पृथ्वीवर परतल्यानंतर सुहास्य वदनाने उपस्थितांना अभिवादन करताना Peggy ,Yurchikhin आणि Jack
फोटो -नासा संस्था
नासा संस्था -3 सप्टेंबर
शनिवारी दोन सप्टेंबरला नासाचे तीनही अंतराळवीर पृथ्वीवर सुखरूप पोहोचले आहेत अंतराळस्थानकातून पूर्वनियोजित वेळेनुसार निघालेले त्यांचे MS-04 हे अंतराळयान शनिवारी रात्री 9.21 मिनिटाला (स्थानिक वेळ 7.20a.m. तीन सप्टेंबर रविवार ) कझाकस्थानातील Dzhezkazgan येथे सुखरूप पोहोचले
पृथ्वीवर पोहोचल्यावर Jack Fischer आनंदी मुद्रेने प्राथमिक चेकअपच्या वेळेस फोटो -नासा संस्था
पृर्थ्वीवर परतल्याचा आनंद त्यांच्या चेहरयावर दिसत होता क्षणभर ते भावुक झाले त्यांचे स्वागत करायला आलेले नासाचे अधिकारी व कर्मचाऱयांनी त्यांचे उत्साहाने स्वागत केले त्यांना उचलून आणुन खुर्चीवर बसविले तिथे त्यांचे प्राथमिक चेकअप झाले नंतर त्यांना तिथेच असलेल्या मेडिकल टेंटमध्ये पुढील मेडिकल चेकअपसाठी चेअरसहित उचलुन नेण्यात आले शिवाय ह्या अंतराळ यानातून अंतराळवीरांनी आणलेले संशोधित सॅम्पल्सही काढून घेण्यात आले
अंतराळयानातुन प्रथम Fyodor Yurchikhin नंतर Jack Fischer आणि शेवटी Peggy Whitson ह्यांना आणण्यात आले आता चेकअप नंतर ते नियोजित स्थळी रवाना होतील
असा झाला निरोप समारंभ
निघण्याआधी ह्या अंतराळवीरांनी एकमेकांचे आभार मानत निरोप घेतला ह्या अंतराळ मोहीम 52 चे कमांडर Fyodor Yurchikhin ह्यांनी त्यांच्या पाचही अंतराळ मोहिमात त्यांच्या सोबतचे अंतराळवीर ,अंतराळ स्थानक तिथे करायला मिळालेले संशोधन सारेच खूपच ग्रेट असल्याचे सांगितले त्या बाबतीत मी लकी असल्याचे सांगत नासा संस्थेचे आभार मानले आताचेही माझे सहकारी अंतराळवीर खूप चांगले आहेत असे ते म्हणाले
कमांडर Fyodor Yurchikhin निरोप समारंभाच्या वेळेला आभार मानताना फोटो -नासा संस्था
ह्या मोहिमेतील सगळ्यात तरुण व बुद्धिमान अंतराळवीर Jack Fischer असल्याचे सांगत त्याने अत्यंत कमी वेळेत उत्कृष्ठ काम केल्याचे सांगीतले तो नासा मधेच नाही तर जगातलाच तरुण बुद्धिमान अंतराळवीर आहे असे गौरोवोदगारही काढले Peggy Whitson हिचेही त्यांनी कौतुक करत प्रशंसा केली
अंतराळवीर Sergey ही जॅक सारखाच हुशार असून ह्या तीनही अंतराळवीरांकडून आता भविष्यात आणखी चांगल्या कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली
त्या नंतर अंतराळवीर Randy Bresnik ह्याला तू आता स्थानकाची जाबाबदारी घेण्यास तयार आहेस का ? असे विचारले तेव्हा Peggy ने तात्काळ त्याला पाठींबा देत प्रोत्साहित केले त्यानेही सर्वांचे आभार मानत कमांडर पद स्वीकारले तेव्हा Yurchikhin ह्यांनी त्याच्या हातात स्थानकाची Key देत त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव करून दिली आणि खेळीमेळीच्या वातावरणात सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला आणि निघण्याचा तयारीला लागले
कमांडर Yurchikhin ह्यांनी स्थानकाची जबाबदारी दिल्यानंतर Key स्वीकारताना Randey Bresnik
फोटो -नासा संस्था
आधी दिलेल्या बातमीनुसार नोव्हेंबरमध्ये सुरु झालेल्या ह्या मोहिमेत Peggy Whitson ह्यांनी 288 दिवस अंतराळस्थानकात निवास करून व Yurchikhin व Fischer ह्या अंतराळवीरांनी 136 दिवस अंतराळस्थानकात राहून तिथे सुरु असलेल्या earth science ,biology ,biotechnology व इतर शेकडो संशोधनात सहभाग नोंदवला शिवाय अंतराळात राहताना मानवी आरोग्यावर होणाऱया परिणामाचेही निरीक्षण नोंदवून त्यावर सखोल संशोधन केले विशेषतः अंतराळवीरांच्या डोळ्यांमध्ये व Lung Tissue वर अंतराळातील झिरो ग्रॅव्हिटी मध्ये होणारया बदलाचे निरीक्षण नोंदवून त्यांचे सॅम्पल्सही सोबत आणले आणि स्टेम सेल उपचारावरही संशोधन केले असून त्यांचे संशोधन मानवाला उपयुक्त ठरेल या शिवाय त्यांनी अनेक आधुनिक संशोधन केले असून ते आगामी अंतराळ मोहिमेतील अंतराळवीरांना अंतराळ स्थानकातील निवासासाठी उपयुक्त ठरेल
No comments:
Post a Comment