केट रूबिन्स स्थानकातून संवाद साधत पोज घेताना - फोटो नासा संस्था
नासा संस्था - 17 सप्टेंबर
टेक्सास मधल्या MD अँडरसन कॅन्सर सेंटर Houston इथल्या कॅन्सर पीडित बालकांशी अंतराळ वीरांगना केट रूबिन्सने शुक्रवारी दुपारी अंतराळ स्थानकातून थेट संवाद साधत त्यांच्या प्रश्नांना हसतमुखाने उत्तरे दिली विशेष म्हणजे ह्या वेळेस तिने परिधान केलेला कलरफुल आकर्षक फ्लाईट सूट कॅन्सर पीडित रुग्णांनी 2015 मध्ये तयार केला होता
कॅन्सर पीडित बालकांनी तिला विचारलेल्या ,
अंतराळ स्थानकात राहून तू काय शिकलीस ?
अंतराळवीरांसाठी स्थानकात रहाण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत ?
तुझ अंतराळवीरांगना व्हायच स्वप्न होत का ? ह्या प्रश्नांना
केटन हसतमुखान उत्तर दिल लहानपणापासूनच तिला अंतराळवीरांगना व्हायच होत आणि बायॉलॉजीत विशेषतः: जीन्स मध्ये रिसर्च करायचं होत
कठोर परिश्रम आणि आपलं स्वप्न साकार करण्याची जिद्द ह्या जोरावर तीच स्वप्न आता पूर्ण झालय
अंतराळ स्थानकात राहण आणि तिथे राहून रिसर्च करण अत्यंत कठीण असल तरीही आव्हानात्मक व रोमांचक आहे अंतराळवीरांना स्थानकात राहताना कठीण परिस्थितीला सामोरे जाव लागत कठीण संघर्ष करावा लागतो त्या साठी सतर्कता कुतूहल ,जिद्द आणि चिकाटी हवी त्या मुळेच अंतराळ स्थानकातून रोजच दिसणारया आजूबाजूंच्या ग्रहांचे दुर्बिणीच्या साहाय्याने व अत्याधुनिक कॅमेऱ्याने फोटो घेता येतात इथे रोजच नवीन गोष्टी शिकायला मिळतात, वेगवेगळे प्रयोग करता येतात
तिला अंतराळ मोहिमेच्या प्रशिक्षणा दरम्यान व स्थानकातील निवासामुळे स्थानकाशी संबंधित अत्याधुनिक तांत्रिक गोष्टी शिकता आल्या
केटने कॅन्सर बायॉलॉजी मध्ये डॉक्टरेट केले असून ती सध्या अंतराळवीरांच्या शरीरात अंतराळस्थानकात राहताना होणारया जिनेटिकल बदलांवर व तिथे उद्भवणाऱ्या समस्यांवर उपाय शोधण्यासाटी संशोधन करतेय
नासा संस्थेतील वरिष्ठांच्या उपस्थितीत जवळपास वीस मिनिटे तिने कॅन्सर रुग्णांशी
थेट अंतराळ स्थानकातून, " Hi ! हॅलो !सी you ! " म्हणत संवाद साधला
फोटो -नासा संस्था
कॅन्सर पीडित बालकांमध्ये जागृती निर्माण व्हावी ह्या हेतूने तिने मेडिसिन आणि आर्ट ह्याचा सुरेख मेळ साधत COURAGE हा आकर्षक कलरफुल फ्लाईट सूट परिधान केला होता
M D अँडरसन सेंटर आणि नासाच्या जॉन्सन स्पेस सेंटर ह्यांच्या संयुक्त विद्यमाने हा सुट तयार करण्यात आला निवृत्त अंतराळवीर Nicole Stott आणि इतर अंतराळवीरांच्या साहाय्याने ह्या सुटचे डिझाईन तयार करण्यात आले जर्मनी ,रशिया आणि जपान मधील कॅन्सर सेंटर मधल्या बऱया झालेल्या रुग्णांनी मिळून तो सूट पेंट करून आकर्षित केला
ह्या प्रकल्पा अंतर्गत HOPE ,COURAGE , आणि UNITY असे तीन फ्लाईट सूट तयार केले गेले विशेष म्हणजे तिने हा सूट तयार झाला तेव्हा रंगवण्याआधी पाहिला होता आणि नंतर तो रंगवताना त्या मुळे अंतराळ स्थानकात जेव्हा हा सूट पोहोचला तेव्हा तो कसा दिसतोय हे पाहण्याची अनिवार इच्छा तिला झाली होती म्हणून तो सूट आधी पाहण्याची इच्छा तिने इतर अंतराळ वीरांना केली होती आणि त्यांनी ती पूर्ण देखील केली तेव्हा तिने COURAGE ह्या सुटची निवड केली
जेकब ह्याने तिला जेव्हा विचारले कि," केट तुला हा सूट आवडला का ? हा घातल्यानंतर तुला कसे वाटतेय ?"
तेव्हा केट म्हणाली कि,"अमेझिंग ! आणि प्रेरणादायी वाटतेय !" तुम्ही जेव्हा हा सूट पेंट करत होतात तेव्हा निश्चितच तुमच्या मनात मी हा सूट परिधान केल्यावर कशी दिसेन असा विचार आला असेल ना! आता तुमचा सूट अंतराळ स्थानकात पोहोचलाय आणि मी तो परिधान केलाय असे म्हणत केटन त्याच्यासाठी खास पोज देत स्थानकात स्वत: भोवती गोल फिरत व उंचावून तो सुट तिला कसा दिसतोय हेही त्याला दाखवले आणि तो तयार कारणाऱयांचे विशेष आभार मानले

No comments:
Post a Comment