दिवाळीचा सण संपला तरीही आसमंतात फटाक्यांचे आवाज घुमत होते फेस्टिव्ह मूडमधून पुरते बाहेर न पडलेल्या लोकांना मोदींनी फोडलेल्या ऑटोंबाँम्बन खडबडुन जाग केल आठ नोव्हेंबरला मोदींनी दहा तारखेपासून पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून बाद झाल्याच जाहीर केल आणि नागरिकांची झोप उडाली आठ नोव्हेंबर पाचशे आणि हजारांच्या नोटांसाठी शेवटची ठरली आता चलनबंदीमुळे त्या कोठेही दिसणार नव्हत्या, चालणार नव्हत्या आजवर ज्या नोटांनी नागरिकांचा प्रेस्टिज पॉईंट वाढवला त्याच नोटा लोकांसाठी डोकेदुखी ठरणार होत्या आणि " नको ती पाचशे हजाराची नोट" ! अस प्रत्येकाला वाटू लागल
टेन्शनची ती रात्र संपून सकाळ होताच जो,तो आपल्याजवळच्या पाचशे हजाराच्या नोटा घेऊन खरेदीसाठी बाहेर पडला एरव्ही दूध,भाजीवाला व इत्तर ठिकाणी चिल्लर घेऊन जाणारे नागरिकही पाचशे हजाराच्या नोटा घेऊन गेल्याने जिथे तिथे ह्या नोटा दिसू लागल्या पण चलन बंदीने कोणीही त्या नोटा स्वीकारत नव्हते ज्यांना हा निर्णय माहीत नव्हता त्यांनी ह्या नोटा स्वीकारल्या पण बहुतेक ठिकाणी हि बातमी पोहोचली होती
शिवाय एरवी भाजी मार्केटमध्ये शंभर,पन्नासची चिल्लर मिळत नाही तिथे ह्या न चालणारया नोटांची चिल्लर कोण देणार?
जुन्या पाचशेच्या नोटांनाही आता चालनबंदी
लोकांनी आपले पैसे गुंतवण्यासाठी सोनाराच्या दुकानात गर्दी केली पण तिथेही ह्या नोटा स्वीकारल्या जात नव्हत्या आणि घेतल्या तर त्यात कमिशन घेऊन मग कोण खरेदी करणार? पण तरीही सोन्याचे भाव त्या दिवशी सर्वसामान्यांसाठी तीस ऐवजी चवतीस हजार जिल्याच्या ठिकाणी तर मुंबई दिल्लीला चक्क साठ हजारावर गेले आणि नंतर सत्तर हजार रुपये तोळ्यांनी सोने विक्री झाली पण मोदींनी सोने घेण्यावर व विक्रीवर बंधने आणताच सोनारांची दुकाने ओस पडली ती आजतागायत कारण सध्या सोन्याचे भाव उतरले असले अन लोकांजवळ पैसे असले तरी ते काढता किंवा खर्चता येत नाहीत ह्याचा सर्वाधिक फटका भर लग्नसराईत प्रामाणिकपणे कर भरणारया नागरिकांना बसला
मोदींच्या देशहिताच्या व काळा पैसे पकडण्यासाठीच्या ह्या निर्णयाचे स्वागत करत दहा तारखेपासून लोकांनी इतर कामे सोडून नोटबदलांसाठी व पैसे बँकेत भरण्यासाठी बँकेसमोर, ATM समोर लांबच लांब रांगा लावल्या त्या अजूनही आहेतच
