Tuesday 9 June 2015

नांदी उत्कृष्ट नाटय प्रयोग

 स्टार वाहिनीने "World  थियेटर टेलीव्हिजन प्रिमियर " ह्या नावाने दर्जेदार मराठी नाटक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याच ठरवल आहे त्याची सुरवात "नांदी " ह्या नाटकान  झाली खरतर "नांदी" हे एक नाटक नसून नाटकाच्या आरंभापासून आजवर जी नाटक गाजली त्या दहा नाटकातील नाटय प्रसंगावर आधारीत हे नाटक आहे."अकल्पित कल्पिताना" ह्या टी व्ही वरील लाइव्ह chat शो च्या माध्यमातून आजवर गाजलेल्या नाटकातील नाट्य प्रसंगाची अप्रतिम मेजवानी घरबसल्या नाट्यरसिकांना पाहायला मिळाली स्पृहा जोशीच  खुमासदार औसुक्यपुर्ण सूत्रसंचलन जुन्या काळातील नाट्यशास्त्राचे जनक भरतमुनी आणि त्यांच्या हातात नव्या युगातील laptop ,प्रश्न विचारणारे प्रेक्षक व स्वत:ची समस्या मधूनच येणारया फोनवरून सोडवणारी सूत्रसंचालक आणि रंगभूमीवर गाजलेले नाटय प्रवेश ह्याच विनोदी पण रंजक  व अभ्यासु चित्रण हि थीम छान होती.आजवर अभिनय क्षेत्रात गाजलेले दहा कलाकार आणि त्यांनी केलेल्या गाजलेल्या दहा नाटकातील भूमिका खरोखरच लाजवाब !
 सुरवात अभिञान शाकुंतल पासून होते तेव्हा संस्कृत ऐवजी मराठी भाषा laptop वर select करतानाच आरंभापासून आतापर्यंत झालेली तंत्रज्ञानातील प्रगती रसिकांपर्यंत पोहोचते संगीत सौभद्र मधल्या प्रसाद ओकची भूमिका लक्षवेधक आहे त्याने साकारलेली रुक्मिणी अप्रतिम! त्याने आपल्या सशक्त अभिनयातून चेहरयावर स्त्रीसुलभ राग,द्वेष,लोभ,लज्जा ह्या भावभावनांचे भावविभ्रम सहजतेने प्रतिबिंबित केलेत  त्याने साकारलेल्या स्री भूमिकेत कोठेही बाष्कळपणा नाही प्रसादने आजवर विविधांगी भूमिका साकारल्यात सद्या " होणार सून मी ह्या घरची" मध्ये मिश्किल विनोद करणारया प्रसादच्या चेहऱ्यावरचे हे हावभाव पाहताना प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर क्षणभर हसू तरळत ह्या नाटकात अजय पुरकर ह्यांची कृष्णाची भूमिका छान होती त्यांनी गायलेले" नभ मेघांनी आक्रमिले ,नच सुंदरी धरी कोपा" सुरेल होते प्रसादनेही" प्रिये पहा रात्रीचा समय सरुनी होत उष:काल हा" ह्या गाण्यामध्ये अजय पुरकर यांना सुरेल साथ दिली बरयाच दिवसांनी हि गाजलेली श्रवणीय गाणी नाट्यसंगीत आवडणारया रसिकांना ऐकायला मिळाली हे दोघेही गायक नट सारेगमपच्या युध्द तारयांचे मध्ये भाग घेतलेले प्रसाद तर विजेता गायक त्याचा अभिनय संघर्ष "जोडी तुझी माझी"मधून ऐकताना अनेकांचे डोळे पाणावले असतील "नटसम्राट" मध्ये सीमा देशमुखने साकारलेली मिश्किल कावेरी जशी सरस तशीच गडकऱ्यांच्या एकच प्याला मधली सुधाकरच्या दारूच्या व्यसनामुळे श्रीमंतीतून गरिबीत आलेली, इतकी कि एकवेळच्या जेवणाची भ्रांत पडावी तरीही तितकीच कणखर स्वावलंबी सिंधू पाहणाऱ्यांच्या मनाला चटका लावून जाते अश्विनी एकबोटे नी साकारलेली शकुंतला,अश्रूंची झाली फुले मधली सुमित्रा barrister मधली राधक्काहि उत्तम होती नाटकाच्या शेवटी तिचा अभिनय पाहून वातावरण स्तब्ध होते  तेजस्विनी पंडितकीचक वध मधली क्रोधीत असहाय्य द्रोपदी,  सखाराम बाईनडर मधली बेदरकार नायिका छान वठवलीय स्पृहान" एकच प्याला" मधली फटकळ स्पष्टवक्ती गीता आणि चाहूल मधली आत्मनिर्भर स्वतंत्र बाण्याची नायिका छान रंगवलीय शरद पोंक्षे चा "नटसम्राट आप्पा बेलवलकर  ,barrister "मधला नायक  उत्तम अविनाश नारकरन  दुष्यंत ,"अश्रूंची झाली फुले" मधला प्रोफेसर विद्याधर  ,चिन्मय मांडलेकरन युधिष्ठीर ,चाहूल मधला नायक छान साकारलाय
  नांदी मधून नाटय निर्मितीच्या काळापासूनचे बदलते स्त्रीजीवन,स्त्रीची लाचारी ,आगतिकता जाऊन तिच्यात स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची आलेली क्षमता आत्मनिर्भरता ,नाटय निर्मितीचा काळ त्यानंतर उठलेले वादंग विशेषत: कीचक वधानंतर झालेले दंगे ban करण्यात आलेलं नाटक नाटय कलावंत गणपत पाटील ह्यांना झालेली मारहाण हा  इतिहास नांदी नाटकातून उलगडत जातो  महाकवी कालिदास ,आण्णासाहेब किर्लोस्कर ,खाडिलकर ,वि.वा.शिरवाडकर, राम गणेश गडकरी, विजय तेंडूलकर वसंत कानेटकर ह्या नाटककारांची नाटके आल्यानंतर त्यांना मिळालेला उत्तम प्रतिसाद  हजारोंच्या संख्येन झालेली गर्दी ,कमाईही तितकीच पण नाटय कलावंताला मिळणार तुटपुंज मानधन ह्या  सारयांची माहिती नाटका दरम्यान रसिकांना दिली जाते ह्या दिग्गज नाटककारांच्या समर्थ लेखणीतून निर्माण झालेल्या अजरामर नाटयकृती रसिकांना अजूनही तितक्याच आवडतात
थोडक्यात उत्तम नाटककारांची उत्कृष्ट नाटक ,ती सादर करणारे सशक्त कलावंत आणि अर्थातच लेखक दिग्दर्शक सारच अप्रतिम! दाद देण्या सारख! पण शंभर प्रयोगानंतर हे नाटक आता बंद करण्यात आलय स्टार प्रवाह वाहिनीने मात्र नांदी दाखवून रसिकांना जुन्या नाटकांचा रंजक प्रवास घडवून सुखद धक्का दिला नाटकाचा लेखक हृषीकेश जोशीन त्याला मिळालेल्या शिष्यवृत्तीतून नाटय निर्मितीच्या काळापासून आजवर झालेल्या सामाजिक सांस्कृतिक भावनिक बदलाच अभ्यासपूर्ण संशोधन करत नांदीची निर्मिती केलीय आणि आता त्याच पुस्तकही प्रकाशित झालय नांदी मुळे लोक पुन्हा जुनी नाटके आवडीन पाहतील ह्यात शंका नाही .    

No comments:

Post a Comment