Saturday 16 September 2017

शनी ग्रहावर कॅसिनी अंतराळ यानाचा ग्रँड फिनाले संपन्न


            शनी ग्रहावर गेलेले व आता अंतराळात विलीन झालेले कॅसिनी अंतराळ यान  - फोटो -  नासा संस्था                                                                                                                    
नासा संस्था -15 सप्टेंबर
13 वर्षे अविरतपणे शनीभोवती भ्रमण करीत पृथ्वीवर उपयुक्त माहिती पाठवणारया कॅसिनी यानाने अखेर काल अपेक्षेप्रमाणे शनी ग्रहाच्या वरच्या वातावरणात प्रवेश केला
आणि ठरल्या प्रमाणे ठरल्या वेळेला 15 सप्टेंबरला ह्या कॅसिनी यानाचा फेअरवेल सोहळा निर्विघ्नपणे पार पडला सकाळी  7.55  मिनिटाला कॅसिनी यानाचा पृथ्वीशी असलेला संपर्क तुटला आणि त्याचे Thrusters सुरु झाले.काही वेळातच कॅसिनी यान नियंत्रणाविना अंतराळात भरकटले आणि यानाचा स्फोट होऊन ते शनिग्रहावर आदळले वातावरणातील प्रचंड वादळी वाऱ्याचा वेगाने आणि स्फोटाने कॅसिनी यानाने पेट घेताच यान आणि त्याचे पेटते भाग वातावरणात इतरत्र उडाले. क्षणाभरातच गेल्या वीस वर्षांपासूनचे सुरु असलेले कॅसिनी मिशन संपुष्ठात आले आणि सौरमंडळातील थरारक युगाचा अंत झाला

           शनीच्या कक्षेत शिरून शनी ग्रहावर धडकताना कॅसिनी अंतराळ यानाची हि शेवटची प्रतिमा
                                                                                                                   फोटो -नासा संस्था
कॅसिनी अंतराळ यानाचा हा फेअरवेल सोहळा पाहण्यासाठी अमेरिकेतील नासाच्या जेट प्रपल्शन लॅब व इतर सेंटर मध्ये नासाचे 1500 शास्त्रज्ञ,इंजिनीअर्स,तंत्रज्ञ आणि ह्या मोहिमेशी संबंधीत अधिकारी व कर्मचारी एकत्र जमले होते  कॅसिनीचा ग्रँड फिनाले यशस्वी झाल्याचे संकेत मिळताच साऱ्यांनी आनंद साजरा केला

            कॅसिनीचा ग्रँड फिनाले यशस्वी झाल्याचा आनंद साजरा करताना मोहिमेतील शास्त्रज्ञ व पदाधिकारी
                                                                                                                                फोटो -नासा संस्था

