Saturday 25 April 2015

किरणोत्सव

                                                     कन्याकुमारी इथला नयनरम्य सूर्योदय

सूर्याच्या किरणांनी जेव्हा कोल्हापुरची महालक्ष्मी प्रकाशमान होते तेव्हा किरणोत्सव (सोहळा )साजरा होतो "डेन्मार्क"मध्ये अभावानेच सुर्याच दर्शन होत त्या मुळे तिथे सूर्याच्या पहिल्या किरणांचा आनंद लुटण्यासाठी लोक समुद्रकिनारी जमतात माझ्या एका शेजारणीच्या" डेन्मार्क" स्थित मुलान आम्हाला video conferencing द्वारे तिथला किरणोत्सव दाखवला होता केरळच्या उगवत्या सुर्याच दर्शनही असच आल्हाददायी असत नेपाळच्या पोखरा इथुन पाहिलेला उगवता सूर्योदय अविस्मरणीय होता  आपल्याकडे मकरसंक्रांतीला पौष महिन्यात सूर्याची उपासना केली जाते सूर्य सृष्टीचा जन्मदाता तारणहारी त्याच्या उगवण्यान पहाट प्रसन्न होते तर मावळतीचा संधिप्रकाश उदासवाणा असतो आणि हाच सूर्य जेव्हा ऊन जास्त प्रसऊ लागतो तेव्हा मात्र तो त्रासदायक होतो उष्माघातान माणस मरतात सृष्टी करपते ,पाणी आटत जीवाची लाही,लाही होते घामाच्या धारा वाहू लागतात मागच्या वर्षी नवतपाच्या उन्हान तापमानाची  अत्तुच्च पातळी गाठली यंदा एप्रिलच्या दुसरया आठवड्या नंतर सुर्य प्रखर तेजान तळपू लागलाय एप्रिल सुरु होईतो अवकाळी पाऊस आणि गारपिटीन हवेत गारवा होता आता मात्र सूर्य चांगलाच तापू  लागलाय  आणि अशा रणरणत्या उन्हातही डोंगर घाटावर बहरलेली  केशरी पळसाची फ़ुले प्रवाश्यांना नेत्रसुखद गारवा देताहेत

