Sunday 24 December 2017

अंतराळ मोहीम 54 चे आणखी तीन अंतराळवीर स्थानकात पोहोचले



                   अंतराळ वीरांसह अंतराळयान अंतराळ स्थानकाकडे उड्डाण करताना -फोटो नासा संस्था

नासा संस्था -२२ डिसेंबर
रविवारी सतरा तारखेला नासाच्या अंतराळ मोहीम 54 चे अंतराळवीर Scott Tingle ,रशियन अंतराळवीर Anton Shkaplerov आणि जापनीज अंतराळवीर Norishige Kanai सोयूझ अंतरिक्ष यानाने अंतराळ स्थानकाकडे रवाना झाले बैकानूर Cosmodrome वरून 2.21 a.m.ला सोयूझ यानाने अंतराळ स्थानकाकडे प्रयाण केले आणि मंगळवारी 3.43a.m.ला ते अंतराळ स्थानकात पोहोचले

                                       अंतराळवीर स्थानकात पोहोचल्यानंतर फोटो -नासा संस्था

स्थानकात पोहोचल्यावर अंतराळ स्थानकात राहत असलेले सध्याचे कमांडर Alexander Misurkin ,अंतराळवीर Joe Acaba आणि Mark Vande ह्यांनी त्यांचे स्वागत केले
आता हे तीन नवीन अंतराळवीर सहा महिने अंतराळ स्थानकात मुक्काम करतील व तेथे सुरु असलेल्या संशोधनात सहभागी होतील आता स्थानकातील अंतराळवीरांची संख्या सहा झाली असून त्यातील चारजण अमेरिकन आहेत
हे सारे मिळून अंतराळ स्थानकातील सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचा मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम व त्यावर आधुनिक उपचार ह्यावर संशोधन करतील विशेषतः निद्रानाश व मानवी स्नायूंवरील दुष्परिणाम शिवाय fiber optic filament manufacturing benefits design of advanced optical materials& electronic devices ह्याचा त्यात समावेश आहे
अंतराळवीर Joe Acaba ,Alexander आणि Mark Vande फेब्रुवारी 2018 मध्ये पृथ्वीवर परततील तर हे नवीन तीन अंतराळवीर जून महिन्यात पृथ्वीवर परत येतील

Saturday 16 December 2017

अंतराळवीर Randy Bresnik,Paolo Nespoli आणी SergeyRyazanskiy पृथ्वीवर परतले

                                       सोयूझ MS-05 अंतराळवीरांसह पृथ्वीवर उतरताना -फोटो नासा संस्था

नासा संस्था -14 dec.
नासाच्या अंतराळ मोहीम 54चे अंतराळवीर व कमांडर Randy Bresnik ,फ्लाईट इंजिनीअर Paolo Nespoli आणी Sergey Ryazanskiy गुरुवारी दुपारी अंतराळस्थानकातून पृथ्वीवर परतले
गुरुवारी दुपारी 3.37 मिनिटाला त्यांचे सोयूझ MS-05 हे अंतरिक्ष यान कझाकस्थानातील Dzhezkazgan येथे पोहोचले

ह्या तिघांनी अंतराळ स्थानकात 138 दिवस वास्तव्य केले अंतराळस्थानकातील वास्तव्यादरम्यान त्यांनी स्थानकातील फिरत्या प्रयोगशाळेत सुरु असलेल्या संशोधनात सहभाग नोंदवला त्यांनी अंतराळातील microgravity  चा शरीरावर होणाऱ्या बॅक्टेरियल इफेक्टवर ,पार्किसन्स ह्या रोगाचे ओरिजिन व त्यावरील आधुनिक उपचार आणि history of cosmic ray ह्यावरील संशोधनात सहभाग नोंदवला
शिवाय त्यांच्या कार्यकाळात स्थानकात आलेल्या तीन कार्गोशिप चे स्वागत करून त्यांच्या डॉकिंगची सोयही केली
Randy Bresnik ह्यांनी त्यांच्या वास्तव्यादरम्यान अंतराळस्थानकाच्या तांत्रिक कामासाठी तीन स्पेसवॉक केले
तर अंतराळवीर Sergey Ryazanskiy ह्यांनी देखील स्थानकाच्या कामासाठी एकदा स्पेसवॉक केला
ह्या अंतराळवीरांच्या वास्तव्यात पहिल्यांदाच स्थानकात सहाजणांनी एकत्रित राहून संशोधन केले
आता स्थानकाची सूत्रे अंतराळवीर Alexander Misurkin ह्यांच्या हाती असून त्यांच्या सोबत अंतराळवीर Joe  Acaba  आणि Mark Vande Hei  हे दोघे स्थानकात राहून आपले संशोधन सुरु ठेवतील  सतरा डिसेम्बरला नवीन तीन अंतराळस्थानकात राहण्यासाठी जातील

Monday 4 December 2017

चाळीस वर्षांनी घडल सुपरमूनच विलोभनीय दर्शन



                                                           आकाशातील तेजोमय सुपरमून

 यवतमाळ -३डिसेंबर
 एरव्ही आपण आकाशात कलाकलाने वाढणारी चंद्रकोर किंवा पौर्णिमेचा चंद्र नेहमीच पाहतो पण कालच्या पौर्णिमेचा चंद्र मात्र वेगळा होता तब्बल चाळीस वर्षांनी चंद्र सुपर मॅन सारखा सुपरमूनच्या रूपात उगवला तो नेहमीपेक्षा सातपट मोठया आकाराचा अन पंधरा पटीन अधिक प्रकाशान अवस्थेत आकाशात अवतरला एरव्ही उशिराने पूर्ण रूपात प्रगटणारा हा तेजस्वी सुपरमुन काल मात्र संध्याकाळीच मोट्या आकारातील तेजोमय रुपात उगवला
आकाशात नजर जाताच त्याच्या भोवती पसरलेली तेजोमय आभा आणि त्याचा वाढीव आकार दृष्टीस पडत होता
त्याच्या ह्या मोट्या आकारामुळे त्याचे नामकरण सुपरमून असे झाले शिवाय सध्या थंडीचे दिवस असल्यामुळे त्याला कोल्ड सुपरमून असं म्हटल जातंय
चंद्राला हे सुपरमूनच रूप प्राप्त होण्यामागे शास्त्रीय कारण आहे आकाशात जेव्हा  चंद्र व पृथ्वी परिक्रमा करतात तेव्हा चंद्र आणि पृथ्वी ह्यांच्या मधील अंतर कमी होत तेव्हा ते जवळ येतात आणि त्यांच्यातील कमी झालेल्या अंतराने चंद्राचा आकार व प्रकाशात वाढ होते काल चाळीस वर्षांनी हे अंतर जवळ जवळ पाच हजार किलोमीटरने कमी झाल होत त्या मुळे पृथ्वीवासीयांना सुपरमूनच विलोभनीय दर्शन घडल
   

Friday 3 November 2017

अंतराळ स्थानकात सहाव्यांदा उगवलेल्या भाजीची अंतराळवीर Joe Acaba ह्यांनी केली कापणी

                 अंतराळ स्थानकातील आधुनिक चेंबर मध्ये उगवलेली नवी भाजीची रोपे -फोटो -नासा संस्था

नासा संस्था - 28 ऑक्टोबर
शुक्रवारी 27 ऑक्टोबरला अंतराळवीर अंतराळस्थानकातील व्हेजी प्रोजेक्ट मध्ये व्यस्त होते कारण त्या दिवशी अंतराळ स्थानकात सहाव्यांदा उगवलेल्या भाजीची अंतराळवीर Joe Acaba ह्यांनी कापणी केली
अंतराळवीर Joe Acaba ह्यांनी Mizuna Mustard ,Waldmanns ग्रीन लेट्युस आणि Outredgeous ,Red Romaine Lettuce ह्या भाज्यांची पाने कापली त्यांनी ह्या भाज्या मुळापासून न कापता अर्ध्याच कापल्या त्यामुळे उरलेल्या भाजीच्या रोपांना पुन्हा पाने येतील Joe Acaba ह्यांच्या ह्या कामाने ह्या व्हेजी प्रोजेक्टचे मॅनेजर Nicole Dufour प्रभावित झाले असून Joe ने छान काम केले अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे
अंतराळवीरांनी स्थानकात ऊगवलेल्या ह्या ताज्या भाज्यांचा आस्वादही घेतला फ्लोरिडा तेथील केनेडी स्पेस सेंटर मधील संशोधकांच्या टीमने स्थानकात पाठवलेल्या ड्रेसिंगचा उपयोग अंतराळवीरांनी ह्या भाज्यांची चव वाढवण्यासाठी  केला
अंतराळस्थानकातील वास्तव्यादरम्यान अंतराळवीर स्कॉट केली,पेगी व्हाइटसॉन व इतर अंतराळवीरांनी अंतराळस्थानकात राहत असलेल्या अंतराळ वीरांना ताजी भाजी व फळे खाता यावीत म्हणून व्हेजी प्रोजेक्ट राबवला ह्या प्रोजेक्ट अंतर्गत त्यांनी स्थानकात भाजी व फुलांच्या रोपांची यशस्वी लागवड करून आधुनिक तंत्रज्ञानाने निगा राखत त्यांची जोपासना केली आणि त्यांच्या ह्या प्रयत्नांना यशही मिळाले अंतराळात फुले तर फुललीच शिवाय लेट्युस ,कोबीची भाजीही उगवली त्या मुळे प्रेरित होऊन अंतराळवीर आता ह्या व्हेजी प्रोजेक्ट अंतर्गत नवनवीन प्रयोग करत आहेत

 स्थानकातील व्हेजी चेंबर मधील Mizuna ,Red romaine Lettuce आणि Wehldmons ग्रीन lettuce ह्या भाज्यांचे   Joe Acaba ह्यांनी काढलेले फोटो - नासा संस्था

व्हेजी प्रोजेक्ट च्या टीमने ह्या वेळेस प्रगतीचे एक पाऊल पुढे टाकत स्थानकातील आधुनिक तंत्रज्ञानानें विकसित केलेल्या प्रयोगशाळेतील बागेत नुकतीच नवीन तीन पालेभाज्यांची लागवड केली आहे भाजी लागवडीची हि स्थानकातील सहावी वेळ आहे
ह्या Veg-03 ह्या प्रोजेक्ट अंतर्गत अंतराळवीरांना वेगळा व नवीन प्रयोग करायचा होता म्हणून त्यांनी मिश्र पालेभाज्यांची लागवड केली त्यांच्या ह्या यशामुळे अंतराळवीरांना नवी वेगवेगळी रोपे पाहायला मिळाली शिवाय त्यांची चवही चाखता आली तीन वेगवेगळ्या भाज्या लाऊन त्यांची निगा राखत स्थानकात वाढवणे पृथ्वीइतके सोपे नव्हतेच Mizuna जातीच्या भाजीचे पाने लांब व टोकदार असल्याने पाणी घालताना अडकत होती
ह्या भाज्यांच्या कापणीनंतर आता अंतराळवीरांनी स्थानकात नवे Plant Growth Chamber (Advanced Plant Habitat ) बसवले आहे आधीपेक्षा हे चेंबर अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त आहे हा आधुनिक चेंबर स्थानकात Install करण्यासाठी अमेरिकेतील नासा सेंटर मधील संशोधकांनी Joe Acaba ह्यांना योग्य त्या सूचना दिल्या
ह्या नवीन चेंबर मधील सगळ्या आवश्यक चाचण्या पूर्ण झाल्यानंतर आठवड्या नंतर अंतराळवीर तिथे Arabidopsis ह्या नव्या फुलाच्या रोपाच्या बिया पेरतील हे फुलझाड कोबी आणि मोहरी ह्या जातीचे आहे शिवाय Dwarf Wheat ह्या प्रजातीच्या गव्हाचे रोपही स्थानकातील आधुनिक चेंबरमध्ये  अंतराळवीर लावणार असून पाच आठवडे ग्रोथ चेंबर मधील वातावरण, पाण्याचे शोषण व पुनर्वापर ह्यांचे निरीक्षण नोंदवून रोपांची जोपासना करणार आहेत
अशीच रोपे अमेरिकेतील स्पेस सेंटर मधील प्रयोग शाळेत लावण्यात येतील आणि पृथ्वी आणि स्थानकातील रोपांच्या वाढीतील बदल टिपुन त्यावर संशोधन करण्यात येईल ह्याचा उपयोग आगामी अंतराळमोहिमेतील अंतराळवीरांना होईल व नव्या व्हेजी प्रोजेक्ट साठीही होईल



