केट रूबिन्स स्पेसवॉक दरम्यान स्थानकाबाहेर अडॉप्टर जोडणीचे काम करताना -फोटो -नासा संस्था
नासा संस्था -20 ऑगस्ट
नासाच्या अंतराळ मोहीम 48 चे कमांडर जेफ विल्यम्स आणि फ्लाईट इंजीनिअर केट रुबिन्स ह्यांनी 19ऑगस्टला तांत्रिक कामासाठी केलेला स्पेसवॉक यशस्वी झाला
ह्या स्पेसवॉक साठी केटने तिच्या प्रशिक्षणादरम्यान सराव केला होता त्या मुळेच तिने अंतराळ स्थानकाला अडॉप्टर जोडण्याचे काम कुशलतेने व निडरतेने केले जेफ विल्यम्स ह्यांचा हा चवथा स्पेसवॉक असल्याने ते अनुभवी होते पण केटचा मात्र हा पहिलाच स्पेसवॉक होता ह्या स्पेसवॉक आधी ह्या दोन अंतराळवीरांनी त्यांच्या स्पेससूटची बॅटरी चार्ज केली होती जेफ विल्यम्स ह्यांच्या स्पेससूटवर लाल रंगांच्या रेषा तर केट रूबिन्स हिच्या स्पेससूट वर पांढरया रंगांच्या रेषा होत्या अंतराळवीरांनी केलेला हा 194वा स्पेस वॉक होता
अंतराळ स्थानकात आगामी काळात येणारया बोईंग आणि स्पेस X कमर्शियल क्रू स्पेसक्राफ्टच्या तयारीसाठी हा स्पेसवॉक करण्यात आला 5 तास 58 मिनिटांच्या स्पेसवॉक मध्ये ह्या दोन अंतराळवीरांनी पहिले दोन इंटर नॅशनल डॉकिंग अडॉप्टर अंतराळस्थानकाला यशस्वीपणे जोडण्याचे अत्यंत कठीण व जिकिरीचे काम यशस्वीपणे पार पाडले
अडॉप्टर जोडल्यामुळे हे दोन स्पेसक्राफ्ट अंतराळस्थानकात येण्यासाठी व पार्किंगसाठी मार्ग तयार करण्यात आला आहे नासाच्या कमर्शियल क्रू प्रोग्राम अंतर्गत हे अडॉप्टर बनवण्यात आले आहेत
फोटो -नासा संस्था
अमेरिकेच्या फ्लोरिडा येथील स्पेस कोस्ट वरून अंतराळस्थानकाकडे होणारया अंतराळवीरांच्या उड्डाणांचा उपयोग मानवी अंतराळमोहिमेसाठी व वैज्ञानिक प्रयोगासाठी होतोय
शिवाय ब्रह्मांडातील दूरवरच्या ग्रहांच्या आगामी अंतराळमोहिमेसाठी विशेषतः मंगळ मोहिमेसाठीही ह्या अंतराळमोहिमांचा उपयोग होईल असे शास्त्रज्ञांना वाटतेय
स्पेसवॉक करणे सोपे नसते कारण अंतराळात कुठलीही वस्तू गुरुत्वाकर्षणाच्या अभावामुळे तरंगते अगदी अंतराळवीर सुद्धा ! आणि त्यांच्या ह्या यांत्रिक जोडणीसाठीचे सामान सुद्धा! म्हणूनच आपला तोल सांभाळून हे सामान पकडत काम करण कठीणच असत त्यात खाली आणि आजूबाजूला अथांग पोकळी ! ह्या स्पेसवॉकच दृश्य सामान्यजनांसाठी थरारक ! काळजाचा ठोका चुकवणार असल तरी ह्या अंतराळवीरांना मात्र त्याची तमा नसते त्यांच्यासाठी हा स्पेसवॉक आव्हानात्मक आनंददायी असतो ,त्यांच्या बुद्धीचा कस लावणार असतो
विशेष म्हणजे फ्लाईट इंजिनीअर केट सारख्या एका अंतराळवीरांगनेन केलेला हा पहिला यशस्वी स्पेसवॉक म्हणजे तमाम महिलावर्गाला अभिमानास्पदच !

No comments:
Post a Comment