Thursday, 31 October 2024

नासाच्या शास्त्रज्ञांनी Artemis III मोहिमेतील अंतराळवीरांना उतरण्यासाठी चांद्रभूमीवरील नऊ जागा शोधल्या

 

नासा संस्थेतील शास्त्रज्ञांनी आर्टेमिस III मोहिमेतील अंतराळवीरांना उतरण्यासाठी शोधलेल्या चंद्राच्या दक्षिण भागातील नऊ जागा -फोटो -नासा संस्था 

नासा संस्था -28 ऑक्टोबर 

अमेरिकेच्या आर्टेमिस III मोहिमेतील चार अंतराळवीर चंद्रावर जाणार आहेत तेथील संशोधित माहिती गोळा करणार आहेत तेथील भूमीवर उतरून भविष्य कालीन अंतराळ मोहिमेतील अंतराळवीरांच्या निवासासाठी आणि चंद्रावरील भविष्यकालीन मानवी निवासासाठी पृथ्वीसारखे पोषक वातावरण असलेली जागा शोधणार आहेत पण त्या आधी ह्या चार अंतराळवीरांना चंद्रावर उतरण्यासाठी योग्य भूमीचा शोध नासा संस्थेतील शास्त्रज्ञ घेत आहेत शास्त्रज्ञांना त्यात यश आले असून Artemis III मोहिमेतील अंतराळवीरांना उतरण्यासाठी चांद्रभूमीवरील नऊ जागा त्यांना आढळल्या आहेत 

शास्त्रज्ञांना चंद्राच्या दक्षिण भागात ह्या जागा आढळल्या असून हा भाग अपोलो मोहिमेतील अंतराळवीर ज्या भागात उतरले होते त्या भागापेक्षा वेगळा आहे तेथील वातावरण व भौगोलिक परिस्थिती देखील वेगळे आहे ह्या भाग थंड आहे तिथे सूर्याचा पुरेसा प्रकाश आणि सावली पडते आणि शास्त्रज्ञांच्या मते तेथे मानवासाठी पोषक वातावरण असू शकते कारण त्या भागात पाणी आणि इतर आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत चांद्रभूमीवरील हा भूभाग पुरातन असल्यामुळे इथे Geological संशोधनास वाव आहे चंद्रावरील पुरातन काळच्या सजीव सृष्टीच्या अस्तित्वाचे पुरावे शोधण्यासाठी संशोधनायोग्य आहे 

नासाच्या Lunar Reconnaissance Orbiter आणि Vast body Lunar Science reserch टीमने गोळा केलेल्या Data च्या साहाय्याने शास्त्रज्ञानी हि माहिती मिळवली आहे नासा संस्थेतील आर्टेमिस मोहिमेतील शास्त्रज्ञ आणि इंजिनीअर्सनी ह्या भागाची निवड करताना चांद्रभूमीवरील ह्या भागात अंतराळवीरांना उतरण्यायोग्य जमीन तेथील मानवाला आवश्यक असलेल्या  पृथ्वीसारखे पोषक वातावरणाची शक्यता सूर्यप्रकाश व सावलीची उपलब्धता शिवाय भविष्य कालीन अंतराळ मोहिमेतील अंतराळवीरांच्या  पृथ्वीवरील नासा संस्थेशी संपर्क यंत्रणेसाठी आवश्यक वातावरण ह्या गोष्ठीना प्राधान्य दिले भविष्यकालीन अंतराळ मोहिमेतील Orion अंतराळयान नासाची Space Launch System , Rocket,Human Landing System ह्या साठी योग्य आहे का? ह्याचीही पाहणी करण्यात आली

नासा संस्थेतील Chief Exploration Scientist -Jocob Bleacher म्हणतात," पन्नास वर्षांनी अमेरिकेने पुन्हा चांद्रमोहीम सुरु केली आहे आर्टेमिस III मोहिमेतील अंतराळवीर पहिल्यांदाच नव्या अंतराळ यानातून चंद्रावरील दक्षिण भागात जाणार आहेत हा भाग अपोलो मोहिमेतील अंतराळवीर उतरले होते त्या भूमीपेक्षा वेगळा आहे आजवर त्या भागात कोणीही गेले नाही त्यांच्या सुरक्षिततेसाठी चांद्रभूमीवर उतरण्यायोग्य जागा निवडणे आवश्यक आहे ह्या अंतराळवीरांच्या चंद्रावरील दक्षिण भागातील भूमीवर उतरण्याची हि पहिली ऐतिहासिक घटना आहे हे अंतराळवीर तेथे जातील चंद्राविषयी संशोधित माहिती मिळवतील भविष्यकालीन अंतराळ मोहिमेतील अंतराळवीरांना राहण्यायोग्य जागा शोधतील शिवाय तेथे राहून चंद्रावरील इतर भागाचाही शोध घेतील "

सध्या चांद्रभूमीवरील ह्या नऊ भागाची प्राथमिक निवड नासा संस्थेने केली आहे नासा संस्थेतील शास्त्रज्ञ ,इंजिनीअर्स नासाचे औद्योगिक पार्टनर ह्या भागांचे सखोल संशोधित निरीक्षण नोंदवतील त्या नंतर अंतिम जागेची निवड निश्चित होईल

 

Wednesday, 30 October 2024

नासाच्या Space X Crew 8 मोहिमेतील अंतराळवीर पृथ्वीवर परतले

  The four NASA SpaceX Crew-8 members sit in a row, smiling and waving in their spacesuits aboard a Dragon spacecraft.