    

Saturday 21 October 2017

अंतराळवीर Randy Bresnik आणि Joe Acaba ह्यांचा स्पेसवॉक यशस्वी


                      अंतराळ वीर स्थानकाबाहेर स्पेसवॉक करताना -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -20 ऑक्टोबर
अंतराळमोहीम 53 चे कमांडर Randy Bresnik आणि फ्लाईट इंजिनीअर Joe Acaba ह्यांनी अंतराळ स्थानकाच्या तांत्रिक कामासाठी यशस्वी स्पेसवॉक केला हा स्पेसवॉक सहा तास एकोणपन्नास मिनिटांनी संपला
ह्या दोन्ही अंतराळवीरांनी ह्या स्पेसवॉक दरम्यान अंतराळ स्थानकाच्या रोबोटिक आर्मच्या latching end effector वरील खराब झालेला fuse बदलवून नवा हाय डेफिनेशन कॅमेरा बसवला ह्या दोघांनी हे काम अत्यंत शीघ्रतेने व कमी वेळात पूर्ण करून भविष्यात उपयुक्त अशी इतर अनेक कामेही केली
Joe Acaba ह्यांनी रोबोटिक आर्मच्या नव्या effectorला ग्रीस लावले तर Randy Bresnik ह्यांनी नवे रेडिएटर ग्रीपल बार फिट केले व भविष्यातील रोबोटिक रिप्लेसमेंट साठी आवश्यक प्लॅटफॉर्म तयार केला शिवाय Randy ह्यांनी अंतराळ स्थानकावर असलेल्या दोन स्पेअर पंप मोड्युल पैकी एकाचे प्रिपरेशन वर्क पूर्ण केले
ह्या दोन अंतराळ वीरांनी ऑक्टोबर मध्ये केलेला हा तिसरा व शेवटचा स्पेसवॉक होता
Randy Bresnik ह्यांच्या आजवरच्या अंतराळमोहिमेतील हा पाचवा स्पेसवॉक होता त्यांनी आजवर अंतराळात 32 तासाचा स्पेसवॉक यशस्वीपणे पूर्ण केला आहे तर Joe Acaba ह्यांचा हा तिसरा स्पेसवॉक होता त्यांनी त्यांच्या करिअर मध्ये आजवर अंतराळात 19 तास 46 मिनिटांचा स्पेसवॉक केला आहे
अंतराळ स्थानकाच्या कामासाठी आजवर अंतराळवीरांनी केलेला हा 205 वा स्पेसवॉक होता तर आतापर्यंत  अंतराळवीरांनी स्पेसवॉक साठी 53 दिवस 6 तास व्यतीत केले आहेत

Monday 25 September 2017

अंतराळवीर Mark Vande Hei ह्यांनीं साधला Space To Earth विद्यार्थ्यांशी लाईव्ह संवाद

         अंतराळवीर Mark Vande Hei  अंतराळस्थानकातून लाईव्ह संवाद साधताना फोटो-नासा संस्था

नासा संस्था- 18 सप्टेंबर
नासाच्या अंतराळ मोहीम 53 चे अंतराळवीर Mark Vande Hei ह्यांनीं नुकताच अमेरिकेतील Pine over back at school मधील विद्यार्थ्यांशी Space To Earth साधलेल्या लाईव्ह संवादाचा हा वृत्तांत
P.V.K स्कूलच्या Emma ह्यांनी स्कूल तर्फे mark ह्यांच स्वागत केल  Senator Eichorn आणि Representative Layman ह्या क्षणी उपस्थित असल्याचे सांगीतले शिवाय आम्ही तुमच्या पहिल्या इंटरव्हू मध्ये सहभागी होतेय हे आमच्यासाठी अभिमानास्पद असल्याचे सांगत मुलाखतीला प्रारंभ केला

             P.V.K.schoolच्या Emma  Mark ह्यांच्याशी लाईव्ह संवाद साधताना -फोटो -नासा संस्था

Emma - मिलिटरीमन असल्याचा अनुभव तुमच्या अंतराळवीर होण्यासाठी व अंतराळ मोहिमेसाठी फायदेमंद ठरला का ?
Mark - मिलिटरी मधल्या अनुभवाचा आणि अंतराळात काम करण्याचा निश्चितच फायदा झाला मिलिटरी मध्ये लोकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण तसच आपल्या सहकाऱ्यांची काळजी घेण महत्वाच असत अंतराळातील अंतराळ स्थानकात आम्ही सहाजण पृथ्वीपासून सारया लोकांपासून दूर राहतो इथल्या विपरीत परिस्थितीत काम करताना तशीच एकमेकांची काळजी घेतो आणि संघर्षरत आयुष्य जगताना मिलिटरीमन असल्याचा निश्चितच फायदा होतो
Abilene (विध्यार्थी )- लाँचिंगच्या वेळेस अंतराळात झेप घेताना गुरुत्वाकर्षणाचा अनुभव कसा होता?
Mark -अंतराळात प्रक्षेपणाचा वेळेस यानासाठी वापरण्यात येणारा G-force नेहमीच्या फोर्सपेक्षा तिप्पट असतो पाठीवर बसलेल्या स्थितीतल्या आम्हाला प्रक्षेपणाच्या ह्या प्रचंड फोर्स मुळे जोरात सीटवर ढकलल्या गेल्याचा अनुभव आला तो थरारक आणि इंटरेस्टिंग होता !
 Kyla -तुम्हाला कधीतरी Oh! My God! I am in Space! असा विचार मनात येऊन भीती वाटते का ?
Mark - हो अनेकवेळा असे Wow ! क्षण आले कारण इथल्या मायक्रो ग्रॅव्हिटी मध्ये तरंगण सोप पण चालण महाकठीण असत इथे आल्यानंतर इथल्या परिस्थितीत adjust व्हायला दोनतीन दिवस लागले चालण्याचा अनुभव इतका वेगळा आहे कि लहानपणी चालायला शिकतानाची आठवण झाली नव्यान चालायला शिकण्याचा अनुभव विलक्षण होता सतत तरंगत्या अवस्थेत असल्यामुळे जिथे थांबायच असत त्याच्या पुढे आम्ही पोहोचतो म्हणून सतत तोल सावरत सजग राहाव लागत म्हणजे जिथे उभ राहायचय तिथे स्थिर राहता येत कधी अंतराळ स्थानकाच्या भिंतीवर पाय ठेवून आधार घ्यावा लागतो आणि तरंगत जाणारया वस्तू पकडताना तारांबळ उडते ,कसरत करावी लागते आणि आम्ही ते सार एन्जॉय करतो! भीती नाही वाटत!

            अंतराळातील सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात भिंतीचा आधार घेताना Mark Vande Hei  फोटो -नासा संस्था

Eleanor -तुम्ही तिथे कोणते प्रयोग करत आहात ?
खूपच छान प्रश्न आहे ! इथे शंभरावर सायन्स विषयक प्रयोगांवर संशोधन सुरु आहे आम्ही lung cancer वरील आधुनिक उपचारावर संशोधन करणार आहोत ईथल्या अंतराळ संशोधकांनी अंतराळातील वातावरणात lung tissue growth वर संशोधन करून त्यांचे सॅम्पल्स  नुकतेच पृथ्वीवर आणलेत आणि हे त्यांचे संशोधन भविष्यात  कॅन्सर वरील प्रभावी इलाजासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल
River - अंतराळ स्थानकातील वास्तव्यादरम्यान तुम्हाला तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड सोबत बोलायला कितीवेळा संधी मिळते
Mark  -इथे फोन असला तरीही स्थानकातून पृथ्वीवर संवाद साधण तिथल्या सारख सोप नसत कित्येकदा संपर्क होत नाही कारण कधी कधी satellite च coverage नसत तरीही आम्ही बरेचदा घरच्यांशी संवाद साधतो दोन दिवसातून एकदातरी मी पत्नीशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो काल पहिल्यांदा मी माझ्या मुलांशी बोललो त्यांना स्पेस स्टेशनची टुर घडवली त्यांनींही ती खूप एन्जॉय केली!
Cameron - भविष्यात मानव मंगळावर राहू शकेल का?
Mark - नक्कीच ! जो पर्यंत मानव शांतीं अन समाधानान एकत्रित राहील तो पर्यंत मानव मंगळावर वस्ती करून राहू शकेल आणि त्या साठी आपल्याला खूप प्रयत्न आणि कष्ठ करावे लागतील नवीन गोष्टी आत्मसात कराव्या लागतील
Grady - आजवर अंतराळ स्थानकाला एखादी उल्का धडकली आहे का ? आणि तस घडल असेल तर कशी दुरुस्ती करण्यात आली
Mark - हो! बऱ्याचवेळा असं घडलय छोटया,छोटया उल्का धडकल्या,त्याच्या खुणाही आहेत त्यामुळे नुकसान झाल नाही कारण स्थानकाची रचनाच तशी करण्यात आलीय फक्त स्पेसवॉक साठी जाताना विशेष खबरदारी घ्यावी लागते कधी उल्का मध्ये आली तर स्थानकाचा मार्ग बदलण्यात येतो
Hannah  -स्पेसमध्ये राहताना येणारया संभावित धोक्याला सामोरे जाण्यासाठी मानसिक तयारी कशी करता?
Mark  आम्हाला लाँचिंगच्या आधीच ह्या सर्व गोष्ठीसाठी ट्रेनिंग दिल जात ते खूप कठीण आणि कठोर असत कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची आमची तयारी करून घेतली जाते त्या मुळे काही अडचण येत नाही म्हणूनच लाँचिंग पासून स्थानकातील प्रवेशापर्यंत सार सुरळीत पार पडल
Kelly - सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात तुमच रोजच काम कस पार पडत ?
Mark - हे काम एकाचे नाही तर साऱया टीमचे असते पृथ्वीवरून स्पेस स्टेशनच काम मॅनेज केल्या जात सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाची सवय व्हायला थोडा वेळ लागतो ह्या वातावरणात काम करताना स्वत:ला स्थिर ठेवण्यासाठी आधार शोधावा लागतो दोन्ही हात कामात असतील तर पायांनी भिंतींचा आधार घेत स्थिर राहील तरच काम करता येत नाहीतर आम्ही तरंगत राहून काम करण अशक्य असत
Andrew - तुम्हाला एखाद्या ग्रहावर जायची संधी मिळाली तर तुम्हाला कुठे जायला आवडेल ? आणि का?
Mark - खरतर माझा सर्वात आवडता ग्रह पृथ्वी आहे कारण आपण पृथ्वीवर जन्म घेतलाय आणि नंतर मला मंगळावर जायला आवडेल त्या साठी सध्या मंगळ मोहीम राबवल्या जातेय पृथ्वीपेक्षा पूर्णपणे वेगळा आणि मानवी निवासासाठी अनुकूल असलेल्या ग्रहावर राहण्यासाठी जातानाचा दूरवरचा प्रवास उत्सुकतापूर्ण आणि थरारक असेल
 Abbie -  स्थानकात अंतराळवीर आजारी पडले तर काय करता ?
 Mark -सुदैवाने आमच्या टीममध्ये एक डॉक्टर आहे पण नेहमीच असं नसत त्या मुळेच आम्हाला ट्रेनिंगच्या वेळेस डेंटल,मेडिकल ट्रेनिंग दिल्या जाते शिवाय पृथ्वीवरून नासाची टीम मार्गदर्शन करते आणि समजा खूपच कठीण परिस्थिती आली आणि पृथ्वीवर जाण अत्यावश्यक असेल तर इथे स्पेसक्राफ्ट असत त्याचा उपयोग होऊ शकतो
Miles - स्पेस स्टेशन मधून पृथ्वीपेक्षा जास्तवेळा सूर्य ग्रहण दिसत का ?
Mark -  नाही !आम्ही अंतराळात असलो तरी पृथ्वीपासून जवळच्या अंतरावर असल्यामुळे पृथ्वीवर जेव्हा ग्रहण दिसत तेव्हाच आम्हालाही दिसत कारण सूर्य पृथ्वी आणि चंद्र जेव्हा एका रेषेत येतात तेव्हाच ग्रहण होत फक्त अंतराळातून पृथ्वीवर आम्हाला ग्रहणाची सावली दिसते
Hudson - स्थानकात पोहोचल्या नंतर आजवर तुमचा किती प्रवास झाला ?
Mark -स्पेस स्टेशन ताशी 17000700 मैल वेगाने फिरत आहे आणि दिवसाचे चोवीस तास आम्ही बुधवारी पोहोचलो आता सहा दिवस झालेत तेव्हा हिशोब कर
RD -तुम्ही स्थानकातून घरी परत कसे येता ?
Mark - आणखी एक इंटरेस्टिंग प्रश्न ! आम्ही पृथ्वीवर सोयूझ यानाने परत येतो ज्या यानाने स्थानकात आलो त्याच यानाने परतताना यानाचा वेग कमी करत पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करून पॅराशूटच्या सहाय्यानें पृथ्वीवर परततो
Modi - तुम्हाला अंतराळवीर व्हाव असं का वाटलं?
Mark - मला हे काम शारीरिक आणि मानसिक दृष्टया आव्हानात्मक वाटल तसही मला परिघाबाहेरच काम करायला आवडत इथे वेगवेगळ्या देशातील संशोधकांसोबत मानवी आरोग्यासाठी उपयुक्त प्रयोगांमध्ये सहभाग नोंदवायला मिळतो
Lyton - अंतराळ वीर होण्यासाठी कितीकाळ ट्रेनिंग घ्याव लागत
Mark - तस तर आयुष्यभर! मी 2009 साली नासा मध्ये अंतराळवीर म्हणून दाखल झालो आणि आता 2017साली स्थानकात पोहोचालो तब्बल आठ वर्षांनी
Toni - सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचा तुमच्यावर काय परिणाम झाला ?
Mark - खूपच विनम्र करणारा अनुभव आहे हा ! नवीन अंतराळवीरांच्या आजूबाजूला जेव्हा आधीचे अंतराळवीर सारी कामे सराईतपणे करतात तेव्हा सवय व्हायला वेळ लागतो एखाद काम करताना एखादी वस्तू तिथेच ठेवून दुसरीकडे वळल तर ती वस्तू तिथे नसते कारण तरंगत ती दुसरीकडे जाते कधी कधी लक्ष नसल कि धडक लागते आता हळू हळू सवयीन स्वत:वर नियंत्रण ठेवता येतेय

