अंतराळातील भविष्यातील मानवी निवासाचे काल्पनिक मॉडेल फोटो -नासा संस्था
नसा संस्था -12 ऑगस्ट
नासाचे शास्त्रज्ञ आगामी मानव सहित मंगळ मोहिमेची जोरदार तयारी करत आहेत आतापर्यंतच्या त्यांच्या यशस्वी मंगळमोहीमेमुळे त्यांचा उत्साह द्विगुणित झाला असून आता नासाचे शास्त्रज्ञ मंगळावर मानव पाठवण्या सोबतच मानवाच्या तिथल्या निवासासाठीही प्रयत्नशील आहेत
भविष्यात जर नासाच्या संशोधकांच्या मानवासहित मंगळ मोहिमेला यश मिळाले आणि मानवाला तिथे राहण्यायोग्य वातावरण सापडले तर मानव निश्चितच तिथे निवास करेल आणि त्या साठी त्याला तिथे घराची आवश्यकता भासेल
म्हणूनच नासाचे शास्त्रज्ञ आतापासूनच भविष्यातील मंगळ ग्रहावरील वसाहतीचे नियोजन करण्यासाठी प्रयत्न करत आहेत
आणि त्याच उपक्रमाअंतर्गत नासाने आता अमेरिकेतील सहा कंपन्यांची ह्या मंगळावरील वसाहतीच्या नियोजनासाठीचे मॉडेल बनवण्यासाठी निवड केली आहे
Bigelow Aerospace-Las Vegas
Boeing Of Pasadena-Texas
Lockheed Martin- Denver
Orbital ATK-Dulles,Virginia
Sierra Nevada Corporations Space Systems of Louisville-Coloorado
NanoRacks of Webster-Texas
ह्या सहा अमेरिकन कंपन्या मिळुन येत्या दोन वर्षात भविष्यातील मंगळ ग्रहावरील मानवी निवासासाठी अपेक्षित मॉडेल बनवतील त्या साठी नासा संस्थेतर्फे 65 मिलियन डॉलर खर्च होईल असा संशोधकांचा अंदाज आहे
2016 व 2017 ह्या वर्षात सुरु असलेल्या ह्या प्रोजेक्ट मध्ये जर अपेक्षेपेक्षा जास्त खर्च आला तर नासा संस्था 2018 साली ह्या जास्तीच्या खर्चाचा भार उचलेल तर ह्या सहा कंपन्यांतर्फे तीस टक्के खर्च करण्यात येईल
नासाच्या हॅबिटेशन सिस्टीम अंतर्गत मंगळ ग्रहावर मानवी निवासासाठी पोषक वातावरण असलेली सुरक्षित जागा शास्त्रज्ञ शोधत आहेत
नासाच्या अमेरिकन अंतरिक्ष एजन्सीचे प्रमुख निर्देशक Jason Crusan म्हणतात कि,शास्त्रज्ञ
आता मानवाच्या आगामी अंतरिक्ष मोहिमेसाठी आणि मानवाच्या इतर ग्रहावरील निवासासाठीही प्रयत्नशील आहेत
सध्या शास्त्रज्ञ मंगळ ग्रहावरील मानवी वस्ती निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत
आता जर मंगळावर मानव पोहोचला किंवा भविष्यात तेथे मानवी वस्ती निर्माण केली तर त्यांना पृथ्वीवरून आवश्यक सामान पाठवण्याची गरज भासू नये आणि त्यांना पृथ्वीवर विसंबुन न राहताही महिनोंमहिने किंवा वर्षेसुद्धा तिथे राहता येईल व संशोधन करता येईल ह्या साठी संशोधक प्रयत्न करत आहेत

No comments:
Post a Comment