोंमहिने किंवा वर्षेसुद्धा तिथे राहता येईल व संशोधन करता येईल ह्या साठी संशोधक प्रयत्न करत आहेत