             स्थानकात तोल सावरतानाचे प्रात्यक्षित दाखवताना Mark Vande Hei -फोटो -नासा संस्था

Billy - स्थानकातून चंद्र कसा दिसतो ?
Mark - पृथ्वीपेक्षा वेगळा नसला तरी मध्ये ढग नसतात त्या मुळे चंद्र स्पष्टपणे दिसतो
Brook - अंतराळात कितीकाळ राहता येत ? तुम्ही सध्या ज्या मोड्युल मध्ये राहताय त्या बद्दल सांगा
इथल्या सारखेच Northern lights दिसतात कि वेगळे ? Aurora कसा दिसतो तिथून ?
Mark -तशी ठराविक मर्यादा अजून माहीत नाही पण वर्षभर मानव राहू शकतो आम्ही आगामी दूरवरच्या मानवासहित अंतराळ मोहिमेत मानव निरोगी आणि दीर्घकाळ वास्तव्य करू शकेल असे प्रयत्न करतोय
मी सध्या US Hub मध्ये आहे तिथे खूप सोयी सुविधा आहेत ,इंटरनॅशनल पेलोड रॉक्स आहेत इथली बहुतांश जागा यंत्रांनी आणि storage ने व्यापलीय आम्हाला लागणारे प्रयोगांसाठीचे सामान स्थानकासाठीची आवश्यक सामग्री इथेच आहे
मी स्थानकात पोहोचलो तेव्हा सार खूप वेलकमिंग होत आम्हाला खूप काम असल्याने बिझी होतो नंतर मात्र मी विश्रांती न घेता खिडकी जवळ सूर्यास्त आणि सूर्योदय पाहण्यासाठी गेलो तेव्हा आधीच्या अंतराळवीरांनी northern lights आणि aurora दाखवला पृथ्वीवरून हिरव्या पडद्याप्रमाणे दिसणारा aurora  इथून हिरव्या तरंगाप्रमाणे अप्रतिम दिसतो
मुलांना जर अंतराळवीर व्हायचे असेल तर त्या साठी खूप कष्ट करत ध्येय साध्य करा असे सांगत Mark ह्यांनी मुलाखतीचा शेवट केला


Saturday 16 September 2017

शनी ग्रहावर कॅसिनी अंतराळ यानाचा ग्रँड फिनाले संपन्न


            शनी ग्रहावर गेलेले व आता अंतराळात विलीन झालेले कॅसिनी अंतराळ यान  - फोटो -  नासा संस्था                                                                                                                    
नासा संस्था -15 सप्टेंबर
13 वर्षे अविरतपणे शनीभोवती भ्रमण करीत पृथ्वीवर उपयुक्त माहिती पाठवणारया कॅसिनी यानाने अखेर काल अपेक्षेप्रमाणे शनी ग्रहाच्या वरच्या वातावरणात प्रवेश केला
आणि ठरल्या प्रमाणे ठरल्या वेळेला 15 सप्टेंबरला ह्या कॅसिनी यानाचा फेअरवेल सोहळा निर्विघ्नपणे पार पडला सकाळी  7.55  मिनिटाला कॅसिनी यानाचा पृथ्वीशी असलेला संपर्क तुटला आणि त्याचे Thrusters सुरु झाले.काही वेळातच कॅसिनी यान नियंत्रणाविना अंतराळात भरकटले आणि यानाचा स्फोट होऊन ते शनिग्रहावर आदळले वातावरणातील प्रचंड वादळी वाऱ्याचा वेगाने आणि स्फोटाने कॅसिनी यानाने पेट घेताच यान आणि त्याचे पेटते भाग वातावरणात इतरत्र उडाले. क्षणाभरातच गेल्या वीस वर्षांपासूनचे सुरु असलेले कॅसिनी मिशन संपुष्ठात आले आणि सौरमंडळातील थरारक युगाचा अंत झाला

           शनीच्या कक्षेत शिरून शनी ग्रहावर धडकताना कॅसिनी अंतराळ यानाची हि शेवटची प्रतिमा
                                                                                                                   फोटो -नासा संस्था
कॅसिनी अंतराळ यानाचा हा फेअरवेल सोहळा पाहण्यासाठी अमेरिकेतील नासाच्या जेट प्रपल्शन लॅब व इतर सेंटर मध्ये नासाचे 1500 शास्त्रज्ञ,इंजिनीअर्स,तंत्रज्ञ आणि ह्या मोहिमेशी संबंधीत अधिकारी व कर्मचारी एकत्र जमले होते  कॅसिनीचा ग्रँड फिनाले यशस्वी झाल्याचे संकेत मिळताच साऱ्यांनी आनंद साजरा केला

            कॅसिनीचा ग्रँड फिनाले यशस्वी झाल्याचा आनंद साजरा करताना मोहिमेतील शास्त्रज्ञ व पदाधिकारी
                                                                                                                                फोटो -नासा संस्था

कॅसिनी यान 1997 मध्ये अमेरिकेतील फ्लोरिडा येथील  Cape Canveral Air Force Station येथून 13 ऑक्टोबरला प्रक्षेपित करण्यात आले होते आणि शनीच्या प्रवासाला निघालेले कॅसिनी अंतराळयान तब्बल 7 वर्षे अंतराळ प्रवास करून 2004 साली शनीवर पोहोचले कॅसिनीने शनीवर पोहोचताच यशस्वी कामगिरी करत त्यातील अत्याधुनिक यंत्रणेद्वारे उपयुक्त माहिती गोळा करून पृथ्वीवर पाठवत हि मोहीम यशस्वी केली कॅसिनीतील इंधन कमी होताच आणि त्याचा अपेक्षित कार्यकाळ पूर्ण होताच शास्त्रज्ञानीं हि मोहीम थाबवण्याचे ठरवले होते पण कॅसिनीची कमी इंधनातली जास्त काळाची यशस्वी कार्यक्षमता पाहून हि मोहीम प्रथम दोन वर्षे आणि नंतर सात वर्षापर्यंत वाढवण्यात आली ह्या काळात कॅसिनीने पाठविलेली शनीची सखोल माहिती पाहून शास्त्रज्ञही अचंबित झाले
शनीचे चंद्र तेथील बर्फ,वातावरण आणि मानवाला आकर्षित करणाऱ्या शनीच्या कड्याचे गूढ कॅसिनीने घेतलेल्या फोटोमूळे आणि गोळा केलेल्या माहितीमुळे उलगडले शिवाय शनीबद्दल मानवामध्ये असलेले गैरसमजही दूर झाले शनी पीडादायक नसून तोही पृथ्वी सारखाच सुंदर ग्रह असून पूर्वी तिथेही सजीवसृष्ठी अस्तित्वात असण्याची शक्यताही बळावली
कॅसिनीच्या ग्रँड फिनाले नंतर नासाच्या शास्त्रज्ञानीं,आणि इतर अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या
Thomas Zurbuchen (Associate Admin Science mission & Directorate Washington ) म्हणतात ,
" एका विस्मयकारी मिशनचा हा अंत असला तरी हि नवीन मोहिमेची सुरवात आहे कॅसिनी मुळे शनीच्या दोन चंद्राची माहिती मिळाली शिवाय तिथे पूर्वी अस्तित्वात असलेले व लोप पावलेले समुद्राच्या ठिकाणाचे पुरावे पुरातन जीवसृष्ठीची शक्यता दर्शवतात ह्यामुळे ब्रह्मांडात पृथ्वीसारख्या जीवसृष्ठी असलेल्या ठिकाणांच्या शोधात मोलाची भर पडली आहे "
Michael Watkins -( Director Nasa JPL Lab California ) म्हणाले ,
" हा कडू गोड निरोपाचा अविस्मरणीय ऐतिहासिक क्षण आहे! ह्या  कॅसिनी मोहिमेने शनी बद्दलचे पूर्व दूषित मत बदलून गेले आहे आणि ह्या नवीन आच्श्चर्य कारक उपयुक्त माहितीमुळे आगामी अंतराळ मोहीम आणि संशोधनास नवा आयाम प्राप्त झाला आहे आजवर कुठलेही यान शनिग्रहावर पोहोचले नव्हते पण कॅसिनीने हि अवघड व अशक्य कामगिरी यशस्वी केली आता ह्या ग्रँड फिनालेचा अंत झाला आहे "
Earl Maize -(Cassini Project Manager J PL) म्हणतात ,
" Cassini Opration Team मधील सर्वच जण ह्या यशाचे मानकरी आहेत त्यांनी कुशलतेने आणि कर्तृत्वाने हे दैदिप्यमान यश मिळवले आहे ह्या यानाचे डिझाईन करणारे तंत्रज्ञ ग्रेट आहेत सात वर्षांपूर्वी कॅसिनी यानाची कक्षा वाढवुन बावीसवेळा शनीच्या कड्यांमधल्या कॅसिनीच्या भ्रमणावर नियंत्रण ठेवण अत्यंत कठीण होत ते त्यांनी कार्यकुशलतेन यशस्वी केल आणि त्याचा शेवटही कॅसिनी यानामार्फत पूर्ण माहिती मिळवून यशस्वीपणे केला हे निश्चितच अभिमानास्पद आहे "
Linda Spilker -(Cassini Project Scientist ) म्हणाल्या ,
" आता कॅसिनी मिशन संपले आहे त्या मुळे रोज आकाशात पाहताना त्याची उणीव जाणवेल पण मी त्याला सौरमालेतील फिरणाऱ्या प्लॅनेट मध्ये पाहीन कारण त्याच्या काही भागांचे अवशेष शनीग्रहावर पडलेले असतीलच "
कॅसिनीने जाता जाताही पृथ्वीवर अँटेना व इमेजिंग कॅमेराच्या साहाय्याने काही शेवटचे संदेश व सिग्नल दिले आहेत ते नासाच्या डीप स्पेस नेटवर्क अँटेना complex Canberra Australia इथे प्राप्त झाले आहेत
आणि अपेक्षेप्रमाणे कॅसिनी यानाच्या वेगवेगळ्या उपकराणाद्वारे पाठवलेली माहिती संकलित करून त्याचे परीक्षण केल्यानंतरची संशोधित माहिती येत्या काही आठवड्यात प्राप्त होईल आणि शनी व त्याची उत्पत्ती ह्याचे गूढ उलगडेल  

