Peggy Whitson स्थानकातील cupola मध्ये खिडकीतून सूर्यास्ताचा आनंद घेताना फोटो -नासा संस्था
नासा संस्था - 6 ऑगस्ट
नासाची अंतराळवीरांगना Peggy Whitson हिने आजवर अनेक रेकॉर्ड ब्रेक केलेत सर्वात जास्तवेळा स्पेस मध्ये राहणारी व स्पेसवॉक करणारी पहिली महिला अंतराळवीर म्हणून तिने नाव कमावले आहेच शिवाय ह्या निवासादरम्यान कमांडरपदही अनेकदा भूषवले आहे तिला बागकामाची आवड आहे अंतराळातही कोबीची लागवड यशस्वी करून तिने त्याचे सॅम्पल्स पृथ्वीवर पाठवले आणि तिच्या सहकारी अंतराळवीरांना कोबी खाऊही घातली सध्या ती अंतराळ स्थानकात राहून वेगवेगळ्या विषयांवर संशोधन करतेय त्या साठी तिने पृथीवर परतण्याचा निर्णय रद्द करून स्थानकातील तिचा मुक्कामही वाढवला तिच्या ह्या निर्णयाचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ह्यांनी स्वागत करत तिचे खास अभिनंदनही केले
ती सतत स्थानकातून नासा संस्थेद्वारे तिच्या चाहत्यांशी,विद्यार्थ्यांशी नासा t.v. वरून लाईव्ह संवाद साधत त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देते तिथे कर्तृत्व व काम करण्याची क्षमता अफाट आहे ती प्रचंड उत्साही आहे तेही 57 व्या वर्षी असे तिचे सहकारी अंतराळवीर म्हणतात ती त्यांच्यासाठी प्रेरणादायी आहे
आता तिच्या अंतराळस्थानकातील निवासाला 638 दिवस पूर्ण झालेत अशाच एका निवांत क्षणी सूर्यास्ताचा आनंद घेतानाचा फोटो तिने तिच्या चाहत्यांशी ट्विटर वरून शेअर केला
No comments:
Post a Comment