Space X Crew -8 चे रशियन अंतराळवीर Alexander Grebenkin,नासाचे अंतराळवीर Michael Barratt,Matthew Dominickआणि Jeanette Epps पृथ्वीवर परतल्यानंतर -फोटो नासा संस्था

नासा संस्था -25 ऑक्टोबर

नासाच्या Space X Crew 8 मोहिमेतील अंतराळवीरMathew Dominick ,Michael Baratt Jeanette Epps आणि  रशियन अंतराळवीर Alexander Grebenkin त्यांचे स्थानकातील वास्तव्य संपवून पृथ्वीवर परतले आहेत हे चारही अंतराळवीर बुधवारी 23 तारखेला संध्याकाळी 5 वाजता स्थानकातून पृथ्वीवर परतण्यासाठी स्थानकाबाहेर पडले आणि 34 तासांच्या अंतराळ प्रवासा नंतर 25 तारखेला शुक्रवारी दुपारी 3.29 मिनिटाला पृथ्वीवर पोहोचले 

Space X Crew Dragon Endeovour ह्या अंतराळवीरांसह Florida येथील Pensacola येथील समुद्राच्या खाडीत खाली उतरले हे अंतराळवीर पृथ्वीवर पोहोचताच नासाची रिकव्हरी टीम तेथे पोहोचली त्यांनी अंतराळवीरांना Dragon मधून बाहेर काढले त्या नंतर टीम मधील डॉक्टरांनी त्यांचे प्राथमिक चेकअप केले ह्या अंतराळवीरांना त्या नंतर नासाच्या विमानाने Houston येथील Johnson Space Center मध्ये पोहोचविण्यात आले 

हे अंतराळवीर सहा महिन्यांच्या वास्तव्यासाठी 3 मार्चला स्थानकात गेले होते पण Star Liner अंतराळयानाच्या  समस्येमुळे त्यांचे पृथ्वीवर परतणे लांबल्यामुळे स्थानकातील 232 दिवसांच्या वास्तव्यानंतर ते आता पृथ्वीवर परतले आहेत त्यांच्या स्थानकातील वास्तव्यादरम्यान त्यांनी तेथे सुरु असलेल्या सायंटिफिक संशोधनात सहभाग नोंदविला विशेषतः मानवी आरोग्यासाठी उपयुक्त Stem Cell Research ,Fuel Temperature affects Material आणि स्थानकातील झिरो ग्रॅविटीतील वास्तव्यात मानवी शरीरावर होणारे विपरीत परिणाम ह्या विषयी त्यांनी संशोधन केले 

पृथ्वीवर परतण्याआधी स्थानकात नासा संस्थेच्या लाईव्ह संपर्कात ह्या अंतराळवीरांचा Farewell  ceremony पार पडला तेव्हा ह्या अंतराळवीरांनी त्यांच्या भावना व्यक्त करीत नासा संस्थेचे आभार मानले अंतराळ मोहीम 71-72 च्या वतीने अंतराळवीर सुनीता विल्यम्स ह्यांनी ह्या चारही अंतराळवीरांना पृथ्वीवर परतण्यासाठी शुभेच्छा दिल्या त्या म्हणाल्या ,"ह्या चारही अंतराळवीरांचे कर्तृत्व असामान्य आहे त्यांनी स्थानकात सुरु असलेल्या सायंटिफिक प्रयोगात सहभागी होऊन महत्वपूर्ण संशोधन केले आहे त्या अंतराळवीरांचे Hard work आणि यशस्वी योगदाना बद्दल त्यांचे आभार ! त्यांच्या सहवासातील काळ मजेत गेला आम्ही त्यांना मिस करू !" त्या नंतर ह्या चारही अंतराळवीरांनी देखील सहकारी अंतराळवीर आणि नासा संस्थेतील सर्वांचे आभार मानले 

Mathew Dominick -,"ह्या मोहिमेतील सर्वच अंतराळवीरांसोबतचा स्थानकातील वास्तव्याचा काळ मजेत गेला आम्हाला इथे वास्तव्याची,संशोधनाची संधी दिल्याबद्दल जगभरातील नासा संस्थेतील सर्वांचे आभार त्यांच्या मार्गदर्शनामुळे सहकार्यामुळे आम्ही इथे राहू शकलो संशोधन करू शकलो आणि विशेष म्हणजे रात्री निश्चिन्त झोपू शकलो कारण आम्हाला माहीत होते कि ते रात्रदिवस आमच्या संपर्कात आहेत त्यांची आमच्यावर नजर आहे त्या साठी स्पेशल आभार विशेष म्हणजे स्थानकातून आम्ही पृथ्वीवरचे Huricane Milton वादळ पाहू शकलो त्या काळात माझ्या कुटुंबीयांनी आणि मित्रांनी आम्हाला सपोर्ट केल त्या साठी त्यांचेही आभार !"

Michael Baratt -," Crew -8 मोहिमेतील Matt,Jenette आणि Sasha ह्यांच्या सोबत इथे येतानाचा अंतराळ प्रवास मजेशीर होता छान होता इथल्या वास्तव्यातील सहकारी अंतराळवीरां सोबतचे काही प्रसंग तर खूप वंडरफूल होते त्या साठी त्यांचे आभार आणि संस्थेतील सर्वांचे त्यांनी आम्हाला स्थानकात वास्तव्याची संधी दिल्याबद्दल आणि वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शासाठी आभार !'

Jenette -"मला  सुद्धा संस्थेतील सर्वांचे आभार मानावयाचे आहेत त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आम्ही इथे संशोधन करू शकलो आणि माझ्या कुटुंबियांचे माझ्या जुळ्या बहिणी Jenet आणि Brain ह्यांचे विशेष आभार मी इथे आठ महिने दूर असूनही त्यांनी adjust केल माझे स्थानकातील सहकारी मित्र खूप छान होते मी देखील त्यांना मिस करेन !" अंतराळवीर Alexandar ह्यांनी देखील अशाच भावना व्यक्त केल्या पृथ्वीवरील वादळा मुळे हवामान खराब असल्याने ह्या अंतराळवीरांची परत येण्याची तारीख लांबली पण अखेर हे अंतराळवीर पृथ्वीवर सुरक्षित पोहोचले  

Wednesday, 16 October 2024

नासाचे Europa Clipper अंतराळयान गरु ग्रहाच्या दिशेने मार्गस्थ

     A SpaceX Falcon Heavy rocket carrying NASA’s Europa Clipper spacecraft launches off the coast of Florida, with blue skies and ocean in the background.