Friday 15 September 2017

शनिग्रहावर यशस्वी कामगिरी पार पाडून कॅसिनी अंतराळयान आज होणार नष्ट

             कॅसिनी अंतराळ यान शनीचे कडे भेदुन शनिग्रहावर प्रवेशताना -फोटो नासा संस्था

नासा संस्था -15 सप्टेंबर
शनिग्रह व त्याच्याभोवतीच्या कड्यांचे गूढ उकलण्यासाठी शास्त्रज्ञ वर्षानुवर्षे प्रयत्न करत आहेत अमेरिकेच्या नासा संस्थेने वीस वर्षांपूर्वी पृथ्वीवरून शनिग्रहावर पाठवलेले आणि आजपर्यंत सतत कार्यरत असलेले  कॅसिनी अंतरिक्ष यान आज (15 सप्टेंबर ) नष्ट करण्यात येणार आहे
शनी ग्रह,त्याच्या भोवतीचे कडे, तेथील वातावरण आणि तिथल्या जीवसृष्टीच्या अस्तित्वाची शक्यता ह्या विषयी सखोल माहिती मिळवण्यासाठी वीस वर्षांपूर्वी नासाने कॅसिनी अंतराळ यान पृथ्वीवरून शनीग्रहावर पाठवले होते सात वर्षांच्या प्रवासानंतर ते शनिग्रहाच्या कक्षेत पोहोचले आणि गेल्या तेरा वर्षांपासून हे यान शनीभोवती अविरत भ्रमण करीत तिथली इतंभूत माहिती पृथ्वीवर पाठवत होते
अनेक चक्रीवादळांना तोंड देत आणि अनेक ग्रह पार करीत शनीपर्यंत पोहोचलेल्या आणि अविरतपणे शनीभोवती भ्रमण करत सतत शनीची माहिती पृथ्वीवर त्वरित पोहोचवणाऱया कॅसिनी यानाचे इंधन जेव्हा संपत आले  तेव्हा हे मिशन संपवण्याचा निर्णय नासाच्या खगोल शास्त्रज्ञांनी घेतला होता त्याची सुरवात  26 एप्रिलला ह्या कॅसिनी यानाचा ग्रँड फिनालेने झाली होती
शास्त्रज्ञांनी हे यान नष्ट करण्यापूर्वी कॅसिनीला शनिग्रहाच्या कक्षेत धडकवून यानाचा शेवट करण्याचा धाडसी निर्णय घेतला होता सव्वीस एप्रिलला बुधवारी ह्या ग्रँड फिनालेची सुरवात झाली तेव्हा कॅसिनी यान शनी ग्रह व त्याच्या कड्यामधील 1500 मैल रुंद पट्यात शिरले होते
आजवर एकही यान शनीच्या कक्षेत शिरले नव्हते पण नासा संस्थेने हे धाडस करण्याचे ठरवले होते कारण  ह्या धाडसामुळे ब्रम्हांडातील मोठे ग्रह व ग्रहमालांच्या उगमाचे रहस्य उलगडेल शिवाय ह्या कॅसिनी यानाचा शेवट जरी झाला तरी तो नवीन मोहिमेसारखाच असेल अशी आशा शास्त्रज्ञांना वाटत होती
इतक्या वर्षांमध्ये कॅसिनीने मिळवलेल्या माहितीच्या आधारे कॅसिनीच्या इंजिनीअर्सनी Flight Plan तयार केला होता त्या नुसार 22 एप्रिलला कॅसिनी यानाने Titan ह्या शनीच्या चंद्राच्या अतिशय जवळून प्रवास केला तेव्हा Titan च्या गुरुत्वाकर्षणाच्या परिणामामुळे कॅसिनीची भ्रमण कक्षा थोडीशी खाली  झुकली त्यामुळे हे यान कड्यांच्या बाहेरून न फिरता ग्रह व कड्यांच्या आतल्या कक्षेत शिरले होते
आणि आता आज 15 सप्टेंबरला कॅसिनी यान शनिग्रहावर धडकेल व नष्ठ होईल शास्त्रज्ञाच्या माहितीनुसार ह्या प्रक्रियेत अडचणी येणार नाहीत असा प्राथमिक अंदाज असला तरीही आवश्यक ती सावधगिरी बाळगली गेली आहे यानासमोरील अँटेना द्वारे मार्गाची सुरक्षितता तपासल्या जाईल
आता कॅसिनी यान नष्ठ होण्याआधी ताशी तेरा हजार मैल वेगाने शनिग्रहाभोवती भ्रमण करेल आणि फिरता,फिरता हे यान गोते खात स्फोट घडवुन जळून नष्ठ होईल  ज्या वेळेस हे यान नष्ट होण्याच्या स्थितीत येईल तेव्हा कॅसिनी यान शनीच्या चंद्राच्या थंड वातावरणातील वायूमंडलात पोहोचलेले असेल आणि शनीवर तेव्हा दिवस असेल
15 सप्टेंबरला यान जेव्हा शनी वर धडकेत तेव्हा ह्या कॅसिनी यानाचा शेवट होण्यास सुरवात होईल तेव्हा
अमेरिकेत सकाळचे 7..55 मिनिटे झालेले असतील
शनीच्या वायूमंडलात शिरल्यानंतर कॅसिनी तिथल्या पातळ आवरणात सक्रिय राहण्यासाठी छोटे.छोटे स्फोट घडवेल आणि भ्रमण सुरु ठेवेल पण जसजसा ह्या वायुमंडळाचा थर जाड होत जाईल तेव्हा तो निष्क्रिय होईल त्या मुळे कार्यरत राहण्यासाठी तो मोठा स्फोट घडवेल पण एक मिनिटाच्या आत त्याचा पृथ्वीशी संपर्क तुटेल आणि  नियंत्रण नसल्याने हे यान गोते खात भरकटत जाईल आणि मोठा विस्फोट होऊन कॅसिनी यान नष्ठ होण्यास सुरवात होईल
जोवर हे यान पूर्णपणे नष्ठ होत नाही तोवर त्यतील वेगवेगळ्या उपकरणाद्वारे हे यान शेवटपर्यंत पृथ्वीवर माहिती पाठवत राहील कॅसिनीचा इमेजिंग कॅमेरा शनी ग्रहावरचे व त्याच्या भोवतीच्या कड्यांचे सगळीकडून फोटो घेईलच शिवाय शनीचा चंद्र टायटन आणि  Enceladus ह्यांचे देखील फोटो घेईल कॅसिनी यानाद्वारे पाठवलेला शेवटचा संदेश ऑस्ट्रेलियातील कॅनबेरा डीप स्पेस सेंटर मध्ये प्राप्त होईल
आजवर कासिनी यानाने पृथ्वीवर शनीविषयी अत्यंत महत्वपूर्ण व अत्याधुनिक माहिती पाठवली असून
शनीच्या  Enceladus ह्या चंद्रावरील बर्फ़ाळ प्रदेशात जागतिक महासागर असून त्याचा दुसरा चंद्र Titan वर  देखील द्रव्य रूपातील मिथेनचा महासागर वहात असल्याचे संकेत कॅसिनी यानाने दिले आहेत

Wednesday 13 September 2017

नासाच्या मोहीम 54 चे तीन अंतराळवीर अंतराळस्थानकात पोहोचले

          अंतराळवीर Mark Vande , Joe Acaba आणि Alexander लाँचिंगच्या तयारीत -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -13 सप्टेंबर
नासाच्या अंतराळ मोहीम 54 चे अंतराळवीर Mark Vande Hei , Joe Acaba  आणि रशियन अंतराळवीर Alexander Misurkin  बुधवारी 13 सप्टेंबरला अंतराळस्थानकात पोहोचले आहेत
कझाकस्थानातील बैकोनूर कोस्मोड्रोमवरून सोयूज MS-05 हे अंतराळ यान संध्याकाळी  5.17 मिनिटाला   (3.17 a.m.स्थानिक वेळ ) ह्या तिन्ही अंतराळवीरांना घेऊन अंतराळस्थानकाकडे झेपावले व पृथ्वीभोवती चारवेळा परिक्रमा करून सहा तासांनी रात्री 10.55 मिनिटाला स्थानकात पोहोचले 12.40 मीनिटांनी हे यान स्थानकाशी जोडले गेले

                  सोयूज MS-05 अंतराळ यान अंतराळस्थानकात पोहोचताना फोटो - नासा संस्था

 ह्या तीन अंतराळवीरांचा स्थानकात प्रवेश झाल्यानंतर स्थानकाचे सध्याचे कमांडर Randy Bresnik ,Sergey आणि Paolo Nespoli ह्या तीन अंतराळवीरांनी त्यांचे स्थानकात स्वागत केले
प्रथम स्थानकात कमांडर Alexander ह्यांनी प्रवेश केला त्या नंतर Joe आणि शेवटी Mark ह्यांनी स्थानकात प्रवेश केला Alexander व Joe ह्यांची हि दुसरी अंतराळवारी आहे तर मार्क ह्यांची मात्र हि पहिलीच अंतराळवारी आहे प्रवेशानंतर हे अंतराळवीर रशियन सेगमेंट मध्ये पोहोचले
आता अंतराळस्थानकातील अंतराळवीरांची संख्या सहा झाली असून हे सर्वजण मिळून स्थानकात सूरु असलेल्या सायन्सविषयक संशोधनात सहभागी होतील
मोहीम 53 चे Randy Bresnik,Sergey आणि Nespoli हे अंतराळवीर डिसेंबर पर्यंत अंतराळस्थानकात निवास करतील आणि हे नवे तीन अंतराळवीर फेब्रुवारी 2018 मध्ये पृथ्वीवर परततील
ह्या तिन्ही अंतराळवीरांचा स्थानकात प्रवेश झाल्यानंतर Welcoming ceremony व सुखरूप पोहोचल्याच लाईव्ह टेलिकास्ट नासा संस्थेन ह्या अंतराळवीरांच्या नातेवाईक व मित्रांना दाखवल आणि त्यांचा अंतराळवीरांशी संवादही घडवला त्या हृद्य क्षणाचा हा वृत्तांत

          स्थानकातून अंतराळवीर लाईव्ह टेलीकास्टद्वारे कुटुंबियांशी संवाद साधताना  फोटो -नासा संस्था

नासा संस्थेने अंतराळवीर आणि त्यांचे नातेवाईक ह्यांचा t.v. वरून लाईव्ह संपर्क साधून देण्याआधी ह्या अंतराळवीरांना तुम्ही ह्या संवादासाठी रेडी आहात का ? तुम्हाला ऐकू येतेय का? असे विचारून कार्यक्रमाला सुरवात झाली

