Thursday 17 August 2017

Space X Dragon मालवाहु अंतराळयान अंतराळस्थानकात पोहोचले


                     नासाचे Space X Dragon  अंतराळात उड्डाण करताना -फोटो -नासा संस्था

नासा संस्था - 16 ऑगस्ट
नासाचे Space X Dragon मालवाहु अंतराळयान काही टन आवश्यक सामान घेऊन अंतराळस्थानकात व्यवस्थित पोहोचले आहे ह्या मालवाहू अंतराळ यानाचे अंतराळ स्थानकाकडे उड्डाण झाल्यापासून ते अंतराळस्थानकात पोहोचेपर्यंतचे लाईव्ह प्रक्षेपण नासा t.v. वरून करण्यात आले होते
Space X  Dragon अंतराळ स्थानकाजवळ पोहोचल्या नंतर अंतराळवीर Jack Fischer व Paolo Nespoli ह्यांनी Cupola मधुन त्याचे निरीक्षण केले व सुरक्षित अंतरावर अंतराळ यान आल्यावर स्थानकाच्या रोबोटिक आर्मला आवश्यक सूचना दिल्या त्यानंतर हे अंतराळ यान स्थानकाशी जोडल्या गेले त्यासाठी आवश्यक असलेली डॉकिंगची सोय ह्या अंतराळवीरांनी स्पेसवॉकच्या वेळेसच केली होती
ह्या स्पेस X  अंतराळ यानातून अंतराळ स्थानकासाठी लागणारे तसेच अंतराळवीरांच्या संशोधनासाठी लागणारे सामान ,इंधन आणि अन्न पाठवण्यात आले आहे ह्या अंतराळ यानातून पाठवण्यात आलेल्या 64 टन वजनाच्या सामानात अंतराळ स्थानकासाठी लागणारे payload व इतर सामानासोबतच अंतराळवीरांसाठी खास स्वीट ट्रीटही पाठवण्यात आलीय त्या मध्ये आईस्क्रीम ,चॉकलेट्सचे लहान कप ,व्हॅनिला केक ,बर्थडे केक ,फ्लेवर्ड आइस्क्रीम व फ्रोझन अन्नाची पाकिटे ह्याचा समावेश आहे
तसेच ह्या मालवाहु अंतराळयानातून अंतराळवीरांच्या आज होणारया स्पेसवॉक साठीचे साहित्य आणि अंतराळ स्थानकात सध्या सुरु असलेल्या संशोधनासाठी लागणारे वैज्ञानिक साहित्य पाठवण्यात आले आहे शिवाय अंतराळवीर करणार असलेल्या पार्किंसन्स व lung कॅन्सर ह्यावरील आधुनिक व उपयुक्त संशोधनासाठी आवश्यक असलेले स्टेम सेल व  tissue सँपल्सचाही त्यात समावेश आहे
Space X Dragon एक महिनाभर स्थानकात राहील आणि सप्टेंबरमध्ये पृथ्वीवर परतेल तेव्हा त्यातून अंतराळवीरांनी संशोधित केलेल्या वैज्ञानिक प्रयोगांचे सॅम्पल्स पाठवले जातील. 

No comments:

Post a Comment