Tuesday, 9 June 2015

नांदी उत्कृष्ट नाटय प्रयोग

 स्टार वाहिनीने "World  थियेटर टेलीव्हिजन प्रिमियर " ह्या नावाने दर्जेदार मराठी नाटक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याच ठरवल आहे त्याची सुरवात "नांदी " ह्या नाटकान  झाली खरतर "नांदी" हे एक नाटक नसून नाटकाच्या आरंभापासून आजवर जी नाटक गाजली त्या दहा नाटकातील नाटय प्रसंगावर आधारीत हे नाटक आहे."अकल्पित कल्पिताना" ह्या टी व्ही वरील लाइव्ह chat शो च्या माध्यमातून आजवर गाजलेल्या नाटकातील नाट्य प्रसंगाची अप्रतिम मेजवानी घरबसल्या नाट्यरसिकांना पाहायला मिळाली स्पृहा जोशीच  खुमासदार औसुक्यपुर्ण सूत्रसंचलन जुन्या काळातील नाट्यशास्त्राचे जनक भरतमुनी आणि त्यांच्या हातात नव्या युगातील laptop ,प्रश्न विचारणारे प्रेक्षक व स्वत:ची समस्या मधूनच येणारया फोनवरून सोडवणारी सूत्रसंचालक आणि रंगभूमीवर गाजलेले नाटय प्रवेश ह्याच विनोदी पण रंजक  व अभ्यासु चित्रण हि थीम छान होती.आजवर अभिनय क्षेत्रात गाजलेले दहा कलाकार आणि त्यांनी केलेल्या गाजलेल्या दहा नाटकातील भूमिका खरोखरच लाजवाब !
 सुरवात अभिञान शाकुंतल पासून होते तेव्हा संस्कृत ऐवजी मराठी भाषा laptop वर select करतानाच आरंभापासून आतापर्यंत झालेली तंत्रज्ञानातील प्रगती रसिकांपर्यंत पोहोचते संगीत सौभद्र मधल्या प्रसाद ओकची भूमिका लक्षवेधक आहे त्याने साकारलेली रुक्मिणी अप्रतिम! त्याने आपल्या सशक्त अभिनयातून चेहरयावर स्त्रीसुलभ राग,द्वेष,लोभ,लज्जा ह्या भावभावनांचे भावविभ्रम सहजतेने प्रतिबिंबित केलेत  त्याने साकारलेल्या स्री भूमिकेत कोठेही बाष्कळपणा नाही प्रसादने आजवर विविधांगी भूमिका साकारल्यात सद्या " होणार सून मी ह्या घरची" मध्ये मिश्किल विनोद करणारया प्रसादच्या चेहऱ्यावरचे हे हावभाव पाहताना प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर क्षणभर हसू तरळत ह्या नाटकात अजय पुरकर ह्यांची कृष्णाची भूमिका छान होती त्यांनी गायलेले" नभ मेघांनी आक्रमिले ,नच सुंदरी धरी कोपा" सुरेल होते प्रसादनेही" प्रिये पहा रात्रीचा समय सरुनी होत उष:काल हा" ह्या गाण्यामध्ये अजय पुरकर यांना सुरेल साथ दिली बरयाच दिवसांनी हि गाजलेली श्रवणीय गाणी नाट्यसंगीत आवडणारया रसिकांना ऐकायला मिळाली हे दोघेही गायक नट सारेगमपच्या युध्द तारयांचे मध्ये भाग घेतलेले प्रसाद तर विजेता गायक त्याचा अभिनय संघर्ष "जोडी तुझी माझी"मधून ऐकताना अनेकांचे डोळे पाणावले असतील "नटसम्राट" मध्ये सीमा देशमुखने साकारलेली मिश्किल कावेरी जशी सरस तशीच गडकऱ्यांच्या एकच प्याला मधली सुधाकरच्या दारूच्या व्यसनामुळे श्रीमंतीतून गरिबीत आलेली, इतकी कि एकवेळच्या जेवणाची भ्रांत पडावी तरीही तितकीच कणखर स्वावलंबी सिंधू पाहणाऱ्यांच्या मनाला चटका लावून जाते अश्विनी एकबोटे नी साकारलेली शकुंतला,अश्रूंची झाली फुले मधली सुमित्रा barrister मधली राधक्काहि उत्तम होती नाटकाच्या शेवटी तिचा अभिनय पाहून वातावरण स्तब्ध होते  तेजस्विनी पंडितन कीचक वध मधली क्रोधीत असहाय्य द्रोपदी,  सखाराम बाईनडर मधली बेदरकार नायिका छान वठवलीय स्पृहान" एकच प्याला" मधली फटकळ स्पष्टवक्ती गीता आणि चाहूल मधली आत्मनिर्भर स्वतंत्र बाण्याची नायिका छान रंगवलीय शरद पोंक्षे चा "नटसम्राट आप्पा बेलवलकर  ,barrister "मधला नायक  उत्तम अविनाश नारकरन  दुष्यंत ,"अश्रूंची झाली फुले" मधला प्रोफेसर विद्याधर  ,चिन्मय मांडलेकरन युधिष्ठीर ,चाहूल मधला नायक छान साकारलाय
  नांदी मधून नाटय निर्मितीच्या काळापासूनचे बदलते स्त्रीजीवन,स्त्रीची लाचारी ,आगतिकता जाऊन तिच्यात स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची आलेली क्षमता आत्मनिर्भरता ,नाटय निर्मितीचा काळ त्यानंतर उठलेले वादंग विशेषत: कीचक वधानंतर झालेले दंगे ban करण्यात आलेलं नाटक नाटय कलावंत गणपत पाटील ह्यांना झालेली मारहाण हा  इतिहास नांदी नाटकातून उलगडत जातो  महाकवी कालिदास ,आण्णासाहेब किर्लोस्कर ,खाडिलकर ,वि.वा.शिरवाडकर, राम गणेश गडकरी, विजय तेंडूलकर वसंत कानेटकर ह्या नाटककारांची नाटके आल्यानंतर त्यांना मिळालेला उत्तम प्रतिसाद  हजारोंच्या संख्येन झालेली गर्दी ,कमाईही तितकीच पण नाटय कलावंताला मिळणार तुटपुंज मानधन ह्या  सारयांची माहिती नाटका दरम्यान रसिकांना दिली जाते ह्या दिग्गज नाटककारांच्या समर्थ लेखणीतून निर्माण झालेल्या अजरामर नाटयकृती रसिकांना अजूनही तितक्याच आवडतात
थोडक्यात उत्तम नाटककारांची उत्कृष्ट नाटक ,ती सादर करणारे सशक्त कलावंत आणि अर्थातच लेखक दिग्दर्शक सारच अप्रतिम! दाद देण्या सारख! पण शंभर प्रयोगानंतर हे नाटक आता बंद करण्यात आलय स्टार प्रवाह वाहिनीने मात्र नांदी दाखवून रसिकांना जुन्या नाटकांचा रंजक प्रवास घडवून सुखद धक्का दिला नाटकाचा लेखक हृषीकेश जोशीन त्याला मिळालेल्या शिष्यवृत्तीतून नाटय निर्मितीच्या काळापासून आजवर झालेल्या सामाजिक सांस्कृतिक भावनिक बदलाच अभ्यासपूर्ण संशोधन करत नांदीची निर्मिती केलीय आणि आता त्याच पुस्तकही प्रकाशित झालय नांदी मुळे लोक पुन्हा जुनी नाटके आवडीन पाहतील ह्यात शंका नाही .    