          अंतराळवीरांशी लाईव्ह टेलिकास्ट द्वारे संवाद साधताना अंतराळवीरांचे नातेवाईक फोटो -नासा संस्था

प्रथम Alexander ह्यांनी त्यांची पत्नी ,आजी आणि मुलीशी संवाद साधला तेव्हा त्यांच्या मुलीन त्यांना
हॅलो डॅड ! How are You ! love You ! तिथल वातावरण कस आहे ? खूप गरम आहे का ? असं विचारल
तेव्हा त्यांनी खूप छान आहे मी खूप आनंदात आहे इथे थंड वातावरण आहे असं सांगीतल त्यांच्या मुलीने त्यांचा आजीशीही संवाद घडवला तेव्हा काळजी करणाऱया आजीशी संवाद साधत ,आजी बघ इथे मी किती सुरक्षित चांगल्या अवस्थेत आहे! इथे आजूबाजूला कस मस्त वाटतय !  असे सांगितले
त्यांच्या पत्नीनं त्यांना तू वंडरफूल आहेस excellent आहेस beautiful दिसतोयस मला तुझा अभिमान वाटतोय कीप इट उप म्हणत शुभेच्छा दिल्या
Mark -ह्यांच्या पत्नीनेही त्यांना कसा आहेस ? तिथे adjust झालास का ?  मला तुझा अभिमान वाटतोय असं सांगितल
मुलानेहि त्यांना डॅड how are you ? असं विचारलं तिथल्या झिरो ग्रॅव्हिटी मुळे तरंगत्या अवस्थेत कस वाटतंय? असं विचारलं तर मुलगी Laura हिने देखील संवाद साधत त्यांची ख्याली खुशाली विचारली ती म्हणाली,तुमचा स्वागत सोहळा पाहिला आम्हाला पाहायला छान वाटल पण खरंच तुमचा प्रवास कसा झाला ?
पोहोचल्याचा क्षण कसा होता ?
Mark म्हणाले
मी छान आहे ,सुरक्षित आहे! आमचा प्रवास सुरळीत झाला! smooth होता , तो अनुभव अमेझिंग होता! लाँचिंगनंतर टेस्टिंगच्या वेळेस सारे शांत होते पण मी मात्र  खिडकीतून बाहेर पाहिल तेव्हा मला सूर्यकिरणे दिसली ते सुंदर दृश्य पाहून अभावीत पणे माझ्या मुखातुन Wow ! Wow ! असे शब्द बाहेर पडले तेव्हा माझ्या सहकाऱयांना वाटल काहीतरी गडबड झाली आणि त्यांनी विचारलं काय झाल सार ठीक आहे ना? आणि पोहोचल्यावर खिडकीतुन बाहेर पाहील तेव्हा चंद्रदर्शन झाल अलौकिक अदभुत होते ते दृश्य! दुरून स्थानक पाहिल तो क्षण आणि सारच ऑसम ! शब्दातीत होत सार! माझी पहिलीच अंतराळवारी असल्याने मला adjust व्हायला थोडा वेळ लागला तशी ट्रेनिंगच्या वेळेस तयारी झाली आहेच माझे सहकारी अंतराळवीर अनुभवी आहेत त्यांची मदत झाली आणि भविष्यातही होईलच
Joe Acaba -ह्यांचे वडील ,आई नातेवाईक ह्यांनीही त्यांच्याशी संवाद साधत ते सुखरूप आहेत का ? कसे आहेत प्रवास कसा झाला असे विचारले
त्यांच्या आईने त्यांना सांगितले आम्हाला तुझा अभिमान वाटतोय !आम्हीच नाही तर सारा देश तुझ्या पाठीशी आहे आमच्या साऱयांच्याच तुला शुभेच्छा आहेत we all love You ! आम्ही t.v. वर तुम्हाला पहातोय हे सार थरारक आहे! अमेझिंग आहे ! आम्हाला ह्या क्षणी बोलायला शब्द सुचत नाहीत तू स्वत:ची काळजी घे ! असं म्हटल तेव्हा त्यांनी सुद्धा thanks !  I love all of you ! म्हणत तुमच्या साऱ्यांचा शुभेच्छा मला उपयोगी पडल्या असे सांगत आम्ही सुरक्षित मस्त आहोत आमचा प्रवास छान झाला खरंच ऑसम होता! लाँचिंगचा अनुभव !
ह्या वेळेस त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलं कि ते गेल्यानंतर साऱयांनी एकत्रित पार्टी करून त्यांच्या आठवणी
शेअर केल्या त्यांनी सुचवलेलं गाणं ऐकलं ते आवडलं आणि तुझी खूप छान माहितीही एका दिवसात मिळाली तेव्हा Jeo  हसत म्हणाले ,बर झाल मी तेव्हा पृथ्वीबाहेर होतो मला माझ्याबद्दल ऐकायला आवडल नसत आता ती माहिती तुमच्यापुरतीच सीमित राहील अशी आशा करतो  आणि गाण खरंच छान आहे
 सर्वच नातेवाईकांनी तुम्हाला स्क्रीन वर पाहून आम्हाला तुमचा अभिमान वाटतोय काळजी घ्या तुमच काम यशस्वी करून सुखरूप परत या! असे सांगितले आणि त्यांचा अभिमान वाटतोय असं सांगत त्यांच्या संशोधनाला आणि अंतराळ स्थानकातील निवासाला शुभेच्छा दिल्या


Sunday 3 September 2017

नासाचे तीनही अंतराळवीर पृथ्वीवर सुखरूप पोहोचले



    पृथ्वीवर परतल्यानंतर सुहास्य वदनाने उपस्थितांना अभिवादन करताना Peggy ,Yurchikhin आणि Jack
      फोटो -नासा संस्था

नासा संस्था -3 सप्टेंबर
शनिवारी दोन सप्टेंबरला नासाचे तीनही अंतराळवीर पृथ्वीवर सुखरूप पोहोचले आहेत अंतराळस्थानकातून पूर्वनियोजित वेळेनुसार निघालेले त्यांचे MS-04 हे अंतराळयान शनिवारी रात्री 9.21 मिनिटाला  (स्थानिक वेळ 7.20a.m. तीन सप्टेंबर रविवार ) कझाकस्थानातील Dzhezkazgan येथे सुखरूप पोहोचले 

          पृथ्वीवर पोहोचल्यावर Jack Fischer आनंदी मुद्रेने प्राथमिक चेकअपच्या वेळेस फोटो -नासा संस्था

पृर्थ्वीवर परतल्याचा आनंद त्यांच्या चेहरयावर दिसत होता क्षणभर ते भावुक झाले त्यांचे स्वागत करायला आलेले नासाचे अधिकारी व कर्मचाऱयांनी त्यांचे उत्साहाने स्वागत केले त्यांना उचलून आणुन खुर्चीवर बसविले तिथे त्यांचे प्राथमिक चेकअप झाले नंतर त्यांना तिथेच असलेल्या मेडिकल टेंटमध्ये पुढील मेडिकल चेकअपसाठी चेअरसहित उचलुन नेण्यात आले शिवाय ह्या अंतराळ यानातून अंतराळवीरांनी आणलेले संशोधित सॅम्पल्सही काढून घेण्यात आले
अंतराळयानातुन प्रथम Fyodor Yurchikhin नंतर Jack Fischer आणि शेवटी Peggy Whitson ह्यांना आणण्यात आले आता चेकअप नंतर ते नियोजित स्थळी रवाना होतील
                                                 असा झाला निरोप समारंभ 
निघण्याआधी ह्या अंतराळवीरांनी एकमेकांचे आभार मानत निरोप घेतला ह्या अंतराळ मोहीम 52 चे कमांडर Fyodor Yurchikhin ह्यांनी त्यांच्या पाचही अंतराळ मोहिमात त्यांच्या सोबतचे अंतराळवीर ,अंतराळ स्थानक तिथे करायला मिळालेले संशोधन सारेच खूपच ग्रेट असल्याचे सांगितले त्या बाबतीत मी लकी असल्याचे सांगत नासा संस्थेचे आभार मानले आताचेही माझे सहकारी अंतराळवीर खूप चांगले आहेत असे ते म्हणाले

              कमांडर Fyodor Yurchikhin निरोप समारंभाच्या वेळेला आभार मानताना  फोटो -नासा संस्था

ह्या मोहिमेतील सगळ्यात तरुण व बुद्धिमान अंतराळवीर Jack Fischer असल्याचे सांगत त्याने अत्यंत कमी वेळेत उत्कृष्ठ काम केल्याचे सांगीतले तो नासा मधेच नाही तर जगातलाच तरुण बुद्धिमान अंतराळवीर आहे असे गौरोवोदगारही काढले Peggy Whitson हिचेही त्यांनी कौतुक करत प्रशंसा केली
अंतराळवीर Sergey ही जॅक सारखाच हुशार असून ह्या तीनही अंतराळवीरांकडून आता भविष्यात आणखी चांगल्या कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली
त्या नंतर अंतराळवीर Randy Bresnik  ह्याला तू आता स्थानकाची जाबाबदारी घेण्यास तयार आहेस का ? असे विचारले तेव्हा Peggy ने तात्काळ त्याला पाठींबा देत प्रोत्साहित केले त्यानेही सर्वांचे आभार मानत कमांडर पद स्वीकारले तेव्हा Yurchikhin ह्यांनी त्याच्या हातात स्थानकाची Key देत त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव करून दिली आणि खेळीमेळीच्या वातावरणात सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला आणि निघण्याचा तयारीला लागले

   कमांडर Yurchikhin ह्यांनी स्थानकाची जबाबदारी दिल्यानंतर Key स्वीकारताना Randey Bresnik 
     फोटो -नासा संस्था

आधी दिलेल्या बातमीनुसार नोव्हेंबरमध्ये सुरु झालेल्या ह्या मोहिमेत Peggy Whitson ह्यांनी 288 दिवस अंतराळस्थानकात निवास करून व Yurchikhin व Fischer  ह्या अंतराळवीरांनी 136 दिवस अंतराळस्थानकात राहून तिथे सुरु असलेल्या earth science ,biology ,biotechnology व इतर शेकडो संशोधनात सहभाग नोंदवला शिवाय अंतराळात राहताना मानवी आरोग्यावर होणाऱया परिणामाचेही निरीक्षण नोंदवून त्यावर सखोल संशोधन केले विशेषतः अंतराळवीरांच्या डोळ्यांमध्ये व Lung Tissue वर अंतराळातील झिरो ग्रॅव्हिटी मध्ये होणारया बदलाचे निरीक्षण नोंदवून त्यांचे सॅम्पल्सही सोबत आणले आणि स्टेम सेल उपचारावरही संशोधन केले असून त्यांचे संशोधन मानवाला उपयुक्त ठरेल या शिवाय त्यांनी अनेक आधुनिक संशोधन केले असून ते आगामी अंतराळ मोहिमेतील अंतराळवीरांना अंतराळ स्थानकातील निवासासाठी उपयुक्त ठरेल
                           

Friday 1 September 2017

रेकॉर्डब्रेकर Peggy Whitson,Jack Fischer आणि Fyodor Yurchikhin दोन सप्टेंबरला पृथ्वीवर परतणार


