Wednesday 14 December 2016

नोटबंदी आणि जयललिताच्या निधनाने सात डिसेंबरला तिरुपती मंदिरात कमी गर्दी


                         नोटबंदी आणि जयललितांच्या निधनाने तिरुपतीच्या मंदिरातील शुकशुकाट

तिरुपती -7 डिसेंबर
पर्यटक आणि भाविकांच्या गर्दीन गजबजलेल्या तिरुपती तिरुमला देवस्थान मंदिरात सात डिसेंबरला शुकशुकाट जाणवत होता  एरव्ही भक्तांच्या रांगाचरांगा असणाऱया रांगेंची ठिकाण देखील रिकामी होती त्या बाबतीत अधिक माहिती घेतली असता हा नोटा बंदीचा परिणाम असल्याची माहिती मिळाली आधीच नोटबंदीने पर्यटकांची गर्दी कमी त्यातून सहा तारखेला जयललिताच्या निधनामुळे तामिळनाडूतील बससेवा व रेल्वेसेवाही बंद होती त्या मुळे सात डिसेंबरला मंदिरात अत्यंत कमी गर्दी होती आधीच तिरुपतीचे तिकीट काढून ठेवलेल्या भक्तांना तिरुपतीत वेळेवर पोहचता आले नाही मात्र आठ डिसेंबरला तिरुपतीच्या मंदिरात भक्तांचा गजबजाट होता पण नेहमीपेक्षा कमीच!  नोटबंदीमुळे तिथे येणारया भाविकांची संख्या जशी रोडावली आहे तसेच तिथल्या दुकानदारांच्या धंद्यांवर देखील नोटबंदीचा परिणाम झाला आहे सर्वच दुकानदार मंदीचा सामना करत असून नोटबंदीने त्रस्त असल्याच तिथल्या काही व्यावसायिकांनी सांगितल           
 नोटबंदी आणि जयललिताच्या निधनाने सात डिसेंबरला तिरुपती मंदिरात कमी गर्दी असली तरीही तिथली सुरक्षा व्यवस्था मात्र चोख होती तिथे प्रवेश करणारी वाहने ,भाविक आणि पर्यटकांची कडक तपासणी होत होती त्या नंतरच लोकांना तिरुपतीत प्रवेश मिळत होता
एरव्ही तिरुपतीच्या दर्शनाला येणारया भाविकांचा ओघ प्रचंड असतो दर्शन रांगा गर्दीने भरून जातात भाविकांचे जथ्थे सतत तिरुपतीत दाखल होतात ह्या गर्दीतही लोक शिस्तीत दर्शन घेत असतात सर्वात श्रीमंत देव अशी तिरुपतीची ख्याती आहे अर्ध्या रात्री सकाळच्या सुप्रभातम साठी रांग लागते ते दिवसभरच्या सर्व सेवा पूर्ण करून शेवटच्या एकांत सेवा संपेपर्यंत रांग सुरूच असते शिवाय इतर दर्शन रांगातून गोविंदा SSS गोविंदा चा जयघोष सुरूच असतो
तिरुपती तिरुमला देवस्थान समितीच व्यवस्थापन खरोखरच वाखाणण्याजोग आहे मग ती स्वच्छता असो की दानपेटीतुन आलेली प्रचंड रक्कम तिरुपतीचा लाडू प्रसाद प्रसिद्ध आहे दररोज तिथे लाखोंच्या संख्येत लाडू बनवले जातात दर्शन रांगेत बुंदीचे लाडू ,दहीभात ,चिंचेचा भात आलटून पालटून वाटल्या जातो लाडू विक्री केंद्रात पैसे भरून कुपन काढून लाडू विकत मिळतो दर्शन रांगा आणि जागोजागी तैनात सुरक्षा व्यवस्था सारच एकदम चोख आहे तिथले नियमही एकदम कडक मंदिरातील गाभाऱयातील विशेष सेवांच्या वेळी सील्कचे धोतर किंवा लुंगी व शाल घालावी लागते तरीही तेथे दररोज लाखो लोक दर्शनासाठी येतात श्रद्धेपोटी केसदान करतात अगदी बायका,मुलही मुंडन करून देवाला केस अर्पण करतात त्यासाठीही विशेष सोय केली आहे तिरुपतीत अशी असंख्य मुंडन करून डोक्याला चंदन लावलेली कुटुंब पाहायला मिळतात

                        तिरुपतीच्या वाटेवर सप्तरंगांची उधळण करत अस्ताला जाणारा सूर्य

तिरुपतीहून तिरुमला देवस्थानात जातानाची सप्तगिरीतील घाटाची वाट निसर्गदत्त नैसर्गिक वनसंपदेने समृद्ध आहे दुर्मिळ औषधी वनस्पतीची विपुलता तिथे पाहायला मिळते
तिरुपती तिरुपती देवस्थान समितीने खालून वर तिरुमलाच्या बालाजीचे दर्शन घेण्यासाठी पायी जाणारया भाविकांसाठी हा परिसर निसर्गरम्य आणि सुशोभित केलाय ह्या वाटेवर देवळे व थकलेल्यांना विसाव्यासाठी रमणीय ठिकाणेही आहेत सप्तगिरीचा हा परिसर घनदाट वृक्षांनी वेढलेला आहे त्या मुळे तिथे वन्यप्राण्यांचा वावर आहे देवस्थान प्रशासनाने ह्या वाटेवर तिरुपती तिरुमला प्राणीसंग्रहालय विकसित केल आहे अशाच विसाव्याच्या ठिकाणी वसलेल हे डियर पार्क येणाऱ्या जाणारया भाविकांना आकर्षित करत
             
                                     तिरुपतीच्या वाटेवरचा आर्कषक सुंदर हरिणांचा हा एकत्रित कळप

                                  फळे खाण्यासाठी जमलेला हा डौलदार हरणांचा कळप
 एरव्ही  प्रवासात जंगलवाटेवर माणसांना पाहुन वायुवेगाने पळणारी हरण आपण पहातो पण इथली हरीण मात्र चांगलीच माणसाळलीत तिथून प्रवास करणारी वाहन ह्या हरीण दर्शनासाठी थांबतात तिथे विकत मिळणारी  कडू काकडी (वाळूक) ,पपई आणि इतर फळे विकत घेऊन ती हरिणांना खायला देतात हरणही ती खाण्यासाठी गर्दी करतात तिरुपतीला येणारे भाविक पर्यटन प्लस भक्ती ह्याचा सुरेल मेळ साधतात 

No comments:

Post a Comment