बँकिंगच हे कामही सोप नव्हतच! कारण पैसे भरण्यासाठी किंवा बदलण्यासाठी आपल्याच बँकेत कित्येक वर्षांची ओळख असताना देखील प्रूफ I D द्यावा लागत होता व्होटिंग कार्ड ,पॅन कार्ड,आधार कार्डचे झेरॉक्स काढण्यासाठी वेगळी कसरत नागरिक करत होते त्यातही अडीच किंवा साडेचारहजारच्या जागी थोडीही कमी जास्त रक्कम असली कि तो फॉर्म रिजेक्ट होत होता त्या मुळे लोक वैतागले होतेच पण मोदींनी आधी ठराविक तारखेनंतर जास्त रक्कम काढता येईल अस सांगूनही नंतर त्यावरही मर्यादा घातली आणि नोट बदलांची प्रक्रियाच बंद करून टाकत फक्त बँकेतच पैसे जमा करता येतील असा नवा निर्णय जाहीर केला आजपर्यंत त्यांनी कित्येक निर्णय बदलले त्या मुळेही लोक त्रासलेत शिवाय बरेच दिवस झाले तरीही पाचशेच्या नव्या नोटा बँकेत पोहोचल्याच नव्हत्या कारण त्या कमी प्रमाणात छापल्या गेल्याने त्यांचा तुटवडा असल्याच यवतमाळ येथील S B I बँकेच्या मॅनेजरनी सांगितल होत आणि नव्या नोटांच्या वेगळ्या डिझाईन बदलामुळे ATM मशिनही बंद होती
नव्या दोन हजाराच्या नोटेच स्वागत
फोटो -R B I
सुरवातीला दोन हजाराची नोट मिळताच काही उत्साही तरुणाईने त्या सोबत सेल्फी काढत तो सोशल मीडियावर शेअर करून आपला आनंद द्विगुणित केला पण जसजसे दिवस पुढे सरकत गेले तेव्हा ह्या नोटांचीही डोकेदुखी सुरु झाली कारण दोन हजारची चिल्लर मिळेना त्या मुळे त्याही कोणी स्वीकारत नाहीत अस हैदराबादमधील एका मोठ्या व्यापाऱयाने सांगितलं कारण त्यांच्याकडे आधीच दोन हजाराच्या खूप नोटा आहेत पण त्या बदलण्यासाठी तिथल्या व्यापाऱयांना पन्नास रुपये कमी मिळतात त्या मुळे लोक दोन हजाराची नोट घेतच नाहीत
नोटबंदीमुळे सर्वच व्यावसायिक त्रस्त झालेत कारण अगदी छोटया व्यावसायिकांपासून मोठया कारखानदारांचा व्यवसाय ठप्प झालाय काहींचा मंदावलाय तर काहींनी बंदच केलाय भाजीमार्केटमधील भाजी कधी नव्हे ते स्वस्त झाल्याने गृहिणी खुश आहेत पण भाजीवाल्यांचं मात्र नुकसान होतंय
ह्या नोटबंदीन सुरवातीच्या दिवसात मोदी सरकारनं लोकांना जुन्या काळात नेल नांदेड जिल्यातील एका खेडयात पैसे हातात नसल्याने वस्तूंच्या बदल्यात किराणा माल खरीदला गेल्याची बातमी पाहायला मिळाली
अनेक ठिकाणी असा व्यवहार केला गेला
ह्या नोटबंदीचा फटका गृहिणींनाही झाला त्यांनी काटकसरीने जमवलेले पैसेहि बँकेत भरावे लागले त्यातून ज्यांची घरी आर्थिक पिळवणूक होते त्यांनी वेळप्रसंगी उपयोगी पडेल म्हणून लपवलेल्या पैशाची ठिकाणही मीडियाने बातमी देण्याच्या नादात सर्वांपुढे आणल्याने त्यांच्या संकटात भर पडलीय
