Flight engineer Paolo Nespoli ( E.SA ) ,Sergey Ryazanskiy ( Roscosmos ) आणि Randy Bresnik ( NASA )
फोटो -नासा संस्था
नासा संस्था -21जुलै
नासाच्या अंतराळमोहीम 52 चे तीन अंतराळवीर 28 जुलैला अंतराळ स्थानकात राहण्यासाठी जाणार आहेत
नासाचे अंतराळवीर Randy Bresnik, रशियाचे अंतराळवीर Sergey Ryazanskiy आणि युरोपियन स्पेस एजन्सीचे अंतराळवीर Paolo Nespoli हे तीन अंतराळवीर कझाकस्थानातील बैकोनूर येथील कॉस्मोड्रोम वरून MS-05 ह्या अंतराळ यानातून 28 जुलैला अंतराळस्थानकाकडे प्रयाण करतील
सोयूझ MS-05 हे अंतराळयान सकाळी 11.41 वाजता ह्या तीन अंतराळवीरांना घेऊन अंतराळात झेपावेल ह्या अंतराळयानातून सहा तास प्रवास केल्यानंतर हे अंतराळवीर अंतराळस्थानकात पोहोचतील संध्याकाळी 7.40 वाजता सोयूझ MS-05 हे अंतराळ यान अंतराळस्थानकाला जोडल्या जाईल
अंतराळ मोहीम 52 चे कमांडर Fyodor Yurchikhin व फ्लाईट इंजिनीअर Peggy Whitson ह्या अंतराळवीरांचे अंतराळ स्थानकात स्वागत करतील
हे तीनही अंतराळवीर चार महिन्यांहून अधिक काळ अंतराळ स्थानकात राहतील आणि अंतराळ स्थानकात सुरु असलेल्या Biology ,Biotechnology,Earth Science ,Physical Science ह्या विषयांवरील शेकडो प्रयोगातील संशोधनात सहभागी होतील
ह्या अंतराळवीरांच्या प्रयाणाचे लाईव्ह प्रक्षेपण सकाळी 10.45 वाजता,
Dockingचे प्रक्षेपण संध्याकाळी 6 वाजता ,
आणि त्यांच्या अंतराळस्थानकातील प्रवेशाचे व स्वागताचे थेट प्रक्षेपण संध्याकाळी सात वाजता नासा T.V. वरून करण्यात येणार आहे
नासा संस्था -27 जुलै
उड्डाणापूर्वी अंतिम तयारीसाठी Soyuz MS-05 आणि Soyuz booster रेल कारने नेताना
28 जुलैला नासाचे तीन अंतराळवीर सोयूझ MS-05 ह्या अंतराळ यानातून अंतराळस्थानकात राहण्यासाठी जाणार आहेत उड्डाणाआधी हे MS-05 यान व यानाचे बुस्टर चेकिंगस्थळी रेलकारने तपासणी व अंतिम तयारीसाठी नेण्यात आले
MS-05 ह्या यानाची अंतिम चाचणी 26 जुलैला करण्यात आली ह्या अंतराळवीरांची अंतराळस्थानकाकडे प्रयाणाची अंतिम तयारी जोरात सुरु आहे

No comments:
Post a Comment