       मोहीम 52 ची फ्लाईट इंजिनीअर Peggy Whitson ,कमांडर Fyodor Yurchikhin आणि Jack Fischer          स्थानकातील Harmony Module  मध्ये तरंगत्या अवस्थेत -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -1सप्टेंबर
आजवरचे अनेक रेकॉर्ड ब्रेक करणारी नासाची अंतराळ वीरांगना Peggy Whitson फ्लाईट इंजिनीअर Jack Fischer आणि सध्याचे अंतराळ मोहीम बावन्नचे कमांडर  Fyodor Yurchikhin  दोन सप्टेंबरला पृथ्वीवर परतणार आहेत हे तिघेही नासाच्या सोयूझ MS -04 ह्या अंतराळ यानातून पृथ्वीवर परततील
अंतराळ स्थानकातून ह्या तीन अंतराळवीरांना घेऊन सोयूझ MS -04 हे अंतराळ यान संध्याकाळी 5.58 p.m.ला पृथ्वीकडे झेप घेईल आणि कझाकस्थान येथे  रात्री 9.22 p.m.ला पोहोचेल ह्या सर्वाचे लाईव्ह प्रक्षेपण नासा TV वरून करण्यात येणार आहे

  अंतराळवीर  Fyodor Yurchikhin ,Jack व Peggy Whitson परतण्याच्या तयारीत entry suits चेक करताना

पृथ्वीवर परतण्याआधी ह्या अंतराळ मोहीम बावन्नचे सध्याचे कमांडर Fyodor Yurchikhin हे शुक्रवारी स्थानकाच्या कमांडरपदाची जबाबदारी नासाचे अंतराळवीर Randy Bresnik ह्यांच्या कडे सोपवतील
हार्वे वादळाच्या प्रभावामुळे Houston मध्ये ह्या तीन अंतराळवीरांच्या परतण्याच्या तयारीची नासा संस्था पुन्हा पडताळणी करणार आहे ह्या अंतराळवीरांनी अंतराळ स्थानकात राहून सायन्स विषयक शेकडो प्रयोग आणि अंतराळातील निवासादरम्यान अंतराळवीरांच्या शरीरावर होणारया परिणामावर संशोधन केले असून त्यांचे सॅम्पल्सही हे अंतराळवीर सोबत आणणार आहेत परतल्यानंतर हे अंतराळवीर Post Flight Medical evaluations मध्ये सहभाग नोंदवतील
ह्या अंतराळ मोहिमेत Peggy Whitson ह्यांनी सर्वात जास्त दिवस अंतराळ स्थानकात राहून संशोधन करण्याचा आणि सर्वात जास्त वेळा स्पेसवॉक करणारी पहिली अमेरिकन महिला अंतराळवीरांगना होण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे
नोव्हेंबर 2016 मध्ये तिसऱयांदा Peggy Whitson अंतराळस्थानकात राहण्यासाठी गेल्या तिथे त्यांनी संशोधनासोबतच स्थानकात कोबीच्या भाजीची यशस्वी लागवड केली आणि वेळोवेळी स्थानकातून नासा संस्थेद्वारे नागरिक व विध्यार्थ्यांशी संवाद साधत तिथली माहिती शेअर केली त्यांनी अंतराळ स्थानकातील मुक्कामही वाढवला आता त्यांनी त्यांच्या आजवरच्या अंतराळमोहिमांमध्ये अंतराळ स्थानकात 665 दिवस राहून संशोधन करण्याचा विक्रम प्रस्थापित केला असून तो आजवरच्या अमेरिकन अंतराळवीरांच्या स्थानकातील निवासापेक्षा जास्त आहे  त्यांनी ह्या अंतराळमोहिमेतील मुक्काम वाढवुन एकाच मोहिमेत सलग 288 राहण्याचा विक्रम प्रस्थापित केला असून त्यांच्या ह्या धैर्याने त्यांना अंतराळातील अंतराळवीरांच्या धैर्याच्या सूचीतील आठव्या क्रमांकावर पोहोचविले आहे विशेष म्हणजे हा विक्रम नोंदविणारया त्या पहिल्या  अमेरिकन महिला आहेत
Fyodor Yurchikhin ह्या रशियन अंतराळवीराची हि पाचवी अंतराळ मोहीम होती त्यांनी त्यांच्या आजवरच्या अंतराळ मोहिमांमध्ये अंतराळ स्थानकात 673 दिवस वास्तव्य केले असून अंतराळ स्थानकात जास्त दिवस वास्तव्य करणाऱया अंतराळवीरांच्या यादीत त्यांचा क्रमांक सातवा आहे तर Jack Fischer ह्यांनी अंतराळ स्थानकात 136 दिवस वास्तव्य केले आहे त्यांनीही स्थानकातून लाईव्ह संवाद साधत स्थानकातील गुरुत्वाकर्षण विरहित अवस्थेतील गमतीजमती करून दाखविल्या
आता हे तीनही अंतराळवीर पृथ्वीवर परतल्यानंतर स्थानकात Randy Bresnik,Sergey Ryazanskiy आणि Paolo Nespoli हे तिघेच वास्तव्य करतील व त्यांचे संशोधन सुरु ठेवतील 12 सप्टेंबरला आणखी तीन अंतराळवीर स्थानकात राहण्यासाठी जातील 

Sunday 27 August 2017

अमेरिकन नागरिकांनी लुटला खग्रास सूर्यग्रहणाचा आनंद


                             अमेरिकेतून दिसलेले पूर्ण रूपातील खग्रास सूर्य ग्रहण फोटो -नासा संस्था 

नासा संस्था -२२ ऑगस्ट 
हौशी अमेरिकन नागरिक आणि वैज्ञानिकांनी शंभर वर्षानंतर एकवीस ऑगस्टला दिसलेल्या खग्रास सुर्ग्रहणाच्या ह्या अभूतपूर्व सुवर्ण पर्वणीचा मनमुराद आनंद लुटला एरव्ही सूर्यग्रहण पाहण्यासाठी इतर देशात जाणारे अमेरिकन आपल्याच देशातील ग्रहण पाहण्याची हि सुवर्णसंधी सोडणार नव्हतेच !
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ह्यांनीही व्हाईट हाऊस मधून आपल्या पत्नीसोबत हे ग्रहण पाहिले विशेष म्हणजे ट्रम्प ह्यांनी तिथे उपस्थित लोकांनी नको नको म्हणत असताना देखील क्षणभर उघडया डोळ्यांनी चष्मा न घालता हे ग्रहण पाहिले

       अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पत्नीसोबत उघडया डोळ्यांनी सूर्य ग्रहण पाहताना -फोटो -नासा संस्था

अमेरिकेच्या चौदा राज्यात हे ग्रहण दिसले ह्या ग्रहणाचा काळ दोन मिनिटांपेक्षा जास्त होता ह्या वेळेस दिवसा सर्वत्र अंधार पसरल्यामुळे लोकांनी दिवसा रात्रीचा अनुभव घेतला ग्रहण काळातील पूर्ण रूपातील हिऱ्याच्या अंगठीच्या स्वरूपातील सूर्याला पाहून O! My God! My God ! अमेझिंग ! lovely ! अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया उपस्थितांच्या तोंडून बाहेर पडली काहींनी आनंदाने जल्लोष करत ग्रहणाचा आनंद व्यक्त केला

                          खग्रास सूर्यग्रहणादरम्यान काळवंडलेल्या सूर्याचा तेजोमय मुकुट -फोटो नासा संस्था

 अंतराळवीरांनीही अंतराळ स्थानकातून हे ग्रहण पाहिले आणि त्याचे फोटोही पाठवले विशेष म्हणजे खग्रास सूर्यग्रहणाच्या फोटोमध्ये अंतराळात भ्रमण करणारे अंतराळस्थानकही फोटोबद्ध झाले अंतराळवीरांसाठी हा क्षण औसुक्यपूर्ण आणि अविस्मरणीय होता हे दृश्य अलौकिक होते असे ते म्हणतात

     कमांडर FyodorYurchikhin ह्यांनी अंतराळस्थानकातून टिपलेले खग्रास सूर्यग्रहण - फोटो -नासा संस्था

                    ग्रहणाच्या फोटोमध्ये फोटोबद्ध झालेले अंतराळस्थानाक - फोटो नासा संस्था

ह्या शतकी खग्रास सूर्य ग्रहणासाठी गेल्या दोन महिन्यांपासून अमेरिकेतील नासा संस्थेतून खास तयारी करण्यात येत होती त्यासंबधीत बातम्याही प्रसारित होत होत्या हे ग्रहण कोठे दिसणार,त्यासाठी काय तयारी करावी ग्रहण पाहताना कोणती खबरदारी घ्यावी ग्रहण कसे पाहावे ह्यासारख्या सूचना देतानाच त्या संबंधीत प्रबोधनपर कार्यक्रमही नासा संस्थेने आयोजित केले होते विशेषतः मुलांना पृष्ठयांचे बॉक्स कापून त्यात ब्लॅक फिल्म बसवुन ग्रहण पाहण्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते 
नासा संस्थेने बारा ऑगस्टला प्रसारित केलेल्या बातमीत ह्या खग्रास सूर्यग्रहणाचे नासा t.v वरून लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार असल्याच तसेच एअरक्राफ्ट,स्पेसक्राफ्ट आणि अंतराळस्थानकातूनही ह्या ग्रहणाचे प्रक्षेपण करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते त्यासाठी ठिकठिकाणी मुख्य चॊकात स्क्रीनही बसवण्यात आले होते हे ग्रहण आपल्या कर्मचाऱयांना पाहता यावे म्हणून कंपन्यांनी आधीच सुटीही जाहीर केली होती
आणि अखेर शंभरवर्षानंतर अमेरिकेत सूर्याच्या खग्रास ग्रहणाचा क्षण येताच उत्साही अमेरिकन लोकांनी रस्त्यावर येऊन ग्रहण पाहण्यासाठी गर्दी केली विद्यार्थ्यांनी मिकी माऊस व मानवी चेहऱ्याचे कागदी मुखवटे बनवून डोळ्यांच्या ठिकाणी काळी फिल्म बसवुन ते घालुन हे ग्रहण पाहिले तर नागरिकांनी खास काळा चष्मा घालुन ह्या सुवर्ण संधीचा लाभ घेतला आधी सांगितल्या प्रमाणे नासा संस्थेने ठिकठिकाणी स्क्रीन वरून लोकांना हे ग्रहण दाखवले

   ग्रहणाचा आनंद घेताना नागरिक ,छोटी मुले आणि नासासंस्थेतील पदाधिकारी फोटो-नासा संस्था 

             खग्रास चंद्रग्रहण पाहून आनंद व्यक्त करताना अमेरिकन नागरिक -फोटो -नासा संस्था

हे ग्रहण भारतातून पाहता आले नाही कारण त्या वेळेस रात्र होती पण हे ग्रहण उत्तर अमेरिका ,दक्षिण अमेरिका ,पश्चिम यूरोप आफ्रिका व उत्तर पूर्व आशिया खंडात दिसले 


Saturday 19 August 2017

नासाच्या अंतराळ मोहीम 52 च्या अंतराळ वीरांनी केला स्पेसवॉक यशस्वी

              कमांडर  Fyodor Yurchikhin नॅनो सॅटलाईट बॉंक्स घेऊन स्पेसवॉकच्या तयारीत  

नासा संस्था 17 ऑगस्ट
नासाच्या अंतराळ मोहीम 52 चे कमांडर Fyodor Yurchikhin आणि फ्लाईट इंजिनीअर Sergey Ryazanskiy ह्या दोन्ही अंतराळवीरांनी 17 ऑगस्टला यशस्वी स्पेसवॉक केला अंतराळ स्थानकाच्या तांत्रिक कामासाठी व पाच नॅनो सॅटलाईट रिलीज करण्यासाठी हा स्पेसवॉक केल्या गेला सुरवातीला हा स्पेसवॉक सहा तासांनी संपेल अशी अपेक्षा होती मात्र हा स्पेसवॉक संपायला 7 तास 34 मिनिटे लागली सकाळी 10.36 मिनिटाला सुरु झालेला हा स्पेसवॉक संध्याकाळी 6.10 मिनिटांनी संपला ह्या स्पेसवॉक साठी दोन्ही अंतराळवीरांनी निळया रंगाच्या रेषा असलेला रशियन Orlan स्पेससूट परिधान केला होता

