Friday 15 September 2017

शनिग्रहावर यशस्वी कामगिरी पार पाडून कॅसिनी अंतराळयान आज होणार नष्ट

             कॅसिनी अंतराळ यान शनीचे कडे भेदुन शनिग्रहावर प्रवेशताना -फोटो नासा संस्था

नासा संस्था -15 सप्टेंबर
शनिग्रह व त्याच्याभोवतीच्या कड्यांचे गूढ उकलण्यासाठी शास्त्रज्ञ वर्षानुवर्षे प्रयत्न करत आहेत अमेरिकेच्या नासा संस्थेने वीस वर्षांपूर्वी पृथ्वीवरून शनिग्रहावर पाठवलेले आणि आजपर्यंत सतत कार्यरत असलेले  कॅसिनी अंतरिक्ष यान आज (15 सप्टेंबर ) नष्ट करण्यात येणार आहे
शनी ग्रह,त्याच्या भोवतीचे कडे, तेथील वातावरण आणि तिथल्या जीवसृष्टीच्या अस्तित्वाची शक्यता ह्या विषयी सखोल माहिती मिळवण्यासाठी वीस वर्षांपूर्वी नासाने कॅसिनी अंतराळ यान पृथ्वीवरून शनीग्रहावर पाठवले होते सात वर्षांच्या प्रवासानंतर ते शनिग्रहाच्या कक्षेत पोहोचले आणि गेल्या तेरा वर्षांपासून हे यान शनीभोवती अविरत भ्रमण करीत तिथली इतंभूत माहिती पृथ्वीवर पाठवत होते
अनेक चक्रीवादळांना तोंड देत आणि अनेक ग्रह पार करीत शनीपर्यंत पोहोचलेल्या आणि अविरतपणे शनीभोवती भ्रमण करत सतत शनीची माहिती पृथ्वीवर त्वरित पोहोचवणाऱया कॅसिनी यानाचे इंधन जेव्हा संपत आले  तेव्हा हे मिशन संपवण्याचा निर्णय नासाच्या खगोल शास्त्रज्ञांनी घेतला होता त्याची सुरवात  26 एप्रिलला ह्या कॅसिनी यानाचा ग्रँड फिनालेने झाली होती
शास्त्रज्ञांनी हे यान नष्ट करण्यापूर्वी कॅसिनीला शनिग्रहाच्या कक्षेत धडकवून यानाचा शेवट करण्याचा धाडसी निर्णय घेतला होता सव्वीस एप्रिलला बुधवारी ह्या ग्रँड फिनालेची सुरवात झाली तेव्हा कॅसिनी यान शनी ग्रह व त्याच्या कड्यामधील 1500 मैल रुंद पट्यात शिरले होते
आजवर एकही यान शनीच्या कक्षेत शिरले नव्हते पण नासा संस्थेने हे धाडस करण्याचे ठरवले होते कारण  ह्या धाडसामुळे ब्रम्हांडातील मोठे ग्रह व ग्रहमालांच्या उगमाचे रहस्य उलगडेल शिवाय ह्या कॅसिनी यानाचा शेवट जरी झाला तरी तो नवीन मोहिमेसारखाच असेल अशी आशा शास्त्रज्ञांना वाटत होती
इतक्या वर्षांमध्ये कॅसिनीने मिळवलेल्या माहितीच्या आधारे कॅसिनीच्या इंजिनीअर्सनी Flight Plan तयार केला होता त्या नुसार 22 एप्रिलला कॅसिनी यानाने Titan ह्या शनीच्या चंद्राच्या अतिशय जवळून प्रवास केला तेव्हा Titan च्या गुरुत्वाकर्षणाच्या परिणामामुळे कॅसिनीची भ्रमण कक्षा थोडीशी खाली  झुकली त्यामुळे हे यान कड्यांच्या बाहेरून न फिरता ग्रह व कड्यांच्या आतल्या कक्षेत शिरले होते
आणि आता आज 15 सप्टेंबरला कॅसिनी यान शनिग्रहावर धडकेल व नष्ठ होईल शास्त्रज्ञाच्या माहितीनुसार ह्या प्रक्रियेत अडचणी येणार नाहीत असा प्राथमिक अंदाज असला तरीही आवश्यक ती सावधगिरी बाळगली गेली आहे यानासमोरील अँटेना द्वारे मार्गाची सुरक्षितता तपासल्या जाईल
आता कॅसिनी यान नष्ठ होण्याआधी ताशी तेरा हजार मैल वेगाने शनिग्रहाभोवती भ्रमण करेल आणि फिरता,फिरता हे यान गोते खात स्फोट घडवुन जळून नष्ठ होईल  ज्या वेळेस हे यान नष्ट होण्याच्या स्थितीत येईल तेव्हा कॅसिनी यान शनीच्या चंद्राच्या थंड वातावरणातील वायूमंडलात पोहोचलेले असेल आणि शनीवर तेव्हा दिवस असेल
15 सप्टेंबरला यान जेव्हा शनी वर धडकेत तेव्हा ह्या कॅसिनी यानाचा शेवट होण्यास सुरवात होईल तेव्हा
अमेरिकेत सकाळचे 7..55 मिनिटे झालेले असतील
शनीच्या वायूमंडलात शिरल्यानंतर कॅसिनी तिथल्या पातळ आवरणात सक्रिय राहण्यासाठी छोटे.छोटे स्फोट घडवेल आणि भ्रमण सुरु ठेवेल पण जसजसा ह्या वायुमंडळाचा थर जाड होत जाईल तेव्हा तो निष्क्रिय होईल त्या मुळे कार्यरत राहण्यासाठी तो मोठा स्फोट घडवेल पण एक मिनिटाच्या आत त्याचा पृथ्वीशी संपर्क तुटेल आणि  नियंत्रण नसल्याने हे यान गोते खात भरकटत जाईल आणि मोठा विस्फोट होऊन कॅसिनी यान नष्ठ होण्यास सुरवात होईल
जोवर हे यान पूर्णपणे नष्ठ होत नाही तोवर त्यतील वेगवेगळ्या उपकरणाद्वारे हे यान शेवटपर्यंत पृथ्वीवर माहिती पाठवत राहील कॅसिनीचा इमेजिंग कॅमेरा शनी ग्रहावरचे व त्याच्या भोवतीच्या कड्यांचे सगळीकडून फोटो घेईलच शिवाय शनीचा चंद्र टायटन आणि  Enceladus ह्यांचे देखील फोटो घेईल कॅसिनी यानाद्वारे पाठवलेला शेवटचा संदेश ऑस्ट्रेलियातील कॅनबेरा डीप स्पेस सेंटर मध्ये प्राप्त होईल
आजवर कासिनी यानाने पृथ्वीवर शनीविषयी अत्यंत महत्वपूर्ण व अत्याधुनिक माहिती पाठवली असून
शनीच्या  Enceladus ह्या चंद्रावरील बर्फ़ाळ प्रदेशात जागतिक महासागर असून त्याचा दुसरा चंद्र Titan वर  देखील द्रव्य रूपातील मिथेनचा महासागर वहात असल्याचे संकेत कॅसिनी यानाने दिले आहेत

No comments:

Post a Comment