Wednesday, 20 May 2015

विदर्भ उष्णतेच्या तडाख्यात तापमानाचा उच्चांक

विदर्भात सद्या प्रचंड ऊन तापत असुन ह्या आठवडयात तापमानाने उच्चांक गाठला आज सर्वाधिक तापमान वर्धा व चंद्रपूर येथे ४७. ५ पर्यंत गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे ह्या आठवड्याची सुरवातच जास्त तापमानाने झाली रविवारपासूनच सूर्य प्रचंड उष्णतेने तळपू लागलाय यवतमाळ येथेही सोमवारी तापमान ४५. ६ इतके नोंदले गेले राजस्थान मधुन वहात येणाऱ्या उष्ण वारयामुळे  उन्हाची तीव्रता वाढली असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात येतेय रविवार पासूनच नागपूरच्या तापमानाचा पारा ४६ अंशाच्या वर गेला असल्याची चर्चा होती त्या मुळे रस्त्यावर शुकशुकाट होता सकाळी नऊ  पासूनच उन्हाची तीव्रता वाढत असून रात्री उशिरापर्यंत उन्हाच्या झळा जाणवत होत्या
उन्हाच्या तीव्रते मुळे लोक आवश्यक कामानिमित्यच  बाहेर पडतात उन्हापासून बचाव करण्यासाठी लोक डोक्याला स्कार्फ,शेला बांधून डोळ्याला गॉगल लावुन बाहेर पडताना दिसतात  दुपारच्या वेळेस रस्ते निर्मनुष्य झाले आहेत रस्त्यावर ठिकठिकाणी थंड पेय सरबत,रसाच्या गाडया उभ्या असून लोक तिथे उन्हापासून बचाव करण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत
ह्या वर्षी अवकाळी पाऊस,गारपिटीमुळे इतके दिवस ऊन जाणवले नाही पण आता मात्र उन्हाची तीव्रता दररोज वाढतच आहे मंगळवारी  वर्धा येथे सर्वाधिक ४७.५ इतके तापमान नोंदले गेले त्या नंतर नागपूर ,चंद्रपूर अकोला येथे ४६ अंश सेल्सिअस तापमान होते  मागच्या वर्षी नवतपाच्या उन्हाने वैदर्भीय त्रासले होते यंदाही तापमान वाढतच आहे उन्हाच्या तीव्रतेमुळे कुलरची हवा ,माठातले पाणीही गरमच असते शिवाय दिवसभरच्या उन्हामुळे नळातून येणारे पाणीही गरम असते  अजून एकदोन दिवस तापमान असेच राहील असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आलाय  विदर्भात आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे आतापर्यंत पाच जणांचा उष्माघाताने बळी गेल्याची नोंद झाली आहे सध्या मे महिन्याचे शेवटचे दिवस असून लवकरच नवतपाचे (अत्तुच्च उष्णतेचे ) ऊन पडण्याचीही शक्यता वर्तवण्यात येतेय