 नासाचे युरोपा क्लीपर अंतराळयान Kennedy Space Center मधील उड्डाणस्थळावरून गुरु ग्रहावर जाण्यासाठी अंतराळात उड्डाण करताना -फोटो -नासा संस्था

 नासा संस्था -15ऑक्टोबर 

नासाचे युरोपा क्लीपर अंतराळयान 14 ऑक्टोबरला दुपारी 12वाजुन 4 मिनिटाला नासाच्या फ्लोरिडा येथील Kennedy Space Center मधील 39A ह्या उड्डाण स्थळावरून Space X Falcon -9 रॉकेटच्या साहाय्याने गुरु ग्रहावर जाण्यासाठी अंतराळात झेपावले गुरु ग्रहाच्या Europa ह्या चंद्रावर शास्त्रज्ञांना बर्फाचा सागर आढळला तेव्हा पासुनच शास्त्रज्ञांना तेथे सजीवांचे अस्तित्व आहे का? किंवा पुरातन काळी होते का? हे जाणून घेण्याची ऊत्सुकता होती आता त्या बाबतीत अधिक संशोधन करण्यासाठी Europa Clipper अंतराळयान गुरु ग्रहाच्या दिशेने मार्गस्थ झाले आहे

गुरु ग्रहांच्या चंद्रावरील समुद्राच्या पाण्याच्या संशोधनासाठी नासाने राबवलेली हि पहिलीच अंतराळ मोहीम आहे हे अंतराळयान प्रदीर्घ कालावधीचा अंतराळ प्रवास करणार असून सहा वर्षांनी 2030 मध्ये गुरु ग्रहावर पोहोचेल त्या साठी युरोपा क्लीपर अंतराळयान 1.8 बिलियन मैलाचा (2.9 बिलियन k.m.)अंतराळ प्रवास करेल 2031मध्ये यान कार्यरत होईल आणि संशोधनाला सुरवात करेल युरोपा क्लीपर अंतराळयान गुरु ग्रहाभोवती अत्यंत जवळून म्हणजे 16 मैल अंतरावरून (25k.m.) 49 वेळा भ्रमण करेल आणी ह्या भ्रमणादरम्यान तेथील वातावरण आणि पाण्याच्या सागराची संशोधनात्मक माहिती गोळा करेल 

नासाने परग्रहावरील संशोधनासाठी तयार केलेले युरोपा क्लीपर हे अंतराळयान आजवरच्या अंतराळयानापेक्षा आकाराने मोठे अद्ययावत यंत्रणेने उपयुक्त आणि स्वयंचलित आहे ह्या अंतराळ यानात नऊ अत्याधुनिक सायंटिफिक उपकरणे फिक्स केली आहेत त्या मध्ये गुरूच्या युरोपा चंद्रावरील सागरावर जमलेल्या बर्फाचा थर भेदण्यासाठी ice penetrating radar यंत्रणा व अत्याधुनिक कॅमेरे ह्यांचा समावेश आहे युरोपा क्लीपर यानातील Thermal उपकरणाद्वारे समुद्रावर जमलेल्या बर्फीय भागाच्या तापमानाची नोंद करेल आणि उष्णतेमुळे वितळलेल्या बर्फ़ाचे पाणी होऊन प्रवाहित झालेला भाग शोधेल गुरु ग्रहावरील वातावरण अत्यंत विरळ आहे तेथे अत्यंत कमी प्रमाणात सूर्यप्रकाश पडतो यानाला सौरप्रणाली बसविण्यात आली असून अंतराळयानासाठी आवश्यक सौरऊर्जा निर्मिती आणि सौरऊर्जेचा पुुरेेसा साठा यानात केलेला आहे त्या मुळे आवश्यकतेनुसार अंतराळयान स्वयंचलित यंत्रणेने सौरऊर्जेचा वापर करेल

युरोपा क्लीपर अंतराळयान 49 वेळा गुरु ग्रहाभोवती परिक्रमा करेल आणि त्या दरम्यान तेथील 8000,000k.m. अंतर पार करेल ह्या यानातील अत्याधुनिक सायंटिफिक उपकरणाच्या साहाय्याने गुरु ग्रहाचा पृष्ठभाग आणि वातावरणाची माहिती गोळा केली जाईल तसेच Europa वरील गोठलेला सागर,बर्फाची खोली आणि सागराच्या तळाच्या खोलवरच्या पुरातन सजीव सृष्ठीच्या अस्तित्वाचा शोध घेईल Europa Clipper अंतराळ यान भविष्यकालीन मानवी अंतराळ मोहिमेतील अंतराळवीरांसाठी गुरु ग्रहावरील पृथ्वीसारख्या पोषक वातावरणाचा देखील शोध घेईल आणि गोळा केलेली संशोधित माहिती पृथ्वीवर पाठवेल यानातील सायंटिफिक उपकरणाद्वारे समुद्राच्या पाण्यातील घटक द्रव्ये,खारेपणा,मिठाचे प्रमाण आणि त्यातील इतर खनिज द्रव्याच्या अस्तित्वाचा शोध घेईल  तेथील भूभाग आणि इतर आवश्यक geological माहिती देखील गोळा करेल

