Friday 14 October 2016

यवतमाळातील दुर्गोत्सव

यवतमाळात दरवर्षी प्रमाणे यंदाही उत्साहात दुर्गोत्सव सुरु आहे ठिकठिकाणच्या मंडळात दुर्गेच्या वेगवेगळ्या रूपातील आकर्षक सुंदर मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे
ह्या वर्षी काही मंडळांनी देवीपुढे मंदिर व राजमहालाचा देखावा साकारला आहे चलतचित्र देखाव्या ऐवजी ह्या वर्षी सजावटीवर भर दिला गेला आहे दुर्गेच्या मूर्तीही विलोभनीय आहेत दुर्गा मंडळा समोरील रस्ते लोकांच्या गर्दीमुळे गजबजून गेले असून संध्याकाळी दुर्गेच्या मंडळा पुढील विजेच्या दिव्यांच्या रोषणाईने यवतमाळ झगमगत आहे विशेष म्हणजे अजूनही यवतमाळ येथे अधून मधून पाऊस पडत असताना आणि कृत्रिम पाणी टंचाईने , रस्त्यावरील खड्डे व इतर समस्येने त्रस्त असताना देखील लोक दुर्गादेवी पाहण्यासाठी गर्दी करत आहेत
काही मंडळांनी जनजागृती अभियान राबवत लोकांना मदतीचे आवाहन केले आहे
माळीपुऱ्यातील युवक मंडळाने उरी येथील पाकिस्तानच्या दहशतवादी हल्ल्यात देशाचे रक्षण करताना वीरमरण आलेल्या जवानांच्या फोटोंचा फलक लाऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे व त्यांच्या कुटुंबींयांसाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे तर बालाजी चौकातील युवकांनी बळीराजा चेतना अभियाना अंतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकरयांच्या कुटुंबियांसाठी लोकांना मदतीचे आवाहन करत तिथे दानपेट्याही ठेवल्या आहेत लोकांच्या सुरक्षेसाठी जागोजागी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे

Photo Gallery

No comments:

Post a Comment