Thomas Pesquet(Esa).Oleg Novitskiy (Roscosmos) आणि Peggy Whitson (नासा ) फोटो-नासा संस्था
नासा संस्था 10 nov.
नासाच्या अंतराळ मोहीम 49-50 चे तीन अंतराळवीर Peggy Whitson- नासा ,Thomas Pesquet -इसा आणि
Oleg Novitskiy -Roscosmos हे सोयूझ MS-03 ह्या अंतराळ यानातून अंतराळस्थानकाकडे झेप घेणार आहेत 17 नोव्हेंबरला 3.20 pm ला त्यांचे अंतराळयान कझाकस्थानातील बैकोनूर येथून अंतराळ स्थानकाकडे उड्डाण करेल व 19 नोव्हेंबरला ते स्थानकात पोहोचेल त्या आधी दोन दिवस ते अवकाशात भ्रमण करेल स्थानकात पोहोचल्यानंतर त्यांचे स्वागत अंतराळवीर Shane Kimbrough आणि त्यांचे दोन सहकारी करतील
जाण्याआधी कझाकस्थातील Baikonur मध्ये हॉटेल crew quarters मध्ये हसतमुखाने पोज देताना अंतराळवीर |
अंतराळवीर Cosmonaut Hotel Crew Quarters येथे वृक्षारोपण करताना फोटो- नासा संस्था
अंतराळ स्थानकात पोहोचल्यानंतर हे तीन अंतराळवीर त्यांच्या सहा महिन्यांच्या वास्तव्यात तिथे असलेल्या अंतराळ वीरांसोबत स्थानकात सुरु असलेल्या वैज्ञानिक प्रयोगात सहभाग नोंदवतील
Peggy Whitson जेव्हा अंतराळ स्थानकात पोहचून ह्या मोहिमेची सूत्रे हाती घेईल तेव्हा ती स्थानकात राहून दुसऱयांदा command करणारी पहिली अमेरिकन महिला अंतराळवीर ठरेल 2007 सालच्या अंतराळ मोहिमेत तिने पहिल्यांदा अंतराळ मोहिमेचे नेतृत्व केले होते
Peggy ने Biochemistry मध्ये डॉक्टरेट केले असून 1996 मध्ये तिची नासा संस्थेत अंतराळवीर म्हणून निवड झाली होती तिने आतापर्यंत नासा संस्थेत वेगवेगळ्या पदांवर काम केले असून तीने 2009- 2012 पर्यंत नासाची Cheif Astronaut officer म्हणून काम केले आहे
Peggy ने Houston येथील NBL Jonson स्पेस सेंटर मध्ये पाण्याखाली स्पेस वॉक करण्याचे विशेष प्रशिक्षण घेतले आहे तिने अंतराळात 377 दिवस मुक्काम केला असून 6 वेळा स्पेस वॉक केला आहे
आताची तिची हि तिसरी अंतराळ मोहीम आहे
No comments:
Post a Comment