Wednesday 28 September 2016

गुरूचा चंद्र Europa वर उडताहेत पाण्याचे फवारे

                           यूरोपावरील पृष्ठभागावर उडणारे पाण्याचे फवारे                                    -फोटो नासा संस्था

नासा संस्था - 28 सप्टेंबर
नासाच्या  Space Telescope Science Institute ( Baltimore )येथील प्रमुख खगोल शास्त्रज्ञ William Sparks व त्यांच्या टीमने हबल टेलिस्कोप च्या साहाय्याने काही छायाचित्रे टिपली
तेव्हा त्यांना युरोपाच्या पृष्ठभागावर पक्षांच्या पिसांप्रमाणे दिसणारे पाण्याचे फवारे उडताना दिसले त्यांनी त्या छायाचित्रांचे सखोल निरीक्षण केले
यूरोपा हा गुरूचा चंद्र गुरु ग्रहाभोवती भ्रमण करत असताना हबल टेलिस्कोपने टिपलेल्या काही छायाचित्रांच्या निरीक्षणा नंतर त्यांनी हि माहिती प्रसारित केली आहे
हे पाण्याचे फवारे 125 मैल उंचीचे असण्याच्या शक्यतेबरोबरच ते समुद्राच्या पाण्यातुन निघत असावेत व हे फवारे त्यांच्या सोबत समुद्रातील पदार्थ यूरोपाच्या पृष्ठभागावर आणत असावेत असा निष्कर्षही शास्त्रज्ञांनी काढला आहे

                              यूरोपाच्या पृष्ठभागावर उडणारी पाण्याची कारंजी                               फोटो -नासा संस्था

यूरोपावर प्रचंड मोठा समुद्र अस्तित्वात असून पृथ्वीवरील समुद्राच्या पाण्याच्या दुप्पट पाणीसाठा त्यात असल्याची व हा पाणीसाठा बर्फाच्या जाड थराखाली संरक्षित असणयाची शक्यताही  शास्त्रज्ञांना वाटतेय
ह्या बर्फाच्या थराची जाडी मोजण्यासाठी ह्या थरांमध्ये ड्रिल करून बर्फ खणुन त्याचा नमुना घ्यावा लागेल
आणि जर हे उडणारे फवारे पाण्याचे किंवा वाफेचे असतील तर ड्रिल न करताच निरीक्षणे नोंदवता येतील
ह्या टीमचा मुख्य उद्देश यूरोपावर विरळ वातावरण आहे का ? ह्याचा शोध घेणे हा होता पण अचानक त्यांना युरोपा वर हे पाण्याचे फवारे उडताना दिसले त्या मुळे आता यूरोपावर सौर मंडळाच्या प्रभावाखाली समुद्र व जीवसृष्टी अस्तित्वात असण्याची शक्यता बळावली आहे
2012 साली Lorenz Roth व त्यांच्या टीमने युरोपाच्या बर्फ़ाळ भागावर पाण्याचे वाफारे असंल्याची शक्यता वर्तवली होती त्यांच्या शोधाला आता पृष्ठी मिळाली आहे
जर युरोपा वर पाण्याचे अस्तित्व असल्याचे सिद्ध झाले तर पाणी असणारा तो दुसरा चंद्र ठरेल
ह्या आधी 2005 साली नासाच्या Cassini Orbiter ने शनीच्या Enceladus ह्या चंद्रावर धूळ मिश्रीत पाण्याचे फवारे उडत असल्याचे निरीक्षण नोंदवले होते
असे असले तरीही ह्या छायाचित्रांच्या नोंदीतून ह्या दोनही चंद्रांवर पाणी असण्याची शक्यता आहे पण तसा ठोस पुरावा सद्या तरी उपलब्ध नाही पण लवकरच नासाच्या
आगामी अंतराळ मोहीम 2018 अंतर्गत प्रक्षेपित करण्यात येणाऱया James Webb Space Telescope च्या  साहाय्याने मात्र पाणी अस्तित्वात असल्याचा ठोस पुरावा मिळवता येईल अशी खात्री खगोल शास्त्रज्ञांना वाटतेय शिवाय नासाच्या आगामी अंतराळ मोहिमेत प्रत्यक्ष युरोपा वर जाऊन तिथल्या पृष्ठभागावर उतरुन पाण्याच्या अस्तित्वाचे पुरावे गोळा करण्यासाठी नासाचे वैज्ञानिक प्रयत्नशील आहेत

No comments:

Post a Comment