                                

Friday, 8 May 2015

शास्त्री नगर येथे उशिराने पाणी पुरवठा

                                  शास्त्री नगर येथे गुरवार दि. ७ तारखेला होणारा पाणी पुरवठा सायंकाळ पर्यंत झालाच नाही विशेष म्हणजे यवतमाळ येथे दोन दिवसाआड पाणी सोडण्यात येते तेही कमी दाबाने अचानक पाणी न आल्याने बायकांची तारांबळ उडाली ह्या बाबतीत विचारणा करण्यासाठी पाणीपुरवठा कार्यालयात फोन केला असता तो उचलण्यात येत नव्हता वारंवार फोन करूनही जेव्हा फोन उचलल्या गेला नाही तेव्हा सकाळ कार्यालयाशी संपर्क साधला असता व्हाल्व बिघडल्याचे व उशिराने पाणी सोडण्यात येणार असल्याचे कळाले.शेवटी संध्याकाळी कार्यालयातील अधिकाऱ्यांना फोनवर संपर्क साधला तेव्हा पाणी सोडल्या जाईल असे सांगण्यात आले अखेर उशिराने पाणी आले तेही अत्यंत कमी दाबाने त्या मुळे नागरिकांना दोन दिवस पुरेल एव्हडा पाणीसाठा करता आला नाही विशेष म्हणजे व्हाल्व नादुरुस्त झाल्यामुळे पाणीपुरवठा उशिराने होईल अशी बातमीही दैनिकांना देण्यात आली नव्हती किंवा फोनवरून नागरिकांनाही सांगण्यात येत नव्हते पूर्वी पाणीपुरवठा होणार नसला किंवा काही अडचणी आल्यास रिक्षा फिरवून नागरिकांना सुचित करण्यात येत होते पण आता रिक्षाही फिरवल्या जात नाही आणि ऑफिस मधले फोन रिंग वाजत असूनही उचलल्या जात नाहीत
ह्या वर्षी मधून आधुन सतत पाऊस,गारपीट झाल्याने पाणी जून पर्यंत पुरेल इतके शिल्लक असल्याचे सांगण्यात आलेय तरी देखील गेल्या अनेक वर्षापासून एक दिवसाआड होणारा पाणी पुरवठा दोन दिवसांनीच होतो पावसाळ्यात भरपूर पाऊस,पूरस्थिती येऊनही लोकांना मात्र कृत्रिम पाणी टंचाईला तोंड द्यावे लागते कारण पूर आल्यानंतर पाणी धरणाची दारे उघडुन रस्त्यावर सोडले जाते त्या मुळे नागरिकांचे नुकसान होते शिवाय पाणी नियोजन योग्य प्रकारे न केल्याने भरपूर पाऊस पडूनही लोकांना नियमित पाणी पुरवठा होत नाही पूर्वीप्रमाणे लोकांना नियमित पाणी पुरवठा करावा व त्यात येणारया अडचणींचे लवकरात लवकर निवारण करावे अशी नागरिकांची मागणी आहे 

