Sunday 27 August 2017

अमेरिकन नागरिकांनी लुटला खग्रास सूर्यग्रहणाचा आनंद


                             अमेरिकेतून दिसलेले पूर्ण रूपातील खग्रास सूर्य ग्रहण फोटो -नासा संस्था 

नासा संस्था -२२ ऑगस्ट 
हौशी अमेरिकन नागरिक आणि वैज्ञानिकांनी शंभर वर्षानंतर एकवीस ऑगस्टला दिसलेल्या खग्रास सुर्ग्रहणाच्या ह्या अभूतपूर्व सुवर्ण पर्वणीचा मनमुराद आनंद लुटला एरव्ही सूर्यग्रहण पाहण्यासाठी इतर देशात जाणारे अमेरिकन आपल्याच देशातील ग्रहण पाहण्याची हि सुवर्णसंधी सोडणार नव्हतेच !
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ह्यांनीही व्हाईट हाऊस मधून आपल्या पत्नीसोबत हे ग्रहण पाहिले विशेष म्हणजे ट्रम्प ह्यांनी तिथे उपस्थित लोकांनी नको नको म्हणत असताना देखील क्षणभर उघडया डोळ्यांनी चष्मा न घालता हे ग्रहण पाहिले

       अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पत्नीसोबत उघडया डोळ्यांनी सूर्य ग्रहण पाहताना -फोटो -नासा संस्था

अमेरिकेच्या चौदा राज्यात हे ग्रहण दिसले ह्या ग्रहणाचा काळ दोन मिनिटांपेक्षा जास्त होता ह्या वेळेस दिवसा सर्वत्र अंधार पसरल्यामुळे लोकांनी दिवसा रात्रीचा अनुभव घेतला ग्रहण काळातील पूर्ण रूपातील हिऱ्याच्या अंगठीच्या स्वरूपातील सूर्याला पाहून O! My God! My God ! अमेझिंग ! lovely ! अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया उपस्थितांच्या तोंडून बाहेर पडली काहींनी आनंदाने जल्लोष करत ग्रहणाचा आनंद व्यक्त केला

                          खग्रास सूर्यग्रहणादरम्यान काळवंडलेल्या सूर्याचा तेजोमय मुकुट -फोटो नासा संस्था

 अंतराळवीरांनीही अंतराळ स्थानकातून हे ग्रहण पाहिले आणि त्याचे फोटोही पाठवले विशेष म्हणजे खग्रास सूर्यग्रहणाच्या फोटोमध्ये अंतराळात भ्रमण करणारे अंतराळस्थानकही फोटोबद्ध झाले अंतराळवीरांसाठी हा क्षण औसुक्यपूर्ण आणि अविस्मरणीय होता हे दृश्य अलौकिक होते असे ते म्हणतात

     कमांडर FyodorYurchikhin ह्यांनी अंतराळस्थानकातून टिपलेले खग्रास सूर्यग्रहण - फोटो -नासा संस्था

                    ग्रहणाच्या फोटोमध्ये फोटोबद्ध झालेले अंतराळस्थानाक - फोटो नासा संस्था

ह्या शतकी खग्रास सूर्य ग्रहणासाठी गेल्या दोन महिन्यांपासून अमेरिकेतील नासा संस्थेतून खास तयारी करण्यात येत होती त्यासंबधीत बातम्याही प्रसारित होत होत्या हे ग्रहण कोठे दिसणार,त्यासाठी काय तयारी करावी ग्रहण पाहताना कोणती खबरदारी घ्यावी ग्रहण कसे पाहावे ह्यासारख्या सूचना देतानाच त्या संबंधीत प्रबोधनपर कार्यक्रमही नासा संस्थेने आयोजित केले होते विशेषतः मुलांना पृष्ठयांचे बॉक्स कापून त्यात ब्लॅक फिल्म बसवुन ग्रहण पाहण्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते 
नासा संस्थेने बारा ऑगस्टला प्रसारित केलेल्या बातमीत ह्या खग्रास सूर्यग्रहणाचे नासा t.v वरून लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार असल्याच तसेच एअरक्राफ्ट,स्पेसक्राफ्ट आणि अंतराळस्थानकातूनही ह्या ग्रहणाचे प्रक्षेपण करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते त्यासाठी ठिकठिकाणी मुख्य चॊकात स्क्रीनही बसवण्यात आले होते हे ग्रहण आपल्या कर्मचाऱयांना पाहता यावे म्हणून कंपन्यांनी आधीच सुटीही जाहीर केली होती
आणि अखेर शंभरवर्षानंतर अमेरिकेत सूर्याच्या खग्रास ग्रहणाचा क्षण येताच उत्साही अमेरिकन लोकांनी रस्त्यावर येऊन ग्रहण पाहण्यासाठी गर्दी केली विद्यार्थ्यांनी मिकी माऊस व मानवी चेहऱ्याचे कागदी मुखवटे बनवून डोळ्यांच्या ठिकाणी काळी फिल्म बसवुन ते घालुन हे ग्रहण पाहिले तर नागरिकांनी खास काळा चष्मा घालुन ह्या सुवर्ण संधीचा लाभ घेतला आधी सांगितल्या प्रमाणे नासा संस्थेने ठिकठिकाणी स्क्रीन वरून लोकांना हे ग्रहण दाखवले

   ग्रहणाचा आनंद घेताना नागरिक ,छोटी मुले आणि नासासंस्थेतील पदाधिकारी फोटो-नासा संस्था 

             खग्रास चंद्रग्रहण पाहून आनंद व्यक्त करताना अमेरिकन नागरिक -फोटो -नासा संस्था

हे ग्रहण भारतातून पाहता आले नाही कारण त्या वेळेस रात्र होती पण हे ग्रहण उत्तर अमेरिका ,दक्षिण अमेरिका ,पश्चिम यूरोप आफ्रिका व उत्तर पूर्व आशिया खंडात दिसले 


No comments:

Post a Comment