Tuesday 8 August 2017

नासाच्या Curiosity Mars rover ने मंगळावरील पाच वर्षे केली पूर्ण



                मंगळ ग्रहावरील पाच वर्षे कार्यरत असलेले  Curiosity Mars Rover  फोटो -नासा संस्था

नासा संस्था -5 ऑगस्ट
नासाच्या मंगळ मोहिमे अंतर्गत मंगळावर गेलेल्या Curiosity Mars rover ने पाच ऑगस्टला मंगळावरील यशस्वी पाच वर्षांची कारकीर्द पूर्ण केली असून अजूनही हे अंतरिक्ष यान कार्यरत आहे
पाच वर्षांपूर्वी हे मंगळयान मंगळावरील माउंट शार्प ह्या भागात उतरले होते 5 ऑगस्ट 2012 मध्ये पहिल्यांदा अमेरिकेतील नासाच्या जेट प्रपल्शन लॅब मध्ये Curiosity  अंतरिक्ष यानाने पाठवलेले फोटो पोहोचले होते त्या मुळेच शास्त्रज्ञांच्या अपेक्षा वाढल्या होत्या Curiosity च्या पाच वर्षांच्या यशस्वी कामगिरीने  त्या आता पूर्ण झाल्या आहेत सध्या ह्या अंतरिक्ष मंगळ यानामार्फत मंगळ ग्रहावरील दऱ्याखोऱ्यातील पूर्वी अस्तित्वात असलेल्या पाण्याच्या स्रोताचे  व सजीव सृष्ठीच्या अस्तित्वाचे पुरावे गोळा केल्या जात आहेत सुरवातीला Curiosity मंगळयानाने मंगळावर पोहोचताच दहा मैलाचा प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला होता आणि आता ह्या पाच वर्षात मंगळावरील जवळपास दोन लाख फोटो पाठवले आहेत आणि पंधरा ठिकाणची जमीन खोदून दगड मातीचे नमुने गोळा केले आहेत मानवाप्रमाणेच ह्या Curiosity  Mars Rover ने स्वत:चे सेल्फीही काढून पाठवले आहेत
Curiosity मंगळयानाने आजवर अनेक महत्वपूर्ण कामे केली आहेत मंगळावरील नदी नाले,समुद्र,सरोवर खड्डे ,गोलाकार गोटे, खडक ,गाळ व चिखलामुळे तयार झालेले सेडीमेंटरी रॉक व दरयाखोरयातील पाण्याचे पूर्वी अस्तित्वात असलेले पाण्याचे आटलेले स्रोत शोधून त्यांचे फोटो काढून पृथ्वीवर पाठवले आहेत 


                   मंगळावरील नदीतल्या गाळाने तयार झालेले सेडीमेंटरी रॉक  फोटो -नासा संस्था

 जिथे,जिथे पूर्वी पाणी अस्तित्वात होते पण कालांतराने आटून नष्ट झाले पण तरीही तिथे पाण्यातील खडक  व मिनरल्सचे अवशेष तसेच राहिले अशी जागा शोधून तिथल्या जमिनीतील खोलवरच्या मिनरल्सयुक्त मातीचे नमुने,वाळलेल्या चिखलाचे फोटोही Curiosity ने पाठवले नदीचे अस्तित्व असलेल्या भागातील वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे वाळुत उठलेल्या लाटांच्या व चक्री वादळामुळे घोंघावणारया धुळीच्या लोटांचे फोटोही ह्या मंगळयानाने पाठवले आहेत


                              मंगळावरील वाळू आणि वाळूवर तयार झालेल्या लाटाचे फोटो - नासा संस्था

ह्या सर्व फोटो व माहितीवरून शास्त्रज्ञानीं केलेल्या संशोधनामुळे मंगळावर पूर्वी पाणी अस्तित्वात होते आणि ते वाहत्या स्वरूपात होते ह्याचे सबळ पुरावे मिळाले आहेत वाहत्या नदीसोबत आलेल्या गाळाचे कालांतराने थरावर थर साठत गेले आणि सेडीमेंटरी रॉक व टेकडया तयार झाल्या कालांतराने मंगळावरील वातावरणातील बदलामुळे जमिनीतील व नदीतील पाणी आटत गेले आणि नदीचे पात्र कोरडे पडले सरोवराचा आकार बदलत गेला तरीही तिथे लाखोवर्षे पर्यंत पाणी अस्तित्वात असल्याचा खुणा मिळाल्या आहेत


      पाण्याच्या अस्तित्वाचा पुरावा देणारी हि मातीच्या गाळांची जमीन व आटलेले स्रोत  फोटो - नासा संस्था

शास्त्रज्ञांच्या संशोधनानुसार तीन मिलियन वर्षांनंतर मंगळावरील वातावरण विरळ व थंड झाले असावे
Curiosity मंगळ यानाने आता मंगळावरील व अंतराळातील रेडिएशनचेही निरीक्षण नोंदवले असून ह्याचा उपयोग आगामी मानवसहित मंगळ मोहोमेसाठी व अंतराळ मोहिमेत मानवी निवासासाठी होईल अशी आशा शास्त्रज्ञांना वाटतेय Curiosity च्या ह्या पाच वर्षांच्या यशस्वी वाटचाली मुळे शास्त्रज्ञ आनंदित झाले असून  Curiosity कडून ह्याहुनही चांगली कामगिरी करून घेण्याच्या त्यांचा मानस आहे

No comments:

Post a Comment