Saturday, 25 April 2015

किरणोत्सव

                                                     कन्याकुमारी इथला नयनरम्य सूर्योदय

सूर्याच्या किरणांनी जेव्हा कोल्हापुरची महालक्ष्मी प्रकाशमान होते तेव्हा किरणोत्सव (सोहळा )साजरा होतो "डेन्मार्क"मध्ये अभावानेच सुर्याच दर्शन होत त्या मुळे तिथे सूर्याच्या पहिल्या किरणांचा आनंद लुटण्यासाठी लोक समुद्रकिनारी जमतात माझ्या एका शेजारणीच्या" डेन्मार्क" स्थित मुलान आम्हाला video conferencing द्वारे तिथला किरणोत्सव दाखवला होता केरळच्या उगवत्या सुर्याच दर्शनही असच आल्हाददायी असत नेपाळच्या पोखरा इथुन पाहिलेला उगवता सूर्योदय अविस्मरणीय होता  आपल्याकडे मकरसंक्रांतीला पौष महिन्यात सूर्याची उपासना केली जाते सूर्य सृष्टीचा जन्मदाता तारणहारी त्याच्या उगवण्यान पहाट प्रसन्न होते तर मावळतीचा संधिप्रकाश उदासवाणा असतो आणि हाच सूर्य जेव्हा ऊन जास्त प्रसऊ लागतो तेव्हा मात्र तो त्रासदायक होतो उष्माघातान माणस मरतात सृष्टी करपते ,पाणी आटत जीवाची लाही,लाही होते घामाच्या धारा वाहू लागतात मागच्या वर्षी नवतपाच्या उन्हान तापमानाची  अत्तुच्च पातळी गाठली यंदा एप्रिलच्या दुसरया आठवड्या नंतर सुर्य प्रखर तेजान तळपू लागलाय एप्रिल सुरु होईतो अवकाळी पाऊस आणि गारपिटीन हवेत गारवा होता आता मात्र सूर्य चांगलाच तापू  लागलाय  आणि अशा रणरणत्या उन्हातही डोंगर घाटावर बहरलेली  केशरी पळसाची फ़ुले प्रवाश्यांना नेत्रसुखद गारवा देताहेत