नासा संस्थेने ह्या मोहिमेत नागरिकांसाठी त्यांची नावे युरोपा क्लीपर सोबत पाठविण्यासाठी "Message in Bottle"अभियान जाहीर केले होते त्याला हौशी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता ह्या यानासोबत U.S.मधील पुरस्कार प्राप्त नामांकित कवियत्री Laureate Ada Limons ह्यांची कविताही पाठवण्यात आली आहे Europa Clipper Mission वर त्यांनी हि कविता लिहिली आहे ह्या कविते सोबतच सहभागी नागरीकांची नावे देखील गुरु ग्रहावर पाठविण्यात आली आहेत एका मायक्रो चीपवर स्टेन्सीलच्या स्वरूपात अभियानातील सहभागी नागरिकांची कोरलेली नावे आणि युरोपावरील कविता यानाला जोडण्यात आली आणी यानासोबत गुरू ग्रहाच्या दिशेने मार्गस्थ झाली ह्या अभियानात सहभागी होण्यासाठी नागरिकांना आधी Laureate Ada Limion ह्या कवियित्रीची In Praise Of Mystery-A Poem for Europa हि कविता ऐकावी किंवा वाचावी लागली कवियत्री Laureate ह्यांनी जानेवारीत नासाच्या J PL Lab ला भेट दिली होती तेव्हा Europa Clipper पाहून त्या प्रेरित झाल्या तेव्हाच त्यांना हि कविता सुचली होती

युरोपा क्लीपरच्या यशस्वी उड्डाणानंतर नासाचे Administrator- Bill Nelson  ह्यांनी युरोपा क्लीपर टीम मधील सर्वांचे अभिनंदन केले ,"पृथ्वी बाहेरील ग्रहावरील गुरूच्या चंद्रावरील पाण्याच्या संशोधनासाठी निघालेल्या युरोपा क्लीपरच्या अंतराळ प्रवासाच्या शुभारंभासाठी शुभेच्छा ! नासा संस्था नेहमीच ब्रम्हांडातील अज्ञात गोष्टीच्या शोधासाठी पुढाकार घेते आणि संशोधनाला प्राधान्य देते युरोपा वरील समुद्रातील पाणी मानवासाठी पिण्यायोग्य आहे का ह्याचा शोध युरोपा क्लीपर घेईलच पण ह्या मोहिमेमुळे भविष्यात आपल्या सौरमालेतील आणि सौरमाले बाहेरील ग्रहांच्या चंद्रावरील पिण्यायोग्य पाण्याच्या अस्तित्वाचा शोधही घेता येईल !"

ह्या मोहिमेच्या यशानंतर नासाच्या Washington येथील नासा संस्थेतील Mission Directorate Nicky Fox ह्यांनी देखील प्रतिक्रया व्यक्त केली," आम्ही ह्या मोहिमेच्या यशाने आनंदित झालो आहोत आणि भविष्यकालीन संशोधित माहिती मिळवण्यासाठी उत्सुक आहोत ह्या आधी गुरु ग्रहावर गेलेल्या Juno ,Galileo आणि Voyager अंतराळ यानाद्वारे गुरु ग्रहावरील पुरातन कालीन सजीवांच्या अस्तित्वाचा शोध घेण्यात आला होता 1990 मध्ये Galileo मोहिमेत तेथील युरोपा चंद्रावर गोठलेल्या बर्फाखालील भागात महासागर असून त्यात मुबलक प्रमाणात खारे पाणी आहे आणि ते पाणी पृथ्वीवरील सर्व सागरातील पाण्याच्या प्रमाणापेक्षाही जास्त आहे अशी माहिती मिळाली होती आणि सागराच्या तळातील भागात काही Organic Compounds आणि पुरातन सजीव सृष्टीच्या अस्तित्वाला दुजोरा देणारे घटक देखील आढळले आहेत त्या मुळे प्रेरित होऊन नासा संस्थेतील शास्त्रज्ञांनी हि मोहीम राबविली आहे आणि त्याचा यशस्वी शुभारंभ झाला आहे !'

 

Wednesday, 2 October 2024

Space X Crew -9 चे अंतराळवीर Nick Hagueआणि Aleksandr Gorbunov स्थानकात पोहोचले

 Image shows NASA's SpaceX Crew-9 members secured inside Dragon spacecraft.

नासाच्या Space X Crew -9 मोहिमेतील अंतराळवीर Nick Hague आणि Aleksandr Gorbunov स्थानकात जाण्याच्या तयारीत -फोटो -नासा संस्था  

नासा संस्था - 2 ऑक्टोबर

नासाच्या Space X Crew -9 मोहिमेचे अंतराळवीर  Nick Hagueआणि रशियन अंतराळवीर Aleksandr Gorbunov रविवारी स्थानकात सुखरूप पोहोचले हे दोन्ही अंतराळवीर शनिवारी 28 सप्टेंबरला दुपारी 1.17 वाजता(EDT) Space X Crew Dragon मधून स्थानकात जाण्यासाठी अंतराळ प्रवासास निघाले आणि रविवारी संध्याकाळी 5.30वाजता स्थानकात पोहोचले पहिल्यांदाच  Cape Canaveral Florida येथील Space Launch Complex -40 ह्या उड्डाण स्थळावरून अंतराळवीरांसह Space X Crew Dragon चे उड्डाण करण्यात आले 

Star Liner यानातील बिघाडामुळे अंतराळयान स्थानकात अडकल्यामुळे ह्या अंतराळवीरांचे स्थानकात जाणे लांबले होते शिवाय Star Liner मधील अंतराळवीर येताना Space X Crew Dragon मधून पृथ्वीवर परतणार असल्यामुळे ह्या मोहिमेतील इतर दोन अंतराळवीरांचे स्थानकातील जाणे देखील रद्द करण्यात आले 