                      नासाचे अंतराळवीर  Fyodor Yurchikhin  व  Sergey Ryazanskiy स्पेसवॉक करताना 

अंतराळ स्थानकाच्या airlock च्या बाहेरील रशियन सेगमेंट मध्ये शीडी लाऊन ह्या दोन्ही अंतराळवीरांनी स्थानकाच्या बाहेरील भागाची तपासणी केली शिवाय ह्या अंतराळवीरांनी अकरा पाउंड वजनाची पाच नॅनो सॅटलाईट अंतराळात रिलीज केली ह्या नॅनो सॅटलाईट मध्ये नवीन 3-D प्रिंटिंग टेक्नॉलॉजिचा उपयोग केला असून पाच पैकी एका सॅटलाईटवर अंतराळातील कमी गुरुत्वाकर्षणाचा काय परिणाम होतो ह्याचे निरीक्षण नोंदवण्यात येणार आहे दुसऱया नॅनोसॅटलाईट मध्ये पृथ्वीवरील मानवाच्या अकरा बोलीभाषा मधील रेकॉर्ड केलेल्या शुभेच्छांचा समावेश आहे
रशियाच्या पहिल्या Sputnik 1 ह्या अंतराळयानाच्या लाँचिंगला यंदा साठ वर्षे पूर्ण झाली आहेत तसेच रशियन शास्त्रज्ञ Konstantin Tsiolkovsky ह्यांची 160 वी जयंती आहे त्या प्रित्यर्थ तिसरा नॅनोसॅटेलाईट अवकाशात प्रक्षेपित करण्यात आला आहे
अंतराळवीरांनी अंतराळ स्थानकाच्या तयारीसाठी केलेला हा 202 वा स्पेसवॉक होता अंतराळवीर Yurichikhin ह्यांचा हा नववा स्पेसवॉक होता तर अंतराळवीर  Sergey  ह्यांचा हा चवथा स्पेसवॉक होता ह्या दोनही अंतराळवीरांनी अंतराळ स्थानकाच्या आगामी स्पेसवॉक साठी आवश्यक ती कामगिरीही ह्या स्पेसवॉक मध्ये केली आहे 

Thursday 17 August 2017

Space X Dragon मालवाहु अंतराळयान अंतराळस्थानकात पोहोचले


                     नासाचे Space X Dragon  अंतराळात उड्डाण करताना -फोटो -नासा संस्था

नासा संस्था - 16 ऑगस्ट
नासाचे Space X Dragon मालवाहु अंतराळयान काही टन आवश्यक सामान घेऊन अंतराळस्थानकात व्यवस्थित पोहोचले आहे ह्या मालवाहू अंतराळ यानाचे अंतराळ स्थानकाकडे उड्डाण झाल्यापासून ते अंतराळस्थानकात पोहोचेपर्यंतचे लाईव्ह प्रक्षेपण नासा t.v. वरून करण्यात आले होते
Space X  Dragon अंतराळ स्थानकाजवळ पोहोचल्या नंतर अंतराळवीर Jack Fischer व Paolo Nespoli ह्यांनी Cupola मधुन त्याचे निरीक्षण केले व सुरक्षित अंतरावर अंतराळ यान आल्यावर स्थानकाच्या रोबोटिक आर्मला आवश्यक सूचना दिल्या त्यानंतर हे अंतराळ यान स्थानकाशी जोडल्या गेले त्यासाठी आवश्यक असलेली डॉकिंगची सोय ह्या अंतराळवीरांनी स्पेसवॉकच्या वेळेसच केली होती
ह्या स्पेस X  अंतराळ यानातून अंतराळ स्थानकासाठी लागणारे तसेच अंतराळवीरांच्या संशोधनासाठी लागणारे सामान ,इंधन आणि अन्न पाठवण्यात आले आहे ह्या अंतराळ यानातून पाठवण्यात आलेल्या 64 टन वजनाच्या सामानात अंतराळ स्थानकासाठी लागणारे payload व इतर सामानासोबतच अंतराळवीरांसाठी खास स्वीट ट्रीटही पाठवण्यात आलीय त्या मध्ये आईस्क्रीम ,चॉकलेट्सचे लहान कप ,व्हॅनिला केक ,बर्थडे केक ,फ्लेवर्ड आइस्क्रीम व फ्रोझन अन्नाची पाकिटे ह्याचा समावेश आहे
तसेच ह्या मालवाहु अंतराळयानातून अंतराळवीरांच्या आज होणारया स्पेसवॉक साठीचे साहित्य आणि अंतराळ स्थानकात सध्या सुरु असलेल्या संशोधनासाठी लागणारे वैज्ञानिक साहित्य पाठवण्यात आले आहे शिवाय अंतराळवीर करणार असलेल्या पार्किंसन्स व lung कॅन्सर ह्यावरील आधुनिक व उपयुक्त संशोधनासाठी आवश्यक असलेले स्टेम सेल व  tissue सँपल्सचाही त्यात समावेश आहे
Space X Dragon एक महिनाभर स्थानकात राहील आणि सप्टेंबरमध्ये पृथ्वीवर परतेल तेव्हा त्यातून अंतराळवीरांनी संशोधित केलेल्या वैज्ञानिक प्रयोगांचे सॅम्पल्स पाठवले जातील. 

Tuesday 8 August 2017

यवतमाळात दिसलेले खंडग्रास चंद्र ग्रहण

                                ढगाळ वातावरणातुन क्षणभर ढगाबाहेर आलेला पौर्णिमेचा चंद्र

सोमवार - 6 ऑगस्ट
सोमवारी तारीख सहा ऑगस्टला राखी पौर्णिमा ,श्रावण सोमवार आणि खंडग्रास चंद्र ग्रहण एकाच दिवशी आले त्या मुळे राखी पोर्णिमेसाठीचा वेळ कमी असल्याने ग्रहणकाळात राखी बांधावी कि नाही ह्याची चर्चा सुरु असली तरीही खगोल प्रेमीनी मात्र खंडग्रास चंद्रग्रहण पाहण्याची संधी सोडली नाही

                                                 चंद्राचा ग्रहण काळातील ढगाआड जातानाचा क्षण

यवतमाळ येथेही चंद्र ग्रहण दिसले असले तरीही पावसाळ्यातील ढगाळ वातावरणामुळे चंद्र ग्रहण पूर्णपणे दिसत नव्हते सुरवातीला तर पौर्णिमा असूनही चंद्र ढगाआड गेला होता त्या मुळे बारा पर्यंत अल्पकाळ चंद्र
ढगाबाहेर येत होता ग्रहण दहा वाजून वीस मिनिटांनी सुरु होऊन बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांला संपणार होते  सूर्य पृथ्वी आणि चंद्र जेव्हा एका रेषेत येतात तेव्हा चंद्र ग्रहण होते

                                                  खंडग्रास ग्रहणग्रस्त पौर्णिमेचा चंद्र

      नंतर मात्र सव्वा बाराला काही काळ चंद्र पूर्ण रूपात दृष्टीस पडला अर्थातच ढगाळ वातावर असल्याने
        त्याची प्रतिमा धूसर होती तरीही दिसलेल्या खंडग्रास चंद्रग्रहणाचे त्वरित घेतलेले हे फोटो

                                चंद्राला खंडग्रास ग्रहण लागल्यानंतर ढगाबाहेरील पौर्णिमेचा चंद्र

               त्याची प्रतिमा धूसर होती तरीही दिसलेल्या खंडग्रास चंद्रग्रहणाचे त्वरित घेतलेले हे फोटो

                                                                                                       फोटो -पूजा दुद्दलवार -BE( soft) BMC

Peggy Whitson स्थानकात सूर्यास्ताचा आनंद घेताना



      Peggy  Whitson  स्थानकातील cupola  मध्ये खिडकीतून सूर्यास्ताचा आनंद घेताना फोटो -नासा संस्था

नासा संस्था - 6 ऑगस्ट
नासाची अंतराळवीरांगना Peggy Whitson हिने आजवर अनेक रेकॉर्ड ब्रेक केलेत सर्वात जास्तवेळा स्पेस मध्ये राहणारी व स्पेसवॉक करणारी पहिली महिला अंतराळवीर म्हणून तिने नाव कमावले आहेच शिवाय ह्या निवासादरम्यान कमांडरपदही अनेकदा भूषवले आहे तिला बागकामाची आवड आहे अंतराळातही कोबीची लागवड यशस्वी करून तिने त्याचे सॅम्पल्स पृथ्वीवर पाठवले आणि तिच्या सहकारी अंतराळवीरांना कोबी खाऊही घातली सध्या ती अंतराळ स्थानकात राहून वेगवेगळ्या विषयांवर संशोधन करतेय त्या साठी तिने पृथीवर परतण्याचा निर्णय रद्द करून स्थानकातील तिचा मुक्कामही वाढवला तिच्या ह्या निर्णयाचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ह्यांनी स्वागत करत तिचे खास अभिनंदनही केले
ती सतत स्थानकातून नासा संस्थेद्वारे तिच्या चाहत्यांशी,विद्यार्थ्यांशी नासा t.v. वरून लाईव्ह संवाद साधत त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देते तिथे कर्तृत्व व काम करण्याची क्षमता अफाट आहे ती प्रचंड उत्साही आहे तेही 57 व्या वर्षी असे तिचे सहकारी अंतराळवीर म्हणतात ती त्यांच्यासाठी प्रेरणादायी आहे
आता तिच्या अंतराळस्थानकातील निवासाला 638 दिवस पूर्ण झालेत अशाच एका निवांत क्षणी सूर्यास्ताचा आनंद घेतानाचा फोटो तिने तिच्या चाहत्यांशी ट्विटर वरून शेअर केला

नासाच्या Curiosity Mars rover ने मंगळावरील पाच वर्षे केली पूर्ण



                मंगळ ग्रहावरील पाच वर्षे कार्यरत असलेले  Curiosity Mars Rover  फोटो -नासा संस्था

नासा संस्था -5 ऑगस्ट
नासाच्या मंगळ मोहिमे अंतर्गत मंगळावर गेलेल्या Curiosity Mars rover ने पाच ऑगस्टला मंगळावरील यशस्वी पाच वर्षांची कारकीर्द पूर्ण केली असून अजूनही हे अंतरिक्ष यान कार्यरत आहे
पाच वर्षांपूर्वी हे मंगळयान मंगळावरील माउंट शार्प ह्या भागात उतरले होते 5 ऑगस्ट 2012 मध्ये पहिल्यांदा अमेरिकेतील नासाच्या जेट प्रपल्शन लॅब मध्ये Curiosity  अंतरिक्ष यानाने पाठवलेले फोटो पोहोचले होते त्या मुळेच शास्त्रज्ञांच्या अपेक्षा वाढल्या होत्या Curiosity च्या पाच वर्षांच्या यशस्वी कामगिरीने  त्या आता पूर्ण झाल्या आहेत सध्या ह्या अंतरिक्ष मंगळ यानामार्फत मंगळ ग्रहावरील दऱ्याखोऱ्यातील पूर्वी अस्तित्वात असलेल्या पाण्याच्या स्रोताचे  व सजीव सृष्ठीच्या अस्तित्वाचे पुरावे गोळा केल्या जात आहेत सुरवातीला Curiosity मंगळयानाने मंगळावर पोहोचताच दहा मैलाचा प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला होता आणि आता ह्या पाच वर्षात मंगळावरील जवळपास दोन लाख फोटो पाठवले आहेत आणि पंधरा ठिकाणची जमीन खोदून दगड मातीचे नमुने गोळा केले आहेत मानवाप्रमाणेच ह्या Curiosity  Mars Rover ने स्वत:चे सेल्फीही काढून पाठवले आहेत
Curiosity मंगळयानाने आजवर अनेक महत्वपूर्ण कामे केली आहेत मंगळावरील नदी नाले,समुद्र,सरोवर खड्डे ,गोलाकार गोटे, खडक ,गाळ व चिखलामुळे तयार झालेले सेडीमेंटरी रॉक व दरयाखोरयातील पाण्याचे पूर्वी अस्तित्वात असलेले पाण्याचे आटलेले स्रोत शोधून त्यांचे फोटो काढून पृथ्वीवर पाठवले आहेत 