                                                    प्रखर किरणांनी तळपणारा मद्यान्हीचा सूर्य

घराघरातुन उनापासुन बचाव करण्यासाठी कुलर्स लागलेत दुपारी रस्त्यावर शुकशुकाट दिसतोय अत्यंत आवश्यक असल्याशिवाय  कोणी घराबाहेर पडत नाहीय लोक डोक्याला शेला ,स्कार्फ व डोळ्यांवर गॉगल घालून उनापासुन आपला बचाव करताहेत रस्त्यावर ,दारावर सरबत कुल्फी ,गारेगार, रसाच्या गाडया  दिसु लागल्यात आईस्क्रीम पार्लर्स मधली गर्दी वाढतेय वेगवेगळ्या brand चे स्वादाचे ,फ्लेवरचे आईस्क्रीम ,शेक ,डेझर्ट बाजारात उपलब्ध झालेत पूर्वी जेवणानंतर खाल्ल्या जाणार पान, आईस्क्रीम मध्ये मिक्स होऊन नवीन स्वादात मिळतय पूर्वी आमच्या लहानपणी फ्रीज नव्हते तेव्हा उन्हाळ्यात एक दिवस घरीच आईस्क्रीम बनवल्या जायच सकाळीच आईस्क्रीमच्या दुकानातून आईस्क्रीम पॉट ,बर्फाच्या कारखान्यातून बर्फाची लादी ,खडे मीठ आणल जायच तोवर आई दुध आटवुन ठेवायची मधल्या भांडयात आटवलेल साखर वै. घातलेल दुध घालुन बाहेरून फोडलेल्या बर्फ,मिठाच मिश्रण टाकून आळीपाळीन सारे  पॉटच handle  फिरवायचे तीन चार तासात आईस्क्रीम तयार व्हायच त्या आईस्क्रीमची त्या वेळेसची मजा काही ऑरच! ,फ्रीज मध्येही आईस्क्रीम तयार व्यायला वेळ लागतो आता मात्र घराबाहेर पडताच तयार आईस्क्रीम्स मिळतात 
उन्हाळा येताच गृहिणींची धावपळ सुरु होते वर्षभराची धान्य डाळी आणून ती उनात ठेवण वर्षभरासाठी मसाले वाळवण,शेवया पापड वै करण.आता बाजारात सार तयार मिळू लागलय तरीही अजूनही हौसेन काहीजणी घरी वाळवण बनवतात पूर्वी तीन दिवस गहू भिजवून त्याचा चिक काढून कुरडई.पापड बनवत आता मीक्सरवर, गिरणीतून चिक काढून मिळतो उन्हाळी वाळवण प्रांतानुसार बदलतात विदर्भात मुगाच्या मुगवड्या ,तुरीच्या दाण्याचे सांडगे, गव्हाच्या कोंड्याचे धापोडे साबुदाणा बटाटयाची चकली करतात तर मराठवाडयात बाजरीच्या खारोड्या ,तीळवड्या करतात राजस्थान,उत्तर प्रदेशात उडीदाचे सांडगे करतात पश्चिम भारतात ज्वारीचे पापड तांदळाचे सांडगे ,नाचणीचे पापड  करतात गुजराती लोक तांदळाचे खिछे करतात उन्हाळ्यात भाज्याही वळवून ठेवल्या जातात उन्हाळ्यात सत्तुच पीठ बनवल जात ह्या पिठात आवडी प्रमाणे साखर,गुळ ,दुध घालून खातात किव्हा नुसतच तिखट,मीठ कैरीच्या कांद्याच्या फोडी घालुन,पोह्यांना लाऊन खाल्ल जात गव्हात प्रोटीन तर गुळात आयर्न असत गुळामुळे उष्णता बाधत नाही शिवाय आंब्यात अ व क जीवनसत्व असत 
उन्हाळा म्हणजे सगळ्यांची आवडती कैरी आणि फळांचा राजा आंब्याचा सिझन कैरया भाजुन ,शिजवुन खिसुन त्याच्या गरात साखर ,गुळ  घालुन पन्ह केल जात ह्या मुळेही उन बाधत नाही पन्ह विदर्भात रोजच्या जेवणात असत तर पश्चिम महाराष्ट्रात पन्ह पेय म्हणुन पिल जात पाडव्याला त्यात सुका मेवा ,खसखस खोबर वेलची,केशर,कडुलिंबाची कोवळी फुले घालून हे शाही पन्ह एकमेकांना दिल जात 
कैऱ्यांच लोणच देखील प्रांतानुसार आंबट गोड चवीच,उन्हातल ,मसाल्याच बनवलं जात ह्या दिवसात मिळणारया  भोकारांचही लोणच बनवल जात  रसाचे आंबे येताच रोज रस सुरु होतो बाजारात हापुस,केशर लालबाग,दशेरी,लंगडा ,नीलम बेंगनपल्ली अशा अनेक जातीचे आंबे दाखल होतात विदर्भात जावई ,लेकीला खास रस खाण्यासाठी बोलावल जात त्याला रसाळी म्हणतात अक्षय तृतीयेला विदर्भात आखजी म्हणतात 
रसासोबत आणि रोजही  कुरडया पापड तळले जातात विशेषत: वाफेवरचे चिकाचे पापड,रसात तूप चारोळी टाकून खातात तुपान आंबा बाधत नाही ,मराठवाड्यात रसासोबत हरबरयाच्या डाळीचा भरडा केला जातो आंब्याचे आता नवनवीन पदार्थ केले जातात विदर्भात वर्षभरासाठी आंब्याची बर्फी करून उन्हात वाळवतात तर पश्चिम महाराष्ट्र ,मराठवाड्यात आंब्याचे पेढे करतात आंब्याची टिकाऊ  जेली,जॅम ,सरबत करतात आंब्याच्या उन्हात वाळवलेल्या पोळीला विदर्भातील खेड्यात अट्टु म्हणतात 
उन्हाळ्यात घामावाटे शरीरातुन पाणी बाहेर टाकल्या जाते म्हणून जास्त पाणी प्यावे लागते शरीराची पाण्याची पातळी व्यवस्थित राहावी म्हणुन निसर्गाने पर्यायाने आपल्या पूर्वजांनी रसाळ फळांची निर्मिती केलीय ह्या दिवसात कलिंगड,खरबुज ,लीची हि फळ तर मिळतातच शिवाय विदर्भात चार (चारोळीची फळ ) मिळतात सोलापुरात ह्या दिवसात काळी मैना करवंद S S S S  अशी हाळी देत विक्रेते करवंद विक्रीस येतात काळी रसाळ मीठ लावलेली आंबटगोड चवीच्या करवंदाची लज्जतच न्यारी ! विदर्भात काळी करवंद मिळत नाहीत 
उन्हाळा मुलांसाठी  तरुणाई साठी आनंददायी असला तरीही उन्हाची तीव्रता वाढताच सारेच वैतागतात काही जण पर्यटनासाठी थंड हवेच्या ठिकाणी जातात उन्हाळा त्रासदायक झाला की सारेजण पावसाची आतूरतेन वाट पाहतात  

