अंतराळवीर जेफ विल्यम्स ,Alexey Ovchinin आणि Oleg Skripochka फोटो - नासा संस्था
नासा संस्था -3 सप्टेंबर
नासाच्या अंतराळ मोहीम 48 चे कमांडर जेफ विल्यम्स ,सोयूझ कमांडर Alexey Ovichinin आणि फ्लाईट इंजिनीअर Oleg Skripochka (Roscosmos) हे तीन अंतराळवीर सहा सप्टेंबरला अंतराळ स्थानकातून पृथ्वीवर परतणार आहेत (कझाकस्थानची तारीख सात सप्टेंबर )
सोयूझ T M A-20 M ह्या अंतरिक्ष यानातून हे तीन अंतराळवीर पृथ्वीवर परतणार आहेत
संध्याकाळी 5.51 मिनिटांनी हे अंतराळवीर अंतराळ स्थानकातून निघतील व रात्री 9.14 वाजता ते कझाकस्थान येथे पोहोचतील
5 सप्टेंबरला सकाळी 9 वाजता जेफ विल्यम्स अंतराळ स्थानकाच्या कमांडर पदाची सूत्रे अंतराळवीर Anatoly Lvanishin ह्याच्या हातात देतील
दुपारी 2.15 वाजता अंतराळ स्थानकात फेअरवेलचा कार्यक्रम होईल आणि संध्याकाळी 5.51 वाजता
अंतराळवीर अंतराळ स्थानक सोडतील
हे अंतराळवीर मार्च महिन्यात अंतराळ स्थानकात राहण्यासाठी गेले होते व ह्या अंतराळ वीरांनी 172 दिवस स्थानकात मुक्काम केला
मोहीम 48 च्या अंतराळवीरांनी मिळुन Earth Science,Physical science ,Biology ,Biotechnology ह्या विषयांचे शंभरहून अधिक वैज्ञानिक प्रयोग करून त्यावर सखोल संशोधन केले आहे आता त्यांचा कार्यकाळ पूर्ण करून ते पृथ्वीवर परतणार आहेत
जेफ विल्यम्स ह्यांनी 2000 सालापासूनच्या त्यांच्या चार अंतराळ मोहिमे दरम्यान अंतराळ स्थानकात 534 दिवस राहण्याचा विक्रम केला आहे आणि आतापर्यंतच्या अमेरिकन अंतराळवीरांच्या जास्त दिवस अंतराळ स्थानकात राहण्याचा विक्रम मोडला आहे त्यांनी ह्या अंतराळ मोहिमेत स्थानकाच्या कामासाठी दोनवेळा स्पेस वॉक केला हा त्यांचा पाचवा स्पेस वॉक होता
हे तीनही अंतराळवीर पृथ्वीवर परतल्यानंतर आता अंतराळ स्थानकाच्या अंतराळ मोहीम 49 ह्या पथकाची सूत्रे रशियाचे अंतराळवीर Anatoly Lvanishin हे सांभाळतील
आता केट रूबिन्स ,Takuya Onishi व Anatoly हे तीन अंतराळवीर नवीन तीन अंतराळवीर स्थानकात येईपर्यंत दोन आठवडे अंतराळ स्थानकात राहून त्यांचे वैज्ञानिक संशोधन सुरु ठेवतील
नासाच्या अंतराळ मोहीम 48 चे कमांडर जेफ विल्यम्स ,सोयूझ कमांडर Alexey Ovichinin आणि फ्लाईट इंजिनीअर Oleg Skripochka (Roscosmos) हे तीन अंतराळवीर सहा सप्टेंबरला अंतराळ स्थानकातून पृथ्वीवर परतणार आहेत (कझाकस्थानची तारीख सात सप्टेंबर )
सोयूझ T M A-20 M ह्या अंतरिक्ष यानातून हे तीन अंतराळवीर पृथ्वीवर परतणार आहेत
संध्याकाळी 5.51 मिनिटांनी हे अंतराळवीर अंतराळ स्थानकातून निघतील व रात्री 9.14 वाजता ते कझाकस्थान येथे पोहोचतील
5 सप्टेंबरला सकाळी 9 वाजता जेफ विल्यम्स अंतराळ स्थानकाच्या कमांडर पदाची सूत्रे अंतराळवीर Anatoly Lvanishin ह्याच्या हातात देतील
दुपारी 2.15 वाजता अंतराळ स्थानकात फेअरवेलचा कार्यक्रम होईल आणि संध्याकाळी 5.51 वाजता
अंतराळवीर अंतराळ स्थानक सोडतील
हे अंतराळवीर मार्च महिन्यात अंतराळ स्थानकात राहण्यासाठी गेले होते व ह्या अंतराळ वीरांनी 172 दिवस स्थानकात मुक्काम केला
मोहीम 48 च्या अंतराळवीरांनी मिळुन Earth Science,Physical science ,Biology ,Biotechnology ह्या विषयांचे शंभरहून अधिक वैज्ञानिक प्रयोग करून त्यावर सखोल संशोधन केले आहे आता त्यांचा कार्यकाळ पूर्ण करून ते पृथ्वीवर परतणार आहेत
हे तीनही अंतराळवीर पृथ्वीवर परतल्यानंतर आता अंतराळ स्थानकाच्या अंतराळ मोहीम 49 ह्या पथकाची सूत्रे रशियाचे अंतराळवीर Anatoly Lvanishin हे सांभाळतील
आता केट रूबिन्स ,Takuya Onishi व Anatoly हे तीन अंतराळवीर नवीन तीन अंतराळवीर स्थानकात येईपर्यंत दोन आठवडे अंतराळ स्थानकात राहून त्यांचे वैज्ञानिक संशोधन सुरु ठेवतील
No comments:
Post a Comment