उड्डाणाआधी ह्या अंतराळवीरांचे उड्डाणपूर्व चेकअप करण्यात आले ह्या मोहिमेतील कमांडरपद अंतराळवीर Nick Hague ह्यांनी आणि Flight Engineer पद अंतराळवीर Aleksandr ह्यांनी सांभाळले हे दोन्ही अंतराळवीर अंतराळ प्रवासादरम्यान नासा संस्थेच्या संपर्कात होते रविवारी संध्याकाळी  5.30.वाजता Space X Crew Dragon स्थानकाच्या समोरील भागातील Harmony Module जवळ पोहोचले आणि संध्याकाळी 7.04.वाजता स्थानक आणि Dragon ह्यांच्यातील Hatching ,Docking प्रक्रिया पार पडली त्या आधी ह्या अंतराळवीरांनी Dragon मधील लिकेज आणि pressurization सिस्टिम चेक केली त्या नंतर ह्या दोन्ही अंतराळवीरांनी स्थानकात प्रवेश केला स्थानकात सध्या वास्तव्य करत असलेल्या अंतराळवीरांनी ह्या दोघांचे स्थानकात स्वागत केले काही वेळातच ह्या अंतराळवीरांचा Welcome Ceremony पार पडला 

 NASA's SpaceX Crew-9 crew joins Expedition 72 aboard the International Space Station. Credit: NASA

 Space X Crew -9 चे अंतराळवीर Nick Hague आणि Aleksandr Gorbunov स्थानकातील सर्व अंतराळवीरांसोबत Welcome Ceremony दरम्यान -फोटो -नासा संस्था 

ह्या वेळी झालेल्या लाईव्ह संवादादरम्यान नासा आणि रशियन स्पेस संस्थेतर्फे ह्या अंतराळवीरांचे सुरक्षित अंतराळ प्रवास केल्या बद्दल अभिनंदन करण्यात आले आणि अंतराळस्थानकात यशस्वी प्रवेश केल्या बद्दल स्वागत करण्यात आले त्या वेळी नासा संस्थेतील मान्यवरांनी अंतराळवीर Nick ह्यांना ,"तुमच्या अंतराळातील ह्या दुसऱ्या घरी दुसऱ्यांदा  स्वागत असे म्हणत तुमचा अंतराळ प्रवास कसा झाला हे विचारले तेव्हा अंतराळवीर Nick म्हणाले ,"आमचा Freedom Space Dragon मधील प्रवास छान झाला अंतराळातील आमच्या ह्या दुसऱ्या घरी पुन्हा प्रवेश केल्यानंतर स्थानकातील अंतराळवीरांनी आनंदाने हसतमुखाने आमचे स्वागत केले ते पाहून माझा आनंद द्विगुणित झाला प्रवेशा नंतरच्या ह्या दहा मिनिटात मी खूप हसलो आणि माझ्या डोळ्यात आनंदाश्रू देखील आले ह्या मोहीम 72 मधील अंतराळवीर खूप छान आहेत आता त्यांच्या सोबतचा वास्तव्याचा आणि संशोधनाचा काळ मजेत जाईल मला इथे पुन्हा येण्याची संधी दिल्याबद्दल आभार !"

Aleksandr म्हणाले ,"मी पहिल्यांदाच स्थानकात आलो आमचा अंतराळ प्रवास थरारक होता हे अंतराळातील फिरते स्थानक त्यातील हि मोठी Lab पाहून मी आश्चर्य चकित झालो ,अमेझिंग आहे सार ! इथे पोहोचल्याचा आनंद होतोय आता इथे वास्तव्य करणार आहे संशोधनात सहभागी होणार आहे मला हि संधी दिल्याबद्दल दोन्ही संस्थेचे आभार! त्या नंतर त्यांनी रशियन भाषेतूनही संवाद साधून संस्थेचे आभार मानले !

त्या नंतर संस्थेतील मान्यवरांनी दोघांना स्थानकातील वास्तव्यासाठी शुभेच्छा दिल्या नासा संस्थेचे Administrator Bill Nelson ह्यांनी देखील ह्या अंतराळवीरांच्या स्थानकातील यशस्वी प्रवेशा बद्दल अभिनंदन केले आणि स्थानकातील वास्तव्यासाठी शुभेच्छा दिल्या त्यांनी उड्डाण स्थळावरून पहिल्या मानवासहित यशस्वी उड्डाण केल्याबद्दल टीमचेही अभिनंदन केले आहे

हे दोन्ही अंतराळवीर आता पाच महिने स्थानकात वास्तव्य करतील आणि  स्थानकातील अंतराळवीरांसोबत तेथे सुरु असलेल्या संशोधनात सहभागी होतील फेब्रुवारीत Star liner मोहिमेतील अंतराळवीरांसोबत हे अंतराळवीर   पृथ्वीवर परततील ऑक्टोबर मध्ये Space X Crew -8 मोहिमेतील चार अंतराळवीर पृथ्वीवर परततील तोवर अकरा अंतराळवीर एकत्रित स्थानकात वास्तव्य करून संशोधनात सहभागी होतील 

अंतराळवीर Nick Hague हे दुसऱ्यांदा स्थानकात वास्तव्यास गेले आहेत तर अंतराळवीर Aleksandr मात्र पहिल्यांदाच स्थानकात राहायला गेले आहेत 

Wednesday, 25 September 2024

नासाचे अंतराळवीर Tracy Dyson रशियन अंतराळवीर Oleg Kononenkoआणी Nikolai Chub स्थानकातून पृथ्वीवर परतले

 https://www.nasa.gov/wp-content/uploads/2024/09/iss-return.png

 Soyuz अंतराळयान पृथ्वीवर पोहोचल्यावर कझाकस्थानातील Zhezkazgan येथे पॅराशूटच्या साहाय्याने खाली उतरताना -फोटो -नासा संस्था 

 नासा संस्था-24 सप्टेंबर

नासाची अंतराळवीर Tracy Dyson रशियन अंतराळवीर Oleg Kononenko आणी Nikolai Chub स्थानकातील वास्तव्य संपवून पृथ्वीवर परतले आहेत ह्या अंतराळवीरांसह 23 सप्टेंबरला 4.56 a.m.वाजता सोयूझ MS-25 अंतराळयान पृथ्वीवर येण्यासाठी स्थानकातून निघाले आणी 7.59a.m. वाजता पृथ्वीवर पोहोचले पृथ्वीच्या कक्षेत पोहोचल्यावर सोयूझ अंतराळयान कझाकस्थानातील Zhezkazgan येथे पॅराशूटच्या साहाय्याने खाली ऊतरले