Wednesday, 8 April 2015

दिल दोस्ती दुनियादारी -निखळ मनोरंजन

             झी मराठी channel वर नव्यान सुरु झालेली दिल दोस्ती दुनियादारी हि मालिका पदार्पणातच लोकांच्या पसंतीस उतरलीय सद्याच्या सासुसुना ,कटकारस्थान आणि इतर मालमसाल्याच्या मालिकांना कंटाळलेला प्रेक्षक वर्ग दिल दोस्ती कडे वळल्यास नवल नाही दिल दोस्ती दुनियादारी मधले तरुण ,तरुणी कामाच्या शोधात मुंबईत आलेले आणि जागेच्या टंचाईमुळे flat शेअर करणारे अचानक flat मध्ये राहण्यासाठी मिनल रेशमा ह्या विवाहित तरुणीला घेवून येते .ती आधीही तिला भेटलेली असल्याने तिची कहाणी ऐकून तिला घरी आणते पण flat मधले इतर तिला त्यांच्यासोबत राहू देण्याच्या विरोधात असतात कारण रेशमा त्यांना रेल्वेत भेटलेली असल्याने ती खोटे बोलतेय अस त्यांना वाटत मग तिला घालविण्यासाठी सारे खूप प्रयत्न करतात तिच्यावर चोरीचा आळ आणतात पण नंतर रेशमा सुखी संसाराचे स्वप्न घेऊन मुंबईत आलीय पण घराचा उंबरठा ओलांडताच तिचा पती राकेश तिचा स्वप्नभंग करीत तिला त्याच्या लिव इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या मैत्रिणीबद्दल सांगत,घटस्पोट मागतोय आणि तीच इथे कोणी नाही आणि ती हे घरी सांगू शकत नाही हे कळताच सारे तिला घरी घेऊन येतात,मानसिक आधार देतात आणि तिच्या आईवडिलांना हि गोष्ट कळू नये म्हणून धडपडतात आणि कथानक सुरु होते.
                            Flat मधील सुजय,आशु, कैवल्य,Anna ,मिनल आणि रेशमा ह्यांच्या एकत्र राहण्यातून येणारया अडचणी उडणारे खटके आणि होणारया संघर्षातून घडणारया गमतीजमती प्रेक्षकांना हसवतात हा flat सुजयच्या काकांचा आहे तो आय टी कंपनीत काम कारतो त्या मुळे सतत laptop घेऊन बसलेला व्यवहारी तरुण इतर चौघांना आपला flat भाडे घेऊन शेअर करतो. कैवल्य श्रीमंत घरातला पण गिटार प्रेमामुळे घर सोडून आलेला आणि संगीत क्षेत्रात नाव कमवण्यासाठी संघर्ष करतोय ,लहानपणीच आईवडिलांचे छत्र हरवलेला आशु गुन्हेगारी परिसरात वाढलेला त्या मुळे सतत त्याच सावटाखाली राहणारा शिकण्यासाठी मुंबईत येतो आणि जगण्यासाठी वाढदिवस आरेंजर म्हणून काम करतो ,तर Annaही चांगल्या कुटुंबातली कॅथलिक ख्रिश्चन तरुणी assistant fashion डिझायनर म्हणून काम करतेय तर मिनल सिनेविश्वात मिळेल त्या भूमिका करत संघर्ष करतेय सारयांनाच पैशाची कडकी.
                 ह्या मालिकेतली मीनलची challenging ,dashing modern ,रोकठोक Tom बॉयीश भूमिका स्वानंदी टिकेकर म्हणजेआरती टिकेकर व उदय टिकेकर ह्यांच्या कन्येन उत्तम वठवलीय तिचा अभिनय सहज सुंदर आहे आणि विशेष म्हणजे तरुणाईला ती खूप आवडतेय. सखी गोखले ह्या शुभांगी व मोहन गोखलेच्या  कन्येनही रेशमाची साधी सरळ ,दुसरयांच्या मदतीला धावणारी ,अस्ताव्यस्त घराला व इतरांना वळण लावणारी उत्तम कुक पण हळवी सतत रडणारी भूमिका तितक्याच सहजतेन पेललिय ,इतरांचे विनोद जरा उशिराने लक्षात येणारी प्रांजळ आणि गोड ख्रिश्चन तरुणी Anna पूजा ठोंबरे उत्तम साकारतेय. इंग्लिश शिकण्याची आवड असणारा पण शिकू न शकलेला लोकांच्या मदतीला धावणारा आशु पुष्कराज चीरपूटकर  छान साकारतोय ,अमेय वाघ हा सिनेनाट्य कलावंत त्या मुळे त्याची भूमिका एकदम सरस त्यान रोकठोक आत्मकेंद्री बेफिकीर सडेतोड कैवल्यची भूमिका उत्तमपणे पेललीय तर सुव्रत जोशीही व्यवहारी आयटी तरुण सुजयच्या भूमिकेत फिट आहे.
                 कैवल्यवर लाइन मारणारी प्रगल्भाची एंट्री असो कि आशूच्या गुजराती मैत्रिणीच्या एन्ट्रीचा एपिसोड धमाल उडवून देणारा आशुच त्याच्या मैत्रिणीसाठी (किंजल) इंग्लिश शिकण प्रेक्षकांची अफलातून करमणूक करत एकंदरीत  हि थोडीशी आगाऊ कार्टी मनान चांगली ,कधी एकमेकाशी भांडणारी तर कधी समजून घेणारी ,अडचणीच्या वेळेस धाऊन जाणारी कधी रेशमाला रडवणारे तर कधी तीच कौतुक करणारे हे तिचे दोस्त तिला आत्महत्या करण्यापासून परावृत्त करतात तेही विनोदाची पेरणी करत हा एपिसोडही लोकांना भरभरून हसवून गेला हे दोस्त तिला वेळोवेळी सावध करत ह्या जगात राहायच तर पक्क व्हायला हव हे शिकवतात सारेच कलावंत लाजवाब ,मस्त आणि दिलखुलास हसवणारे ,कधी धमाल मस्ती गोंधळ तर कधी कोपरखळी मारत ,शाब्दिक कोटी करत,हळुवार चिमटे काढत लोकांना हसवणार हलक फुलक कथानक असणारी हि मालिका तरुणाईला आपल्या जवळची वाटतेय कारण आता जागेच्या टंचाई मुळे पुण्या,मुंबईत करीअर करण्यासाठी आलेली तरुणाई एकच flat शेअर करतेय
पण रेशमाला घालवण्यासाठी कैवल्यच भिकारयाला आणण त्याचा चाटून पुसून खाल्लेला बाऊल परत मागण( कुणीही भिकारयाला दिलेल्या बाऊलमध्ये खाणार नाही,मुळात भिकारयाला घरात घेणार नाही) 
आणि फराळासाठी उपमा पोहे च नाव घेत रेशमाच इडली सांबाराची प्लेट हातात देण ह्या चुकांकडे दुर्लक्ष केल्यास मालिका उत्तम