ह्या नोटबंदीचा परिणाम इतर सेवेप्रमाणे एयर लाईन्स वरही झाला तिथल्या कर्मचारयांची प्रतिक्रिया घेतल्यावर त्यांनी मोदींचा निर्णय चांगला असला तरीही नियोजन मात्र योग्य नाही असं सांगितलं आम्ही अहोरात्र ड्युटीवर असतो तेव्हा बँकेत लाईन कशी लावणार ? अशी संतप्त प्रतिक्रियाही व्यक्त केल्या गेली तर एका महिला पोलीस अधिकाऱयाची नोटबंदीच्या काळातच दिल्लीहून हैद्राबादला बदली झाली त्यामुळे तिला कृत्रिम आर्थिक टंचाईला सामोरे जावं लागल तिचे पतीही नोकरी करतात त्या मुळे त्यांचाही पगार अडकलेला अशा वेळी घरातील रक्कम पुरेशी नव्हती तेव्हा त्यांना त्यांच्या मुलीची पिगी बँक कामी आली ती फोडून त्यांना वापरावी लागली नोटबंदी आधी पुरेशा प्रमाणात नव्या नोटा छापून लोकांना उपलब्ध करायला हव्या होत्या असच सारे म्हणतात एअर इंडियानेही आपल्या कर्मचाऱयांना स्वतःहून मदत केलीय कारण त्यांचे पगार अडकलेत अशीच परिस्थिती सर्वच नोकरदारांची झालीय
सुरवातीला मोदींना साथ देणारे नागरिक म्हणताहेत कि मोदींनी टेन्शन के दिन लाये ! कारण ज्यांच्या साठी आणि ज्या साठी मोदींनी हा निर्णय घेतला तो कितपत यशस्वी ठरलाय मुदत संपण्याआधीच नव्या नोटांचे गैरव्यवहार दररोज न्यूज चॅनल वरून पाहायला मिळत आहेत भ्रष्टाचारी आधीच सुटलेत प्रामाणिक नागरिकांना मात्र नाहक त्रास सोसावा लागला काहींचा नाहक जीव गेला
आता फक्त उद्याचा दिवस उरलाय आता दहा पेक्षा जास्त जुन्या नोटा बाळगणाऱयांना शिक्षा होईल अशी नवी घोषणा मोदींनी केलीय आता उद्या त्यात बदल झाल्यास नवल नाही ! जुन्या नोटासंग्रह करणाऱयांसाठी निदान दहा तरी जुन्या नोटा जवळ ठेवता येतील हे काही कमी नाही कारण आता त्या इतिहास जमा झाल्यात
नव्या नोटा आकर्षक रंगाच्या असल्या तरीही त्याला जुन्या पाचशे हजाराच्या नोटांची सर नाही! अशी प्रतिक्रिया व्यक्त होतेय
नवी पाचशेची नोट चलनात फोटो -RBI
पण अजूनही नव्या नोटांचा तुटवडा जाणवणार आहेच कारण नव्या नोटांसाठी लागणारया पेपरच देण्यात येणार टेंडर वेळेवर दिल्या न गेल्यान पेपर मिळण्यास वेळ लागेल आणि सध्या आहे तो पेपर पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही म्हणूनच नव्या नोटांसाठीच्या कागदाची प्रत वेगळी आहे आणि त्याचा परिणाम नोट छपाईवरही पाहायला मिळाला सुरवातीला नोटेचा रंग उडाल्याचीही बातमी आली तेव्हा सरकारकडून रंग जाण हेच नोटेच्या खरेपणाच लक्षण असल्याच सांगितल गेल मग जुन्या नोटा पाण्यात भिजल्या तरीही त्याचा रंग जात नव्हता तेव्हा त्या खोटया होत्या का ? हा प्रश्न उपस्थित केल्या जातोय
वर्ष सरतांना मोदींच्या ह्या चलन बंदींन मात्र चांगलाच धुमाकूळ घातलाय नोटा बंदीनंतर पकडल्या जाण्याच्या भीतीन श्रीमंतीची शान असणारया ह्या नोटा काहींनी कचऱयात फेकल्या ,काहींनी पाण्यात तर काहींनी त्या चक्क जाळल्या देखील वर्षभराच्या ठळक घडामोडींचा विसर पाडत नोटबंदीची चर्चा मात्र चांगलीच रंगतेय
No comments:
Post a Comment