निघण्याआधी स्थानकात ह्या अंतराळवीरांचा फेअरवेल सेरेमनी आणी कमांडर चेंज कार्यक्रम पार पडला ह्या अंतराळवीरांना निरोप देण्यासाठी स्थानकातील सर्व अंतराळवीर एकत्र जमले होते त्या वेळी नासा संस्थेशी साधलेल्या लाईव्ह संवादात ह्या अंतराळवीरांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले स्थानकाचे कमांडर Oleg Kononenko ह्यांनी स्थानकाच्या कमांडर पदाची सुत्रे अंतराळवीर सुनिता विल्यम्स ह्याच्या हाती सोपवली ते म्हणाले,"माझ्या ह्या स्थानकातील दुसऱ्या घरातील मुक्काम संपवून मी माझ्या पृथ्वीवरील घरी परतत आहे माझ्या ह्या अंतराळातील घरातील अंतराळवीरांचे कुटुंब मोठे आहे स्थानकातील त्यांच्या सोबतचा वास्तव्याचा काळ आनंदात गेला त्यांच्या सोबतच्या मैत्रीपूर्ण वातावरणात संशोधन करताना मजा आली त्यांची मैत्री खास होती सुंदर होती " त्या नंतर त्यांनी सगळ्यांंचे आभार मानले आणी रशियन भाषेतही संवाद साधला

अंतराळवीर  सुनिता विल्यम्स ह्यांनी देखील कमांडरपदाची जबाबदारी स्विकारल्यावर संवाद साधला त्या म्हणाल्या,"आम्ही ईथे पुर्व नियोजीत वेळेपेक्षा जास्त दिवस वास्तव्य करणार आहोत आणी स्थानकात राहणारे  अंतराळवीरही जास्त होते तरीही ह्या मोहीम 71च्या अंतराळवीरांनी आम्हाला सामावून घेतल हे अंतराळवीर आमच्या अपेक्षेपेक्षाही जास्त समंजस आहेत आणी Oleg आम्ही तुला मिस करु ईथल्या जेवणाच्या टेबलवरच्या शंभर गोष्टी आम्हाला आठवतील Nikolai चा Precision आणि Professionalism आठवेल आणि Tracy सोबत घालवलेला वेळ मजेशीर क्षण आणि तिच Organization,Ability सारच मिस करेन मला कमांडरपद दिल्याबद्दल नासा संस्थेचे आणि तुम्हा सर्वांचे आभार तुमच्या अंतराळ प्रवासासाठी शुभेच्छा ! त्यानंतर अंतराळवीरांनी सर्वांचा निरोप घेतला आणि सोयूझ यानातून पृथ्वीवर परतण्यासाठी निघाले 

  NASA astronaut Tracy C. Dyson is pictured inside the Soyuz MS-25 spacecraft ahead of hatch closure on Sept. 23. Credit: NASA

 Soyuz अंतराळयानातून पृथ्वीवर परतताना स्थानकातील अंतराळवीरांच्या निरोपाचा क्षण -फोटो नासा संस्था

अंतराळयान पृथ्वीच्या कक्षेत शिरून पॅराशूटच्या साहाय्याने खाली ऊतरताच नासा आणी रशियन स्पेस एजन्सीची रिकव्हरी टिम तेथे पोहोचली त्यांनी ह्या तिनही अंतराळवीरांना यानातुन बाहेर काढले आणी खुर्चीवर बसविले त्या नंतर त्यांचे प्राथमिक चेकअप केले आणी त्यांना पाणी प्यायला दिले ह्या वेळी नासा आणि रशियन स्पेस एजंन्सी मधील मान्यवर त्यांच्या स्वागताला उपिस्थत होते त्यांनी ह्या अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुरक्षित पोहोचल्याबद्दल अभिनंदन केले आणि त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले शिवाय ह्या अंतराळवीरांना त्यांच्या नावाची डॉल भेट देण्यात आली 

   NASA astronaut Tracy C. Dyson is seen smiling and holding a gifted matryoshka doll outside the Soyuz MS-25 spacecraft after she landed with Roscosmos cosmonauts Oleg Kononenko and Nikolai Chub,

अंतराळवीर Tracy Dyson पृथ्वीवर पोहोचल्यानंतर कझाकस्थानातील Zhezkazganयेथे स्वागताच्या क्षणी Doll सोबत -फोटो नासा संस्था

ह्या अंतराळवीरांना Recovery camp मध्ये नेण्यात आले आणि अंतिम चेकअप नंतर अंतराळवीर Tracy Dyson ह्यांना नासाच्या विमानाने Johnson Space Center येथे पोहोचविण्यात आले आणि दोन्ही अंतराळवीरांना त्यांच्या गावी पोहोचविण्यात आले 

Tracy Dyson ह्यांनी स्थानकातील 184 दिवसांच्या वास्तव्या दरम्यान मोहीम 70/71 चे Flight Engineerपद सांभाळले त्यांनी त्यांच्या तीनवेळच्या अंतराळ वास्तव्यादरम्यान स्थानकाच्या दुरुस्तीसाठी 20 तास 20 मिनिटे स्पेसवॉक केला आणि स्थानकात सुरु असलेल्या Cardiac Tissue वरील संशोधनात सहभाग नोंदवला मानवी शरीरातील अवयव आणि Tissue च्या replacement साठी आवश्यक असलेल्या  अत्याधुनिक Stem cell निर्मिती संशोधन केले शिवाय अत्याधुनिक मेडिकल उपचारासाठीच्या औषध निर्मितीसाठी Proteins Crystallization वरील संशोधनात सहभाग नोंदवला