Friday, 3 April 2015

अखेर सफाई कामगारांचा संप मिटला

गेल्या जवळपास  महिनाभरापासून सुरु असलेला सफाई कामगारांचा संप अखेर मिटल्याने नागरिकांना दिलासा मिळाला गेल्या महिना भरात संपामुळे घंटागाडी कर्मचारी कचरा गोळा करण्यासाठी येत नव्हते त्या मुळे कचरा नियमित घंटागाडीत टाकण्याची सवय झालेल्या नागरिकांना कचरा कोठे टाकावा हा प्रश्न पडला होता नागरिकांनी सतत तक्रारी केल्यानंतर नगर परिषदेतर्फे मधून अधुन ट्रक फिरवून कचरा गोळा केल्या जात होता पण तरीही दररोजच्या कचरयाचा प्रश्न होताच काहिंनी रस्त्यावर कचरा टाकल्याने स्वच्छ व सुंदर यवतमाळात कचरयाचे ढीग साचु लागले होते साचलेल्या ढीगामुळे आधीच डासांच्या त्रासाने त्रस्त असलेले यवतमाळ मधले नागरिक कचरा उचलल्या न गेल्याने वाढलेल्या डासामुळे ,दुर्गंधीमुळे व त्यात मनसोक्त फिरणारया डुकरांच्या त्रासाने वैतागले होते पण अखेर घंटा गाडीवाल्या कर्मचारयांचा संप मिटला व घंटा गाडी सकाळी कचरा गोळा करण्यासाठी घरापुढे आली आणि नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला    

