सद्या दिवाळी जवळ आल्याने ऑनलाईन शॉपिंगचा धंदा जोरात सुरु आहे रोज नवनवीन वस्तूंची आकर्षक जाहिरात पेपर मधुन दिली जातेय फोटोतील वस्तू स्वस्त मिळत असल्याची जाहिरात वाचून चोखंदळ ग्राहक साहजिकच अशा वस्तू घेण्यासाठी ऑर्डर बुक करतात प्रत्यक्षात जेव्हा ह्या वस्तू ग्राहकांना मिळतात तेव्हा त्या आणि जाहिरातीतील वस्तूतील बदल त्यांच्या लक्षात येतो ह्या वस्तू अत्यंत पातळ पत्र्यापासून बनवलेल्या, लहान आकाराच्या व वजनाच्या निघतात
जेव्हा ग्राहक हि ऑर्डर बुक करतो तेव्हा वस्तूंची जाहिरातीत लिहलेली साइझ न बघता त्यांचे आकर्षक फोटो आणि कमी किंमत पहातो त्या मुळे साहजिकच ग्राहक फसतो शिवाय लिहलेल्या किमतीपेक्षा डिलिव्हरी चार्जेस एक्सट्रा घेतल्या गेल्यामुळे ह्या वस्तूंची किंमत वाढते आणि हा माल परतही घेतला जात नाही म्हणूनच ऑनलाईन शॉपिंगला भुलू नका त्या ऐवजी जिथे सेल सुरु आहे तिथे जाऊन प्रत्यक्ष अशा वस्तू बघून घेतल्यास ग्राहकांची फसवणूक होणार नाही
No comments:
Post a Comment