अंतराळवीर Oleg आणि Nikolai ह्यांनी स्थानकात 374 दिवस वास्तव्य केले अंतराळवीर Oleg ह्यांच्या पाचवेळच्या अंतराळ कारकिर्दीत त्यांनी स्थानकात 1,111दिवस वास्तव्य करून जास्ती दिवस स्थानकात राहण्याचा रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे अंतराळवीर Nikolai ह्यांची मात्र हि पहिलीच अंतराळवारी होती

Saturday, 14 September 2024

नासाचे अंतराळवीर Don Pettit रशियन अंतराळवीर Alexy Ovchinin आणी Ivan Vagner स्थानकात पोहोचले

 The Soyuz MS-26 crew joins the Expedition 71 crew in orbit aboard the International Space Station. Credit: NASA

 नासाचे अंतराळवीर Don Pettit रशियन अंतराळवीर Alexey Ovchinin आणि Ivan Vagner स्थानकात पोहोचल्यानंतर एकत्रित Welcome Ceremony दरम्यान लाईव्ह संवाद साधताना -फोटो -नासा संस्था 

नासा संस्था -12 सप्टेंबर

नासाचे अंतराळवीर Don Pettit रशियन अंतराळवीर Alexey Ovchinin आणी Ivan Vagner बुधवारी स्थानकात पोहोचले हे तिनही अंतराळवीर सहा महिने स्थानकात वास्तव्य करणार आहेत

बुधवारी 11 तारखेला सोयुझ MS-26 अंतराळयान ह्या तिनही अंतराळवीरांसह स्थानकात जाण्यासाठी अंतराळात झेपावले निघण्या आधी ह्या तिन्ही अंतराळविरांचे ऊड्डाणपुर्व अंतिम चेकअप करण्यात आले त्यांचे हेल्थ चेकअप,स्पेससुट फिटिंग आणी ईतर आवश्यक चेकअप करण्यात आले हे अंतराळवीर स्थानकात जायला निघाले तेव्हा ऊड्डाणस्थळी त्यांना निरोप द्यायला त्यांचे कुटुंबीय,मित्र आणि संस्थेतील प्रमुख हजर होते

सोयुझ अंतराळयान कझाकस्थानातील बैकोनुर येथील ऊड्डाण स्थळावरुन 12.23 p.m(EDT) वाजता स्थानकात जाण्यासाठी अंतराळात झेपावले आणी तीन तासांच्या अंतराळ प्रवासानंतर 3.32p.m.वाजता स्थानका जवळ पोहोचले त्यानंतर सोयुझ अंतराळयानाने  स्थानकाभोवती दोन फेऱ्या मारल्या

सोयुझ अंतराळयान स्थानकाच्या रशियन सेगमेंट मधील  Rassvet Module जवळ पोहोचल्यावर स्वयंचलित यंत्रणेने सोयुझ यान आणी स्थानक ह्यांच्यातील Hatching, Docking प्रक्रिया पार पडली आणी 5.50p.m.ला स्थानकाचे दार ऊघडताच तिनही अंतराळवीरांनी स्थानकात प्रवेश केला स्थानकात सद्या रहात असलेल्या अंतराळवीरांनी ह्या अंतराळवीरांचे स्वागत केले 

त्यानंतर काही वेळातच ह्या अंतराळविरांचा Welcome Ceremony पार पडला तेव्हा स्थानकातील सर्व अंतराळवीर एकत्र जमले होते रशियातील Mascow M.C.C येथील प्रमुखांनी आणि नासाच्या Huston तेथील संस्था प्रमुखांनी त्यांच्याशी लाईव्ह संवाद साधला ,"Space Flight Control Team च्या वतीने देखील तुम्ही स्थानकात सुरक्षित पोहोचल्याबद्दल अभिनंदन! आता स्थानकात अंतराळवीरांची संख्या खूप झाली आहे आणि तुम्हाला एकत्रित वास्तव्य करून संशोधन करावयाचे आहे काही दिवसात Space X Crew Dragon मोहिमेतील आणखी अंतराळवीर स्थानकात पोहोचतील ह्या साठी धैर्याची गरज आहे आम्हाला आशा आहे कि,तुम्ही हे कार्य यशस्वी करून सहा महिन्यांनी सुरक्षित पुन्हा पृथ्वीवर परत याल तुम्हाला स्थानकातील वास्तव्यासाठी शुभेच्छा !" त्या वेळी अंतराळवीर Don आणि Ovchinin ह्यांना तुम्ही इथे पोहोचल्यावर तुमच्या भावना काय आहेत असे विचारले तेव्हा त्यांनी आभार मानत आम्ही पुन्हा आमच्या ह्या दुसऱ्या घरी राहायला आलो आहोत आणि आम्हाला इथे राहायला आवडत हे घर सुंदर आहे!अद्भुत आहे! आणि आमची खूप दिवसांची इच्छा होती कि इथे खूप अंतराळवीरांसोबत वास्तव्य कराव आता आमची ती इच्छा पूर्ण होणार आहे म्हणून आम्ही आनंदित आहोत अशी प्रतिक्रिया व्यक्त केली 

आता स्थानकातील अंतराळवीरांची संख्या बारा झाली असुन हे अंतराळवीर नासाच्या मोहीम 71/72 मध्ये सहभागी होऊन तेथे सुरू असलेल्या संशोधनात सहभागी होतील आणी सहा महिन्याच्या वास्तव्यानंतर पृथ्वीवर परततील

अंतराळवीर Don Pettit आणी अंतराळवीर Alexey Ovchinin हे चवथ्यांंदा स्थानकात रहायला गेले असुन त्यांंची हि चवथी अंतराळवारी आहे आणी अंतराळवीर Ivan Vagner दुसऱ्यांंदा स्थानकात रहायला गेले असुन त्यांची हि दुसरी अंतराळवारी आहे

Monday, 9 September 2024

Boeing Star Liner अंतराळयान अंतराळवीरांविना स्वयंचलित यंत्रणेने स्थानकातून पृथ्वीवर सुरक्षित परतले

 

 Night vision view of Boeing's Starliner and its parachutes descending to New Mexico.