Friday, 27 March 2015

बातचीत

 गुढीपाडवा ठिकठिकाणी मिरवणुक काढून पहाट जागवून उत्साहात साजरा झाला पूर्वी गणेशोत्सवाला निघणारी मिरवणूक आता सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने निघत असते त्या मुळे लोकांना आता अशा मिरवणुकीच नाविन्य फारस राहिलेलं नाही विशेष म्हणजे इकडे ढोलताशांच्या निनादात गुढीपाडवा साजरा होत असताना तिकडे सीमेवर आपले जवान लष्करी वेशात भारतीय हद्दीत घुसलेल्या अतिरेक्यांशी प्राणपणाने लढत होते लष्करी तळावर हातबॉम्ब फेकून केलेल्या आत्मघातकी हल्ल्याला प्रत्युत्तर देत होते आधी कथुआ नंतर सांबा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात वाई येथील जवानासह इतर तीन जवानांना वीरमरण आले तर निरपराध नागरिक जखमी झाले आपल्या प्राणांचे बलिदान देऊन ह्या शूरवीर जवानांनी दोन अतिरेक्यांना यमसदनी पाठवले .सिमेवर आपले जवान रात्रंदिवस आपल्या जीवाची पर्वा न करता शत्रूशी लढतात म्हणुनच आपण निर्धास्त जीवन जगू शकतो सणवार साजरे करू शकतो म्हणूनच अशा वीर जवानांचे सतत स्मरण करायला हवे
ह्या महिन्यात काही चांगले सरकारी निर्णय जाहीर झाले 
त्या पैकी एक म्हणजे वाळीत टाकण्यारयांवर कारवाई करण्याचा निर्णय एखाद्या निरपराध अनिष्ट रूढी परांपरा विरुध्द आवाज उठवणारया लोकजागृती करू पाहणारया नागरिकांना सामुदायिक एकी करून वाळीत टाकल जात त्या मुळे नाहक अशांचा बळी जाण्याचे प्रकार घडतात आणि अशी प्रकरणे उघडकीस आल्यावर त्याच्यावर कारवाईही करण्यात येते तरीही सामाजिक ,आर्थिक ,धार्मिक,राजकीय हितसंबंध जपण्यासाठी आपला हेतू साध्य करण्यासाठी काही गुंड प्रवृत्तीचे मुठभर लोक इतर लोकांना वेठीस धरतात एखाद्या व्यक्तीला ,कुटुंबाला एकी करून वाळीत टाकतात त्यांच्या घरी लोकांना वा कामगारांना येऊ देत नाहीत त्यांना धमकावल जात त्यांना चुकीचा पत्ता देण,त्यांची बदनामी करण,खोटया अफवा पसरवण ,फोन ट्रेस,tap करण,त्यांना आलेली पत्र गहाळ करण,काढून घेण थोडक्यात अशा अनेक प्रकारांनी त्यांची सर्व प्रकारे अडवणूक केली जाते त्यांना एकी करून एकट पाडल जात तेव्हा कमकुवत मनाचे लोक जीव देतात अशी अनेक उदाहरण नेहमी घडतात पण आता सरकारी कठोर कारवाईच्या निर्णया मुळे अशा गोष्टींवर  अंकुश बसेल 
आता अशा वाळीत टाकणारया व्यक्तींना ३ते ७ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व ५लाख रु दंडाची शिक्षा ठोठावण्यात येणार आहे शिवाय त्यांना वृद्धाश्रम ,अनाथाश्रम येथील स्वच्छतागृहाची सफाई करण्याच्या शिक्षेचीही तरतूद करण्यात येणार आहे आणि ह्या सेवेचे व्हिडीओ चित्रण व बातम्या देण्याचे स्वातंत्र्य मिडिया प्रत्रकारांना देण्यात येणार आहे त्या मुळे सामाजिक बहिष्कार टाकणारया जातपंचायत ,सोसायटी वा इतर गुन्हेगाराला आपल्या कृत्याची लाज वाटेल व पुन्हा तो अशी कृत्ये करण्यास धजावणार नाही हा हेतू त्या मागे आहे
ह्या वर्षीपासून शैक्षणिक क्षेत्रातही काही महत्वपूर्ण बदल करण्यात येणार आहेत विद्यार्थी प्रत्येक इयत्तेत त्यांच्या वयाच्या क्षमतेनुसार ज्ञान प्राप्त करतात का? व शिक्षकही विद्यार्थ्याला शिकवण्या योग्य क्षमतेचे आहेत का? ह्याची पडताळणी करण्याकरता शाळेकडून नैदानिक चाचणी घेण्यात येणार असुन त्याचा तपशील शाळेने शिक्षण विभागाला कळवणे बंधनकारक करण्यात येणार आहे शिवाय बाहेरील संस्थेकढूनही अशी चाचणी घेण्यात येणार आहे
पाच वर्षापूर्वी झालेल्या निर्णयानुसार पहिली ते आठवी पर्यंतच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या त्याचा परिणाम त्यांच्या गुणवत्तेवर होत होता परीक्षाच नसल्याने त्यांचा जास्त वेळ खेळण्यात जातो व ती उनाड बनतात शिवाय एकदम नववीत परीक्षा देताना त्यांची तारांबळ उडते ती माघारतात त्या मुळे त्यांची नियमित परीक्षा घ्यावी अशी मागणी शिक्षण शेत्रातल्या मान्यवरांकडून होतेय ती योग्यच आहे आता अवैध गुणवाढ, वाढती कॉपी प्रकरणे पेपर सेटिंग अशा शैक्षणिक क्षेत्रातल्या इतर समस्याही सरकारने गांभीर्याने घ्याव्यात अशीही अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना सरकार तर्फे "भारत रत्न "पुरस्कार जाहीर झालाय  अटलजींसारख्या कुशल नेतृत्व व स्वछ प्रतिमेच्या व्वाक्तीला हा पुरस्कार मिळण हि अभिनंदनीय बाब आहे
                                                                                   yojana.duddalwar@gmail.com