                   मंगळावरील नदीतल्या गाळाने तयार झालेले सेडीमेंटरी रॉक  फोटो -नासा संस्था

 जिथे,जिथे पूर्वी पाणी अस्तित्वात होते पण कालांतराने आटून नष्ट झाले पण तरीही तिथे पाण्यातील खडक  व मिनरल्सचे अवशेष तसेच राहिले अशी जागा शोधून तिथल्या जमिनीतील खोलवरच्या मिनरल्सयुक्त मातीचे नमुने,वाळलेल्या चिखलाचे फोटोही Curiosity ने पाठवले नदीचे अस्तित्व असलेल्या भागातील वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे वाळुत उठलेल्या लाटांच्या व चक्री वादळामुळे घोंघावणारया धुळीच्या लोटांचे फोटोही ह्या मंगळयानाने पाठवले आहेत


                              मंगळावरील वाळू आणि वाळूवर तयार झालेल्या लाटाचे फोटो - नासा संस्था

ह्या सर्व फोटो व माहितीवरून शास्त्रज्ञानीं केलेल्या संशोधनामुळे मंगळावर पूर्वी पाणी अस्तित्वात होते आणि ते वाहत्या स्वरूपात होते ह्याचे सबळ पुरावे मिळाले आहेत वाहत्या नदीसोबत आलेल्या गाळाचे कालांतराने थरावर थर साठत गेले आणि सेडीमेंटरी रॉक व टेकडया तयार झाल्या कालांतराने मंगळावरील वातावरणातील बदलामुळे जमिनीतील व नदीतील पाणी आटत गेले आणि नदीचे पात्र कोरडे पडले सरोवराचा आकार बदलत गेला तरीही तिथे लाखोवर्षे पर्यंत पाणी अस्तित्वात असल्याचा खुणा मिळाल्या आहेत


      पाण्याच्या अस्तित्वाचा पुरावा देणारी हि मातीच्या गाळांची जमीन व आटलेले स्रोत  फोटो - नासा संस्था

शास्त्रज्ञांच्या संशोधनानुसार तीन मिलियन वर्षांनंतर मंगळावरील वातावरण विरळ व थंड झाले असावे
Curiosity मंगळ यानाने आता मंगळावरील व अंतराळातील रेडिएशनचेही निरीक्षण नोंदवले असून ह्याचा उपयोग आगामी मानवसहित मंगळ मोहोमेसाठी व अंतराळ मोहिमेत मानवी निवासासाठी होईल अशी आशा शास्त्रज्ञांना वाटतेय Curiosity च्या ह्या पाच वर्षांच्या यशस्वी वाटचाली मुळे शास्त्रज्ञ आनंदित झाले असून  Curiosity कडून ह्याहुनही चांगली कामगिरी करून घेण्याच्या त्यांचा मानस आहे

Sunday 30 July 2017

नासाचे अंतराळवीर अंतराळस्थानकात सुखरूप पोहोचले

                            Soyuz MS-05 ह्या अंतरिक्ष यान अंतराळ वीरांना घेऊन अंतरिक्षात झेपावताना
                                                                                                                    फोटो -नासा संस्था
नासा संस्था -29 जुलै
नासाच्या अंतराळ मोहीम 52 चे अंतराळवीर Randy Bresnik ,Sergey Ryazanskiy व Paolo Nespoli शुक्रवारी संद्याकाळी 5.54  मिनिटाला सहा तासाच्या अंतराळ प्रवासानंतर अंतराळस्थानकात सुखरूप पोहोचले
कझाकस्थानातील बैकोनूर कॉस्मोड्रोमवरून सकाळी 11.41 मिनिटांनी नासाचे  MS-05 हे अंतराळयान ह्या तीन अंतराळवीरांना घेऊन अंतराळात झेपावले व पृथ्वी भोवती चार प्रदक्षिणा मारून अंतराळ स्थानकात पोहोचले तेव्हा आवश्यक दाब व लीकेजचे चेक अप झाल्यानंतर हे अंतराळ यान अंतराळ स्थानकाला जोडले गेले
संध्याकाळी सात वाजून सत्तावन्न मिनिटाला अंतराळवीरांचा स्थानकात प्रवेश झाला तेव्हा त्यांच्या चेहरयावर आनंद ओसंडून वहात होता नासाच्या अंतराळ मोहीम बावन्नचे कमांडर Fyodor Yarchiikhin , फ्लाईट इंजिनीअर Peggy Whitson आणि Jack Fischer ह्यांनी ह्या नव्या अंतराळ वीरांचे सुहास्य मुद्रेने स्थानकात स्वागत केले
हे अंतराळवीर स्थानकात पोहोचल्या नंतर नासा संस्थेने बैकोनूर येथून त्यांचा लाईव्ह टेलिकास्ट द्वारे कुटुंबीय व मित्रांशी संवाद घडविला तेव्हा अंतराळवीरांनी त्यांना सुखरूप पोहोचल्याचे सांगितले तर कुटुंबीयांनी त्यांचे  स्थानकात सुखरूप पोहोचल्याबद्दल अभिनंदन करून त्यांच्या स्थानकातील निवासासाठी व संशोधनासाठी शुभेच्छा दिल्या

       अंतराळवीर Randy Bresnik ,Sergey Ryazanskiy व Paolo Nespoli  स्थानकातून कुटुंबियांशी            संवाद साधताना- फोटो -नासा संस्था 

तीनही अंतराळवीर आता साडे चार महिने अंतराळ स्थानकात राहून तिथे सुरु असलेल्या सायंटिफिक संशोधनात सहभागी होतील ऑगस्ट मध्ये अंतराळस्थानकातील Space- X ह्या कार्गो स्पेस क्राफ्टच्या आगमनानंतर ह्या नवीन अंतराळवीरांच्या प्रत्यक्ष कामाला सुरवात होईल
ह्या स्पेस क्राफ्ट मधून आधुनिक संशोधनाचे साहित्य अंतराळ स्थानकात पोहोचल्या नंतर हे अंतराळवीर त्यांच्या संशोधनात्मक कार्याला सुरवात करतील हे अंतराळवीर अंतराळस्थानकातील झिरो ग्रॅविटीचा मानवांच्या  Lung Tissues वर काय परिणाम होतो हे अभ्यासून त्यावर स्टेम सेलच्या आधारे आधुनिक उपचार पद्धती संशोधीत करतील हे संशोधन आगामी मानवी अंतराळ मोहिमांसाठी उपयोगी ठरेल तसेच हे अंतराळवीर पार्किसन्स ह्या आजारावरील आधुनिक उपचार पद्धतीवर संशोधन करणार असून ते पृथ्वीवरील मानवी आरोग्यासाठी उपयुक्त ठरेल
पृथ्वीवरील जवळच्या अंतरावरील वातावरणातील बदलांचे निरीक्षण नोंदवून पृथ्वीवर येणारया नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी व इतर वातावरणीय समस्या निवारण्यासाठी एक  Micro Satellite  हे अंतराळवीर launch करतील त्या साठीचे आवश्यक पार्टस कार्गोशिप मधून पाठवण्यात येणार आहेत
ह्या शिवाय हे अंतराळवीर त्यांच्या साडेचार महिन्यांच्या कार्यकाळात स्थानकात येणारया  Orbital Cygnus ह्या मालवाहू अंतरिक्ष यानाचे स्थानकात स्वागत करतील व त्या साठी आवश्यक डॉकिंगची जोडणी करतील अमेरिका व रशिया ह्यांच्या संयुक्त विद्यमाने अंतराळात जाणारया ह्या मालवाहू अंतरिक्ष यानातून स्थानकासाठी व अंतराळवीरांसाठी लागणारे आवश्यक अन्न,इंधन,सायंटिफिक संशोधनासाठी लागणारे साहित्य व हार्डवेअर असे काही टन सामान पाठवण्यात येईल
डिसेंबर मध्ये हे अंतराळवीर पृथ्वीवर परततील गेल्या सोळा वर्षांपासून सतत अंतराळवीर अंतराळस्थानकात राहण्यासाठी जात आहेत व स्थानकातील फिरत्या प्रयोगशाळेत मानवी आरोग्यासाठी आवश्यक असलेले आणि आगामी मानवी अंतराळमोहिमांसाठी आवश्यक असलेले सायंटिफिक प्रयोग करत आहेत आतापर्यंत सोळा देशातील दोनशेच्यावर अंतराळवीरांनी अंतराळ स्थानकात राहून 1,900 च्याहीवर संशोधनात्मक प्रयोगात सहभाग नोंदवला आहे

Wednesday 26 July 2017

28 जुलैला तीन अंतराळवीर अंतराळस्थानकाकडे प्रयाण करणार

  Flight engineer Paolo Nespoli ( E.SA ) ,Sergey Ryazanskiy ( Roscosmos ) आणि Randy Bresnik ( NASA )
  फोटो -नासा संस्था 

नासा संस्था -21जुलै 
नासाच्या अंतराळमोहीम 52 चे तीन अंतराळवीर 28 जुलैला अंतराळ स्थानकात राहण्यासाठी जाणार आहेत 
नासाचे अंतराळवीर Randy Bresnik, रशियाचे अंतराळवीर Sergey Ryazanskiy आणि युरोपियन स्पेस एजन्सीचे अंतराळवीर Paolo Nespoli हे तीन अंतराळवीर कझाकस्थानातील बैकोनूर येथील कॉस्मोड्रोम वरून MS-05 ह्या अंतराळ यानातून 28 जुलैला अंतराळस्थानकाकडे प्रयाण करतील 
सोयूझ MS-05 हे अंतराळयान सकाळी 11.41 वाजता ह्या तीन अंतराळवीरांना घेऊन अंतराळात झेपावेल ह्या अंतराळयानातून सहा तास प्रवास केल्यानंतर हे अंतराळवीर अंतराळस्थानकात पोहोचतील संध्याकाळी 7.40 वाजता सोयूझ MS-05 हे अंतराळ यान अंतराळस्थानकाला जोडल्या जाईल 
अंतराळ मोहीम 52 चे कमांडर Fyodor Yurchikhin व फ्लाईट इंजिनीअर Peggy Whitson ह्या अंतराळवीरांचे अंतराळ स्थानकात स्वागत करतील 
हे तीनही अंतराळवीर चार महिन्यांहून अधिक काळ अंतराळ स्थानकात राहतील आणि अंतराळ स्थानकात सुरु असलेल्या Biology ,Biotechnology,Earth Science ,Physical Science ह्या विषयांवरील शेकडो प्रयोगातील संशोधनात सहभागी होतील 
ह्या अंतराळवीरांच्या प्रयाणाचे लाईव्ह प्रक्षेपण सकाळी 10.45 वाजता, 
Dockingचे  प्रक्षेपण संध्याकाळी  6 वाजता ,
आणि त्यांच्या अंतराळस्थानकातील प्रवेशाचे व स्वागताचे थेट प्रक्षेपण संध्याकाळी सात वाजता नासा T.V. वरून करण्यात येणार आहे

 नासा संस्था -27 जुलै

             उड्डाणापूर्वी अंतिम तयारीसाठी  Soyuz MS-05 आणि Soyuz booster रेल कारने नेताना

28 जुलैला  नासाचे तीन अंतराळवीर सोयूझ MS-05 ह्या अंतराळ यानातून अंतराळस्थानकात राहण्यासाठी जाणार आहेत उड्डाणाआधी हे MS-05 यान व यानाचे बुस्टर चेकिंगस्थळी रेलकारने तपासणी व अंतिम तयारीसाठी नेण्यात आले
MS-05 ह्या यानाची अंतिम चाचणी 26 जुलैला करण्यात आली ह्या अंतराळवीरांची अंतराळस्थानकाकडे प्रयाणाची अंतिम तयारी जोरात सुरु आहे