                                                    प्रखर किरणांनी तळपणारा मद्यान्हीचा सूर्य

घराघरातुन उनापासुन बचाव करण्यासाठी कुलर्स लागलेत दुपारी रस्त्यावर शुकशुकाट दिसतोय अत्यंत आवश्यक असल्याशिवाय  कोणी घराबाहेर पडत नाहीय लोक डोक्याला शेला ,स्कार्फ व डोळ्यांवर गॉगल घालून उनापासुन आपला बचाव करताहेत रस्त्यावर ,दारावर सरबत कुल्फी ,गारेगार, रसाच्या गाडया  दिसु लागल्यात आईस्क्रीम पार्लर्स मधली गर्दी वाढतेय वेगवेगळ्या brand चे स्वादाचे ,फ्लेवरचे आईस्क्रीम ,शेक ,डेझर्ट बाजारात उपलब्ध झालेत पूर्वी जेवणानंतर खाल्ल्या जाणार पान, आईस्क्रीम मध्ये मिक्स होऊन नवीन स्वादात मिळतय पूर्वी आमच्या लहानपणी फ्रीज नव्हते तेव्हा उन्हाळ्यात एक दिवस घरीच आईस्क्रीम बनवल्या जायच सकाळीच आईस्क्रीमच्या दुकानातून आईस्क्रीम पॉट ,बर्फाच्या कारखान्यातून बर्फाची लादी ,खडे मीठ आणल जायच तोवर आई दुध आटवुन ठेवायची मधल्या भांडयात आटवलेल साखर वै. घातलेल दुध घालुन बाहेरून फोडलेल्या बर्फ,मिठाच मिश्रण टाकून आळीपाळीन सारे  पॉटच handle  फिरवायचे तीन चार तासात आईस्क्रीम तयार व्हायच त्या आईस्क्रीमची त्या वेळेसची मजा काही ऑरच! ,फ्रीज मध्येही आईस्क्रीम तयार व्यायला वेळ लागतो आता मात्र घराबाहेर पडताच तयार आईस्क्रीम्स मिळतात 
उन्हाळा येताच गृहिणींची धावपळ सुरु होते वर्षभराची धान्य डाळी आणून ती उनात ठेवण वर्षभरासाठी मसाले वाळवण,शेवया पापड वै करण.आता बाजारात सार तयार मिळू लागलय तरीही अजूनही हौसेन काहीजणी घरी वाळवण बनवतात पूर्वी तीन दिवस गहू भिजवून त्याचा चिक काढून कुरडई.पापड बनवत आता मीक्सरवर, गिरणीतून चिक काढून मिळतो उन्हाळी वाळवण प्रांतानुसार बदलतात विदर्भात मुगाच्या मुगवड्या ,तुरीच्या दाण्याचे सांडगे, गव्हाच्या कोंड्याचे धापोडे साबुदाणा बटाटयाची चकली करतात तर मराठवाडयात बाजरीच्या खारोड्या ,तीळवड्या करतात राजस्थान,उत्तर प्रदेशात उडीदाचे सांडगे करतात पश्चिम भारतात ज्वारीचे पापड तांदळाचे सांडगे ,नाचणीचे पापड  करतात गुजराती लोक तांदळाचे खिछे करतात उन्हाळ्यात भाज्याही वळवून ठेवल्या जातात उन्हाळ्यात सत्तुच पीठ बनवल जात ह्या पिठात आवडी प्रमाणे साखर,गुळ ,दुध घालून खातात किव्हा नुसतच तिखट,मीठ कैरीच्या कांद्याच्या फोडी घालुन,पोह्यांना लाऊन खाल्ल जात गव्हात प्रोटीन तर गुळात आयर्न असत गुळामुळे उष्णता बाधत नाही शिवाय आंब्यात अ व क जीवनसत्व असत 
उन्हाळा म्हणजे सगळ्यांची आवडती कैरी आणि फळांचा राजा आंब्याचा सिझन कैरया भाजुन ,शिजवुन खिसुन त्याच्या गरात साखर ,गुळ  घालुन पन्ह केल जात ह्या मुळेही उन बाधत नाही पन्ह विदर्भात रोजच्या जेवणात असत तर पश्चिम महाराष्ट्रात पन्ह पेय म्हणुन पिल जात पाडव्याला त्यात सुका मेवा ,खसखस खोबर वेलची,केशर,कडुलिंबाची कोवळी फुले घालून हे शाही पन्ह एकमेकांना दिल जात 
कैऱ्यांच लोणच देखील प्रांतानुसार आंबट गोड चवीच,उन्हातल ,मसाल्याच बनवलं जात ह्या दिवसात मिळणारया  भोकारांचही लोणच बनवल जात  रसाचे आंबे येताच रोज रस सुरु होतो बाजारात हापुस,केशर लालबाग,दशेरी,लंगडा ,नीलम बेंगनपल्ली अशा अनेक जातीचे आंबे दाखल होतात विदर्भात जावई ,लेकीला खास रस खाण्यासाठी बोलावल जात त्याला रसाळी म्हणतात अक्षय तृतीयेला विदर्भात आखजी म्हणतात 
रसासोबत आणि रोजही  कुरडया पापड तळले जातात विशेषत: वाफेवरचे चिकाचे पापड,रसात तूप चारोळी टाकून खातात तुपान आंबा बाधत नाही ,मराठवाड्यात रसासोबत हरबरयाच्या डाळीचा भरडा केला जातो आंब्याचे आता नवनवीन पदार्थ केले जातात विदर्भात वर्षभरासाठी आंब्याची बर्फी करून उन्हात वाळवतात तर पश्चिम महाराष्ट्र ,मराठवाड्यात आंब्याचे पेढे करतात आंब्याची टिकाऊ  जेली,जॅम ,सरबत करतात आंब्याच्या उन्हात वाळवलेल्या पोळीला विदर्भातील खेड्यात अट्टु म्हणतात 
उन्हाळ्यात घामावाटे शरीरातुन पाणी बाहेर टाकल्या जाते म्हणून जास्त पाणी प्यावे लागते शरीराची पाण्याची पातळी व्यवस्थित राहावी म्हणुन निसर्गाने पर्यायाने आपल्या पूर्वजांनी रसाळ फळांची निर्मिती केलीय ह्या दिवसात कलिंगड,खरबुज ,लीची हि फळ तर मिळतातच शिवाय विदर्भात चार (चारोळीची फळ ) मिळतात सोलापुरात ह्या दिवसात काळी मैना करवंद S S S S  अशी हाळी देत विक्रेते करवंद विक्रीस येतात काळी रसाळ मीठ लावलेली आंबटगोड चवीच्या करवंदाची लज्जतच न्यारी ! विदर्भात काळी करवंद मिळत नाहीत 
उन्हाळा मुलांसाठी  तरुणाई साठी आनंददायी असला तरीही उन्हाची तीव्रता वाढताच सारेच वैतागतात काही जण पर्यटनासाठी थंड हवेच्या ठिकाणी जातात उन्हाळा त्रासदायक झाला की सारेजण पावसाची आतूरतेन वाट पाहतात  

No comments:

Post a Comment