Saturday 21 October 2017

अंतराळवीर Randy Bresnik आणि Joe Acaba ह्यांचा स्पेसवॉक यशस्वी


                      अंतराळ वीर स्थानकाबाहेर स्पेसवॉक करताना -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -20 ऑक्टोबर
अंतराळमोहीम 53 चे कमांडर Randy Bresnik आणि फ्लाईट इंजिनीअर Joe Acaba ह्यांनी अंतराळ स्थानकाच्या तांत्रिक कामासाठी यशस्वी स्पेसवॉक केला हा स्पेसवॉक सहा तास एकोणपन्नास मिनिटांनी संपला
ह्या दोन्ही अंतराळवीरांनी ह्या स्पेसवॉक दरम्यान अंतराळ स्थानकाच्या रोबोटिक आर्मच्या latching end effector वरील खराब झालेला fuse बदलवून नवा हाय डेफिनेशन कॅमेरा बसवला ह्या दोघांनी हे काम अत्यंत शीघ्रतेने व कमी वेळात पूर्ण करून भविष्यात उपयुक्त अशी इतर अनेक कामेही केली
Joe Acaba ह्यांनी रोबोटिक आर्मच्या नव्या effectorला ग्रीस लावले तर Randy Bresnik ह्यांनी नवे रेडिएटर ग्रीपल बार फिट केले व भविष्यातील रोबोटिक रिप्लेसमेंट साठी आवश्यक प्लॅटफॉर्म तयार केला शिवाय Randy ह्यांनी अंतराळ स्थानकावर असलेल्या दोन स्पेअर पंप मोड्युल पैकी एकाचे प्रिपरेशन वर्क पूर्ण केले
ह्या दोन अंतराळ वीरांनी ऑक्टोबर मध्ये केलेला हा तिसरा व शेवटचा स्पेसवॉक होता
Randy Bresnik ह्यांच्या आजवरच्या अंतराळमोहिमेतील हा पाचवा स्पेसवॉक होता त्यांनी आजवर अंतराळात 32 तासाचा स्पेसवॉक यशस्वीपणे पूर्ण केला आहे तर Joe Acaba ह्यांचा हा तिसरा स्पेसवॉक होता त्यांनी त्यांच्या करिअर मध्ये आजवर अंतराळात 19 तास 46 मिनिटांचा स्पेसवॉक केला आहे
अंतराळ स्थानकाच्या कामासाठी आजवर अंतराळवीरांनी केलेला हा 205 वा स्पेसवॉक होता तर आतापर्यंत  अंतराळवीरांनी स्पेसवॉक साठी 53 दिवस 6 तास व्यतीत केले आहेत

No comments:

Post a Comment