Boeing Star Liner अंतराळयान White Sand Space Harbor-New Mexico येथे पॅराशूटच्या साहाय्याने खाली उतरताना -फोटो नासा संस्था

 नासा संस्था -7 सप्टेंबर 

नासा आणि बोईंग कंपनीच्या Boeing Star Liner अंतराळयानाच्या Flight Test साठी नासाचे अंतराळवीर Sunita  Williams आणि Butch Wilmore जून मध्ये अंतराळस्थानकात राहायला गेले होते पण स्थानकात पोहोचल्यानंतर Star Liner अंतराळयानातील थ्रस्टर्समधून हेलियम वायू लीक होत असल्याने त्यांचे पृथ्वीवर परतणे लांबले होते 

अखेर Boeing Star Liner अंतराळयान स्वयंचलित यंत्रणेने सहा सप्टेंबरला पृथ्वीवर परतले New Mexico येथील White Sand Space Harbor येथे रात्री 10 वाजता (स्थानिक वेळ ) Star Liner अंतराळयान पॅराशूटच्या साहाय्याने सुरक्षितपणे खाली उतरले गेल्या तीन महिन्यांपासून हे अंतराळयान स्थानकात अडकले होते दोनवेळा Star Liner मानव विरहित स्थानकात पोहोचले होते त्या नंतर 5 जूनला तिसऱ्या Flight Test अंतर्गत Star Liner अंतराळवीरांना घेऊन स्थानकात पोहोचले होते

जून मध्ये जेव्हा Star Liner अंतराळयान स्थानकात पोहोचले तेव्हा Boeing आणि नासा संस्थेतील टीम प्रमुखांना यानातील थ्रस्टर्स मधून लिकेज होत असल्याचे लक्षात आले होते तेव्हा पासूनच टीम मधील इंजिनीअर्स थ्रस्टर्स दुरुस्तीसाठी सतत प्रयत्न करत होते आणि अंतराळवीरांच्या पृथ्वीवर परतण्यासाठी आणि यानाच्या दुरुस्तीसाठी वेगवेगळे उपाय शोधत होते अंतराळवीर Sunita Williams आणि Butch Wilmore देखील संस्थेतील टीमच्या नियमित मार्गदर्शनात स्थानकातुन थ्रस्टर्स दुरुस्तीसाठी प्रयत्न करत होते अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आले पण ह्या दोन्ही अंतराळवीरांच्या सुरक्षिततेसाठी Star Liner अंतराळयान ह्या दोधांशिवाय रिकामेच पृथ्वीवर परतले आहे

Star Liner अंतराळयान पृथ्वीवर सुरक्षित परतल्यावर नासा आणि Boeing co. मधील ह्या मोहिमेतील प्रमुखांना आनंद झाला  नासाच्या वॉशिंग्टन येथील  Associate Administrator (Space Operation mission) Ken Bowersox म्हणतात ,"आमच्या टीममधील सर्वांचा मला अभिमान वाटतो त्यांनी संपूर्ण Flight Test दरम्यान आणि आता अत्यंत कठीण परिस्थितीत अंतराळयान सुरक्षित पृथ्वीवर परत आणण्याची मोलाची कामगिरी यशस्वी केली आहे हे त्यांचे असामान्य कर्तृत्व कौतुकास्पद आहे जरी हे अंतराळयान अंतराळवीरांसह न येता रिकामेच परतले असले तरीही त्यांनी हि धोकादायक जबाबदारी कुशलतेने पार पाडली आहे अखेर अंतराळयान सुरक्षित पृथ्वीवर आणण्यात ते यशस्वी ठरले त्या मुळे भविष्यकालीन व्यावसायिक अंतराळ मोहिमेतील अंतराळवीरांच्या नियमित  प्रवासासाठी ह्या यानाला अंतिम मान्यता देण्यासाठी नासा संस्था प्रयत्न करेल!" 

अंतराळयान सुरक्षित पृथ्वीवर परतल्यावर नासाचे मॅनेजर Steve Stich -(Commercial Crew Program) ह्यांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त केली ते म्हणाले," नासाच्या व्यावसायिक अंतराळ मोहिमेअंतर्गत अंतराळविरांना स्थानकात नेण्या आणण्यासाठी अंतराळयानाच्या Flight Test ची गरज असते त्या नंतरच अंतराळयानाच्या नियमित वापराला अंतिम परवानगी दिली जाते आता Star Liner स्थानकातून स्वयंचलित यंत्रणेने सुरक्षित अंतराळ प्रवास करून  पृथ्वीवर परतले आहे त्यामुळे आम्ही आनंदित झालो आहोत !'

आता नासा संस्थेतील तज्ञ ह्या अंतराळ यानाच्या Launching पासून परत पृथ्वीवरच्या Landing पर्यंतच्या अंतराळ प्रवासाच्या Dataचे निरीक्षण करतील आणी ह्या यानाची कार्यक्षमता चेक करतील त्या नंतर नासा संस्था Boeing Star Liner च्या अंतराळवीरांसह नियमित अंतराळ प्रवासाला अंतिम मान्यता देईल !" तोवर नासाच्या Florida येथील Kennedy Space Center मध्ये Boeing Star Linerतज्ज्ञांच्या देखरेखीत ठेवण्यात येईल 

अंतराळवीर Sunita Williams आणि Butch Wilmore अंतराळ मोहीम 71-72च्या अंतराळवीरांसोबत फेब्रुवारी 2025 पर्यंत स्थानकात वास्तव्य करतील आणि स्थानकात सुरु असलेल्या संशोधनात सहभागी होतील आणि Space X Crew -9 मोहिमेतील Crew Dragon मधून पृथ्वीवर परततील