Progress 65 कार्गो स्पेस क्राफ्ट गुरुवारी सकाळी कझाकस्थानातील बैकोनूर येथून उड्डाण करताना
फोटो -नासा संस्था
नासा संस्था - 1 डिसेंबर
गुरुवारी सकाळी रशियाच्या Progress 65 ह्या कार्गो स्पेस क्राफ्टने अंतराळात उड्डाण केल्या नंतर काही वेळातच पेट घेतला रशियाच्या रॉसकॉसमॉस ह्या रशियन स्पेस एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार
प्रोग्रेस 65 ह्या रशियन बनावटीच्या मालवाहू अंतरिक्ष यानाने गुरुवारी सकाळी कझाकस्थानातील बैकोनूर येथून 9.51a.m .ला अंतराळ स्थानकाकडे व्यवस्थित झेप घेतली पण उड्डाणानंतर काही वेळातच त्याचा संस्थेशी असलेला संपर्क तुटला आणि त्याने पेट घेतला सोयूझ ह्या रॉकेट द्वारे Progress 65 कार्गो स्पेस क्राफ्ट अंतराळात सोडण्यात आले होते पण काही वेळानंतर रशियातील तुवा ह्या पर्वतीय क्षेत्रात 190 km उंचीवर पोहोचल्यानंतर अचानक हे यान पेटले
सद्या अंतराळस्थानकात राहात असलेल्या सहा अंतराळवीरांसाठी लागणारे आवश्यक सामान घेऊन हे मालवाहू यान अंतराळ स्थानकाकडे जात होते आता हे कार्गो स्पेस क्राफ्ट जळाल्यामुळे त्यातील 2.4 टन वजनाचे इंधन ,खाद्य पदार्थ व इतर आवश्यक रिसर्च हार्डवेअरचे साहित्यही जळून खाक झाले आहे
नासा संस्थेने ह्या अंतराळवीरांशी live telecast द्वारे संवाद साधत त्यांना ह्या अपघाताची माहिती दिली व त्यांच्या सुरक्षिततेविषयी विचारपूस केली असता सहाही अंतराळवीरांनी आम्ही सुरक्षित असल्याचे सांगीतले शिवाय त्यांना लागणारे आवश्यक सामान सद्यातरी पुरेसे असल्याची माहितीही दिली
लवकरच 9 डिसेंबरला जपानच्या JAXA एजन्सीचे HTV-6 हे कार्गोशिप स्पेस क्राफ्ट अंतराळ वीरांना लागणारे सामान घेऊन स्थानकात जाणार आहे
No comments:
Post a Comment