कॅसिनी यान 1997 मध्ये अमेरिकेतील फ्लोरिडा येथील  Cape Canveral Air Force Station येथून 13 ऑक्टोबरला प्रक्षेपित करण्यात आले होते आणि शनीच्या प्रवासाला निघालेले कॅसिनी अंतराळयान तब्बल 7 वर्षे अंतराळ प्रवास करून 2004 साली शनीवर पोहोचले कॅसिनीने शनीवर पोहोचताच यशस्वी कामगिरी करत त्यातील अत्याधुनिक यंत्रणेद्वारे उपयुक्त माहिती गोळा करून पृथ्वीवर पाठवत हि मोहीम यशस्वी केली कॅसिनीतील इंधन कमी होताच आणि त्याचा अपेक्षित कार्यकाळ पूर्ण होताच शास्त्रज्ञानीं हि मोहीम थाबवण्याचे ठरवले होते पण कॅसिनीची कमी इंधनातली जास्त काळाची यशस्वी कार्यक्षमता पाहून हि मोहीम प्रथम दोन वर्षे आणि नंतर सात वर्षापर्यंत वाढवण्यात आली ह्या काळात कॅसिनीने पाठविलेली शनीची सखोल माहिती पाहून शास्त्रज्ञही अचंबित झाले
शनीचे चंद्र तेथील बर्फ,वातावरण आणि मानवाला आकर्षित करणाऱ्या शनीच्या कड्याचे गूढ कॅसिनीने घेतलेल्या फोटोमूळे आणि गोळा केलेल्या माहितीमुळे उलगडले शिवाय शनीबद्दल मानवामध्ये असलेले गैरसमजही दूर झाले शनी पीडादायक नसून तोही पृथ्वी सारखाच सुंदर ग्रह असून पूर्वी तिथेही सजीवसृष्ठी अस्तित्वात असण्याची शक्यताही बळावली
कॅसिनीच्या ग्रँड फिनाले नंतर नासाच्या शास्त्रज्ञानीं,आणि इतर अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या
Thomas Zurbuchen (Associate Admin Science mission & Directorate Washington ) म्हणतात ,
" एका विस्मयकारी मिशनचा हा अंत असला तरी हि नवीन मोहिमेची सुरवात आहे कॅसिनी मुळे शनीच्या दोन चंद्राची माहिती मिळाली शिवाय तिथे पूर्वी अस्तित्वात असलेले व लोप पावलेले समुद्राच्या ठिकाणाचे पुरावे पुरातन जीवसृष्ठीची शक्यता दर्शवतात ह्यामुळे ब्रह्मांडात पृथ्वीसारख्या जीवसृष्ठी असलेल्या ठिकाणांच्या शोधात मोलाची भर पडली आहे "
Michael Watkins -( Director Nasa JPL Lab California ) म्हणाले ,
" हा कडू गोड निरोपाचा अविस्मरणीय ऐतिहासिक क्षण आहे! ह्या  कॅसिनी मोहिमेने शनी बद्दलचे पूर्व दूषित मत बदलून गेले आहे आणि ह्या नवीन आच्श्चर्य कारक उपयुक्त माहितीमुळे आगामी अंतराळ मोहीम आणि संशोधनास नवा आयाम प्राप्त झाला आहे आजवर कुठलेही यान शनिग्रहावर पोहोचले नव्हते पण कॅसिनीने हि अवघड व अशक्य कामगिरी यशस्वी केली आता ह्या ग्रँड फिनालेचा अंत झाला आहे "
Earl Maize -(Cassini Project Manager J PL) म्हणतात ,
" Cassini Opration Team मधील सर्वच जण ह्या यशाचे मानकरी आहेत त्यांनी कुशलतेने आणि कर्तृत्वाने हे दैदिप्यमान यश मिळवले आहे ह्या यानाचे डिझाईन करणारे तंत्रज्ञ ग्रेट आहेत सात वर्षांपूर्वी कॅसिनी यानाची कक्षा वाढवुन बावीसवेळा शनीच्या कड्यांमधल्या कॅसिनीच्या भ्रमणावर नियंत्रण ठेवण अत्यंत कठीण होत ते त्यांनी कार्यकुशलतेन यशस्वी केल आणि त्याचा शेवटही कॅसिनी यानामार्फत पूर्ण माहिती मिळवून यशस्वीपणे केला हे निश्चितच अभिमानास्पद आहे "
Linda Spilker -(Cassini Project Scientist ) म्हणाल्या ,
" आता कॅसिनी मिशन संपले आहे त्या मुळे रोज आकाशात पाहताना त्याची उणीव जाणवेल पण मी त्याला सौरमालेतील फिरणाऱ्या प्लॅनेट मध्ये पाहीन कारण त्याच्या काही भागांचे अवशेष शनीग्रहावर पडलेले असतीलच "
कॅसिनीने जाता जाताही पृथ्वीवर अँटेना व इमेजिंग कॅमेराच्या साहाय्याने काही शेवटचे संदेश व सिग्नल दिले आहेत ते नासाच्या डीप स्पेस नेटवर्क अँटेना complex Canberra Australia इथे प्राप्त झाले आहेत
आणि अपेक्षेप्रमाणे कॅसिनी यानाच्या वेगवेगळ्या उपकराणाद्वारे पाठवलेली माहिती संकलित करून त्याचे परीक्षण केल्यानंतरची संशोधित माहिती येत्या काही आठवड्यात प्राप्त होईल आणि शनी व त्याची उत्पत्ती ह्याचे गूढ उलगडेल  

No comments:

Post a Comment